जालावरच्या/ पुस्तकातील पाककृती आणि आवडते शेफ्स

Submitted by _मधुरा_ on 11 August, 2011 - 13:40

मला पाककृत्या वाचणं मनापासून आवडतं. अगदी गोष्टींची पुस्तकं वाचल्यासारखं!. जालावर रेसिप्यांचे फोटो पाहण्यात, त्या वाचण्यात, पुस्तकांच्या दुकानात अशी पुस्तकं बघण्यात, मी तासन तास घालवते. कित्येक नवीन गोष्टी करून बघते, नवीन काहीतरी शोधायचा प्रयत्न करते. असो.
तर आपल्याला बरेचदा,काही गोष्टी खूप आवडून जातात. काहींच्या ब्लॉगस् वर, युट्युब च्या चॅनल्स वर आपण नियमीत डोकावतो. ते शेफ आपलेसे वाटतात. त्यांच्या टीप्स मनापसून आपण फॉलो करतो.
बरेचदा आपल्याला ती रेसिपी आहे तशी आवडते तर कधी आपण थोडे बदल करतो. कधी अजून लोकांना सांगावीशी वाटते. आपण मनातल्या मनात त्याला ५ * रेटींग देऊन टाकतो. तर काहीवेळेस असं होतं की फोटो बघून आपण करायला जातो आणि ओम फस होतं.
तर अशाच गोष्टींची चर्चा करूयात. तुमच्यामुळे बाकीच्यांना नवीन प्रकारांची/ शेफ्स ची ओळख होईल.
( तसहीं ह्या ग्रुप मध्ये एकही धागा शेफ्स वर सापडला नाही )
( शेफ साठी चांगला मरठी शब्द कोणता? आणि शीर्षक काय बरं करावं ?)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त धागा. मलाही नवीन रेसिपी करायला आवडतात.Ndtv good times चे कुकींग सेक्शन छान आहे.
नवीन नवीन छान साईट्स देणार्‍यांना मनापासून धन्यवाद.

मधुरा खरच तु चांगला धागा काढलास ह्या धाग्यामुळे बर्‍याचशा चांगल्या चांगल्या रेसिपीजच्या लिंक इथे मिळतील.

_मधुरा_ ही युट्यूब वर रेसिप्या दाखवणारी मधुरा नाही ना ???
कधी कधी तिच्या रेसिप्या बघितल्या जातात.

आमच्या घरचे बरेच पदार्थ मायबोलीवरच्या रेसिप्या वाचून बनवले जातात.
दिनेश, तुमच्या रेसिप्या करायला सोप्प्या पण टेस्टी आणि एकदम नीट प्रमाणं दिलेली असतात असा फिडबॅक आहे. Happy
लालूच्या रेसिपीने बटाटेवडे आणि मिसळ केली होती. मिसळ खूपच भारी झाली होती.
जागूच्या रेसिप्यापण खूप आवडतात. काहीही हायफाय न करता घरात नेहमी असणारे घटक वापरूनच केल्या पदार्थांचे एकदम तोंपासू फोटो असतात !!! एकदा एक फिश करी केली होती जागूच्या रेसिपीने..
अंजलीच्या आणि इतरांच्या पार्ल्यात मिळणार्‍या काही काही टिप्स पण भारी असतात. e.g. सॉसेजेस फ्राय करून पास्त्यात घालणे, ग्रील बद्दलच्या टीप्स किंवा मृ ने दिलेली सन ड्राईट टमेटोंची चटणी.
आणि शिवाय पन्ना ही आमची कायमस्वरूपी फूड कंसल्टंट आहे. बर्‍याच अश्या गोष्टी आहेत ज्या मी एकटा इथे असताना कधी विकत आणायचीही वेळ आली नव्हती. त्यामुळे ब्रॅंड, सबटाईप्स, कुठे चांगलं मिळेल अशी माहिती हवी असेल किंवा कधी डिजास्टर रिकव्हरी करायची वेळ आली की आम्ही पन्नाला फोन करतो. Happy

मेधा(शोनू)ने असाच एक धागा काढला होता ना आधी??

मी वर आलेल्या वेबसाईट्स व मायबोलीच ट्राय करते. कुकबुक्स कधीतरी..

>>>>>_मधुरा_ ही युट्यूब वर रेसिप्या दाखवणारी मधुरा नाही ना ???
ती मी नव्हेच!
>>>>मेधा(शोनू)ने असाच एक धागा काढला होता ना आधी??
हो का? तत्सम काही दिसलं नाही गं मला.

दिनेश, तुमच्या रेसिप्या करायला सोप्प्या पण टेस्टी आणि एकदम नीट प्रमाणं दिलेली असतात असा फिडबॅक आहे>>>> १००% अनुमोदन. हमखास रेसिपि. दिनेशदा, मी एक सहा वर्षापुर्वी तुम्हाला विचारले होते कि ४- ५ वर्ष वयाच्या मुलांना शाळेत रोज काय खावु द्यावा. तुम्हि दिलेले options खरच इतके उपयोगी पडले कि मुलगा आजहि कधी कधी मला सांगतो कि ते तु मला केजी आणि १लित असताना tiffin द्यायचिस ना तसा परत देत जा कधीतरी.

जागुताई - तुम्हि दिलेले माश्याचे प्रकार - काय सांगु ? कित्येक मासे तर तर मी (मीच काय साबाना पण माहित नाहित) पहिल्यादा बघितले. धन्य माते. नको तो विषय अजुन महिनाभर काहि खायचे नाहिये.

