फरहान अख्तर फॅन क्लब
दिल चाहता है.
लक्ष्य.
रॉक ऑन!!
कार्तिक कॉलिंग कार्तिक.
जिंदगी ना मिलेगी दोबारा.
अॅण्ड काऊंटिंग...
रायटर
नॉट सो बॅड सिंगर
नॉट सो बॅड डान्सर
डायलॉग रायटर
डायरेक्टर
अॅण्ड काऊंटिंग...
'दिल चाहता है' पहायला गेलो ते आमिर खानमुळे. नुकताच त्याचा 'लगान' पाहिला होता. तो प्रचंड आवडला होता. 'दिल चाहता है' पाहिला आणि 'लगान' विसरलो. तुलना करण्याची चुक अजिबात करत नाहीये. पण सगळ्यांना 'लगान' विसरून 'डी. सी. एच.' च्या प्रेमात पाडणारा फरहान अख्तर नव्या दमाचा, आत्मविश्वास असलेला वाटला.
'लक्ष्य' पडला तेव्हा फार वाईट वाटलं. मला चित्रपटाच्या यशापयशाचं गणित समजत नाही, समीक्षाही जमत नाही. पण चांगलं की वाईट ते (*माझ्यापुरतं) समजतं. मला लक्ष्य आवडला.
रॉक ऑन बघायला गेलो, तेव्हा मात्र 'वेळ जात नाही म्हणून बापाकडचा पैसा वापरून चित्रपट काढला असेल' अशा अत्यंत चुकीच्या समजूतीने गेलो. चित्रपट पाहण्यापेक्षा मित्रांच्या टवाळक्या करत चित्रपट वाया घालवला. नंतर घरी वीसीडीवर पाहताना चूक समजली. रॉक ऑन ची गाणी थिएटर मधे ऐकण्याची संधी घालवली होती.
त्या विषयावर विचार करण्याची एक संधी घालवली होती.
कार्तिक कॉलिंग कार्तिक.
पैसा टाकला की सगळ्या सुंदर सुंदर गोष्टी मिळतात. सुंदर हिरॉईन्स, छान लोकेशन्स. ३००० स्वे. फूटचे फ्लॅट्स ज्यात एकटीच हिरॉईन राहते. जिथल्या सोफ्यावर चुकुनही बसावे असे वाटू नये असे बुटके पण उंची सोफे.
असलं सगळं असतं फरहान अख्तरच्या चित्रपटात. हे खोटं करून दाखवलं.
जिंदगी ना मिलेगी दोबारा.
लोकेशन्स. डायलॉग्स. स्टोरी, कास्ट.
कॅरॅक्टर्सकडून अचूक निभावून घेतलेले काम. चित्रपटाचं सोनं.
आणि आपण विचार करत बाहेर... गाडीवरुन घरी परतताना डोक्यात एकच विचार :
'खरंच साऽलाऽऽ ... जिंदगी ना मिलेगी दोबारा...'
एका बाजूला "बडे बाप के फक्त 'बाप के नाम पे इण्डस्ट्रीमे टिके हुए' बच्चे" आणि दुसर्या बाजुला
~ फरहान अख्तर ~
मी फक्त उत्तर दिले
मी फक्त उत्तर दिले बेफिकिर......... आता त्यांच्या "खंडेराव, तुम्हाला चिखलात दगड मारायची सवय लागलीये हल्ली" यावरुन मला असे दिसते की त्यांना पुर्वी तसा अनुभव आला आहे आणी अजुन चिखल निघता निघत नाहि. पण माणसाने दगड मारायचाच कशाला आधी नाहि का ?
आता माझी समजुत चुकिची असेल तर त्या सांगतीलच की चिखल निघाला आहे म्हणुन.
आता यात काहि व्यक्तिगत नाहिये. त्यांचे बरोबर आहे. त्या सावध करत आहे खंडेरावांना. चुकुन उडु शकतो चिखल अंगावर . पण माणसाने दगड मारणे बंद केले तर चिखल थोडाच उडेल ?
