छोटे कलाकार- आनंदमेळा- आवडते घर - ईशान

Submitted by तृप्ती आवटी on 9 September, 2011 - 21:47

नावः ईशान
वयः सव्वा चार वर्षं
घरच्यांची मदतः टाचण्या लावून जोडा-जोड

खरं तर ईशानला आर्ट/क्राफ्टमध्ये अजिबात रस आणि/म्हणून/व्हाइस व्हर्सा गती नाही. पण आधी आम्ही गणपती बाप्पासाठी आसन वगैरे बनवले ते बघितलेले असल्याने आणि त्यातली गंमत (उर्फ रहाडा) माहिती असल्याने घराचे चित्र काढतोस का असे विचारल्यावर त्याने गणपती बाप्पासाठी घर बनवायचे आहे सांगितले. आलीया भोगाशी असावे सादर Happy

घर कसे बनवायचे, त्यावर घुंगरं कुठे लावायची ते त्याने सांगितले. कापाकापी, टाचण्या लावून जोडाजोडी मी केली. ग्लू फासणे, ग्लिटर शिंपडणे त्याने केले. मग फोटो पण स्वतःच काढला. बाप्पा आधीच गावाला गेल्याने त्यात क्ले पासून बनवलेली अळई फॅमिली बदली भाडेकरु घातली आहे. खेळातल्या डोनटमध्ये असलेला गोल वापरुन त्या तशा पर्रफेक्ट गोल अळया बनवल्यात. तर हे बाप्पासाठी बनवलेले घर:

bappa_home.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ईशान मस्त!! आवडलं Happy
बाप्पा आधीच गावाला गेल्याने त्यात क्ले पासून बनवलेली अळई फॅमिली बदली भाडेकरु घातली आहे. >> Biggrin

क्युट आहे. शाब्बास !!
टेकायला लोड वगैरे दिले आहेत. मज्जा आहे बाप्पाची.

घर कसलं गोड बनवलंय. विंड्चाइम्स लावलेलं, एअरकंडिशन्ड आहे. (शनीशिंगणापुरातलं वाटतंय.) Happy अळी फ्यामिली सही बनवलीय. फ्लुरोसंट रंगात आहे. तेव्हा कुणी रात्री धडपडणार नाही घरावर.

Pages