आनंदमेळा- छोटे कलाकार- माझे आवडते घर- नचिकेत

Submitted by पूनम on 2 September, 2011 - 04:44

'तुझ्या मनातलं घर कोणतं?' असं विचारताच, 'चॉकलेटचं!!' असं एका क्षणाचाही विलंब न करता उत्तर आलं. पण चॉकलेटचं घर करताना, त्याला डिंक लावून ते कागदाला/ पुठ्ठ्याला चिकटवावे लागेल आणि ते करताना अनेक खाद्यपदार्थांची नासाडी होईल, म्हणून साध्या कागदावरच मॉडेल करायचं ठरलं. हे 'मॉडेल' अ‍ॅज सच नसल्यामुळे कदाचित नियमांमध्ये बसणार नाही, तसे असल्यास, कळवा, मी काढून टाकेन इथून.

पाल्याचे नाव- नचिकेत
वय- आठ वर्षे
आमची मदत- साहित्य आणून देणे, कारंज्याचे 'तुषार' करणे. बाकी सर्व त्याचे त्याने केले आहे.

पूर्वतयारी-

sahitya.jpg

कामात असताना-

tayari.jpgtayari1.jpg

झालं घर करून-

चॉकलेटच्या डोंगराला, 'पर्क'ची नदी, डोंगराच्या पोटात चक्क मनुका आणि बेदाणे, 'पोलो'चा सूर्य आणि 'मार्बल्स'ची झाडं, बिस्किटांचे घर, 'जेम्स'ने भरलेला घराचा माळा, पक्षी आणि फुलंही 'जेम्स'ची, कारंज्यातही बेदाणे, तर पाणी श्रीखंडाच्या गोळ्यांचं आणि तुषार बडीशेपेच्या गोळ्यांचे! दारात उभा असलेला 'तो' आनंदात असेल नाहीतर काय! Happy

final.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

फारच सुरेख. मुळात आयडियाच इतकी तोंपासू आहे. आई आणि लेकाचं खरच कौतुक आहे - ते तोंडावर ताबा या मुद्द्याकरता. शाबास नचिकेत.

फारच गोड्ड आणि सुरेख.. Happy
पौर्णिमा, तुझा मुलगा भलताच पेशंट आहे, मी तर घर करता करता सगळं साहित्य मटकावून टाकलं असतं.. Happy

आवडलं मला तुझं घर.
इतका जबरजस्त कच्चामाल वापरताना तोंडावर ठेवलेला ताबा सॉलिडच आहे.>> अगदी..

मी तर घर करता करता सगळं साहित्य मटकावून टाकलं असतं.. >>> अगदी अगदी. नचिकेत, मस्त बांधलंयस तुझं घर ! Happy

Pages