आता इथेही बघा, मारलाच कि नाहि त्यांनी दगड ?
आता रामने अॅडमीन ची हिम्मत काढली , त्यांना म्हणले की गांधीगिरी करतात. पण मला तर अॅडमीन मध्ये सारासार विवेक दिसतो. नीधपच स्वतः म्हणतात खंडेरावांना की चिखलात दगड मारु नका. निदान अॅडमीन ना हे तरी कळते की दगड आधी मारावा लागतो ते चिखल उडण्याआधी.
तरी ठिक आहे. मी डिलिट केली तुमच्या विनंतीला मान देउन!
थॅन्क्स!
थॅन्क्स!
<<<<पण मला तर अॅडमीन मध्ये
<<<<पण मला तर अॅडमीन मध्ये सारासार विवेक दिसतो.>>>>
मलाही!
वर जाणकारांनी आपण कोणाचे फॅन
वर जाणकारांनी आपण कोणाचे फॅन असावे यावर केलेले मार्गदर्शन वाचुन मनात विचार आला की आपण कोणाचे फॅन होण्यासाठी ती व्यक्ती जगप्रसिद्ध, सगळ्या जनतेने कौतुकलेली अशीच असायला हवी का?
सामान्य माणसातही काहीतरी वेगळे असु शकते ना जे आपल्याला आवडते आणि आपण त्याचे फॅन होतो ??
माझ्या जुन्या ऑफिसच्या समोर एक सँडविचवाला होता. तो अतिशय लाजवाब सँडविचेस बनवायचा. खुप गर्दी असायची त्याच्याकडे. पुढे तो तिथुन गडपल्यावर दुस-याकडे सँडविचेस खाताना त्याची आठवण मला नी लोकांना हमखास यायची. मला तर आजही ती सँडविचेस आठवतात. मी त्याच्या सँडविचेसची फॅन होते आणि आजही आहे. आता तो सामान्य होता, रस्त्यावर गाडी टाकुन होता म्हणुन कोणी त्याचे फॅन असणे नामंजुर करावे का? भले जगात बेस्ट सँडविचेस विकणारे एखादे दुकान असेलही. पण तिथे गेल्यावरही मला त्याचीच आठवण येणार.
आता मी जर जुन्या आठवणीवर त्याचा फॅनफ्लब काढला तर कसल्या फडतुस माणसाचा फॅनफ्लब काढला म्हणुन मला दोष दिला तर मी काय म्हणणार? तुमच्यासाठी असेल तो फडतुस, पण मला त्याने अतिशय उत्तम अशी सँडविचेस खायला घातलीत आणि मी तरी त्याला विसरु शकत नाही.
आणि मला त्याची सँडविचेस जरी आवडली तरी फ्रेंच फ्राईज मात्र मॅक्डीच्याच आवडतात. फ्रेंच फ्राईजसाठी मी मॅक्डीची फॅन आहे. (त्याचवेळी माझी मुलगी मात्र तिच्या आजीने केलेल्या फ्रेंच फ्राईजची फॅन आहे. त्या म्हणे मॅक्डीपेक्षाही छान आहेत
ती तिच्या आजीची फॅन आहे.) वेगवेगळ्या पदार्थांसाठी मला ज्यांचे आवडले त्यांची मी फॅन आहे. तिथे मी अमुकची फॅन मग आता तमुकची फॅन कशी होऊ असा प्रश्न पडत नाही.
रच्याकने मी राजेश खन्ना, शशी कपुर, सलमानची फॅन आहे, अमिताभची आहे, ऋतिकची आहे, टॉम कृजचीही आहे, अल पचिनोचीही आहे. अल पचिनोची आहे तर मग सलमानची फॅन कशी होऊ हा प्रश्न येतच नाही. दोघेही त्यांच्या क्षेत्रात ग्रेट आहेत की नाहीत हाही प्रश्न मला पडत नाही. मला दोघांचेही काम आवडते म्हणुन मी फॅन आहे. फॅन होण्यासाठी ती व्यक्ती ग्रेट असावी लागते असे मला तरी वाटत नाही.
