नावनोंदणीची अंतिम तारीख वाढवुन १६ जुलै २०११ केली आहे.
मायबोली घेउन येत आहे आमच्या अनेक उपक्रमांपैकी एक ज्याची समस्त मायबोलीकर अत्यंत अतुरतेने वाट पाहतात असा नाविन्यपूर्ण, लज्जतदार, खुमासदार, हवाहवासा वाटणारा तो 'वर्षा विहार'.
अर्थात आपल्या सर्व आवड्त्या नावड्त्या... पाहीलेल्या...न पाहीलेल्या...ख-या आणि अर्थातच कदाचित ड्यु आयडी मायबोलीकरांना प्रत्यक्ष याची देही याची डोळा भेटण्याची पर्वणीच!!!! यंदाचा हा मैत्रीचा सोहळा संपन्न होणार आहे २४ जुलै २०११ या दिवशी कर्जत-चौक फाट्यापासुन साधारण ३०-३२ कि.मी. अंतरावर असलेल्या "फार्म लाईफ होलिडेज" इथे.
************
ऐका हो ऐकाsssssssssssssssss...
ए मग्गन भाउ, ए छग्गन भाउ...
ओ सामलोss रे दामलोss......
ओ ऐका हो ऐकाssss....
ओ रघोब्बा, ओ धोंडीबा
ओ कर्नल सिंगं, ओ जर्नल सिंगं
ओ तुम्हीही ऐकाssss....
ऐका हो ऐकाsssssssssss............
पैशाला दोन खारकाsssssssssssssss ! (क्काय ?
काय म्हणलात...? तो शब्द वेगळा आहे? खारकांच्या ऐवजी काही तरी वेगळं आहे? कानफटात खायचीय का राव? मायबोलीकर हाणतील धरून मलाबी आन तुमालाबी.)
तर काय सांगत हुतो.....
तात्या, नाना, मामा, काका, भावांनो आन समद्या काकवानो, ताया-बायांनो ध्यान दिवुन ऐका ! पुन्यांदा दवंडी हुनार न्हाय, कुनालाबी चानस भेटनार नाय. लक्ष असु द्या हिकडं...., आमी समदे चाललुया तकडं...
तकडं म्हंजी कुटं...?
तर पावसात भिजाया! दोस्तास्नी आन मैतरणींस्नी भेटाया. हिरव्यागार रानात, पावसाच्या गाण्यात, थेंबाचं संगीत हाय, गारांचा नाच हाय. थोडीशी थंडी हाय, कुणासाठी गुलाबी तं कुणासाठी शराबी. कर्जतच्या पल्याड, चौकच्या अल्याड डोंगराच्या कुशीत मस्त निसर्ग हाय. समद्या मायबोलीकरांना पिरमाचं आवातणं हाय ! चला बिगी-बिगी पिवश्या भरा, तहान लाडू - भुक लाडू घ्या आन निघा. आवं ततं पोचुपत्तुर कायबाय फायजे ना पोटाला. येकडाव ततं पोचलो की हायेच की शिरा-पूरी........!
तर मंडळी....
मायबोली घेउन येत आहे आमच्या अनेक उपक्रमांपैकी एक ज्याची समस्त मायबोलीकर अत्यंत अतुरतेने वाट पाहतात असा नाविन्यपूर्ण, लज्जतदार, खुमासदार, हवाहवासा वाटणारा तो 'वर्षा विहार'.
एक असा उपक्रम ज्यात मायबोलीवरचे सभासदच नव्हेत तर त्यांचे कुटुंबीयही सहभागी होऊ शकतात. मायबोलीवरचं लेखन, इतर अनेक उपक्रम, इथे चालणार्या गप्पा, चर्चा, चेष्टा-मस्करी (आणि क्वचित काही तात्विक मतभेद सुध्दा ) याबद्दल समस्त मायबोलीकरांचे कुटुंबीय रोज काही ना काही ऐकतच असतात. त्या गप्पा, ती धमाल त्यांना प्रत्यक्ष अनुभवायला मिळते ती वर्षाविहारादिवशी. वविदिवशी नवीन भेटीगाठी होतात, ओळखी होतात, आधीच्या ओळखींचं मैत्रीत रुपांतर होतं, मैत्रीचे नवीन धागेही विणले जातात.
