फरहान अख्तर फॅन क्लब

Posted
9 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
9 वर्ष ago
Time to
read
1’

दिल चाहता है.
लक्ष्य.
रॉक ऑन!!
कार्तिक कॉलिंग कार्तिक.
जिंदगी ना मिलेगी दोबारा.
अ‍ॅण्ड काऊंटिंग...

रायटर
नॉट सो बॅड सिंगर
नॉट सो बॅड डान्सर
डायलॉग रायटर
डायरेक्टर
अ‍ॅण्ड काऊंटिंग...

'दिल चाहता है' पहायला गेलो ते आमिर खानमुळे. नुकताच त्याचा 'लगान' पाहिला होता. तो प्रचंड आवडला होता. 'दिल चाहता है' पाहिला आणि 'लगान' विसरलो. तुलना करण्याची चुक अजिबात करत नाहीये. पण सगळ्यांना 'लगान' विसरून 'डी. सी. एच.' च्या प्रेमात पाडणारा फरहान अख्तर नव्या दमाचा, आत्मविश्वास असलेला वाटला.

'लक्ष्य' पडला तेव्हा फार वाईट वाटलं. मला चित्रपटाच्या यशापयशाचं गणित समजत नाही, समीक्षाही जमत नाही. पण चांगलं की वाईट ते (*माझ्यापुरतं) समजतं. मला लक्ष्य आवडला.

रॉक ऑन बघायला गेलो, तेव्हा मात्र 'वेळ जात नाही म्हणून बापाकडचा पैसा वापरून चित्रपट काढला असेल' अशा अत्यंत चुकीच्या समजूतीने गेलो. चित्रपट पाहण्यापेक्षा मित्रांच्या टवाळक्या करत चित्रपट वाया घालवला. नंतर घरी वीसीडीवर पाहताना चूक समजली. रॉक ऑन ची गाणी थिएटर मधे ऐकण्याची संधी घालवली होती.
त्या विषयावर विचार करण्याची एक संधी घालवली होती.

कार्तिक कॉलिंग कार्तिक.
पैसा टाकला की सगळ्या सुंदर सुंदर गोष्टी मिळतात. सुंदर हिरॉईन्स, छान लोकेशन्स. ३००० स्वे. फूटचे फ्लॅट्स ज्यात एकटीच हिरॉईन राहते. जिथल्या सोफ्यावर चुकुनही बसावे असे वाटू नये असे बुटके पण उंची सोफे.
असलं सगळं असतं फरहान अख्तरच्या चित्रपटात. हे खोटं करून दाखवलं.

जिंदगी ना मिलेगी दोबारा.
लोकेशन्स. डायलॉग्स. स्टोरी, कास्ट.
कॅरॅक्टर्सकडून अचूक निभावून घेतलेले काम. चित्रपटाचं सोनं.
आणि आपण विचार करत बाहेर... गाडीवरुन घरी परतताना डोक्यात एकच विचार :
'खरंच साऽलाऽऽ ... जिंदगी ना मिलेगी दोबारा...'

एका बाजूला "बडे बाप के फक्त 'बाप के नाम पे इण्डस्ट्रीमे टिके हुए' बच्चे" आणि दुसर्‍या बाजुला
~ फरहान अख्तर ~

शब्दखुणा: 

मी पण.
Raspy voice असलेले फार कमी लोकं जे आवडतात त्यात फरहान. Happy
एक प्रकारची सिन्सियरीटी वाटते त्याच्यात. हुशार आणि गुणी वाटतो. नवनवीन प्रयोग करत असतो. गॉसिप्स पासून दूर. आपण बरे, आपले काम बरे. अजून काय करायचे असते ?

फरहानच्या पंख्यांपैकी मी पण.
हो ना, उगीच फालतू लोकांचे फॅक्ल काढायची सवयच आहे माबोवरच्या लोकांना<<<<
मै अगदी अगदी Rofl

अरे मेरे बगैर ये फॅन क्लब खुलाइच कैसे? मी पण फॅन. चतुरस्त्र व्यक्तिमत्त्व. त्याने काहीही पुढे केले नाहीतरी मला तो आवड्तोच. सविस्तर नंतर लिहीनच. : )

Raspy voice असलेले फार कमी लोकं जे आवडतात त्यात फरहान.
एक प्रकारची सिन्सियरीटी वाटते त्याच्यात. हुशार आणि गुणी वाटतो. नवनवीन प्रयोग करत असतो. गॉसिप्स पासून दूर. आपण बरे, आपले काम बरे. >> परफेक्ट अगदी. हेच म्हणायचे होते. कमी शब्दांत पर्फेक्ट लिहिलेस. +१.

काकॉका, लबाचा आणि जिंनामिदो मुळे मी पण फॅनक्लबात. Happy

मी अगदी फॅन नाही, पण मलाही आवडतो फरहान.

<<<एक प्रकारची सिन्सियरीटी वाटते त्याच्यात. हुशार आणि गुणी वाटतो. नवनवीन प्रयोग करत असतो. गॉसिप्स पासून दूर. आपण बरे, आपले काम बरे.एकतर गॉसिप्सपासुन दूर आणि वर म्हटल्याप्रमाणे >>> एकदम पटेश.