(No subject)
आमीर अभिनय करतोय हे जाणवत
आमीर अभिनय करतोय हे जाणवत असते. फरहान अभिनय करताना जाणवत नाही. >>>>>>>
ए हाsssssssssssड.. तुला काय कळत ग्ग अभिनया तला ????
१ पिक्चर काय चाल्ला.. तर जास्तच बडबडायला लागली ही बया
आमीर ला बोलायचा आधि विचार कर जरा..
साधनाताइ तुम्हि चुकीचे उदाहरण
साधनाताइ तुम्हि चुकीचे उदाहरण दिले आहे. खाण्याचे उदाहरण इथे लागु होउ शकत नाहि कारण खायच्या गोष्टिंचा स्वाद वेगळाच असतो. एकच पदार्थ एकाच व्यक्तीने दोनदा बनवला तर त्याची चव वेगळी असु शकते तसेच एकाच पदार्थाची वेगवेगळ्या व्यक्तीने बनवलेली चव वेगळी असते.
इथे प्रश्न प्रतिभेचा आहे. ज्याने सत्यजित रे यांचे सिनेमे पाहिले आहेत, त्यांची प्रतिभा पाहिली आहे त्याला फरहानची प्रतिभा कशी आवडु शकेल ? ( मुळात त्याला प्रतिभा म्हणणे हेच हास्यस्पद आहे).
मी राजेश खन्ना, शशी कपुर, सलमानची फॅन आहे, अमिताभची आहे, ऋतिकची आहे, टॉम कृजचीही आहे, अल पचिनोचीही आहे. अल पचिनोची आहे तर मग सलमानची फॅन कशी होऊ हा प्रश्न येतच नाही>>>
जरा स्वत:शीच विचार करुन बघा. तुम्हि ह्या सगळ्या लोकांच्या फॅन वेगवेगळ्या गोष्टिमुळे असाल. तुम्हि अमिताभच्या फॅन त्याच्या अभिनयामुळे असाल, तर टॉम कृजच्या त्याच्या देखणेपणामुळे, सलमानच्या त्याच्या स्टाइलमुळे (फक्त उदाहरण दिले - तुमचा विचार वेगळा असेल) कदाचित एका गोष्टिहुन जास्त गोष्ट असतील. आणी तुम्हि जी नावे घेतली ती सर्व चांगलीच नावे घेतली आता या यादीत तुम्हि राहुल रोयला टाकणार का ? जर असे कराल तर तुमच्यावर टिका होइलच. उद्या तुम्हि म्हणाल मी ए आर रेहमान, नौशाद, आर डि , एस डि आणी हिमेश रेशमीयाची फॅन आहे तर हे हास्यास्पद आहे. तेच ह्या लेखाचे झाले आहे.
त्यामुळे तुम्हि कोणाचेही फॅन नक्कीच होउ शकता पण मग दुसर्याला ते हास्यास्पद आणी विनोदी वाटले तर चिडु नये (आता कोणी विनोद केला तर हसायला येतेच की)
... (दोनदा लिहिले होते.)
... (दोनदा लिहिले होते.)
त्यामुळे तुम्हि कोणाचेही फॅन
त्यामुळे तुम्हि कोणाचेही फॅन नक्कीच होउ शकता पण मग दुसर्याला ते हास्यास्पद आणी विनोदी वाटले तर चिडु नये (आता कोणी विनोद केला तर हसायला येतेच की)
हेच वाक्य उलट देखील सत्य असू शकते ना गुरुजी? तुम्हाला हास्यास्पद वाटणारी व्यक्ती दुसर्याला फ्यान व्हायाला लायक वाटत असेल...
