वर्षाविहार २०११ - फार्म लाईफ !!!

Submitted by ववि_संयोजक on 22 June, 2011 - 03:50

नावनोंदणीची अंतिम तारीख वाढवुन १६ जुलै २०११ केली आहे.

मायबोली घेउन येत आहे आमच्या अनेक उपक्रमांपैकी एक ज्याची समस्त मायबोलीकर अत्यंत अतुरतेने वाट पाहतात असा नाविन्यपूर्ण, लज्जतदार, खुमासदार, हवाहवासा वाटणारा तो 'वर्षा विहार'.
अर्थात आपल्या सर्व आवड्त्या नावड्त्या... पाहीलेल्या...न पाहीलेल्या...ख-या आणि अर्थातच कदाचित ड्यु आयडी मायबोलीकरांना प्रत्यक्ष याची देही याची डोळा भेटण्याची पर्वणीच!!!! यंदाचा हा मैत्रीचा सोहळा संपन्न होणार आहे २४ जुलै २०११ या दिवशी कर्जत-चौक फाट्यापासुन साधारण ३०-३२ कि.मी. अंतरावर असलेल्या "फार्म लाईफ होलिडेज" इथे.

************

ऐका हो ऐकाsssssssssssssssss...
ए मग्गन भाउ, ए छग्गन भाउ...
ओ सामलोss रे दामलोss......
ओ ऐका हो ऐकाssss....
ओ रघोब्बा, ओ धोंडीबा
ओ कर्नल सिंगं, ओ जर्नल सिंगं
ओ तुम्हीही ऐकाssss....

ऐका हो ऐकाsssssssssss............
पैशाला दोन खारकाsssssssssssssss ! (क्काय ? Uhoh काय म्हणलात...? तो शब्द वेगळा आहे? खारकांच्या ऐवजी काही तरी वेगळं आहे? कानफटात खायचीय का राव? मायबोलीकर हाणतील धरून मलाबी आन तुमालाबी.)

तर काय सांगत हुतो.....

तात्या, नाना, मामा, काका, भावांनो आन समद्या काकवानो, ताया-बायांनो ध्यान दिवुन ऐका ! पुन्यांदा दवंडी हुनार न्हाय, कुनालाबी चानस भेटनार नाय. लक्ष असु द्या हिकडं...., आमी समदे चाललुया तकडं...

तकडं म्हंजी कुटं...?

तर पावसात भिजाया! दोस्तास्नी आन मैतरणींस्नी भेटाया. हिरव्यागार रानात, पावसाच्या गाण्यात, थेंबाचं संगीत हाय, गारांचा नाच हाय. थोडीशी थंडी हाय, कुणासाठी गुलाबी तं कुणासाठी शराबी. कर्जतच्या पल्याड, चौकच्या अल्याड डोंगराच्या कुशीत मस्त निसर्ग हाय. समद्या मायबोलीकरांना पिरमाचं आवातणं हाय ! चला बिगी-बिगी पिवश्या भरा, तहान लाडू - भुक लाडू घ्या आन निघा. आवं ततं पोचुपत्तुर कायबाय फायजे ना पोटाला. येकडाव ततं पोचलो की हायेच की शिरा-पूरी........!

तर मंडळी....
मायबोली घेउन येत आहे आमच्या अनेक उपक्रमांपैकी एक ज्याची समस्त मायबोलीकर अत्यंत अतुरतेने वाट पाहतात असा नाविन्यपूर्ण, लज्जतदार, खुमासदार, हवाहवासा वाटणारा तो 'वर्षा विहार'.

एक असा उपक्रम ज्यात मायबोलीवरचे सभासदच नव्हेत तर त्यांचे कुटुंबीयही सहभागी होऊ शकतात. मायबोलीवरचं लेखन, इतर अनेक उपक्रम, इथे चालणार्‍या गप्पा, चर्चा, चेष्टा-मस्करी (आणि क्वचित काही तात्विक मतभेद सुध्दा ) याबद्दल समस्त मायबोलीकरांचे कुटुंबीय रोज काही ना काही ऐकतच असतात. त्या गप्पा, ती धमाल त्यांना प्रत्यक्ष अनुभवायला मिळते ती वर्षाविहारादिवशी. वविदिवशी नवीन भेटीगाठी होतात, ओळखी होतात, आधीच्या ओळखींचं मैत्रीत रुपांतर होतं, मैत्रीचे नवीन धागेही विणले जातात.
अर्थात आपल्या सर्व आवड्त्या नावड्त्या... पाहीलेल्या...न पाहीलेल्या...ख-या आणि अर्थातच कदाचित ड्यु आयडी मायबोलीकरांना प्रत्यक्ष याची देही याची डोळा भेटण्याची पर्वणीच!!!! यंदाचा हा मैत्रीचा सोहळा संपन्न होणार आहे २४ जुलै २०११ या दिवशी कर्जत-चौक फाट्यापासुन साधारण ३०-३२ कि.मी. अंतरावर असलेल्या "फार्म लाईफ होलिडेज" इथे. तर मंडळी, तो दिवस साजरा करण्याची पूर्वतयारी म्हणून काही गोष्टी नियमानुसार आणि ठराविक दिवशी करणं गरजेचं आहे.

