शीघ्रकाव्य - चारोळ्यांच्या आरोळ्या : विषय ५ - "खाऊच्या आरोळ्या"

Submitted by संयोजक on 3 September, 2011 - 09:13

आधीच्या चारोळीत आपण आपल्या नावडत्या विषयावर आरोळ्या ठोकल्यात ना?

मग आता इथे संधी आहे ती आपल्या आवडत्या विषयावर आरोळ्या ठोकायला. जेवण हा विषय आपल्या सगळ्यांच्या आवडीचा. पण त्यातल्या त्यातही काही जास्त आवडणारे पदार्थ असतात. कोणाला पावभाजी आवडते, कोणाला श्रीखंड, तर कोणाला मॅगी!!!

कुरकुरीत काकड्या, लालभडक टोमॅटो
ताजे, लुसलुशीत ब्रेडचे स्लाईस
बटर अन चटणी चव वाढवाया
माझं व्हेज सँडविच व्हेरी नाईस!

काही का आवडेना, आपल्या आवडत्या पदार्थांची आठवण काढून आरोळ्या ठोकणार ना???

श्रीबालाजीचीसासू दिसताच
हसू येई चेहर्‍यावर
चारोळीला विषय तोंपासु
तर ताबा राहील का तोंडावर?

चला तर मंडळी, करा सुरूवात भोजनाला ......

******************************************

सर्वसाधारण नियम:

१. ही स्पर्धा नाही. हा एक खेळ आहे.
२. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०११' ह्या ग्रुपचे सभासद होणे गरजेचे आहे.
३. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा हा खेळ खेळू शकतो/ते, फक्त सलग दोन चारोळ्या देऊ शकत नाही.

******************************************

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

केळीच मऊशार, हिरवं हिरवं पान
त्यावर घातली भाताची मूद गोल
पिवळं धम्मक वरण, लिंबू नि तुपाची धार
घास घेताच सुखावला माझा सोल!

नारळाचं काढलं दूध निर्मळ
त्यात घातलं इटकुस्सं आगळ
लसूण-मिरचीचा खर्डा किंचित
सोलकढी चापा सुजन तात्काळ!

बासुंदी अस्सावी दाट सुगंधी
आटीव, खरपूस, मलईवाली
केशर पिस्ते चारोळ्यांची
वरतुनी सुंदरशी रांगोळी

तेलावर टाकले लसूण, खोबर्‍याचं वाटण दाट
आलं-लसूण, हळद, तिखट, मीठ माशांत मस्त मुरलं आत
सुरमईच्या तुकड्या ताज्या, तिखट कालवणात लागल्या तरंगू
गरमागरम कालवणासंगे खाते मी आंबेमोहराचा गुरगुट्या भात

सैपाकाचे माजवू नये स्तोम | काय गोम कळेना |
चव, रसना, तृप्ती | मोह मज सोडवेना !
देवा तूच तार | मायबापा आता |
वदनीकवळघेता | विसर मज पडो नये |

जे भावे करावे | ते प्रेमे अर्पावे |
स्वाद तो भरला | पदार्थांसी ओतप्रोत |
साधेसे तरीही | तृप्त गणगोत |
वदनीकवळघेता | विसर मज पडो नये |

Proud

चमचाभर लोण्यात परतलं कॉर्नफ्लोअर जरासं
त्यावर ओतलं कपभर दूध निरसं
उकळी आणली ढवळत त्या सॉसला व्हाईट
वर घातले चीज म्हणता झाला की हो दाट!! Lol

आई येताना चॉकलेट आणशील?
प्लस दोन्दोन लॉलीपॉप
घरी आल्यावर पिझ्झा करशील?
चिझ ऑन टॉप

आई उद्या शिर्रा कर
खूऽऽप किसमिस टाक
पाहता पाहता संपवून टाकु
यम्मीयम्मी , चट्टाक मट्टाक

जगातल्या सगळ्या वाहिन्यांवर साऽरखे स्वैपाक करतात, घरी मेला तोच
पार्सलीचेरीटॉपिंगलेंटिलसुप, कुठेतरी ठेवा पोच
पहातरी एकदा आरशात, सैपाकघरात, स्वप्नात
विचारुन पहा स्वतःला, हेच हवय आपल्याला एकुणात?