अर्थात आपल्या सर्व आवड्त्या नावड्त्या... पाहीलेल्या...न पाहीलेल्या...ख-या आणि अर्थातच कदाचित ड्यु आयडी मायबोलीकरांना प्रत्यक्ष याची देही याची डोळा भेटण्याची पर्वणीच!!!! यंदाचा हा मैत्रीचा सोहळा संपन्न होणार आहे २४ जुलै २०११ या दिवशी कर्जत-चौक फाट्यापासुन साधारण ३०-३२ कि.मी. अंतरावर असलेल्या "फार्म लाईफ होलिडेज" इथे. तर मंडळी, तो दिवस साजरा करण्याची पूर्वतयारी म्हणून काही गोष्टी नियमानुसार आणि ठराविक दिवशी करणं गरजेचं आहे.
त्यापैकी पहिली गोष्ट म्हणजे वविला येणार्यांची नावनोंदणी. वविला registered मायबोलीकर आणि त्यांचे कुटुंबिय (पति/पत्नी/मुले) येऊ शकतात. इच्छुक मायबोलीकरांनी त्यासाठी vavi@maayboli.com या पत्त्यावर ई-मेल करायची आहे.
नावनोंदणी करताना सभासदांनी खालील गोष्टींची माहिती देणे आवश्यक आहे. ईमेल च्यासब्जेक्ट मध्ये ववि२०११ नोंदणी' असे नमुद करण्यास विसर नका.
१. नाव
२. मायबोलीचा user id
३. संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक (भ्रमणध्वनी क्रमांक दिल्यास उत्तम)
४. कुठल्या शहरातून येणार (मुंबई, पुणे इ.)
५. आपला नेहमी वापरात असलेला email id
६. सहभागी होणार्या एकूण व्यक्तींची संख्या (प्रौढ/ मुले).
७. लहान मुले (६ ते १० किंवा ३ ते ५ वयोगट) असल्यास त्यांचे वय
८. मायबोली गृपबरोबर बसने येणार की स्वतंत्र येणार?
९. पैसे कसे भरणार? प्रत्यक्ष की ऑनलाईन?
नावनोंदणीची अंतिम तारीख आहे १६ जुलै २०११.
एकूण इच्छुकांच्या संख्येनुसार बसभाडे ठरवण्यास मदत होते. त्यामुळे लवकरात लवकर आपली नावनोंदणी करा. नावनोंदणीचे काम पूर्ण झाले की पुढचे महत्त्वाचे काम म्हणजे पैसे जमा करणे.
वर्षाविहार-२०११ साठी वर्गणी आहे :
पुणेकरांसाठी :
प्रौढ : रु. ६२५ प्रत्येकी. (रिसॉर्ट : रु. ३५०, बस : रु. २२५, सा.स. : रु. ५०)
मुंबईकरांसाठी :
प्रौढ : रु. ६०० प्रत्येकी. (रिसॉर्ट : रु. ३५०, बस : रु. २००, सा.स. : रु. ५०)
(फक्त बस खर्चामुळे वर्गणी रक्कम वेगवेगळी आहे.)
मुले (वय ६ ते १० वर्षे) : रु. ३५० प्रत्येकी.
५ वर्षांपर्यंतच्या मुलांना काहीही शुल्क नाही.
पुणे आणि मुंबई इथे १७ जुलै २०११ या एकाच दिवशी वविचे पैसे जमा केले जातील.
पुणे - स्थळ: बालगंधर्व नाट्यगृहाच्या तिकीटखिडकीशेजारील कट्टा. वेळ: १७ जुलै २०११, सं. ५.३० ते ८.००
मुंबई - स्थळ: शिवाजी पार्क, उद्यान गणेश मंदिराच्या प्रांगणात. वेळ: १७ जुलै २०११, सं. ५.३० ते ८.००
समजा पैसे भरून जर आयत्यावेळी काही कारणाने वविला येणं रद्द केलं तर बसचे भाडे वजा करून उरलेले पैसे परत करण्यात येतील.
