जालावरच्या/ पुस्तकातील पाककृती आणि आवडते शेफ्स

Submitted by _मधुरा_ on 11 August, 2011 - 13:40

मला पाककृत्या वाचणं मनापासून आवडतं. अगदी गोष्टींची पुस्तकं वाचल्यासारखं!. जालावर रेसिप्यांचे फोटो पाहण्यात, त्या वाचण्यात, पुस्तकांच्या दुकानात अशी पुस्तकं बघण्यात, मी तासन तास घालवते. कित्येक नवीन गोष्टी करून बघते, नवीन काहीतरी शोधायचा प्रयत्न करते. असो.
तर आपल्याला बरेचदा,काही गोष्टी खूप आवडून जातात. काहींच्या ब्लॉगस् वर, युट्युब च्या चॅनल्स वर आपण नियमीत डोकावतो. ते शेफ आपलेसे वाटतात. त्यांच्या टीप्स मनापसून आपण फॉलो करतो.
बरेचदा आपल्याला ती रेसिपी आहे तशी आवडते तर कधी आपण थोडे बदल करतो. कधी अजून लोकांना सांगावीशी वाटते. आपण मनातल्या मनात त्याला ५ * रेटींग देऊन टाकतो. तर काहीवेळेस असं होतं की फोटो बघून आपण करायला जातो आणि ओम फस होतं.
तर अशाच गोष्टींची चर्चा करूयात. तुमच्यामुळे बाकीच्यांना नवीन प्रकारांची/ शेफ्स ची ओळख होईल.
( तसहीं ह्या ग्रुप मध्ये एकही धागा शेफ्स वर सापडला नाही )
( शेफ साठी चांगला मरठी शब्द कोणता? आणि शीर्षक काय बरं करावं ?)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अग नीधप तुझ्या लेमन राईसवर मी फोटो टाकलेत बघ.

हो ग खरी गोष्ट आहे. पण सरकारी नोकरी कोण सोडेल ? बादवे पार्टनर होशिल काय ?

Pages