अन्जली Lol म्हणुन मी सध्या पुढचे प्रकार टाकायचेही थांबवले आहेत. आता श्रावण झाल्यावर टाकेन पुढचे मासे.

माझ्या साठी मायबोली ईक्वल टु रेसिपी फाईंडर आहे गेल्या ८ वर्षात अनेक रेसिपी आणि टिप्स फॉलो केल्यात ९० % वेळा पदार्थ जमलाय.(चुकलाच तो माझ्यामुळेच असतो)
शिवाय मिनोतिचा ब्लॉग, चकलीचा ब्लॉग्,खारेखा चा ब्लॉग जागुची रेसीपी लिहण्याची आणि स्टेप बाय स्टेप फोटोसहित पदार्थ देण्याची पद्धत आवडते.दिनेशदांच्या रेसिपी आवडतात.

अन्जलि,
दिनेशदांनी तुला मुलाच्या डब्यासाठी दिलेले options शेअर करु शकशील का? मला पण फार प्रश्न पडतो डब्यात रोज काय द्यायचे.

अन्जलि. किती जूने आहे ते सगळे. अजून लक्षात आहे, याचा फारच आनंद झाला.
सानिका, लहान मूलासांठी आहार, असाच एक बीबी होता बहुतेक.

'हमखास पाकसिद्धी' हे माझे आवडते पुस्तक आहे! (या पुस्तकाच्या सुरुवातीलाच पुलंच्या हस्ताक्षरातले खुसखुशीत पत्र आहे.)
'स्वयंपाक शोध आणि बोध' हे मालती कारगांवकरांचे पुस्तक संग्रही ठेवण्यासारखे आहे.

दिनेशदांंच्या रेसिपीज मस्त आणि सोप्या असतात!
जागुतैंच्या रेसिपीज पण आवडतात. ती स्टेपवाईज फोटो देते त्यामुळे छान वाटतात.

इथले प्रतिसाद वाचून एवढं कळातंय की दिनेशदानी पुस्तक लिहायचं लवकर मनावर घ्यायला हवं. तरला दलाल, संजीव कपूरच्या शेजारी एक मराठी झेंडा हवाच.

दिनेशदा, नुसत्या वेगवेगळ्या पाककृतींवरच नाही तर तुमच्या अनेक देशांच्या अनुभवांबद्दलही एक पुस्तक आले पाहिजे.

सानिका, मी ती लिंक नाहि मिळाली. पण मी काय option दिनेशदांनी दिले होते ते सांगु शकेन. आता रमाझान चालु असल्याने आजकाल 1/2 day असतो त्यामुळे वेळ मिळत नाहि. घरी गेल्यावर नक्कि लिहिन.
दिनेशदा, जुने असले तरी अजुनहि तेच चालु आहे मी जरी कधी विसरले तरी लेक आठवण करुन देतोच कि.
खरच दिनेशदा तुम्हि ते पुस्तकाचे मनावर घ्याच.

अन्जलि,
दिनेशदांनी तुला मुलाच्या डब्यासाठी दिलेले options शेअर करु शकशील का? मला पण फार प्रश्न पडतो डब्यात रोज काय द्यायचे.

मला पण हवे शेअर करा म्हणजे बायकोला देतो.

गुरूदासबी,
तुम्हाला कोणती रेसिपी हविये?
चिनूक्स यांनी ईथेच, विष्णू मनोहर यांच्या काही रेसिपीज दिल्या होत्या :
http://www.maayboli.com/node/3556
http://www.maayboli.com/node/3531
http://www.maayboli.com/node/3466
http://www.maayboli.com/node/3397
http://www.maayboli.com/node/3345

'हमखास पाकसिद्धी' खरच चांगल आहे. त्यात्ल्या टिप्स खुप उपयोगि पडल्या आहेत.
दिनेशदा-- त्या लहान मुलांच्या डब्याच्या पदार्थांची लिस्त पुन्हा एकदा शेअर कराल का?

मला ती रेचेल रे जाम अवड्ते.तिच्या भाज्या already कापुन चिरुन ठेवलेल्या नसतात म्हणुन पण असेल कदाचित. अजुन कोणि fan नही का तिचा?

प्रिया७ Thanks हिच लिंक शोधत होते.

सानिका, sorry, मला घरी वेळ्च नाहि मिळाला, (घरी जायचय ना? ) packing, shopping मधे वेळच नाहि मिळाला, पण वर प्रिया नी दिलीय तिच लिंक.

http://www.maayboli.com/hitguj/messages/103383/92989.html?1219738700

माहेर ऑगस्ट २०११ च्या अंकात दिनेशदा, जागु आणि मिनोती यांनी लिहिलेल्या पाककृती प्रसिद्ध झाल्या आहेत.

जागु, मी शाकाहारी असल्यामुळे तुमच्या इथल्या पाककृती जास्त वाचल्या नाहीत. पण मत्स्याहरींना तुम्ही पुस्तक लिहायला हवे असे नक्कीच वाटत असेल:)

भरत नक्कीच. माझे अजुन काही माश्यांचे प्रकार बाकी आहेत. ते झाले की पुस्तक छापणार आहे.

सहीच जागू. माझ्या नवर्‍याला गिफ्ट देण्यासाठी मी एक प्रत नक्की घेणार. तुझ्या रेसिपीज आणि माश्यांच्या डिटेलिंगचं प्रचंड वर्णन केलंय मी त्याच्याकडे. आत्तापासून बुकींग करून ठेवते.
जागुले बा द वे कधी रेस्तराँ उघडायचा विचार केलायस का?

Pages