त्यापैकी पहिली गोष्ट म्हणजे वविला येणार्‍यांची नावनोंदणी. वविला registered मायबोलीकर आणि त्यांचे कुटुंबिय (पति/पत्नी/मुले) येऊ शकतात. इच्छुक मायबोलीकरांनी त्यासाठी vavi@maayboli.com या पत्त्यावर ई-मेल करायची आहे.

नावनोंदणी करताना सभासदांनी खालील गोष्टींची माहिती देणे आवश्यक आहे. ईमेल च्यासब्जेक्ट मध्ये ववि२०११ नोंदणी' असे नमुद करण्यास विसर नका.

१. नाव
२. मायबोलीचा user id
३. संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक (भ्रमणध्वनी क्रमांक दिल्यास उत्तम)
४. कुठल्या शहरातून येणार (मुंब‌ई, पुणे इ.)
५. आपला नेहमी वापरात असलेला email id
६. सहभागी होणार्‍या एकूण व्यक्तींची संख्या (प्रौढ/ मुले).
७. लहान मुले (६ ते १० किंवा ३ ते ५ वयोगट) असल्यास त्यांचे वय
८. मायबोली गृपबरोबर बसने येणार की स्वतंत्र येणार?
९. पैसे कसे भरणार? प्रत्यक्ष की ऑनला‌ईन?

नावनोंदणीची अंतिम तारीख आहे १६ जुलै २०११.
एकूण इच्छुकांच्या संख्येनुसार बसभाडे ठरवण्यास मदत होते. त्यामुळे लवकरात लवकर आपली नावनोंदणी करा. नावनोंदणीचे काम पूर्ण झाले की पुढचे महत्त्वाचे काम म्हणजे पैसे जमा करणे.

वर्षाविहार-२०११ साठी वर्गणी आहे :

पुणेकरांसाठी :
प्रौढ : रु. ६२५ प्रत्येकी. (रिसॉर्ट : रु. ३५०, बस : रु. २२५, सा.स. : रु. ५०)

मुंबईकरांसाठी :
प्रौढ : रु. ६०० प्रत्येकी. (रिसॉर्ट : रु. ३५०, बस : रु. २००, सा.स. : रु. ५०)
(फक्त बस खर्चामुळे वर्गणी रक्कम वेगवेगळी आहे.)

मुले (वय ६ ते १० वर्षे) : रु. ३५० प्रत्येकी.
५ वर्षांपर्यंतच्या मुलांना काहीही शुल्क नाही.
पुणे आणि मुंबई इथे १७ जुलै २०११ या एकाच दिवशी वविचे पैसे जमा केले जातील.

पुणे - स्थळ: बालगंधर्व नाट्यगृहाच्या तिकीटखिडकीशेजारील कट्टा. वेळ: १७ जुलै २०११, सं. ५.३० ते ८.००
मुंबई - स्थळ: शिवाजी पार्क, उद्यान गणेश मंदिराच्या प्रांगणात. वेळ: १७ जुलै २०११, सं. ५.३० ते ८.००
समजा पैसे भरून जर आयत्यावेळी काही कारणाने वविला येणं रद्द केलं तर बसचे भाडे वजा करून उरलेले पैसे परत करण्यात येतील.

स्वतंत्र येणार्‍यांनी बसभाडे देण्याची अर्थातच गरज नाही.
या पैकी कोठे तुम्हाला पोहोचणे शक्य नसेल तर तुमच्या संपर्कातल्या माबोकरांमार्फत पैसे संयोजकांपर्यंत पोचवा.
ऑनला‌ईन पैसे भरणार्‍यांना ज्या अका‌ऊंटमध्ये पैसे भरायचे आहेत त्याची सर्व माहिती ईमेलने कळविली जाईल.
मुंब‌ई आणि पुणे सोडुन इतर ठिकाणच्या तसेच भारताबाहेरील कोणालाही वर्षाविहारास येणे शक्य असेल तर त्यांनी जरूर यावे.

