फरहान अख्तर फॅन क्लब

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

दिल चाहता है.
लक्ष्य.
रॉक ऑन!!
कार्तिक कॉलिंग कार्तिक.
जिंदगी ना मिलेगी दोबारा.
अ‍ॅण्ड काऊंटिंग...

रायटर
नॉट सो बॅड सिंगर
नॉट सो बॅड डान्सर
डायलॉग रायटर
डायरेक्टर
अ‍ॅण्ड काऊंटिंग...

'दिल चाहता है' पहायला गेलो ते आमिर खानमुळे. नुकताच त्याचा 'लगान' पाहिला होता. तो प्रचंड आवडला होता. 'दिल चाहता है' पाहिला आणि 'लगान' विसरलो. तुलना करण्याची चुक अजिबात करत नाहीये. पण सगळ्यांना 'लगान' विसरून 'डी. सी. एच.' च्या प्रेमात पाडणारा फरहान अख्तर नव्या दमाचा, आत्मविश्वास असलेला वाटला.

'लक्ष्य' पडला तेव्हा फार वाईट वाटलं. मला चित्रपटाच्या यशापयशाचं गणित समजत नाही, समीक्षाही जमत नाही. पण चांगलं की वाईट ते (*माझ्यापुरतं) समजतं. मला लक्ष्य आवडला.

रॉक ऑन बघायला गेलो, तेव्हा मात्र 'वेळ जात नाही म्हणून बापाकडचा पैसा वापरून चित्रपट काढला असेल' अशा अत्यंत चुकीच्या समजूतीने गेलो. चित्रपट पाहण्यापेक्षा मित्रांच्या टवाळक्या करत चित्रपट वाया घालवला. नंतर घरी वीसीडीवर पाहताना चूक समजली. रॉक ऑन ची गाणी थिएटर मधे ऐकण्याची संधी घालवली होती.
त्या विषयावर विचार करण्याची एक संधी घालवली होती.

कार्तिक कॉलिंग कार्तिक.
पैसा टाकला की सगळ्या सुंदर सुंदर गोष्टी मिळतात. सुंदर हिरॉईन्स, छान लोकेशन्स. ३००० स्वे. फूटचे फ्लॅट्स ज्यात एकटीच हिरॉईन राहते. जिथल्या सोफ्यावर चुकुनही बसावे असे वाटू नये असे बुटके पण उंची सोफे.
असलं सगळं असतं फरहान अख्तरच्या चित्रपटात. हे खोटं करून दाखवलं.

जिंदगी ना मिलेगी दोबारा.
लोकेशन्स. डायलॉग्स. स्टोरी, कास्ट.
कॅरॅक्टर्सकडून अचूक निभावून घेतलेले काम. चित्रपटाचं सोनं.
आणि आपण विचार करत बाहेर... गाडीवरुन घरी परतताना डोक्यात एकच विचार :
'खरंच साऽलाऽऽ ... जिंदगी ना मिलेगी दोबारा...'

एका बाजूला "बडे बाप के फक्त 'बाप के नाम पे इण्डस्ट्रीमे टिके हुए' बच्चे" आणि दुसर्‍या बाजुला
~ फरहान अख्तर ~

शब्दखुणा: 

पब्लिकच्या मेमरीचं खरचं कौतुक करावसं वाटतं ,किती डिटेल्स लक्षात ठेवतात !!! ( आम्हाला काल कुठला शर्ट घातला होता ते पण लक्षात रहात नाही Proud )

फरहान सूट्स व एकूणच कपडे छान कॅरी करतो. रॉक ऑन मधील स्टॉक ब्रोकर चे कपडे थ्रीपीस सूट व कार्तिक मधील त्याच्या स्मार्ट अवतारातील कपडे नीट टेलर्ड असतात. बाकी नट फार फिल्मी हीरो वाट्तात. बीफी बॉडीज किंवा जनरल बॉलिवूड हँग ओवर मुळे ते कधीही फिल्मीच दिसतात. तसे ह्याचे होत नाही. सिनोरीटा गाण्यातली पांढरी लूज पायजमा सद्रूश्य पँट ही चांगली आहे. रॉक ऑन मधील सोचा है गाण्यातील त्याचे टीशर्ट व लांब केस चांगले आहेत.

