जालावरच्या/ पुस्तकातील पाककृती आणि आवडते शेफ्स

Submitted by _मधुरा_ on 11 August, 2011 - 13:40

मला पाककृत्या वाचणं मनापासून आवडतं. अगदी गोष्टींची पुस्तकं वाचल्यासारखं!. जालावर रेसिप्यांचे फोटो पाहण्यात, त्या वाचण्यात, पुस्तकांच्या दुकानात अशी पुस्तकं बघण्यात, मी तासन तास घालवते. कित्येक नवीन गोष्टी करून बघते, नवीन काहीतरी शोधायचा प्रयत्न करते. असो.
तर आपल्याला बरेचदा,काही गोष्टी खूप आवडून जातात. काहींच्या ब्लॉगस् वर, युट्युब च्या चॅनल्स वर आपण नियमीत डोकावतो. ते शेफ आपलेसे वाटतात. त्यांच्या टीप्स मनापसून आपण फॉलो करतो.
बरेचदा आपल्याला ती रेसिपी आहे तशी आवडते तर कधी आपण थोडे बदल करतो. कधी अजून लोकांना सांगावीशी वाटते. आपण मनातल्या मनात त्याला ५ * रेटींग देऊन टाकतो. तर काहीवेळेस असं होतं की फोटो बघून आपण करायला जातो आणि ओम फस होतं.
तर अशाच गोष्टींची चर्चा करूयात. तुमच्यामुळे बाकीच्यांना नवीन प्रकारांची/ शेफ्स ची ओळख होईल.
( तसहीं ह्या ग्रुप मध्ये एकही धागा शेफ्स वर सापडला नाही )
( शेफ साठी चांगला मरठी शब्द कोणता? आणि शीर्षक काय बरं करावं ?)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तर धाग्याची idea मला रवा डोसा मुळे सुचली. माबो वरच्या खूप रेसिपी मी मागे करून बघीतल्यात. आणि ते चांगलेही झालेले, पण संजय थुम्मा यांची रेसिपी - खास करून बॅटर शिंपडून घालायची पद्ध्त खूप आवडली.
http://www.youtube.com/watch?v=7FDbSvQ8wGo
तो पर्यंत माझे, बॅटर आतून बाहेर, बाहेरून आत, उंचावरून वै घालण्याचे सगळे प्रकार करून झालेले Proud

सध्या मी बरेचदा हरपाल सिंग सोखीच्या रेसिपीज फॉलो करते. साऊथ च्या रेसिपीज सोडल्या तर थुम्मा बिग नो नो.

टिव्हि पाहण शक्य होत नाही. लग्ना आधी अन्नपुर्णाच्या पुस्तकातील जवळ जवळ पाऊण पुस्तकातील रेसिपीज चे पदार्थ केले आहेत.

मायबोलीवरील दिनेशदा आणि इतर काही जणांच्या रेसिपीज फॉलो करते. तसे लहान पणापासुन अन्नपुर्णा हे पुस्तक चाळत आलेय.

लग्नानंतर वेगवेगळी मासिकं आणि प्रतिभा कोठावळे यांच परफेक्ट रेसिपीज हे पुस्तक फॉलो केले. अजुन काही गोष्टिंकरीता करते.

मायबोलीवर आल्यापासुन दिनेशदा तसेच इतरजणांच्या बर्‍याचश्या पाककृती आत्मसात केल्या आहेत.

अन्नपुर्णाच्या पुस्तकातील जवळ जवळ पाऊण पुस्तकातील रेसिपीज चे पदार्थ केले आहेत.>>>
ज्युली आणि ज्युलिया सारखं जागू आणि अन्नपूर्णा Happy

http://www.epicurious.com/recipes/food/views/Persian-Love-Cake-232273
ही माझ्या सध्याच्या टु-डू लीस्ट मध्ये सगळ्यात वर आहे. कधी सामान आणायला वेळ होणारे, आणि कधी मी करून पाहू शकणारे देव जाणे. पण असले एडीबल गुलाब करावेसे वाटत आहेत.