वर्षाविहार-२०११ संयोजन समिती :

पुणे -

मल्लीनाथ (MallinathK) फोन : ९९६०३६६५६६
राम चिंचलीकर(राम) फोन : ९८५०८८५४२५

मुंबई -

आनंद चव्हाण (आनंदमैत्री) फोन : ९७६९४५४४२९
आनंद केळकर (आनंद्_सुजू) फोन : ९८२०००९८२२
संदिप खांबेटे(घारुआण्णा) फोन : ९८१९९९३६३४

http://www.farmlifeholidays.com या दुव्यावर रिसॉर्टची अधिक माहिती मिळू शकेल. आपल्याला काही शंका असल्यास आपण इथे मेसेज टाकू शकता अथवा vavi@maayboli.com या ई-मेल आयडीवर संपर्क करु शकता.
गेल्या वर्षी यू. के.’ज्‌ रिसॉर्ट इथे पार पडलेल्या ववि-२०१० ला मायबोलीकर आणि त्यांचे कुटुंबीय यांची विक्रमी उपस्थिती होती. तो विक्रम यंदा मोडला जावा अशी सर्वांचीच इच्छा आहे.

वविची रुपरेषा साधारण अशी असेल......

सकाळी ९.३० वाजेपर्यंत पुणे व मुंबईच्या बसेस रिसॉर्टवर पोहोचतील
सकाळी ९.३० ते १०.०० न्याहारी करुया
१०.०० ते १०.३० स्विमिंगपूलात / नदीत/ओढ्यात उतरण्यासाठीचे चेंजिंग
१०.३० ते १२.३० स्विमिंग पूल ,नदीत/ ओढा व इतर उपलब्ध धबधबा डान्स Proud Proud : मधे धम्माल मस्ती
१२.३० ते १.०० परत चेंजिंग
१.०० ते २.०० जेवण
२.३०-४.३० मनोरंजन
५.०० वाजता न्याहारी
५.३० वाजता जड अंत:करणाने आपापल्या शहरात नेणार्‍या बस मधून प्रयाण.

तेव्हा, भेटू या, आपल्या वविला!
बस रुटची माहिती इथेच प्रकाशीत केली जाईल. नोंदणी केलेल्या सर्वांनी कृपया आपला थांबा आणि बरोबर येणार्‍या मंडळींची नाव इमेल करुन कळवावी, ही माहिती वहातूक कंत्राटदाराला परवान्यासाठी लागणार आहे.

सुचना: रिसॉर्ट मधे पाण्यात उतरताना पोहोण्याचा पोषाख असणे आवश्यक आहे. (महिलांसाठी: पोहोण्याचा पोषाख नसल्यास टेरिकॉट्/नायलॉन मटेरिअलचे लेगिंग्ज आणि टि शर्ट चालतील) पाण्यात उतरताना शक्यतो कॉटनचे कपडे/ जीन्स वगैरे गोष्टी टाळाव्यात)

धन्यवाद.
वविसंयोजक.

आता तुम्ही आमचा नंबर दिला नाही ही गोष्ट वेगळी >> चित्र काढायला सांगितलेलं तुला. कागदाची मस्करी करून रंग वाया घालवून संयोजकांची भंकस करून कुठे नंबर मिळतात का?

चित्र काढायला सांगितलेलं तुला. कागदाची मस्करी करून रंग वाया घालवून संयोजकांची भंकस करून कुठे नंबर मिळतात का?
Rofl Lol
ते बदक वालं चित्र होतं का हिचं.. Proud

बर, आता ववि झाला... वविला गेलेल्यांची आता बर्‍यापैकी चर्चाही झाली.. तिथे जावुनही कोणी काय काय मिसलं इ. इ. इ. ची... वविची उजळणी झाली असेल तर कुणीतरी अथ पासुन इति पर्यंत वृत्तांत लिहा की आता.... सकाळपासुन वाट बघुन बघुन दमले मी Light 1

मस्त जोक आहे. पण कधी झाला हा?>>>>>>>>>> हे राम ! तुला स्विमिंग पुलात कुणीतरी ढकलला तेव्हा खाली डोकं वर पाय असा तर नाही ना पडलास? बरं, तुझा मोबाईल सुरु झाला का? घड्याळ सुकलं का?