लक बाय चांस मध्ये तो हिरॉइनच्या घरी येतो व तिची रूम बघून यू लिव्ह इन अ केक असे काहीतरी म्हणतो ते ही मजेशीर आहे.

बरोबर. तो फरहान आहे, तो गुलाबाचे फूल घेणाचा टिपिकलपणा करणार नाही, माय मिस्टेक Happy

जिंदगी..मधला- अभय आणि फरहान ह्रिथिकला भेटतात, तेव्हा अभय त्याची ती 'यार, तेरे बारेमें कुछ पता चला है..' ट्रिक ह्रिथिकवर वापरायला लागतो. बिचारा ह्रिथिकही त्यात अडकतो आणि बडबड करायला लागतो- ह्या सीनमधले फरहानचे फक्त एक्स्प्रेशन्स पहायचे! मस्त! Lol

एका बाजूला "बडे बाप के फक्त 'बाप के नाम पे इण्डस्ट्रीमे टिके हुए' बच्चे" आणि दुसर्‍या बाजुला
~ फरहान अख्तर ~ >>>
:हहगलो:, Rofl

काही चांगलं चाललेलं बघवू नये, काड्या टाकाव्यात ही वृत्ती बरी नव्हे. अजूनही हौस असेल, तर या फिरुन इथे. नाही म्हणणार नाही. नाहीतर लगेच सोशल साईट, जाहिरात वगैरे लेक्चर द्याल.>>>

लेक्चर आधीच दिलेले आहे. तुम्हाला समजत नसेल तर परत परत यायला नक्किच आवडेल. आधीच म्हणले तसे एख्दयाला सिंह आणी गाढव यात जर गाढव भारी वाटत असेल तर त्याला असलेच प्रतिसाद मिळतील माझ्याकडुन. सुमार दर्जाचे पिक्चर काढणारे आणी त्यांचे फैन क्लब काढणारे ह्यावर अजुन तरी फारच सौम्य शब्दात टिका केली आहे. केवळ मनोरंजन चांगले करणारे पिक्चर काढणायांना डोक्यावर घेण्याआधी थोडे आजुबाजुला बघा. सत्यजीत रे, निहलानी, श्याम बेनेगल यांची नावे तुम्हाला माहित नसतील याची खात्री आहे.

उगाचच नाही तिथे जाऊन फुकाच्या पिंका टाकून शोभा कशाला करून घ्यावी? >>>
दुसर्याने टाकलेल्या पिंका पाहुन बाजुने निघुन जावे. त्यात जाउन लोळायचीच हौस असेल तर त्याला पि़का टाकणारा काय करणार ? Biggrin

तू तुझा आयडी बदलून "अरे हाऽऽड" कर म्हणजे तुला बॅन क्लब वाल्यांना काही उत्तर द्यायची गरज नाही >>>

तुम्हाला कोणीतरी असे केले वाटते आधी ! चांगले आहे. तिथुन हाकलले म्हणुन इथे येउन चघळत बसला आहात का ? Biggrin

केवळ मनोरंजन चांगले करणारे पिक्चर काढणायांना डोक्यावर घेण्याआधी थोडे आजुबाजुला बघा.>>>>> खुर्ची दिसली! अता पुढे?

फ अ मला माहीत नाही, याचा अर्थ मला सत्यजीत रे माहीत आहेत असा नव्हे, हे कृपया ध्यानात घ्यावे >>>

फ अ माहित नाहि हे मला समजु शकत होते. सत्यजीत रे माहित नाहि असे म्हणाल तर कलमाडिंना विचारा कोणते उपचार घेतायत. तुमच्यासारखाच आजार आहे त्यांना. Proud

खुर्ची दिसली! अता पुढे? >> आता तुमचे डोके आपटा त्यावर. तुमची आणी आमची दोघांचीही डोकेदुखी एकदमच मिटेल. Proud

.. सगळी माहिती डोस्क्यात असलीच पाहिजे असा नियम नाही..... तुम्हीच उपचार घ्या..

तुमचा लाडका
चंद्रगुप्त

सगळी माहिती डोस्क्यात असलीच पाहिजे असा नियम नाही >>>> सर्वसामान्य माणसांसाठी तर आहे बुवा. म्हणजे शास्त्र (science) तसे म्हणते...