स्वतंत्र येणार्यांनी बसभाडे देण्याची अर्थातच गरज नाही.
या पैकी कोठे तुम्हाला पोहोचणे शक्य नसेल तर तुमच्या संपर्कातल्या माबोकरांमार्फत पैसे संयोजकांपर्यंत पोचवा.
ऑनलाईन पैसे भरणार्यांना ज्या अकाऊंटमध्ये पैसे भरायचे आहेत त्याची सर्व माहिती ईमेलने कळविली जाईल.
मुंबई आणि पुणे सोडुन इतर ठिकाणच्या तसेच भारताबाहेरील कोणालाही वर्षाविहारास येणे शक्य असेल तर त्यांनी जरूर यावे.
वर्षाविहार-२०११ संयोजन समिती :
पुणे -
मल्लीनाथ (MallinathK) फोन : ९९६०३६६५६६
राम चिंचलीकर(राम) फोन : ९८५०८८५४२५
मुंबई -
आनंद चव्हाण (आनंदमैत्री) फोन : ९७६९४५४४२९
आनंद केळकर (आनंद्_सुजू) फोन : ९८२०००९८२२
संदिप खांबेटे(घारुआण्णा) फोन : ९८१९९९३६३४
http://www.farmlifeholidays.com या दुव्यावर रिसॉर्टची अधिक माहिती मिळू शकेल. आपल्याला काही शंका असल्यास आपण इथे मेसेज टाकू शकता अथवा vavi@maayboli.com या ई-मेल आयडीवर संपर्क करु शकता.
गेल्या वर्षी यू. के.’ज् रिसॉर्ट इथे पार पडलेल्या ववि-२०१० ला मायबोलीकर आणि त्यांचे कुटुंबीय यांची विक्रमी उपस्थिती होती. तो विक्रम यंदा मोडला जावा अशी सर्वांचीच इच्छा आहे.
वविची रुपरेषा साधारण अशी असेल......
सकाळी ९.३० वाजेपर्यंत पुणे व मुंबईच्या बसेस रिसॉर्टवर पोहोचतील
सकाळी ९.३० ते १०.०० न्याहारी करुया
१०.०० ते १०.३० स्विमिंगपूलात / नदीत/ओढ्यात उतरण्यासाठीचे चेंजिंग
१०.३० ते १२.३० स्विमिंग पूल ,नदीत/ ओढा व इतर उपलब्ध धबधबा डान्स
: मधे धम्माल मस्ती
१२.३० ते १.०० परत चेंजिंग
१.०० ते २.०० जेवण
२.३०-४.३० मनोरंजन
५.०० वाजता न्याहारी
५.३० वाजता जड अंत:करणाने आपापल्या शहरात नेणार्या बस मधून प्रयाण.
तेव्हा, भेटू या, आपल्या वविला!
बस रुटची माहिती इथेच प्रकाशीत केली जाईल. नोंदणी केलेल्या सर्वांनी कृपया आपला थांबा आणि बरोबर येणार्या मंडळींची नाव इमेल करुन कळवावी, ही माहिती वहातूक कंत्राटदाराला परवान्यासाठी लागणार आहे.
सुचना: रिसॉर्ट मधे पाण्यात उतरताना पोहोण्याचा पोषाख असणे आवश्यक आहे. (महिलांसाठी: पोहोण्याचा पोषाख नसल्यास टेरिकॉट्/नायलॉन मटेरिअलचे लेगिंग्ज आणि टि शर्ट चालतील) पाण्यात उतरताना शक्यतो कॉटनचे कपडे/ जीन्स वगैरे गोष्टी टाळाव्यात)
धन्यवाद.
वविसंयोजक.
पुण्याची बस मागच्या
पुण्याची बस मागच्या वेळेसारखी(च) यसजी रोडवरून सुटणार आहे का?
>>>
दक्षे एस्जी रोड सिंहगडापासुन ते दांडेकर पुलापर्यंत आहे. नीट स्पेसिफाय कर की कुठे बस येणार आहे किंवा यायला हविये.
