युएस ओपन सिरीज - २०११

Submitted by Adm on 31 July, 2011 - 10:17

हार्ड कोर्ट मोसमातली युएस ओपन सिरीज चालू झाली आहे. ह्या सिरीजची सांगता युएस ओपन खुल्या डेनिस स्पर्धेने सप्टेंबरमध्ये होते.
http://www.usopenseries.com/

हा धागा युएस ओपन सिरीज २०११ तसेच युएस ओपन २०११ बद्दल चर्चा करण्यासाठी.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अबाबाबाबाबाबाबा..........
साला राफा काय चिवट आहे!!!! जोको थकल्यामुळे त्याचे शॉट्स पहिल्या इतके पावरफुल नाही दिसत आहेत. त्यात त्याच्या पाठीला काही झालं तर मग अवघडच आहे. राफा कसला बिल्ट आहे. वेट लिफ्टींगचा फायदा होणार त्याला नक्की. अजूनही शिस्तीत उभा आहे कोर्ट वर, हु नाही की चू नाही.

श्या.. ब्रेक परत.. !

ज्याकोने अचानक त्याचा खेळ स्लो केला.. त्यामुळे राफाची लय पण जरा जरा गंडली दुसर्‍या आणि तिसर्‍या गेममध्ये.

>> ज्याकोने अचानक त्याचा खेळ स्लो केला.. त्यामुळे राफाची लय पण जरा जरा गंडली

मी या सेटमधले गेम्स बघितले नाहीत पण हे काही पटत नाही ..

नक्की काय पटत नाही ? ज्योकोने गेम स्लो केला हे, राफाची लय गंडली हे, की ज्योकोने गेम स्लो केल्याने राफाची लय गंडली हे ? Happy

कॉमेन्टेटर म्हणतात तसं पुढचा इन्जुअर्ड असेल दुसरा खेळाडू फक्त बॉल तिकडे ढकलायचा विचार करू शकतो. म्हणून मग लय गेली असेल बहुतेक..

पण दोघे थकले असावेत आता. ४ तास झाले. सर्व्हिस करताना कॉमेन्टेटर म्हणतायेत की एवढी हळू का करतायेत सर्व्हिस. च्यायला ४ तास झाले खेळतायेत, ते कायम जोरदार सर्व्हिस कशी करतील..

ओके.. समोरच्या बॉलच्या स्पीडवर पण आपल्या रिटर्नचा स्पीड अवलंबून असतो.. आपण हळूहळू त्या स्पीडला युज्ड टू होत जातो.. त्यामुळे समोरच्याने जर अचानक स्पीड, वाढवला किंवा कमी केला तर आपल्याला पण अकॉर्डींगली बदल करावा लागतो. तसं झालं नाही तर आपल्या खेळाची लय बिघडू शकते. तसं झालं असं मला वाटलं कारण ज्योकोच्या शॉट्सचा स्पीड कमी झाला.. त्याने ग्रंटींग पण बरच कमी केलं आणि नदालचे अचानक लाँग जायला लागले.. हे मला थोड्याफार वाचनातून समजलेलं ज्ञान. चुकीचं असू शकतं.. Happy

५-१ Sad

फार जबरी मॅच.. Happy
ज्योकोचे अभिनंदन.. चमन कुठे दिसत नाही तो.. Wink
हार्ड लक राफा... Sad

राहूल नक्की.. लेफ्ट ओव्हर मिठाई घेऊन येतो तुझ्यासाठी... Proud

जिंकला जोको. महान!! Happy

कालच्या फेडररच्या मॅचमध्ये जसं फेडरर अचानक तिसर्‍या चौथ्या सेटमध्ये एनर्जीलेस झाला तसंच नदालचं झाल्यासारखं वाटलं.

पण फार मजा आली. पहिल्यांदा नदालच्या मॅचमध्ये मला इतकी मजा आली. दोघे तोडीस तोड होते.

जोकोने म्हणे ग्लुटेन फ्री डाएट घेतलेय यावर्षी.. कॉमेन्टेटर सांगतायेत.

अभिनंदन जोको आणि त्याचे समर्थक !!! Happy जबरी मॅच झाली. काय रॅलिज खेळले. वा वा !!!

मॅचवर फोकस करायचं सोडुन तुम्ही लोकं इथे का की बोर्ड बडवत बसले ? Uhoh

जोकोने म्हणे ग्लुटेन फ्री डाएट घेतलेय यावर्षी >>> व्हिगन डायेट घेतले त्याने आणि होमिओपथीची ट्रीटमेंट. तू जेव्हा आईच्या हातचं गरम जेवण रोजच्या रोज चापत होतास ना तेव्हा आमची चर्चा झाली ह्यावर. तिसर्‍या सेटच्या शेवटी हा व्हेजिटेरियन दुखणेकरी दमुन हारणार असं वाटत होतं. पण त्याच्यापेक्षा नादालच थकला असं वाटलं चौथ्या सेटमध्ये.

पहिल्यांदा नदालच्या मॅचमध्ये मला इतकी मजा आली >>>> कौन बोला बे ? टॉर्च मार XXपे Proud

कोणी नोटिस केल का, ज्या दोन मॅचेस जोको हरला २०११ मध्ये त्याच्या आधीच्या मॅचेस विड्रॉ किंवा अर्ध्याच झाल्या होत्या.