याच नियमाने एखादा एकाच वेळी रहमान आणि रेशमियाचाही फ्यान असू शकतो.. एकाच वेळी चाणक्य आणि बापूजी यांचाही एखादा फ्यान असू शकतो
अहो पण जामोप्या दोनदोनदा का
अहो पण जामोप्या दोनदोनदा का लिहिताय ? नाहि म्हणजे रात्र आहे, तेहि विकएण्ड - पार्टी करुन आला असाल म्हणुन विचारले. दोन दोन प्रतिसादाच्या खिडक्या तर दिसत नाहित ना ?
- हलकेच घ्या.
याच नियमाने एखादा एकाच वेळी रहमान आणि रेशमियाचाही फ्यान असू शकतो.. >>>>> असु शकतो की. मी तेच म्हणले आहे.
पण मला हास्यास्पद वाटणारी व्यक्ती दुसर्याला फ्यान व्हायाला लायक वाटत असेल तर मला ते हास्यास्पदच वाटणार. आणी मी तसे लिहिले तर त्यात दुसर्याने एवढे चिडावे कशाला हेच तर मी विचारत आहे.
असो. धन्यवाद जामोप्या, बर्याच वेळाने या धाग्यात कोणीतरी लिहिल्यामुळे मला परत लिहायला मिळाले. चला आजचा उरलेला दिवस सार्थकी लागला!
मी पण फरहान अखतर ची फॅन आहे.
मी पण फरहान अखतर ची फॅन आहे. अभय देओल आणि हृतीक आणि नागेश कुकनुरची पण. कुणाचा कुणाशी संबंध नाही माहितेय पण दिल तो पागल है, नाही का?
उगाच हाइप! बोअर! 
आणि इथे आमीर किती महान आहे नि फरहान किती बोअर इ. फालतु गोष्टी करणार्यांना सांगायची इच्छा होतेय की काही झालं तरी आमीर नेहमीच "नॅचरल दिसण्याची" "अॅक्टिंग" करतो, नॅचरल कधीच नसतो. आमीरची नॅचरल दिसण्याची भयंकर ओव्हरअॅक्टिंग बघायची असेल तर ३ इडिय्ट्स बघा
<असो. धन्यवाद जामोप्या,
<असो. धन्यवाद जामोप्या, बर्याच वेळाने या धाग्यात कोणीतरी लिहिल्यामुळे मला परत लिहायला मिळाले. चला आजचा उरलेला दिवस सार्थकी लागला! >
अशा गोष्टींनी एकेक दिवस आणि पर्यायाने आयुष्य सार्थकी लागतंय तर?!?! गेट वेल सून!
फरहानमित्रांना आणि फरहानद्वेष्टींना, सर्वांनाच मैत्रीदिनाच्या शुभेच्छा!
आमीर नेहमीच "नॅचरल दिसण्याची"
आमीर नेहमीच "नॅचरल दिसण्याची" "अॅक्टिंग" करतो, नॅचरल कधीच नसतो. आमीरची नॅचरल दिसण्याची भयंकर ओव्हरअॅक्टिंग बघायची असेल तर ३ इडिय्ट्स बघा >>>
आमीरला नावे ठेवायची असतील तर नवीन धागा काढा. ह्या धाग्यावर फक्त फरहानला नावे ठेवता येतील.
अशा गोष्टींनी एकेक दिवस आणि पर्यायाने आयुष्य सार्थकी लागतंय तर?!?! गेट वेल सून! >>>>>
त्यामुळे यात गेट वेल सुन वगैरे असे काहि नाहि
त्यामुळे कशा गोष्टिंना आणी कोणत्या लोकांना फ्यान बनवायचे ते शिका पहिल्यांदा आणी कोणताही धागा काढताना विचार करा आधी. नाहितर एम एफ हुसेन सारखी वेळ येते- आपली कला (चित्रकला असो की लेखन) कशी व्यक्त करायची याचा पायपोस नसेल तर 
मजेदार धागे आणी हास्यास्पद statements (उदा. फरहान ग्रेट actor आहे ) टाकल्यावर ते वाचुन मनोरंजन होतेच
तुम्हालाही शुभेच्छा!
