फरहान अख्तर फॅन क्लब

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

दिल चाहता है.
लक्ष्य.
रॉक ऑन!!
कार्तिक कॉलिंग कार्तिक.
जिंदगी ना मिलेगी दोबारा.
अ‍ॅण्ड काऊंटिंग...

रायटर
नॉट सो बॅड सिंगर
नॉट सो बॅड डान्सर
डायलॉग रायटर
डायरेक्टर
अ‍ॅण्ड काऊंटिंग...

'दिल चाहता है' पहायला गेलो ते आमिर खानमुळे. नुकताच त्याचा 'लगान' पाहिला होता. तो प्रचंड आवडला होता. 'दिल चाहता है' पाहिला आणि 'लगान' विसरलो. तुलना करण्याची चुक अजिबात करत नाहीये. पण सगळ्यांना 'लगान' विसरून 'डी. सी. एच.' च्या प्रेमात पाडणारा फरहान अख्तर नव्या दमाचा, आत्मविश्वास असलेला वाटला.

'लक्ष्य' पडला तेव्हा फार वाईट वाटलं. मला चित्रपटाच्या यशापयशाचं गणित समजत नाही, समीक्षाही जमत नाही. पण चांगलं की वाईट ते (*माझ्यापुरतं) समजतं. मला लक्ष्य आवडला.

रॉक ऑन बघायला गेलो, तेव्हा मात्र 'वेळ जात नाही म्हणून बापाकडचा पैसा वापरून चित्रपट काढला असेल' अशा अत्यंत चुकीच्या समजूतीने गेलो. चित्रपट पाहण्यापेक्षा मित्रांच्या टवाळक्या करत चित्रपट वाया घालवला. नंतर घरी वीसीडीवर पाहताना चूक समजली. रॉक ऑन ची गाणी थिएटर मधे ऐकण्याची संधी घालवली होती.
त्या विषयावर विचार करण्याची एक संधी घालवली होती.

कार्तिक कॉलिंग कार्तिक.
पैसा टाकला की सगळ्या सुंदर सुंदर गोष्टी मिळतात. सुंदर हिरॉईन्स, छान लोकेशन्स. ३००० स्वे. फूटचे फ्लॅट्स ज्यात एकटीच हिरॉईन राहते. जिथल्या सोफ्यावर चुकुनही बसावे असे वाटू नये असे बुटके पण उंची सोफे.
असलं सगळं असतं फरहान अख्तरच्या चित्रपटात. हे खोटं करून दाखवलं.

जिंदगी ना मिलेगी दोबारा.
लोकेशन्स. डायलॉग्स. स्टोरी, कास्ट.
कॅरॅक्टर्सकडून अचूक निभावून घेतलेले काम. चित्रपटाचं सोनं.
आणि आपण विचार करत बाहेर... गाडीवरुन घरी परतताना डोक्यात एकच विचार :
'खरंच साऽलाऽऽ ... जिंदगी ना मिलेगी दोबारा...'

एका बाजूला "बडे बाप के फक्त 'बाप के नाम पे इण्डस्ट्रीमे टिके हुए' बच्चे" आणि दुसर्‍या बाजुला
~ फरहान अख्तर ~

शब्दखुणा: 

हायला मला वाटले की ऋयामने फॅक्लब काढला आहे म्हणजे कंराजी चा असेल आणी RAC नाही मिळाले तरी वेटींग लीस्ट ला तरी आपला नंबर लागेल ... अगदीच निराशा झाली राव.... Wink
बाकी मला फरहान आवडतो पण मी त्याचा पंखा नाही.. Happy

मी एक कोलाज बनविले आहे पीपल मासिकातील फोटोंचे व सीडी तील फोटोंचे. Happy फ्रेम करायला टाकले आहे. रुयाम तुला पाठ्वून देउका पोस्टाने?

मामीजी, मै आपका भलताच शुक्रगुजार रहूंगा Happy इथेही टाका की हो मस्तपैकी!!!

ओ रामजी~
बस्क्या.... करांजी तर एक झाली होऽ आपण सर्व भारी लोक्सचा पंखा आहे Wink

चाणक्य, काढू देत ना मग. त्यांना ती व्यक्ती आवडते म्हणून ते काढतील. ती व्यक्ती तुम्हाला पण आवडलीच पाहिजे हा त्यांचा आग्रह नसेलच. तुम्ही पण काढा कोणाचातरी फॅ क्ल, कोणी आडवलंय Proud

मलाही आवडतो
पण दिग्दर्शक म्हणून जास्त इंप्रेस्सिव वाटतो.. त्याचे बॅक टू बॅक पिक्चर बघितले की आक्टिंग मधे तोच तोच पणा जाणवतो
Raspy voice असलेले फार कमी लोकं जे आवडतात त्यात फरहान.>>> अगदी अगदी
आवाज मस्तच आहे त्याचा

चाणक्य, काढू देत ना मग >>> काढु देत ना मग . मी कुठे नाहि म्हणतोय :फिदी:.

