फरहान अख्तर फॅन क्लब

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

दिल चाहता है.
लक्ष्य.
रॉक ऑन!!
कार्तिक कॉलिंग कार्तिक.
जिंदगी ना मिलेगी दोबारा.
अ‍ॅण्ड काऊंटिंग...

रायटर
नॉट सो बॅड सिंगर
नॉट सो बॅड डान्सर
डायलॉग रायटर
डायरेक्टर
अ‍ॅण्ड काऊंटिंग...

'दिल चाहता है' पहायला गेलो ते आमिर खानमुळे. नुकताच त्याचा 'लगान' पाहिला होता. तो प्रचंड आवडला होता. 'दिल चाहता है' पाहिला आणि 'लगान' विसरलो. तुलना करण्याची चुक अजिबात करत नाहीये. पण सगळ्यांना 'लगान' विसरून 'डी. सी. एच.' च्या प्रेमात पाडणारा फरहान अख्तर नव्या दमाचा, आत्मविश्वास असलेला वाटला.

'लक्ष्य' पडला तेव्हा फार वाईट वाटलं. मला चित्रपटाच्या यशापयशाचं गणित समजत नाही, समीक्षाही जमत नाही. पण चांगलं की वाईट ते (*माझ्यापुरतं) समजतं. मला लक्ष्य आवडला.

रॉक ऑन बघायला गेलो, तेव्हा मात्र 'वेळ जात नाही म्हणून बापाकडचा पैसा वापरून चित्रपट काढला असेल' अशा अत्यंत चुकीच्या समजूतीने गेलो. चित्रपट पाहण्यापेक्षा मित्रांच्या टवाळक्या करत चित्रपट वाया घालवला. नंतर घरी वीसीडीवर पाहताना चूक समजली. रॉक ऑन ची गाणी थिएटर मधे ऐकण्याची संधी घालवली होती.
त्या विषयावर विचार करण्याची एक संधी घालवली होती.

कार्तिक कॉलिंग कार्तिक.
पैसा टाकला की सगळ्या सुंदर सुंदर गोष्टी मिळतात. सुंदर हिरॉईन्स, छान लोकेशन्स. ३००० स्वे. फूटचे फ्लॅट्स ज्यात एकटीच हिरॉईन राहते. जिथल्या सोफ्यावर चुकुनही बसावे असे वाटू नये असे बुटके पण उंची सोफे.
असलं सगळं असतं फरहान अख्तरच्या चित्रपटात. हे खोटं करून दाखवलं.

जिंदगी ना मिलेगी दोबारा.
लोकेशन्स. डायलॉग्स. स्टोरी, कास्ट.
कॅरॅक्टर्सकडून अचूक निभावून घेतलेले काम. चित्रपटाचं सोनं.
आणि आपण विचार करत बाहेर... गाडीवरुन घरी परतताना डोक्यात एकच विचार :
'खरंच साऽलाऽऽ ... जिंदगी ना मिलेगी दोबारा...'

एका बाजूला "बडे बाप के फक्त 'बाप के नाम पे इण्डस्ट्रीमे टिके हुए' बच्चे" आणि दुसर्‍या बाजुला
~ फरहान अख्तर ~

शब्दखुणा: 

आमीर अभिनय करतोय हे जाणवत असते. फरहान अभिनय करताना जाणवत नाही. >>>>
वाक्य आवडले . कारण समजावुन सांगतो - फरहानला अभिनय करता येत नाहि. अशा भुमीका निवडणुन की ज्यात अभिनय लागत नाहि, त्यातल्या अभिनयाचे कौतुक करणे म्हणजे फारच हास्यास्पद आहे Proud
हिम्मत असेल तर लगान मधला भुवन, रंगीला मधला टपोरी, RDB मधील भुमिका करुन दाखवावी फरहानने. मला ओकारी यायला लागली - त्याला आमीरच्या जागी या भुमिकांमध्ये पाहुन!

चाणक्यनीती वाचा आता......... >>>>
नक्किच वाचा. काहितरी डोक्यात शिरेल आणी विचार करायला शिकलात तरी खुप आहे. प्रत्यक्ष चाणक्यनीती ही फार पुढची गोष्ट.

आहो आमीर फॅन क्लब उघडा ना. आम्ही तिथे पण येतो. एका वेळी आमीर व फरहान आवडू शकतात कि नाही अ‍ॅक्टर्स/ क्रिएटिव पर्सनालिटी म्हणून. झगड्ते कायकु मियां?