कौन बोला बे ? टॉर्च मार XXपे >> अगं गंमत केली.. Proud

बुवा मरे फॅन आहेत की काय? 'ये सुननेसे पहले धरती फट क्यों नही गयी' असे डायलॉग मला आठवत आहेत. Proud Light 1

अहो सुमंगलताई, ह्या स्पर्धेमध्येसुद्धा ती टिपसर्व्हिच विरूद्धची मॅच अर्धवटच सोडली होती. तरी जिंकला पुढे तो. त्यामुळे असा काही पॅटर्न नाहीये.

फॅन वगैरे नाही रे भाऊ, त्यात फिजीकल अबिलिटी आहे नदाल सारखी येवढच म्हणत होतो. स्वतःच्या चुका कमी करता आल्या तर भारी खेळेल एकदम.
राफाचा काल लैच कचरा केला जोको नी! मागच्या वर्षी खेळत होता चांगला पण ह्या वर्षी एकदम कमांड मध्ये वाटला!

राफा शेवटच्या गेममध्ये चक्क ब्लँक झाला होता (शेवट्चे ३ स्ट्रोक्स). त्याने बॉलला अ‍ॅप्रोच पण केला नाही. मॅचतर छान होतीच पण इथल्या कमेंटस पण छानच.

आता पुढची कुठली आहे ऑस्ट्रेलियन ओपन ना? ती कधी सुरु व्हायची?
पुढे डेविस कप आहे असं ऐकलं एक दोन वेळा कॉमेंटटर्स कढून. ते ही बघावं लागेल कधी आहे ते.

राफाला इतकं वाईट खेळताना आणि वागताना कधी पाहिलं नव्हतं.
फेडररचं राफासमोर जे व्हायचं, ते जोकोसमोर राफाचं झालं.
संपूर्ण सर्धेत राफाने सर्व्ह अतिशय सांभाळून केली. हे बाकीच्यांसमोर चालेल. जोकोसमोर नाही.
जोकोला कोई मिल गया तला जादू भेटलेला दिसतोय. त्याची पॉवर कायम राहील का?

काय जबरी फायनल झाली... शब्दच नाहीत.. दोन वर्षापुर्वीची रॉडिक्-फेडरर मधली झालेली जबरी विंबल्डन फायनल बघीतल्यानंतर वाटले होते की काय अजरामर ग्रँड स्लॅम फायनल बघायला मिळाली.. पण ही फायनल त्याच्यापेक्षा सरस होती... खर म्हणजे मॅच सुरु होण्याआधी अजुन एक राफा-फेडरर फायनल बघायला मिळणार नाही याची राहुन राहुन खंत वाटत होती पण ही फायनल राफा-फेडरर यांच्यात झालेल्या अजरामर फायनल्सइतकीच उत्कंठावर्धक व रोमांचक झाली.

बघताना डोळ्यावर विश्वासच बसत नव्हता की ३०-३० शॉट्सच्या रॅलीज चालु आहेत..व १५-१६ मिनिटांचा एक एक गेम होत आहे. त्यांच्या प्रत्येक रॅली मधे एकापेक्षा एक अमेझिंग शॉट्सचे उत्तर प्रत्युत्तर बघायला मिळत होते. जोकोचे ड्रॉप शॉट्स,बॅकहँड रिटर्न्स व क्रॉस कोर्ट व डाउन द लाइन शॉट्स खरच अमेझिंग होते.. द गाय हॅज इंप्रुव्ह्ड हिज गेम ट्रिमेंडस्ली... हि थरवली डिझर्व्ह्ड टु विन धिस फायनल.. हे मी राफा व फेडररचा निस्सिम चाहता असुनही म्हणत आहे.. आणि तो जर असाच खेळत राहीला तर पुढची ४-५ वर्षे तो अशीच या वर्षीसारखी ग्रँड स्लॅम विजेतेपद लुटत राहील यात शंका नाही...

अशी फायनल किंवा अशी मॅच बघायला मिळणे हे म्हणजे आपले भाग्यच म्हटले पाहीजे.. काय तो स्टॅमिना.. काय ती जिद्द.. काय ते कौशल्य... काय ती तडफ.. अरे .. असा सामना खेळल्याबद्दल तमाम टेनिसप्रेमींनी या दोघांना वाकुन मानाचा मुजरा केला पाहीजे..

महिलांच्या फायनलमधे सरिनाला हरताना बघुन खुप खुप आनंद झाला.. तिला वाटले की तिच्या नावाला घाबरुन स्टाउजर तिला फायनल बहाल करेल. अंपायर बरोबर असुनही तिला अद्वातद्वा बोलुनही तिला पुढच्या कुठल्याही टुर्नामेंटमधे बॅन केले नाही याचा खेद वाटतो. आणि ती अंपायरला त्या दिवशी सांगत होती.. की ती कधीच कंप्लेट करत नाही.. वा रे वा... २ वर्षापुर्वी हिच एका लाइनवुमनला तिने फुट फॉल्ट दिल्यावर म्हणाली होती ना... की आय विल शव्ह धिस बॉल डाउन युअर थ्रोट? शि इज रिअली अ डिसग्रेस टु द गेम!

Pages