फरहान अख्तर फॅन क्लब

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

दिल चाहता है.
लक्ष्य.
रॉक ऑन!!
कार्तिक कॉलिंग कार्तिक.
जिंदगी ना मिलेगी दोबारा.
अ‍ॅण्ड काऊंटिंग...

रायटर
नॉट सो बॅड सिंगर
नॉट सो बॅड डान्सर
डायलॉग रायटर
डायरेक्टर
अ‍ॅण्ड काऊंटिंग...

'दिल चाहता है' पहायला गेलो ते आमिर खानमुळे. नुकताच त्याचा 'लगान' पाहिला होता. तो प्रचंड आवडला होता. 'दिल चाहता है' पाहिला आणि 'लगान' विसरलो. तुलना करण्याची चुक अजिबात करत नाहीये. पण सगळ्यांना 'लगान' विसरून 'डी. सी. एच.' च्या प्रेमात पाडणारा फरहान अख्तर नव्या दमाचा, आत्मविश्वास असलेला वाटला.

'लक्ष्य' पडला तेव्हा फार वाईट वाटलं. मला चित्रपटाच्या यशापयशाचं गणित समजत नाही, समीक्षाही जमत नाही. पण चांगलं की वाईट ते (*माझ्यापुरतं) समजतं. मला लक्ष्य आवडला.

रॉक ऑन बघायला गेलो, तेव्हा मात्र 'वेळ जात नाही म्हणून बापाकडचा पैसा वापरून चित्रपट काढला असेल' अशा अत्यंत चुकीच्या समजूतीने गेलो. चित्रपट पाहण्यापेक्षा मित्रांच्या टवाळक्या करत चित्रपट वाया घालवला. नंतर घरी वीसीडीवर पाहताना चूक समजली. रॉक ऑन ची गाणी थिएटर मधे ऐकण्याची संधी घालवली होती.
त्या विषयावर विचार करण्याची एक संधी घालवली होती.

कार्तिक कॉलिंग कार्तिक.
पैसा टाकला की सगळ्या सुंदर सुंदर गोष्टी मिळतात. सुंदर हिरॉईन्स, छान लोकेशन्स. ३००० स्वे. फूटचे फ्लॅट्स ज्यात एकटीच हिरॉईन राहते. जिथल्या सोफ्यावर चुकुनही बसावे असे वाटू नये असे बुटके पण उंची सोफे.
असलं सगळं असतं फरहान अख्तरच्या चित्रपटात. हे खोटं करून दाखवलं.

जिंदगी ना मिलेगी दोबारा.
लोकेशन्स. डायलॉग्स. स्टोरी, कास्ट.
कॅरॅक्टर्सकडून अचूक निभावून घेतलेले काम. चित्रपटाचं सोनं.
आणि आपण विचार करत बाहेर... गाडीवरुन घरी परतताना डोक्यात एकच विचार :
'खरंच साऽलाऽऽ ... जिंदगी ना मिलेगी दोबारा...'

एका बाजूला "बडे बाप के फक्त 'बाप के नाम पे इण्डस्ट्रीमे टिके हुए' बच्चे" आणि दुसर्‍या बाजुला
~ फरहान अख्तर ~

शब्दखुणा: 

+१
पण 'लक बाय चान्स ' नाही या लिस्ट मधे ??
मला तो पण आवडला, रिअ‍ॅलिस्टिक एकदम :).
लक्ष्य नाही आवडला.

यात डॉन नाही?
लक बाय चान्स आणि ZNMD झोया अख्तरने दिग्दर्शित केलेत.
'कार्तिक..' मला नव्हता आवडला.

बाकी मी आहे फॅन क्लबात. Happy

+१ Happy

+१
अवांतर - रॉक ऑन मध्ये त्याला स्वतःच गायलेले बघितल्यावर मला एकदम कॉन्फिडन्स आला होता आपणही गाणी गाऊ शकतो याचा. Proud

अभय देओलचा फॅन क्लब नाही का काढणार कोणी, असेल तर माझा नंबर पहिला.

रॉक ऑन इतका का आवडलेला लोकांना? किती नेहमीची स्टोरी आहे. डिस्नी वरच्या कितीतरी टिन मुव्हीस्टार बनणार्‍या अनेक मुव्ही त्याच स्टोरी वर आलेल्या आहेत. रॉक ऑन बघताना त्यामुळे तेच तेच परत पाहतोय अस वाटल.
फराह अख्तर आवडतो. त्याचा कार्तीक आवडलेला.

यात डॉन नाही????>>>

+१>>>

मी तर म्हणतो यात काहीच असू नये. Lol Rofl

सामान्य धागा. हू द हेल इज फरहान अख्तर????

म्हणजे, 'कळले' की तो कोण आहे ते, पण त्यानंतरही 'असे' विचारावेसे वाटले. Lol

बख्श दो यार, बस बख्श दो! Lol

अहो अख्तर बद्दल बोललात ते ठीक आहे पण धाग्यानी तुमचं काय घोडं मारलय. तेवढ्यात शेरा मारून घेतला. Proud सारख्या वर्गवार्‍या करायलाच पाहिजे का?

बरंय रे बाबा. तुझा आयडी हाऽऽऽडऽऽ नाही.>>> Lol

आय होप की हे वाहते पान नसेल. Proud

घोडं कुणाचं मारलं गेलं हे समजलं नाही. असो. आग राज्य येथे आता झोपायची वेळ झाली आहे.

-'बेफिकीर'!

सगळं आहे मान्य , पण म्हणून सगळंच छान आहे असं कसं म्हणायंच ? जे नाही आवडलं तेच लिहिलं .. उगाच तू पर्सनली घेऊ नकोस हां ... Happy

सामान्य धागा. हू द हेल इज फरहान अख्तर????

बख्श दो यार >>>>> Rofl हो ना, उगीच फालतू लोकांचे फॅक्ल काढायची सवयच आहे माबोवरच्या लोकांना Happy

दिल चाहता है,रॉक ऑन, कार्तिक कॉलिंग..., जिंनामिदो.... सगळेच आवडलेले.

>>>हो ना, उगीच फालतू लोकांचे फॅक्ल काढायची सवयच आहे माबोवरच्या लोकांना>>> Lol

मै Rofl

मै Lol

Pages