नाही हबा शिवराळ आहे असे बोलली ती.. Lol
बाकी या ववीला उपस्थीत असलेली सर्व गोड पिल्ले पण मस्त एंजॉय करत होती.. जिप्स्या बाकी कुणाचे फोटो टाकले नाहीस तरी चालेल पण या सर्व चिमण्यांचे टाक रे.. Happy

हे राम ! तुला स्विमिंग पुलात कुणीतरी ढकलला तेव्हा खाली डोकं वर पाय असा तर नाही ना पडलास?
तो डोक्यावरच पडलेला. कारण त्याला मी ओढलं तेव्हा तो परसाकडं बसतात तसं बसलेल... पण इथे राम चा कै संबंध ? Uhoh

हबाची भाषा शिवराळ आहे अस दक्षिणा म्हणालेली का रच्याकने>> हो गं. आंम्ही चहा पीत होतो. मी म्हटल "काय भर तापात निघालोय मी पण च्यायला" तर म्हणते शिव्या का देतोयस? टेबल भोवतीच्या कुणालाच आणि खुद्द मलाही ह्याच्यात काय शिवी होती तेच कळालं नाही. शेवटी म्हटलं जाऊदे ना च्यायला. दुसर्‍याला असभ्य म्हणून स्वतःला सभ्य सिध्द करण्याची जुनी परंपरा आहे या देशात. आपल्या ताईने त्यासाठी आपलीच निवड केली तर त्यात ताईच्या सभ्यपणाबद्दल बोलायची काय गरज आहे. मला दक्षीताईचा आजिबात राग आला नाही. आम्हा सातारकरांना च्यायला म्हणजे चहापाणासारखंच साध सोप्प वाटतं.

मायबोलिकर मंडळी,
मीच तो देह, ज्याला घारूअण्णांची गरूडझेप धडकली :)....
चला या निमित्ताने मला एक नविन ओळख मायबोलिकरानि दिलि :)...
मि मजेत आहे ..... काळजी नसावि.... (पण ति बिच्चारि खुर्चि...... लंगडी झालि.... Sad ... कायम चि ... आता... तिच काय होणार.... कोण तिला स्विकारनार .... घारूअण्णां .... )

कालच्या... लई भारि.... मंडळी बरोबर केलेलि धमाल आठवत .... रोमातुन जागा होतो आहे.....

यो रोक्स, तुम्च्या रॉकिंग छायाचित्राचि वाट बघतोय.....

असो, कळावे, लोभ असावा

आपलाच,
मनिश

मल्ल्या टल्ल्या, बदकाच चित्र आमच नव्हतं. दुसर्‍या नंबराच चित्र आमच होतं Happy
बदकाच चित्र बहुतेक दक्षीच्या टीमचे होते काळा पाऊस वाले Lol
हबा Lol

<<ते बदक वालं चित्र होतं का हिचं.. <<
मल्ल्या...तो बदक नि मोराचा क्रॉसब्रीड होता. बदक नै कै!! आणि ते दक्षीच्याच टीमचं होतं! निळं इंद्रधनुष्य नि काळा पाऊस (ए, कोण रे ते.. माझ्या पोराचं नाव घेतय? ) Proud

<<बाकी या ववीला उपस्थीत असलेली सर्व गोड पिल्ले पण मस्त एंजॉय करत होती<<
अरे सर्वात छोटा 'ववीकर' माहितीये का कुणाला? फक्त १४ महिन्याचा मल्ल्याचा 'रुद्राक्ष'. गाडीत पण धमाल करुन त्याने बापाचा झेंडा ववीवर फडकावलाय. Proud

कोण तिला स्विकारनार .... घारूअण्णां ... >>> चांगाला निर्णय आहे. तसं घारुआण्णानी स्वतः तुम्हाला सांगितलं की खुर्ची म्हणाली?