आज फरहानचे कोलाज रूम मध्ये
आज फरहानचे कोलाज रूम मध्ये लागले. फ्रेम करायला वेळ झाला नाही म्हणून चिकट पट्टी ने लावले.
अगदी हॉस्टेलच्या खोलीचा फील येतो आहे.
कुछ जलने की बू आ रही है.
दिवे दिवे.
<मुळात मला चित्रपट
<मुळात मला चित्रपट अभिनेत्यांचे कोणी फ्यान असलेले पाहिले की जाम मजा येते. त्यात परत फरहान वगैरे म्हणजे मजाच मजा. आणी त्यात जिंदगी ना मिले दोबारा वगैरे. >
वाह! एकूण काय, तर तुम्ही फार मजेशीर दिसताय!!!
बाकी तुमचा सेन्स ऑफ ह्युमर युनिक आहे. केव्हापासून एकटेच हसताय... असो.
आज फ्रेंडशिप डे आहे, म्हणून एक मैत्रीपूर्ण प्रयत्न करावासा वाटतोय. @ टाळ्या / अंडी/ टोमॅटो ..
तर.. तुमची मतं समजली. चूक आहेत असे कोणीही इथे म्हटलेले नाही..
पुरे पण आता. तुमची मतं तुमच्यासाठी बरोबर. बाकीच्यांची बाकीच्यांसाठी.
सिंधुताई सपकाळ, आकिरा कुरोसावा वगैरे बद्दल इतका आदर आहे, तर त्यांच्याबद्दल बीबी उघडा. तुम्हाला माहिती असलेल्या गोष्टी तिथे लिहा. चांगल्या गोष्टी आम्हीही वाचू.
इथे येऊन परत परत तेच तेच बोलणं म्हणजे बरोबर नाही. बघा विचार करा. नाहीतर आहेच, ये रे माझ्या मागल्या..
ओ अ.मामी फोटू काढून पाठवा की
आपण लावू इथे.
* अवांतर :
जिंदगी... मधला सर्वात आवडलेला शॉट म्हणजे हृतिकचा स्कुबा डायव्हिंग नंतरचा. एक्स्प्रेशन्स ऑसम!
मला अजून एक शॉट फार क्यूट
मला अजून एक शॉट फार क्यूट वाटला्. बुल फाइट च्या आधीचा सीन आहे, चौघे रेस्टॉरन्ट मधे बसलेले असतात अन ह्रितिक अभय देओल ची सायको टेस्ट घेतो तर अभय शादी या शब्दाला थबकतो, आणी नंतर उठून निघून जातो. रितिक कतरीनाला एक्स्क्यूज मी म्हणून त्याची समजून घालायला जातो. फरहान ला पण जायचं असतं पण बहुधा जस्ट मॅनर्स म्हणून बसून राहतो कतरिना ला कंपनी द्यायला. पण अत्यन्त ऑकवर्ड चुळबूळ करतो. शेवटी कतरिनाच म्हणते, 'गो!' तर लगेच पडत्या फळाची आज्ञा घेऊन उठतो अन जातो. असला क्यूट सीन वाटला मला
देवघरात लावले असतेत तरी चालले
देवघरात लावले असतेत तरी चालले असते की.>> अय्या तुम्हाला कसे कळले? शनीच्या इमेज च्या साइडलाच लावले आहे. वेगळी पूजा रूम नाही माझ्याघरात. शनीच्या तापावर उतारा हो.
फरहान? धागा काढण्यासारखा तरी
फरहान?
