युएस ओपन सिरीज - २०११

Submitted by Adm on 31 July, 2011 - 10:17

हार्ड कोर्ट मोसमातली युएस ओपन सिरीज चालू झाली आहे. ह्या सिरीजची सांगता युएस ओपन खुल्या डेनिस स्पर्धेने सप्टेंबरमध्ये होते.
http://www.usopenseries.com/

हा धागा युएस ओपन सिरीज २०११ तसेच युएस ओपन २०११ बद्दल चर्चा करण्यासाठी.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सिनसिनॅटीच्या स्पर्धेत पेस आणि भुपती जोडीने दुहेरीतलं विजेतेपद मिळवलय. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन !
दहा वर्षांनी ते ही स्पर्धा जिंकले. सेमी फायनलमध्ये अटीतटीच्या सामन्यात त्यांनी ब्रायन बंधूंचा पराभव केला !

लालू Lol जाऊ दे गं, धागे-बाहुल्ल्यामुळे होतं असं... Wink

ललिता.. :|

धागे-बाहुल्ल्यामुळे >>> Lol

अरे युएस ओपन सुरू होऊन दोन दिवस झाले की. अजून वॉर्म अप चाललाय का?

ड्रॉज प्रमाणे उपांत्यपूर्व फेरीत पुढीलप्रमाणे सामने अपेक्षित आहेत :
१) नोव्हाक जोकोव्हिच वि. गेल मॉन्फिल्स (बर्डिच याच भागात
२) रॉजर फेडरर वि. मार्डी फिश (जो विल्फ्रेस त्सोंगा आणि विंबल्डनात अनेक धक्कादायक विजय मिळावणारा बर्नार्ड टॉमिच इथे आहेत)
३) रॉबिन सॉडर्लिंग वि. अँडी मरे (डेल पोट्रो इथे आहे)
४) डेव्हिड फरेर वि. राफाएल नदाल

महिलांमध्ये गतविजेती आणि सध्याची ऑस्ट्रेलियन ओपन विजेती किम क्लायस्टर्स जायबंदी असल्याने स्पर्धेत नाही. फ्रेंच ओपन विजेती ली ना आणि विंबल्डन विजेती पेट्रा क्विटोव्हा या पहिल्याच फेरीत पराजित झाल्या आहेत. त्यामुळे सध्याची एकही ग्रँड स्लॅम विजेती मैदानात नाही.

एकही ग्रँड स्लॅम न जिंकता रँकिंगच्या शिखरावर राहाण्याचे व्रत यथासांग करण्यास कॅरोलिन वोझ्नियाकी समर्थ आहेत.
सेरेना विल्यम्सताईंना स्पर्धा जिंकण्यासाठी तिसर्‍या फेरीत व्हिक्टोरिया अझारेंका तर उपांत्यपूर्व फेरीत फ्रांसिस्का शियाव्होनी आणि उपांत्य फेरीत वोझ्नियाकीचा पाडाव करावा लागेल.
तिसर्‍या विभागात किटोव्हाच्या पराभवामुळे मारिया शारापोव्हाचे काम सोपे झालेले आहे.
चौथ्या भागात मानांकन नसलेल्या व्हीनसताईना व्हेरा झ्वोनोरेवा, समांथा स्टोसर, मारियन बार्टोली यांचा सामना करावा लागेल.
मिर्झाबाईंनी पहिला सेट टायब्रेकरमध्ये जिंकल्यावर उदार अंतःकरणाने शहर पीरला पुढच्या फेरीत जाऊ दिलेले आहे.

दुहेरीत पेसभूपती आणि बोपण्णाकुरेशी दुसर्‍या फेरीत दाखल.. आज देवबर्मनची मरे बरोबर मॅच आहे..

मयेकर आणि हिम्या धन्यवाद हा बाफ जिवंत ठेवल्याबद्दल !
काल मी पहिली मॅच पाहिली.. सेरेनाताई जबरदस्त खेळल्या.. ना ली, क्विट्टोवा आणि किमच्या अनुपस्थित सेरेनाला फूल चान्स असेल. शारापोव्हा, वॉझनियाकी ह्यांनी काही चमत्कार केले तर आनंदच होईल. पण त्या काही करत नाहीत.

मेन्स ड्रॉत मजा येणार बाकी !

ब्रेकला की दुसर्‍या सेटमध्ये.

पग्याची फेवरेट बार्टोली जातेय की काय.

व्हीनस दुखापतीमुळे बाहेर.. म्हणजे तर सेरेनाला फुल स्कोप... पण शारापोव्हा जबरदस्त फॉर्म मध्ये आहे..