राज कपूर देव आनंद दिलीप कुमार, संजीव कुमार, अमिताभ
गुरुदत्त, रफी, किशोर, शंकर जयकिशन , मदन मोहन, मुकेश,स्पीलबर्ग, सलीम-जावेद हे सर्व कलाकार प्रियच आहेत.

मामी, शैली चुकली. 'जाने दो नवाब. सौ फुट उपर गये, तो किसी को वायरां दिकें, किसीको गाडीके टायरां दिके. किसीको कुतुब्मिनार के टावरां दिके. किसीको वायरस कांपुटरवाला दिके, किसीको सायरस पुनावाला दिके. तुमारा प्राबलेम जी, तुमको एकईच दिके. हमको तो इसमेसे सबकुच दिके.' अशा काहीतरी शैलीत उत्तर द्या.

गणूनवाब, लोकशाही हय. जाने देव. तुमारी कोई नई सुनेगा. हमने सुना. बऊत बुरा लगा.

आहो आमीर फॅन क्लब उघडा ना >>>> तुम्हाला कोण म्हणाले मी आमीरचा फैन आहे म्हणुन ? Proud

कोणितरी उघडा हवा तर! पण आता फरहान आवडत नाहि, तो फालतु वाटतो तर त्यावर टिका करायला लागणारच. उगाचच कोणालाहि डोक्यावर घेउ नये हे कळेल एवढी अक्कल अजुन मला तरी आहे ! Biggrin

तुमारी कोई नई सुनेगा. हमने सुना. बऊत बुरा लगा. >> आमची कोणी सुनी नहि रहती तो इतना रिप्ल्याय आता क्या बाबा हमको ? Biggrin

अजून एक फरहानचा चांगला लक्षात राहीलेला सीन म्हणजे लक बाय चान्स मधला.
तो आणि ती निक्की यांना एकमेकांशी इंटरॅक्ट करतांना डिंपल बघते आणि त्यांच्या बॉडी लँग्वेजवरून अंदाज घेते की या दोघांचे काहीतरी प्रकरण जमलेलं दिसतय. मग त्या दोघांना समोर बसून ती हा प्रश्न विचारते आणि तेव्हा दोघेजण एकदम लांब लांब बसतात. तेव्हाचे फरहानचे एक्सप्रेशन्स एकदम सही आहेत.

अजुन एक तसाच सीन :).
फरहान आणि ती निकी डिंपल शी गप्पा मारत असतात.. मधेच डिंपल निक्क्की कडे पाहून विचारते डोळे असे का दिसतायेत..रात्री जागरण केलस ना.., किती डार्क सर्कल्स दिस्तायेत.. हा डॉयलॉग चालु असताना फरहान पटकन डोळ्यावर काळा गॉगल चढवतो :).

फरहानचं एंट्री स्पीच पण सहीये जिनामिदो मधलं :).
उगीच होम प्रॉडक्शन हिरो आहे म्हणून ढँटडँग म्युझिक नाही कि टॉप टु टो क्लोज अप नाही Proud
अभय च्या एन्गेजमेंट पार्टीचं cool witty speech :).
Hello everyone , my name is Imran.. कबीर और मै स्कुल मे एक साथ थे, The 3 musketeers ...Unfortunately 3rd musketeer आज हमारे बीच नही है.. ... (एक पॉझ)... Don't worry about it वो जिन्दा है, बस आज यहां नही है !
नताशा, कबीर इस दुनियाके सबसे अच्छे इन्सानोमेसे एक है, तो कही तुमने उसकी BMW ठोक बोक दी, don't worry about it.
इंटेलिजन्ट भी है, तो बच्चोंका होमवर्क प्लिज इसीसे करवाना !
बहुत बहुत बहुत बडा दिल है इसका, तो बिना फिक्र किये जितने भी डायमंड्स खरीदने है, खरीद लो !

हो Happy मस्त भाषण आहे, एकदम witty. फरहानच ते इतकं मस्त कॅरी करू शकतो Happy

रॉक ऑनची गाणी. सही. परत एकदा, फक्त फरहानच ती तशी गाऊ शकतो Happy

हा फॅन क्लब फारच फॅट होत चालला आहे... >>>

फॅट नाहि हास्यास्पद होत चालला आहे. हे बाहेर जर कुठे लोकांनी वाचले तर (फरहानच हे करु शकतो, फरहानच ते करु शकतो.......... वगैरे....) तर काहिदिवसात रजनीचे सगळे जोक फरहानला लावले जातील एवढे नक्कि. Proud

>>>>आहो आमीर फॅन क्लब उघडा ना >> तुम्हाला कोण म्हणाले मी आमीरचा फैन आहे म्हणुन ?