आता तुमच्यासाठी गुडघ्यातही असु शकेल. तेव्हा उपचार करुन घ्या. निदान हे तरी कळेल तुम्हाला की तुमचा मेंदु कोठे आहे! Proud

तुमचा गुरु
चाणक्य

ता.क. - चंद्रगुप्त आहात तर एका जरा चाणक्यचे. असे उलटे बोलु नये. उगाचच नाहि म्हणले मी - उपचार करुन घ्या असे. गुरु शिष्याच्या चांगल्यासाठीच सांगत असतो. Proud

काल शेवटी हि बकवास फिल्म पाहिली. २०० रुपये वाया गेले. इतकी सामान्य फिल्म बरेच दिवसांनी पाहिली.

दिल चाहता है चा सीक्वेल.
चार वर्षाचे भांडण - परत तेच - तिथे आमीर अक्षय - इथे फरहान - रोशन
आमीरचा nughty/cool character - इथे फरहान
confused सैफ - इथे अभय

एका मुलीबरोबर (किंवा मुलाबरोबर) लग्न ठरलेले असताना शेवटी अचानक दिवे पेटुन दुसरीशी लग्न करणे हा formula किती वेळा बघायला लागणार अजुन माहित नाहि.:फिदी:

अजुन एक formula - अचानक कोणीतरी भेटणे - त्यांच्याबरोबर पुढचा प्रवास - स्कुबा डायविंग वाली ट्रेनर ३ पोरांबरोबर एकदम त्यांच्या रुम मधे येते. (हा नक्किच करन जोहर टच आहे Proud )

आमीर चे DCH मधील character सारखा अभिनय करण्याचा फरहानचा केविलवाणा प्रयत्न हास्यास्पदच वाटतो. आमीरला त्याच्या जागी ठेवुन पाहात होतो आणी लगेच कळ्ले की फरहानच्या जागी आमीर असता तर त्याने हे character कुठल्या कुठे नेले असते. पण त्यासाठी तेवेढे talent लागते.

मी दिल चाहता है पाहिलेला नाही. मग आता हा कशाला पाहू? त्यापेक्षा दिल्ली बिल्ली बघतो. फ अ चा फॅन क्लब निघाला, मला तो हिरो असेल असे वाटत होते.. ( काय हे अज्ञान!) :फिदी:.. पन तो तर डायरेक्टर की निर्माता असला कुणीतरी निघाला.

मी पण फॅन क्लबात Happy
>>Raspy voice असलेले फार कमी लोकं जे आवडतात त्यात फरहान.>> अगदी Happy

मला तो हिरो असेल असे वाटत होते.. >>>

जामोप्या - फरहानला स्वतःला तो हिरोच वाटतो. असतो काहिजणांचा गैरसमज. हिमेश रेशमीया देखील हिरो झाला होता. अर्थात फरहानपेक्षा बराच बरा आहे हिमेश हिरो म्हणुन Proud

ऋयाम, नमस्कार...मी पण आहे क्लबात, मी फारसे पिक्चर पाहत नाही आजच JNMD बघितला. मी पाहीलेला फरहान चा अभिनय असलेला पहिलाच चित्रपट.... पण मला खरच त्याचा अभिनय आवडला...
अवांतर: हिमेश आणि त्याचे चित्रपट कशासाठी प्रसिद्ध आहेत ते लहान मुलांनापण माहीत आहे

सेमीपंखे चालतील का येथे? Happy मला तो दिग्दर्शक म्हणून दि.चा.है प्रचंड आवडला (Duh!), पण इतर एवढे नाही - डॉन, लक्ष्य ई. अभिनेता म्हणून लक बाय चान्स मधे जबरी काम, बाकी कार्तिक कॉ.का. एवढा नाही - पण तेथे मुळातच चित्रपट एवढा आवडला नाही, दीपिका प. कधीच आवडत नाही, त्यातून याला निवडून काढून आवडणे अवघड होते Happy लक बाय चान्स आणि रॉ़क ऑन त्याचे दिग्दर्शन असेल तर तेही खूप छान.