फरेरो वि. मॉन्फिल्स मॅच बघितली.. जबरी झाली एकदम ! फरेरो अजूनही इतका चांगला खेळू शकतो हे पाहून छान वाटलं.

ब्रायन ब्रदर्स पहिल्याच फेरीत बाहेर?
शारापोव्हा गेली. इव्हानोविच अजून आहे. आता सामना सेरेनाशी .
टिपसर्व्हिच आणि फेरेरो महारथींचा पाडाव करून आता समोरासमोर.

रात्री ८:३० टेन स्पोर्ट्स
अमेरिकेतल्या रात्रीच्या मॅच्स भारतात पहाटे /भल्या सकाळी.

सेरेना इव्हानोविचला कच्ची खाणार ! काल इव्हानोविचने भयंकर पाट्या टाकल्या स्टीव्हन्स विरुद्ध.. स्टीव्हन्सचा अनुभव कमी पडला.. नाहितर नक्की जिंकली असती ती..

जोको- डेव्हिडेंको मॅच चांगली झाली.. तीन सेटर असली तरी फार सोपी नव्हती जोकोसाठी..
आधी सेरेना-अझारेंका चा दुसरा सेट जबरदस्त झाला ! ५-३ असताना अझारेंकाने तब्बल ४ मॅच पॉईंट्स वाचवत तो टायब्रेकरला घातला... दोघींनीही जोरदार ग्राऊंडस्ट्रोक्स मारले.

त्सोंगा-व्हर्डास्को पण चांगली झाली... त्सोंगापण एकदम फॉर्ममध्ये वाटतोय...

आज झ्वोनारेव्हा लिसिस्की मॅच चांगली होणार असं वाटतय..

काल नालबांडियनने घाबरवलं. पहिला सेट सॉलिड.
टेन स्पोर्ट्स मुर्दाबाद. राफाच्या मॅचचा पहिलाच सेट दाखवून पेंग-पेनेट्टाकडे वळले.

हो.. नालबांडियन पाहिला सेट चांगला खे़ळला..

आत्ता त्सोंगा फिश ची मॅच अत्यंत भारी झाली ! दोघही जबरी खेळले.. त्सोंगा पाहिलेल्या दोन्ही मॅचेसमध्ये सही खेळलाय एकदम..

आधी ज्योको आणि डोल्गोपोलोव्हचा पहिला सेट आणि त्याचे टायब्रेकर मस्त झाले.. ! ज्योको तो टायब्रेकर जेमतेम जिंकला..

सेरेना अपेक्षाप्रमाणे किरकोळीत जिंकली...

काल टिव्हीवाले लिसिस्की झ्वोनारेव्हाला घाम गाळायला लावणार असा अंदाज व्यक्त करत होते.. प्रत्यक्षात झ्वोनारेव्हा फारच किरकोळीत जिंकली...

स्क्विव्होनी हरली.. आता सेरेना आणि हे पोस्ट लिहित असे पर्यंत कुझनेत्सोवा सोडता कोणीच ग्रँडस्लॅमविजेती उरलेली नाहीये..

कुझनेत्सोवा पण हारली.. म्हणजे आता फक्त सेरेनाच राहिली... जर काही गडबड झाली नाही तर यंदा तीच विजेती होण्याचे चान्सेस... महिलांमध्ये पहिल्या २ सीडेड खेळाडू बाकी त्यांच्या नंतर डायरेक्ट नंबर ९ आणि १०..

हातातली मॅच वाईट खेळून कशी घालवावी ह्याचं उत्तम उदाहरण म्हणजे कालची कुझनेत्सोवाची मॅच...
पहिल्या सेटचा टायब्रेकर इतकं उच्च खेळून जिंकल्यावर आणि दुसर्‍या सेटमध्ये ४-१ अशी आघाडी असताना दुसरा सेट ७-५ आणि तिसरा ६-१ घालवणं म्हणजे कहर आहे ! अतीजास्त अन फोर्स्ड एरर केल्या.. वॉझनियाकी जिंकली म्हणण्यापेक्षा कुझनेत्सोवा हरली असं म्हंणण जास्त योग्य आहे.

आर्थर अ‍ॅशवरचा कालचा दिवस फेडररची शेवटची मॅच वगळता सि-सॉ झाला एकदम !
पुढच्या फेरीत आता फेडरर वि. त्सोंगा... आज "ली"इफेक्ट ने पाऊस पडला तर दोघांनाही चांगली विश्रांती मिळून जोरदार मॅच होईल...

Pages