नोंदणी केलेली आहे. ऑनलाईन ट्रान्स्फर साठी डिटेल्स पाठवावेत
पैसे असुदे यांच्या अकाउंटला
पैसे असुदे यांच्या अकाउंटला ऑनलाईन ट्रान्स्फर केलेले आहेत व तसे त्यांना कळवलेले आहे. कृपया पोच द्यावी.
नावनोंदणीची अंतिम तारीख
नावनोंदणीची अंतिम तारीख वाढवुन १६ जुलै २०११ केली आहे.
ववि चे पैसे ही अमित देसाई
ववि चे पैसे ही अमित देसाई यांच्या अकाऊंटलाच ट्रान्सफर केले तर चालणारेत का?
मीही करते नावनोंदणी
मीही करते नावनोंदणी
मस्तच! मी ही प्रयत्न करतो.
मस्तच!
मी ही प्रयत्न करतो.
देसाई यांच्या कडे पैसे
देसाई यांच्या कडे पैसे ट्रान्सफर केलेत. पोच पावती द्या.
मोनालीप, कृपया ट्रॅन्झेक्शन
मोनालीप, कृपया ट्रॅन्झेक्शन आयडीसह दिलेल्या इमेल पत्त्यावर मेल करा, पोच देण्यात येईल.
उद्या नाव नोंदणीचा शेवटचा
उद्या नाव नोंदणीचा शेवटचा दिवस.... अजुनही काही झोपलेले मायबोलीकर आपल्या कोशातुन बाहेर पडणार का??
ववी म्हणजे खुप सार्या माबोकराना प्रत्यक्ष भेटण्याची संधी .. सर्व हेवेदावे, वाद, कंपु विसरुन एकमेकांच्या सहवासात मनसोक्त आनंद लुटण्याचा सोनेरी दिवस.. मित्रमैत्रीणीनो त्वरा करा आणी संयोजकाना सहकार्य करा..
यावेळेसचा वर्षाविहार रद्द
यावेळेसचा वर्षाविहार रद्द करा. जी जमेल ती रक्क्म माबोतर्फे अतिरेकी हल्ल्यात जखमी/ठार झालेल्या लोकांना उपचारासाठी द्या. मी वर्षाविहार मध्ये नाहि परंतु मदत देण्यास तयार आहे. नाहितर इतर धाग्यांवर मोठीमोठी "आपण काय करणार" अशी नुसतीच चर्चा करण्यात काहिहि अर्थ नाहि!
अमित देसाई यांच्या अकाऊंट
अमित देसाई यांच्या अकाऊंट मध्ये पैसे ट्रान्सफर केलेत. कृपया पोचपावती देणे.
आत्ताच नोंदणी केलेय. कृपया
आत्ताच नोंदणी केलेय.
कृपया आपल्यापर्यंत विरोप पोचल्याची पोच द्यावी ही विनंती.
वविसंयोजक.. मी काल रात्री
वविसंयोजक.. मी काल रात्री उशिराने ववि नोंदणीची मेल पाठवली आहे.. पुण्याच्या बशीत जागा असेल कृपया पोचपावती द्यावी.. अन्यथा तसे कळवावे..
यावेळी मी येणार नाय प्रचंड
यावेळी मी येणार नाय

प्रचंड काम आणि टुरमुळे वविला येणे बहुतेक जमणार नाही
पण जमलेच तर ऐनवेळेला टपकेन.... चालेल का?
बसचे रुट व वेळ मेल करुन
बसचे रुट व वेळ मेल करुन पाठवणार का? बस ठाणे वरुन जाणार का? तर ठाणेवाले तिथेच चढतील. जमेल का ते?
मी पण येणार
मी पण येणार
मी येणार(च) अशी चिन्हे आहेत.
मी येणार(च) अशी चिन्हे आहेत.
पैशान्ची सोय झाली, पण अजुन बाईकची सोय व्हायची आहे, ती होईल! अन मी येणार, म्याप छापुन घेतलाय
बर, तिकडे मोबाईलला रेन्ज आहे का?