ती व्यक्ती तुम्हाला पण आवडलीच पाहिजे हा त्यांचा आग्रह नसेलच >>>> तेच तर मी सांगतोय की स्वतःला एखादी व्यक्ती आवडली की त्याची जाहिरात कशाला करता ? बाकिच्यांना ती आवडली पाहिजे हा कसला आग्रह ?

फॅन क्लब हा ज्या सगळ्यांना ती व्यक्ती आवडते त्यांच्याकरता "तो/ती किती भारी" ह्या प्रकारचं डिस्कशन करण्यासाठी असतो. ज्यांना ती व्यक्ती आवडत नाही त्यांनी फॅक्लत डोकावलं नाही तरी चालतं. बाकिच्यांना ती आवडली पाहिजे हा आग्रह तर नाहीच्चे.
वरचे ऋयामचे वाक्य वाचा :
>>>तुम्ही नकाच घेऊ. आम्ही आणि श्रीही समर्थ आहेत.>>>
Proud

मला फॅन क्लब हा कन्सेप्ट फारसा पटत नाही. पण फरान अख्तर आणि मी अनेक वेळा पाहिलेला दिल चाहता है. लक्ष आणि आता जिंदगी ना मिले २/१२ आवडला.

तुम्ही पण काढा कोणाचातरी फॅ क्ल, कोणी आडवलंय >>
फॅक्ल काढायचाच असेल तर रंगीबेरंगीचं पान विकत घेऊन काढावा असा नियम केला पाहीजे. Proud

<फरान अख्तर आणि मी अनेक वेळा पाहिलेला दिल चाहता है>
Rofl

<फॅक्ल काढायचाच असेल तर रंगीबेरंगीचं पान विकत घेऊन काढावा असा नियम केला पाहीजे. फिदीफिदी>
हे बाकी खरे~ आपण घेतलंय बॉ.. Proud

धन्यवाद सिंडरेला. नंतर लिंक टाकतो वरच्या फॅक्ल घोषणेत Wink

हां, तर फरहान का, कधी, केव्हा आवडला होता लिहायचे आहे ना? Happy

१) लक बाय चान्स- फरहान स्ट्रगल करणारा अभिनेता आहे, एका मोठ्या ब्रेकच्या आशेवर आहे. इशा शर्वाणी ह्या प्रचंड गाजलेल्या हीरॉईनबरोबर त्याची स्क्रीन टेस्ट आहे. स्क्रीन टेस्ट चांगली झाली आणि इशाला तो पसंत पडला, तर त्याला थेट हीरोचाच रोल मिळणार आहे, आणि त्याला तो रोल हवाच आहे. स्क्रीन टेस्ट सुरू होते. इशा पुढे आहे, आणि फरहान तिच्या थोऽडा मागे. ती मागे वळून काहीतरी ओळी म्हणते, मग फरहानच्या ओळी. ह्यावेळी तो सेटवर असलेला गुलाब उचलतो आणि सहजपणे अ‍ॅडिशन घेत, त्याला दिलेल्या ओळी आणि गुलाबाचे फूल अशी सांगड घालून इशाला इम्प्रेस करतो. अर्थातच हीरोचा रोल त्याला मिळतो!
फरहानने इतका सुंदर अभिनय केला आहे ह्या सीनमध्ये. धूर्त, संधीची वाट पाहणारा न्यूकमर, मुद्दाम हीरॉईनला इम्प्रेस करणारा मुलगा, पण चेहर्‍यावर कुठेही 'डेस्परेट' लुक नाही!

२) दिल चाहता है- प्रीतीवरचं प्रेम आमीरला समजतं, तोवर ती भारतात लग्न करायला निघून गेलेली असते. प्रथमच आमीरला पराभवाचा सामना करायला लागतो. प्रेमभंगामुळे तो अत्यंत एकटा पडतो. त्याला आठवण येते ती मित्राची. अभावितपणे तो नंबर फिरवतो, सैफचा आहे असं समजून. पण अक्षय खन्नाचा नंबर त्याच्याकडून लागतो. अक्षयशी तो भांडलेला असतो, त्यांच्यामध्ये मोठे गैरसमज निर्माण झालेले असतात. ते कित्येक काळ बोललेलेही नसतात. पण दु:खाच्या प्रसंगी त्याला आठवण येते ती त्याच्या प्रिय मित्राचीच.
फरहानमधला दिग्दर्शक दिसला इथे.