तुम्ही कोणाचे फॅन कसे असु शकाल. सगळीकडे खुसपटे काढणे ह्या दृष्टीने पहिले तर कुठेच काहीच चांगले दिसणार नाही. तुमच्या टिकास्त्राला आता मी तरी इग्नोरास्त्र वापरणार आहे. त्याच्या पेक्षा अनबिटेबल दुसरे अस्त्र नाही.

मला तरी आवडला हा फॅक्ल....

मी त्याची फॅन वगैरे नाहीय पण मला आवडतो फरहान. मी फक्त रॉकऑन नी जिंदगी.. थिअ‍ॅटरात पाहिले. पैसे पुर्ण वसुल....

बाकीच्यात दिल चाहता है खुप आवडला. लक.. पण आवडला.. इतर पाहिले नाहित. पण पाहिन नक्कीच..

Proud

मला पण फरहान अख्तर दिग्दर्शक म्हणून जास्त आवडतो. लक्ष्य व DCH भारीच. अभिनेता म्हणून त्याला अजून बराच पल्ला गाठायचाय. पण रॉक ऑन ते जिंदगी ना.. पर्यंतच्या प्रवासात त्यानी अभिनयात बरीच प्रगती केली आहे हे पण खरं. गाणी गाणे वगैरे ठिकठाक आहे. पण त्यानी चित्रपट दिग्दर्शन करावं. त्याला भारी जमतं ते.

तुमच्या टिकास्त्राला आता मी तरी इग्नोरास्त्र वापरणार आहे. त्याच्या पेक्षा अनबिटेबल दुसरे अस्त्र नाही. >>>

तुम्हि कोणतेही अस्त्र वापरा! इग्नोरास्त्राचेच दुसरे नाव आहे पलायनस्त्र. त्याच्या पेक्षा अनबिटेबल दुसरे अस्त्र नक्केच नाही. Proud

चाणक्य फॅनक्लब काढावा काय आता? >> काढा की . वाट कसली पहाताय ? Proud

तुम्ही कोणाचे फॅन कसे असु शकाल >>> . मी फालतु लोकांचा फॅन खरेच असु शकत नाहि. मी सत्यजित रे यांचा, अकिरा कुरोसावा यांचा , चार्ली चैप्लिन यांचा , इंगमार बर्गमन यांचा नक्कीच फैन आहे. आणी यांचा फैन असल्यावर मी फरहानचा फैन कसा असु शकेल नाहि का ? (सनी देवल चा दामीनी मधला dialogue आठवला ........:फिदी: --- मैदान मे अगर शेर का सामना करोगे तो तुम्हिरी मर्द होनेकी गलत फैमी अपने आप दुर हो जायेगी......:फिदी:)

ही नावे तुम्हाला माहित नसतील अशी खात्री आहे. शोधा आणी यांचा एकतरी पिक्चर पहा.

च्यायला हे म्हणजे मला पुरनपोळी आवडते तर मी भुक लागल्यावर लोणचंपोळी भाजीपोळी वरणभात खिचडी वगैरे कसा खाऊ असा प्रश्न आहे. गुड क्वश्शन.

ही नावे तुम्हाला माहित नसतील अशी खात्री आहे. >> नाही माहिती समजा. आता जे माहिती आहे, त्याकडे बघायचं की माहित नसलेल्या परग्रहांवरच्या जातिजमातींबद्दल बोलायचं. तुमच्या रेअर स्पेसीज वेगळ्या. यांच्या रेअर स्पेसीज वेगळ्या. त्यांच्या रेअर स्पेसीज वेगळ्या. पंडित नेहरू राजभवनातनं बाहेर निघून चांदणी चौकात येऊन बिर्याणी नि तंदूर नि रसमलाई खायचे, तोच फॉर्म्युला वापरून चार्ली चॅप्लीन सारख्यांनी उद्या फरहान फॅन क्लब काढला तर काय कराल हो? Proud

समर्थ रामदासानी जी मुर्खांची लक्षणे लिहली त्यावेळी त्यांच्या डोळ्यासमोर चाणक्य हा आयडी असावा.. Happy मला आश्चर्य वाटते ते अ‍ॅडमीनचे .. जिथे तिथे हा आयडी येउन गरळ ओकल्या सारखे बकबक करतो.. स्वताच्या मुर्खपणाचे प्रदर्शन करतो पण अ‍ॅडमीन मध्ये हिम्मत नाही की या आयडी ला वॉर्नींग द्यावी किंवा हा आयडी बंद करावा.. सुधरा अ‍ॅडमीन आता..:)

चिखलात दगड? कानपूर आयआयटीवर नव्याने सर्च मारायला पायजे मग. मी काहीतरी वेगळंच समजून होतो. Proud

रामभाऊ, आस्ते कदम. टीपी चालू आहे आहे, असं समजा. हौले हौले.