मला तर त्याचा voice खुप आवडतो. वेगळाच आहे. त्याच्या 'Friday Talk Show - ND TV Imagine' बद्द्ल कोणीच लिहिलं नाही. एकदम entertaining होता. नाव नाही आठवत त्या कार्यक्रमाचं आता.

'Friday Talk Show - ND TV I>>>>>>>>>>>>>>>... ओय इट्स फ्रायडे

+१
"ओये इट्स फ्रायडे"
अमेझिंग अँकर आहे तो
मी तर फॅन आहेच आहे त्याची..
त्याच साधं 'वेगळेपण' फार भावतं मला.... Happy

* <ओय, इट्स फ्रायडे टॉक शो> नाही बघितला मी Sad आता शोधून बघिन.
* डॉन मला नाही आवडला म्हणून नाही लिहीला त्या यादीत. पण लिहीतो.
* झिंनामिदो झोया अख्तरचं डायरेक्शन आहे, बरोबर.. त्याचं डायलॉग वगैरे आहे म्हणून त्या यादीत टाकलाय. तरी दुरुस्ती करतो.

मैत्रेयी Rofl
रैना बरोब्बर एकदम~ Happy

<<

रूनी पॉटर | 26 July, 2011 - 01:21
+१
अवांतर - रॉक ऑन मध्ये त्याला स्वतःच गायलेले बघितल्यावर मला एकदम कॉन्फिडन्स आला होता आपणही गाणी गाऊ शकतो याचा.
अभय देओलचा फॅन क्लब नाही का काढणार कोणी, असेल तर माझा नंबर पहिला.

दीपांजली | 26 July, 2011 - 01:26
माझा नंबर दुसरा अ.देओल मधे .

राखी. | 26 July, 2011 - 01:28
माझा तिसरा

प्रज्ञा९ | 26 July, 2011 - 01:30
माझा चौथा.

स्वाती_आंबोळे | 26 July, 2011 - 01:33
अरे, तुम्ही तुमच्या फॅक्लचा वेगळा धागा काढा बघू. इथे काय आहे! >> Rofl धन्यवाद स्वाती_आंबोळे.

तर समस्त पंखजनहोऽ

काही नाही. Happy स्वागत सर्वांचे!!!
आता सगळे जमले आहेत तर ह्या 'बाबा'चा उद्देश आणि विधेयाबद्दल बोलूया काय??

फरहान अख्तरच्या चित्रपटांमधे आपल्याला आवडलेले प्रसंग, सीन जे खास "फरहान अख्तर टच" मुळे जास्तीच समृद्ध झालेत वगैरे.. असे काही असतील तर त्याच्याबद्दल किंवा एखाद्या चित्रपटामुळे अगदी आयुष्य नाही बदललं, तरी थोडा वेळ का होईना विचार करावासा वाटला त्याबद्दल लिहून तो अनुभव सगळ्यांबरोबर शेअर करुयाक्का ? Happy

तर कोण करणार सुरुवात ???

* सगळीकडे शिकायची गरज नाही.. चित्रपट पाहून आनंद मिळाला असेल, तर तेही सांगता येईल. बोला तर मग! Happy

<अरे मेरे बगैर ये फॅन क्लब खुलाइच कैसे? मी पण फॅन. चतुरस्त्र व्यक्तिमत्त्व. सविस्तर नंतर लिहीनच. : ) >>
ओ अश्विनीमामी, सुरुवात तुमीच करा मग Happy

< त्याने काहीही पुढे केले नाहीतरी मला तो आवड्तोच.>
ह्याला +१. पण त्याने भरपूर काम करावं~~

मी पण क्लबात. मला रॉकॉन जास्त आवडलेला.. मोस्ट ऑफ त्यातलं 'मेरे लाँड्री का एक बिल..' गाणं!
रैना, मोदक!
अभय देओलचा फॅन क्लब नाही का काढणार कोणी, असेल तर माझा नंबर पहिला.>>> अगदी!

फरहान अख्तर कोण आहे ?

एका बाजूला "बडे बाप के फक्त 'बाप के नाम पे इण्डस्ट्रीमे टिके हुए' बच्चे" आणि दुसर्‍या बाजुला
~ फरहान अख्तर >>> हि ओळ मात्र फारच विनोदी. विनोदी म्हणजे - मला फरक समजला नाहि म्हणुन - बाप के नाम पे इण्डस्ट्रीमे टिके हुए' बच्चे आणी फरहान अख्तर यातला फरक.

दिल चाहता है चांगलाच होता पण तो कोणामुळे हे जग्जाहिर आहे.

पण सगळ्यांना 'लगान' विसरून 'डी. सी. एच.' च्या प्रेमात पाडणारा >>>> क्रुपया असे बाहेर बोलु नका. सगळ्यांना तरी म्हणु नका. तुम्हाला फक्त असु शकेल.

<मंदार_जोशी | 28 July, 2011 - 17:31 नवीन
मला नाही आवडत. फरहान अख्तरला उगाच डोक्यावर चढवलंय.>

मंजो..
कुणाच्या डोक्यावर कुणाचे ओझे... तुम्ही नकाच घेऊ. आम्ही आणि श्रीही समर्थ आहेत. Proud Light 1

<<श्री | 26 July, 2011 - 06:40
मला पण आवडलं फरहानचं काम !>>

Pages