मागच्या आठवड्यामधे एक रेसिपी शोधत असताना ही साइट मिळाली
http://www.4thsensecooking.com/
मला या साईट्वरील फूड फोटोग्राफी खुप आवडली ,
डेकोरेशनच्या मस्त आइडीया आहेत तिथे
एक दोन लिंक देते त्याच्या
१.http://www.4thsensecooking.com/2011/02/jelly-boats.html
२.http://www.4thsensecooking.com/2011/03/bloggy-birthday-two-years-two-lak...

मी पण थुम्मा च्या रेसीपीज बघते काही काही छान असतात.
आणि चकली चा ब्लॉग पण वाचते, त्या पण रेसीपीज मस्त होतात http://chakali.blogspot.com/
आणि पुस्तक म्हणजे रुचिरा (ओगले आजींच) Happy

मधुरा, धागा सार्वजनिक करशील का? >> कसं करायचं ?
मन्जु मावशी >>>
यांनी दाखवलेली जिलेबी ( यीस्ट घालून, झटपट ) मी करून बघीतलेली. पण ब्रेड तळून पाकात घातल्या सारखी लागत होती. काय माहीत काय चुकले, पण मी तंतोतंत पाळलेली.

"हमखास पाकसिद्धी" पुस्तक सौ. जयश्री देशपांडे याचं . सगळ्या परफेक्ट रेसिपीज.
vegi आणि non veg रेसीपीज छान आहेत.

चांगला धागा. धन्यवाद.
मी सगळे फेव मध्ये टाकते पण तिथे इतक्या लिंक आहेत की फार शोधायला लागते.

कुणी मिनोतीच्या ब्लॉगची पण लिंक टाकून ठेवेल का?

चकलीचा ब्लॉग, इथल्या काही रेसिपीज, ऑलरेसिपीज.कॉम एवढ्यात माझी गरज भागते. तसंही मला जरा यातला सोस आणि अक्कल दोन्ही कमी आहे.
माझ्या आयुष्यातलं मी प्रेमाने वाचलेलं आणि अनुसरलेलं पहिलं आणि एकमेव पुस्तक म्हणजे बीएमेमने प्रकाशित केलेलं मॉम्ज किचन http://www.bmmonline.org/momskitchen
लिंकवर आहे ती नवीन आवृत्ती असावी.
खास मराठी स्टुडंटसना अमेरिकेत स्वतःचं कुकींग करता यावं यासाठी म्हणून लिहिलेलं हे पुस्तक तुला गिफ्ट असं म्हणत माझ्या मामीआज्जीने हे पुस्तक हातात ठेवलं. ९८ च्या ख्रिसमसमधे.
खरोखर यात अगदी बेसिक रेस्प्या आहेतच पण ठार वरणभाताचा कुकर कसा लावायचा? फोडणी कशी घालायची? भारतातल्या कुठल्या वस्तूला अमेरिकेतील कुठली वस्तू पर्यायी असू शकते? कॅप्सिकम, लेडीज फिंगर अश्या गोष्टींना अमेरिकेत काय म्हणतात? अशी सगळी अगदी साधी सोपी माहिती त्यात आहे. वरणभाताचा कुकर आणि फोडणी येत नाही इतका उजेड नव्हता माझा मी तिकडे गेले तेव्हा पण तरी बाकीच्या रेसिपीज अगदी साध्या सोप्या पद्धतीने आणि नेहमी स्वैपाक न करणार्‍याला भिती वाटणार नाही अश्या पद्धतीने दिलेल्या आहेत त्यात.
दुर्दैवाने हे पुस्तक आता माझ्याकडे नाही. माझी कॉपी मी परत यायला निघाले तेव्हा 'अब तुझे क्या जरूरत है?' असं म्हणत ढापली कुणीतरी. Happy

"हमखास पाकसिद्धी" पुस्तक सौ. जयश्री देशपांडे याचं . सगळ्या परफेक्ट रेसिपीज. >> येस.... मी आत्तापर्यंत १०-१२ तरी गिफ्ट म्हनून दिल्य्यात नविन लग्न झालेल्यांना. लोक पण आवर्जुन आवडले पुस्तक म्हनुन सांगतात. माझ्याकडच्या पुस्तकाची तर पोथी झालीये..

हो मी पण काहि वेगळ करायच म्हट्ल.. तर ह्या सगळ्या रेसिपी साईटवर जाते.. चकलि , मंजुलाताई, माबो , वारेवाह .. अजुन एक आहे... http://madhurasrecipe.com/ ह्या वर पण खुप मराठी रेसिपिच आहेत..