आता ते वरचे चानक्य येऊन मला शिव्या देतील नि मग जीवश्चकंठश्च मित्र म्हणून तुम्ही धावून आलात तर गोष्ट वेगळी होती. काय राव. (बरं त्ये झक्क्यीचं कलासचं फी काय आहे म्हणलंस तू?)

खंडेराव.. आपल्याला एकच गोष्ट जमते खोपच्यात घेणे... फक्त समोर यायची खोटी .. डायरेक्ट आरपार.. अपुन या तुम बस... अ‍ॅडमीन सारखी गांधीगीरी आपल्या बापाला सुद्धा जमली नाही.. Happy

काय वेळ आली म्हंजे? अहो वेळ काय सांगून येते का? न्हाई. आता तुम्ही आपले गरीबबापडे दररोजएकभागयास्पीडने लिवत होता तवा माशांचं मोहोळ उठून कुठच्या तरी क्रमशः भागाची खिंड पकडून अचानक तुमच्या अंगाशी येईल असं तुम्हांस वाटलं होतं काय? न्हाई. पण आली. आली तशी जाते पण ती. पण दोष आपल्या ग्रहदशेत असतो हे लक्षात ठेवा.

आता त्या झक्क्यींवर आजवर काय काय वेळा आल्यात हा एक वेगळाच इतिहास आहे. ते जाऊद्या.

काय वेळ आली म्हंजे? अहो वेळ काय सांगून येते का? न्हाई. आता तुम्ही आपले गरीबबापडे दररोजएकभागयास्पीडने लिवत होता तवा माशांचं मोहोळ उठून कुठच्या तरी क्रमशः भागाची खिंड पकडून अचानक तुमच्या अंगाशी येईल असं तुम्हांस वाटलं होतं काय? न्हाई. पण आली. आली तशी जाते पण ती. पण दोष आपल्या ग्रहदशेत असतो हे लक्षात ठेवा.

आता त्या झक्क्यींवर आजवर काय काय वेळा आल्यात हा एक वेगळाच इतिहास आहे. ते जाऊद्या.>>>

Lol

तुमी कय प्यॉर खंडेराव्ह नय राव ! तेत गोड गोजिरे आन साज साजिरे डोकिवत्यात! कय नय, ग्र्हद्श्शा म्हून द्या सोऊन! (येथे 'ड" राहिला नाही बरे? सोऊन हे मोरगावात सोडून म्हणून वापरतात) Lol

ल्ह्या अपली कादंब्री! Proud

समर्थ रामदासानी जी मुर्खांची लक्षणे लिहली त्यावेळी त्यांच्या डोळ्यासमोर चाणक्य हा आयडी असावा >>>>
छान आहे. चला आम्हाला पाहुन तुम्हाला रामदासांची तरी आठवण आली. तुम्हि मात्र नामाचेच राम दिसता..करणी मात्र रावणाची वाटते... Biggrin

आपल्याला एकच गोष्ट जमते खोपच्यात घेणे >>> आता मात्र मजा येणार रामभाउ. आता याच तुम्हि खोपच्यात. Biggrin

असो खंडे....राव. हे घ्या तुम्हाला खास माझ्याकडुन Free Bouncy Smileys

चाणक्य,

समजा फरहान अख्तर सुमार कलाकार आहे. (आपल्याला तर माहीतही नाही की तो कोण आहे, हे वेगळे, त्यामुळे आपण तसे म्हणालो बुवा! माझे म्हणणे होते की ऋयाम यांनी अमिताभ बच्चनचा फॅन क्लब तरी काढावा. अन्यथा मी काढेनच!) Happy

पण तुम्ही 'इतके' :

<<<<नीधप बाइंचे एका खंडेराव वेळिच. अजुन चिखल निघत नाहिये त्यांच्यावर उडालेला..>>>>

व्यक्तीगत का होत असाल ते समजत नाही. माझे काही चुकले असेल तर जरूर लिहावेत, पण मला तुमच्या अनेक प्रतिक्रिया सडेतोड व प्रामाणिक वाटतात. पण ही जराशी 'काहीतरीच' वाटली.

डिलीट कराल काय? Happy (प्लीज)

-'बेफिकीर'!

Pages