मनीमानसी रुजलेले पदार्थ चाराठ, अन आईचा हात
टीव्हीतल्या पदार्थांची चव, करील एकदा घात
रांधावाढाउष्टी काढा, पिढ्यानुपिढ्यांचा वारसा
शतकानुशतके बाईच्या जन्मांचा आरसा

दहीदूधतूपलोणी, सार्‍यांची उस्तवार
त्यात कुळाचारांचा भडीमार
त्यात पडली आणिक वर्ल्डक्युझिनची भर
चूलखंड ते इलेक्ट्रिक कॉईल, अखंड सुगरणज्वर

आई, दुधाला विरजण लावताना
विचार केलास कधी ?
आपली स्वप्नच विरजून
येतात कधीमधी

अगं आमच्या स्वप्नांचे दहीच झाले
तुमची होऊ देत बाई सत्य
आम्ही आमचीच लाकडे चुलीत सारली
तेव्हा असायचे गं दैत्य

ओके.. लास्ट टीपी. आय प्रॉमिस. Proud
मी कल्टी. तुम्ही लिहा

अगं अगं रैना नको होऊस अशी गंभीर
पाकातले लाडू करण्यास होऊ आपण खंबीर
साजूक तुपात भाजू रवा, घालून खोबरं आणि बदाम
पाकात मुरवून गट्टम करू, त्यातच आहे राम
Wink

वरण आमटीचा कंटाळा आला.

पिठल्याचाही आला वात.

मुळ्याचे काप घाला आणि करा

बोलाची कढी अन बोलाचा भात

टण्या म्हणतो लावा खाणावळ; झुगारूनी द्या गुलामगीरी
डीजे म्हणते व्हावे ऋजू; ओन्ली ताजे, हेल्दी, केलेले घरी
आम औरत को दोनो नामुंम्कीन, आ.औ आपल्या काठाकाठावर
समटाईम्स करिती पदार्थ सुंदर, आदळिती कधी वरणभाताचा कुकर

Light 1 Proud
टण्या आणि डीजे दोन्ही फिक्टीशियस आहेत. योगायोग समजावा अँड ऑल दॅट.

मामे धन्स गो माझ्या तर्फे चारोळी टाकल्या बद्द्दल.

मामी नी साधनाला बोंबिल तळलेले
लारा आणि ऐशूसाठी झणझणीत कोलंबीचे
दिनेशदांसाठी बिरडे नी फतफते
जिप्स्यासाठी आळूवड्या पण कालवणही थोडे टेस्ट केले.

काय च्या काय Lol

फ्रीजमध्ये अवघी आठवड्याची शिळाई
हलवायाच्या दुकानातील तमाम (असली!!) मिठाई
ऋजुता अंगी अवतरेल तर ताजी फळे खाई
हॉटेलांची सरते काही दिसातच नवलाई!!
(तर मग खाण्याचे ह्या काय करावे बा(भा)ई?? :हाहा:)

मोदक, करंजी नी पुरणाची पोळी
बेसनची गुंडाळली सुरळीची वडी
वडीवर ओतली राईची फोडणी
पहील्या ओळीशी जुळत नाही मांडणी Lol

खाऊन खाऊन सणावारी पोट झाले जड
काही पदार्थ कचरट काही होते होऽ वातड
सुगरणींच्या कवतिके रचली गेली गं कवने
खाऊच्या आरोळ्यांची बघा किती भरली पाने!!! Proud

सुरेख सुगंधी बासमती तांदूळ
लवंग, वेलची, खोबरे आणि गूळ
खमंग परतले साजूक तुपात
सुंदर चविष्ट नारळीभात

Pages