चांगला धागा.
मला आवडणार्‍या साइट्स म्हणजे तरला दलाल, आईज रेसिपी, सैलूज किचन, मंजुलाज किचन, संजीव कपूर, निशा मधुलिका इत्यादी वर दिलेल्याच.

त्या खेरीज ह्या साईट्सवरील रेसिपीजही चांगल्या आहेत :

अमूल प्रॉडक्ट्स वापरणार्‍यांनी बघाव्यात अशा रेसिपीज : http://www.amul.com/m/recipes

मल्लिका बद्रिनाथ, ऑल टाईम फेवरिट : http://www.awesomecuisine.com/authors/8/Mallika-Badrinath

मधुर जाफरी च्या रेसिपीज : http://www.bbc.co.uk/food/cuisines/indian

मस्तच , <<जालावर रेसिप्यांचे फोटो पाहण्यात, त्या वाचण्यात, पुस्तकांच्या दुकानात अशी पुस्तकं बघण्यात, मी तासन तास घालवते. >> मी पण ...

रेसिपी करण्याची , त्याहून जास्त बघण्याची आवड मला संजीव कपूर यांच्या खाना-खजाना कार्यक्रमामुळे झाली.

मायबोलीवर दिनेशदांच्या रेसिपि मला खुप आवडतात, अगदी साध्या , सुटसुटीत ,आणि लागणार सामान सहज मिळणार असत.

मायबोलीवर मिनोती यांचा ब्लॉकपण छान वाटतो.

मिसळपाव साईटवर गणपा करून आयडिच्या रेसिपी पण आवडता, विशेषतः क्रमाक्रमाने फोटो असतात म्हणून समजायला सोप्या जातात.

ह्या अजुन काही
http://onehotstove.blogspot.com/
http://cooks.ndtv.com/

या शिवाय
http://finelychopped-k.blogspot.com/

बूक्स मध्ये माझ्याकडे असलेल्यांपैकी काही -
रुचिरा दोन्ही बुक्स
अन्नपुर्णा
सुग्राससिध्धी

अरे वा, चक्क माझं नाव इथे !! खुप आनंद झाला.
मला स्वतःला ओगले आजींचे लेखन आवडते. (त्यांची दोन्ही पुस्तके जवळजवळ तोंडपाठ आहेत.)
मंगला बर्वे यांचे अन्नपुर्णा पण आवडते (इतके वय झाले तरी त्या अजून मोदक वळतात असे त्यांच्या जावईबापूंनी सांगितले होते.)

आता नेटवर जे व्हीडीओज आहेत ते जास्त आवडतात. मंजूळाच किचन म्हणून एक सिरिज आहे.
वसुमति धुरु यांचे अन्नाविषयी सर्व काही असे एक पुस्तक अलिकडेच विकत घेतले. त्यात त्यांनी पारंपारिकच पदार्थ लिहिलेत, पण प्रत्येकाचे पोषणमूल्य आणि कुणाला चालेल, कुणाला चालणार नाही (पथ्य / कुपथ्य ) सविस्तर लिहिलेय.

दुर्गाबाईनी, बिनिवालेनी जे अन्नाविषयी लेखन केलेय, त्याचा तर मी फॅनच आहे.

मिसळपाव साईटवर गणपा करून आयडिच्या रेसिपी पण आवडता, विशेषतः क्रमाक्रमाने फोटो असतात म्हणून समजायला सोप्या जातात>>

हा त्यांचाच ब्लॉग आहे
http://kha-re-kha.blogspot.com/

लक्ष्मीबाई धुरंधर यांचे पुस्तक पण एक नंबर आहे. पण त्यात बर्‍याचशा कृती सामिष असल्याने मला त्याचा उपयोग नाही. मात्र पुस्तक व कृती अफलातून आहेत एकेक.

वसुमती धुरू, मालती कारवारकर यांची पुस्तकेही छान आहेत.

अकु, त्या पुस्तकाला आता साहित्यिक मूल्य आहे असे वाटते. करण्यापेक्षा वाचायलाच मजा येते.
लिबिगसाहेबांचे सूप, सोकरीबाई यांची बदामाची थाळी, काशीताई किर्लोस्करांचे चिरोटे... अशी मस्त नावे आहेत.

Pages