जिनामिदो मधले त्याचे काम म्हणजे द्रविड चे शतक. एकदम योग्य वेळेस, सुंदर काम, कसलीही टीका करू शकणार नाही. पण त्याला सचिनच्या शतकाची सर नाही Happy

सेमीपंखे चालणार नसतील तर त्या उरलेल्या अर्ध्या न-पंखे-पणासाठी माफ करा Happy

हिमेश आणि त्याचे चित्रपट कशासाठी प्रसिद्ध आहेत ते लहान मुलांनापण माहीत आहे >>. कशासाठी प्रसिद्ध आहेत ? माहित नाहि म्हणुन विचारत आहे.
आणी फरहानचे कशासाठी प्रसिद्ध आहेत तेहि सांगा. माहित नाहि म्हणुन विचारत आहे. म्हणजे असे नको व्हायला की आयुष्याचा उपदेश मिस व्हावा आणी सर्व आयुष्य वाया जावे. एकदा कळले म्हणजे भगवदगीता वगैरेची गरजच पडणार नाहि Proud

जिंदगी ना मिलेगी दोबारा.
लोकेशन्स. डायलॉग्स. स्टोरी, कास्ट.
कॅरॅक्टर्सकडून अचूक निभावून घेतलेले काम. चित्रपटाचं सोनं.>>>>>>

अरे आत्ताच लक्षात आले ............... काय राव तुम्हि पण ऋयाम ! एवढे फैन म्हणवता, एवढी स्तुती केली पण या पिक्चरला फरहानचे डायरेक्शन नाहिये हो Proud Proud आता काय करणार तुम्हि ? नवीन धागा काढता का ? झोया अख्तर फैन क्लब म्हणुन ? Proud

जिनामिदो मधले त्याचे काम म्हणजे द्रविड चे शतक. एकदम योग्य वेळेस, सुंदर काम, कसलीही टीका करू शकणार नाही. पण त्याला सचिनच्या शतकाची सर नाही
<<< गुडवन फारेंड, एकदम कणेकर इष्टाइल Happy
पण अपुन को मॅच जितनेसे मतलब है , नो मॅटर हु हिट्स इट :)... आमिर नी केलाच असता झकास पण फरहान इज टु गुड !
अर्थात मी पण कंपॅरिझन करतेच, आय मीन होतेच आपोपाप. ..लेटेस्ट सुल्तान मिर्झा आणि सिंघम ला बघताना बच्च्न ला इतकं मिस केलं :)( सिंघम ची मराठी वाक्यं सोडून)
देवगणनी कितीही बॉडी बनवली, कितीही व्हिलन्स ना हवेत उडवून तुडवून आपटलं तरी एक डॉयलॉग " जब तक बैठनेको न कहा जाए शराफत से खडे रहो, ये पुलिस स्टेशन है, तुम्हारे बाप का घर नही ' सारखा एक बच्चन च्या जंजीर चा डॉयलॉग मारायची आजच्या एकाही अ‍ॅक्टर ची पात्रता नाही :).

सारखा एक बच्चन च्या जंजीर चा डॉयलॉग मारायची आजच्या एकाही अ‍ॅक्टर ची पात्रता नाही <<<<
यावर टाळ्या आणि अनुमोदन... पण आपण फ अ फॅ क्ल मधे हे अवांतर का बोलतोय.. Wink

झोयातैंची काल एक मुलाखत वाचली त्यात आमच्या सात पिढ्या कविता करत आहेत असे त्या म्हटल्या.
काव्य करणे हे त्यांच्या साठी अगदी नैसर्गिक आहे. झोया व फरहान जुळी भावंडे आहेत. त्यांना सिनेमे बनविताना किती मजा येत असेल ना - त्या पूर्ण प्रक्रियेतच.

डॉन प्रकरण मला मुळातच पटलेले नाही. आता तर डॉन टू?

फार एंड उत्तम पोस्ट. कधी कधी आमिरचा आमीर पणा नको वाट्तो. फरहान कधीच अति होत नाही. संयत प्रेझेन्स. मनातले सर्व व्यक्त करेलच असे नाही. नॉन-बीफी व्यक्तिमत्त्व( नॉन फॅट मिल्क सारखे वाट्ते आहे.)

Pages