धागा काढण्यासारखा तरी खास वाटला नाही अभिनय त्याचा.
अभिनय करताना पण मुळात आहे तसाच वाटतो त्यामुळे मी......तट्स्थ!
Farhan Akhtar Thank you for
Farhan Akhtar
Thank you for all the love.... sending it right back at all of you....
15 hours ago · 2281473 · UnlikeLike ·
फेसबुक वरील फरहान फॅन पेज वर थोडे कौतुक लिहीले होते. त्याला चक्क उत्तर आले. जरी सेक्रेटरीने लिहीले असले तरी हे ही नसे थोडके. सर्व थोडे थोडे शेअर करा.
फरहान अखतर चा अभिनय पाहिला
फरहान अखतर चा अभिनय पाहिला त्याच्यापेक्षा हिंदीतला कोणताही अभिनेता जास्त चांगला अभिनय करत असेल. त्याचे हसु पाहुन रडू येते आणी रडु पाहुन हसु.
हसु पाहुन रडू येते आणी रडु
हसु पाहुन रडू येते आणी रडु पाहुन हसु.>>>>
(ही दाद फक्त या विनोदाला आहे बरं ??)
आजही हसल्याप्रमाणे हुंदके देतेस तू
आणि मी रडल्याप्रमाणे भासतो हसलो तरी
हा बहुधा मला फरहान अख्तरवरूनच सुचला असावा शेर!
अरे फरहानने इद व गणपतीच्या
अरे फरहानने इद व गणपतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच डॉन साठी तसल्यास वनलायनर्स मागिवल्या आहेत. कोणाला रस असल्यास इथे धागा काढू शकतो.
हो पाहिलं मी ट्विटर वर,
हो पाहिलं मी ट्विटर वर, गणपतीच्या पहिल्याच दिवशी, 'तुझको फिरसे जालवा दिखाना ही होगा, अगले बरस आना है आना ही होगा' चा व्हिडिओ टाकलाय
बघ ना जल्ला बॉडीगार्ड आला तर
बघ ना जल्ला बॉडीगार्ड आला तर इथले सगळे सल्लू भायच्या मागे पलाले.
>बघ ना जल्ला बॉडीगार्ड आला तर
>बघ ना जल्ला बॉडीगार्ड आला तर इथले सगळे सल्लू भायच्या मागे पलाले.
मामी अहो, हॅपॉ कडेही पळाले होते की होऽ
असंही आजकाल सर्वजणा एकस्टारव्रत घेऊन कुठे असतात? "ते हि नो दिवसा गतः" हेच खरे.
फ. अ. हिंदुस्तान युनिलिवर आणि
फ. अ. हिंदुस्तान युनिलिवर आणि टायटनचा ब्रँड अॅम्बॅसिडर होणार आहे म्हणे
http://economictimes.indiatimes.com/news/newsbyindustry/services/adverti...
आजचा इको टाईम्स मध्ये आले आहे
आजचा इको टाईम्स मध्ये आले आहे ना जामोप्या. वाचले मी ते.
फुल्ल फोटो बि आलेला.
कंपन्यांच्या लिस्टमध्ये यु
कंपन्यांच्या लिस्टमध्ये यु बी- युनायटेड ब्रेवरीजही आहे. ( विजय मल्ल्याची दारुची कंपनी.) तसे झाले तर या बीबीचे नाव फरहान अख्तर 'सोडा क्लब' ठेवायचे का?
जिंदगी ना मिलेगी दोबाराची
जिंदगी ना मिलेगी दोबाराची व्हर्जिनल डीव्हीडी/सिडी आली म्हने..
कोनी घेतलीय कावोऽ???
>फरहान अख्तर 'सोडा क्लब'
>फरहान अख्तर 'सोडा क्लब'
काही लोकांचं इथं जे काही चाललंय त्यावरून 'फरहान अख्तर झोडा क्लब' देखिल चालायला हरकत नसावी
Pages