३) अर्थातच बॅगवती. हे फरहानचंच फाईन्ड असणार आहे Happy त्याचा 'टच' आहे त्यात

अजून लिहीन- रॉक ऑन, डॉनबद्दल, आणि अजूनही खूप काही Proud पण आता बाकीच्यांनीही लिहा

>>>फरान अख्तर आणि मी अनेक वेळा पाहिलेला दिल चाहता है>>>
Rofl
मला मिसेस.तेंडुलकर मधला गुज्जु त्रिवेदी आठवला Happy

ज्यांना ती व्यक्ती आवडत नाही त्यांनी फॅक्लत डोकावलं नाही तरी चालतं >>>> मग लिहिताच कशाला?. सोशल साइटवर लिहिता तर ज्यांना आवडत नाहि तेहि डोकावणारच. आणी तेहि फरहान सारख्याचा फैन क्लब काढल्यावर तर नक्किच .

आता कोणाला काय आवडते हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. आता एखाद्याला गाढवात देखिल सिंहाचे गुण दिसत असतील पण ते सोशल साईट वर जाहिररित्या सांगितल्यावर टिका होणारच. Proud

आम्ही आणि श्रीही समर्थ आहेत >>>>

जास्त नका घेउ (डोक्यावर बरका! ) नाहितर तो बिचारा फरहान (हि) पडायचा गटारात ! Proud

>> ह्यावेळी तो सेटवर असलेला गुलाब उचलतो आणि सहजपणे अ‍ॅडिशन घेत, त्याला दिलेल्या ओळी आणि गुलाबाचे फूल अशी सांगड घालून इशाला इम्प्रेस करतो.
नाही. तो तिथला एक शोपीस उचलून तिच्या हातांत देतो, आणि ते बघून तिला हसू फुटतं. हा खरा त्याचा 'टच' आहे. फूल फार... 'चीऽऽऽ' झालं असतं. Proud

कार्तिक कॉलींग कार्तिक मधला तो मोटरसायकलवर नायिकेला लाँग ड्राइव्हला नेतो आणि कॉफी पाजतो तो प्रसंग पण मला एकदम फरहान टच असलेला वाटला.

मा. चाणक्य.

उगाचच नाही तिथे जाऊन फुकाच्या पिंका टाकून शोभा कशाला करून घ्यावी?
लोकांनी वर काय लिहीले आहे, हे समजत नसेल तर गोष्ट निराळी.

बाकी तुमच्या पिंका तुम्ही तुम्हाला जे आवडते, तिथे घेऊन जा आणि तिथे टाका. मी विचार करतो आहे, की 'फरहान अख्तर बॅन क्लब' नावाचा एक धागा काढून द्यावा तुम्हाला. तुमची सगळी टी आणि का यथा इच्छा, पण तिथे करा.

काही चांगलं चाललेलं बघवू नये, काड्या टाकाव्यात ही वृत्ती बरी नव्हे. अजूनही हौस असेल, तर या फिरुन इथे. नाही म्हणणार नाही. नाहीतर लगेच सोशल साईट, जाहिरात वगैरे लेक्चर द्याल.

ऋयाम
तू तुझा आयडी बदलून "अरे हाऽऽड" कर म्हणजे तुला बॅन क्लब वाल्यांना काही उत्तर द्यायची गरज नाही
(बुवा - प्रताधिकाराचे १० पैसे टान्स्फर केलेत)

नाही. तो तिथला एक शोपीस उचलून तिच्या हातांत देतो, आणि ते बघून तिला हसू फुटतं. हा खरा त्याचा 'टच' आहे. फूल फार... 'चीऽऽऽ' झालं असतं. फिदीफिदी

<< टु बी व्हेरी प्रिसाइझ घोड्याचं डोकं असलेला शो पिस ( फुलं म्हणून) देतो Proud

तसाच कार्तिक मधला अजून एक लहानसा "फरहान" कॅटेगरी सीन, दीपिका सिगरेट पेटवते, हा काढून घेऊन फेकून देतो. थोड्या वेळाने ती लिपस्टिक काढून ओठापाशी नेते तर हा ती पण फेकतो चुकून Happy ती फक्त एक लूक देते , मग फरहान उठून ती लिपस्टिक उचलून त्याला लागलेल्या गवताच्या काडीसकट तिला परत देतो!! Happy

Pages