तेवढ कासवाच्या जोडीच बघा रे कुणीतरी
लिंबुजी, मागच्या वेळेसारखे
लिंबुजी, मागच्या वेळेसारखे सर्वांआधी पोचलात तर काठी/सोटा घेऊन गेट पाशी उभे राहू नका
मोबाईल रेंजची थोडी बोंबच आहे.
मोबाईल रेंजची थोडी बोंबच आहे.
पण प्रयत्न करा लागला तर लगेल.
मल्ली, त्यांना म्हणावं
मल्ली, त्यांना म्हणावं पुण्याच्या बशीला फॉलो करा
दोन दिवसांवर ववि आलाय तरीही
दोन दिवसांवर ववि आलाय तरीही अजूनपर्यंत पुढची काहीच खबर आली कशी नाही?
वाट पाहतोय.
हां ना राव प्रमोद, उद्या
हां ना राव प्रमोद, उद्या नक्की आहे ना ववि?

बर, अस केल तर? समजा दोनचार गोवर्या, माचिस, पापडान्चे एक प्याकेट, थोडे तेल/मीठ/हिन्ग अस आणून, वविला आडबाजुस गोवर्या पेटवुन त्यावर तेल/मिठ/हिन्ग चोळलेले पापड भाजुन खाणे/खिलवणे कितपत शक्य आहे? नै म्हणजे पापड भाजले जातिल, खपतील का सगळे?
तर मग आणू का गोवर्या?
समस्त वविकरांना वविसाठी भरपूर
समस्त वविकरांना वविसाठी भरपूर शुभेच्छा!!
मस्त मज्जा करा... पावसात धमाल करा
आणि ववि झाल्यावर वृत्तातं टाका......फोटो सहित
ऑल द बेस्ट
<< मस्त मज्जा करा... पावसात
<< मस्त मज्जा करा... पावसात धमाल करा >> १००% अनुमोदन.
हाय लोक्स कसा पार पडला ववि??
हाय लोक्स
कसा पार पडला ववि??
तोषा, दक्षे तुम्हाला फोन करायचा प्रयत्न केला पण फार्मवर बहुदा रेंज नसावी. की फोन घ्यायलासुद्धा वेळ नव्हता एव्हढे बिझी होतात मज्जा करण्यात
शेवटी तोषा, दक्षिणा, अम्या आणि गुब्बीला समस केला........तो तरी मिळाला का महाभागांनो????
चला आता उद्या पटापट वृत्तांत येऊ देत....
सालाबादप्रमाणे ववि धमाल पार
सालाबादप्रमाणे ववि धमाल पार पडला, वृत्तान्त येतिलच!
पापड भाजण्याचे तेवढे राहूनच गेले, गडबडीत न्यायचेच विसरलो.
वविकर्स आता वृत्तांताची बारी
वविकर्स आता वृत्तांताची बारी होऊन जाऊदेत. बारी बारीनं.
सालबादाप्रमाणे यंदाही ववि
सालबादाप्रमाणे यंदाही ववि दणक्यात पार पडलेला आहे... सर्व संयोजकांचे उत्तम संजोयनासाठी अभिनंदन आणि आभार.... पहिल्यांदाच वविला आलेल्या सगळ्यांचे स्वागत....
वृत्तांत शक्यतो नवीन लोकांनीच लिहा.... आणि सगळ्यांनी माबोवर सक्रीय व्हा....
लाजो फोन ला रेंज नसल्याने तुझा फोन मिळाला नाही... परतीच्या वाटेवर जेव्हा रेंज मिळाली तेव्हा तुझे समस मिळाले...
फोन ला रेंज नसल्याने तुझा फोन
फोन ला रेंज नसल्याने तुझा फोन मिळाला नाही... << मला वाटलचं...
परतीच्या वाटेवर जेव्हा रेंज मिळाली तेव्हा तुझे समस मिळाले...<< ग्रेट.
गुब्बीचा मेसेज आला तुमच्या संध्याकाळी आणि आमच्या रात्री ११.४२ ला
मी झोपेतुन दचकुन जागी झाले
तोषाचा आज सकाळी मेसेज आला
Yo Rocks!
Pages