मी बापडा पाच वाजता उठून तयारीला लागलो. मग रामचा साडेपाचला एसेमेस- उठा म्हणून. अर्धा ववि आमचा रस्त्यातच होणार, हे तेव्हाच कळले. पुढे मल्लि आणि पल्लिच्या गाड्यांनी हिंजवडीच्या पुढे तासभर आमचा पुतळा केला. मग रामच्या डायवरला घरी पाठवून मी गाडीचे सारथ्य केले. करजतच्या पुढे खुद्द संयोजकच 'हम कहां है' करू लागले, तेव्हा आम्ही रामला हात जोडले.
.
कसेबसे फार्मलाईफच्या फाट्यावर पोचलो, तेव्हा लिंब्या भर झिम्मड पावसात गाड्यांना वाट दावायला रस्त्यावर लेकीसकट उभा होता. मग त्यालाही हात जोडून फार्मलाईफमध्ये घुसलो. त्यामानाने अपेक्षेपेक्षा लवकरच.
.
मिसळ, पोहे, उपमा, चहा झाल्यावर पूलमध्ये डुंबणे. मग जवळच असलेल्या बंधार्‍यावर जाण्याची कल्पना. गिरीविहार पलीकडे अडकला, तेव्हा पाण्याची पातळी आणि जोर वाढला होता. त्याला बांबू, ओढण्या वगैरे वापरून ओढून काढला, तेव्हा एकच जयजयकार झाला. वाढते पाणी पाहून मग सार्‍यांनी तिथून काढता पाय घेतला.
.
पुन्हा पूलवर डुंबणे आणि त्यातच व्हॉलीबॉल. हबा आजारातून उठला असल्याने कर्तव्याच्या भावनेपोटी त्याच्यासोबत काठावरच कोरडा राहण्याचा प्रयत्न करत राहिलो. मायबोलीकरांना पोज द्यायला सांगून कॅमेरा उलटा करून आमचेच फोटो आम्ही काढून घेतले ते इथेच. नंतर हब्याने साग्रसंगीत पाण्यात डुबकी मारून माझा विश्वासघात केला. पोपट पण केला. या पोपटाने त्याला नंतर २-३ तास तसेच ओले ठेवून शिक्षा केली.
.
योरॉक्स, घारू, कौतुक, आनंदसुजू आणि इतर अनेकांनी गाण्यांच्या तालावर पावसात नाचून घेतले.
मी हिम्या आणि आशूतोषने तेवढ्यात क्रिकेट खेळून घेतले.
.
नंतर ज्या जेवणावळी सुरू झाल्या त्या थेट साडेतीनपर्यंत. घारूसारख्या अनेकांना या सुग्रास थाळ्या सोडाव्याशाच वाटत नव्हत्या.
.
सां.स. च्या हातात फ्रेंडशिपबँडसदृश रिबिनींचा गठ्ठा पाहून नंतरच्या कार्यक्रमाबद्दल अनेक शंका उपस्थित झाल्या. मग वविकरांना चार रंगांच्या रिबिनींच्या चार ग्रुपात- पल्ली, दक्षिणा, साजिरा, निलिमा- विभागून जे मस्त खेळ झाले, त्यामुळे सार्‍या शंका फिटल्या.
.
लंगडी खेळायची कल्पना कुणाची? त्यो धन्य. कुणी कोंबडीगत, कुणी घोड्यागत, कूणी लंगड्या गाढवागत, कुणी पाय झाडणार्‍या मारकुट्या बैलांगत लंगड्या केल्या. सार्‍यांची दमछाक झाली. हसून पोट दुखले. दोनेक डझन तरी वीर पडले, कोलांट्या खाल्ल्या. त्यात मी पण. (चा सांडला नाही, पण हा सोताच अख्खा सांडला-असं कुणीतरी ब्याकग्राऊंडला कुचकुचलेच). घारू पडला तेव्हा बाँबस्फोटसदृश आवाज झाला. नीट बघितले तवा घारू ठिकठाक, पण खुर्चीचे चारपाच तुकडे.
.
हे कमी म्हणून की काय, म्हणून दुसर्‍या राऊंडात हब्याने एक हात खुळ्यागत वर आभाळाकडे रोखून लंगडी घालायचे खूळ काढले. 'हे कसे शक्य आहे' असं कुणीतरी म्हणल्यावर हबाने प्रात्यक्षिक करून दाखवलं. मग कुणी काही बोललंच नाही. पुन्हा पळापळी. खेकड्या-विंचवा-कोंबड्या-बदकांच्या लंगड्या. पुन्हा पडापडी. जखमी वीर हातपाय चोळत जागेवर वगैरे. स्फोटांनी, हास्यात्कारांनी फार्मलाईफ घाबरले.
.
मग आंधळे होऊन केळी खाऊ खालायचा अभिनव उपराळा. गालावर, गळ्यात, कपाळावर, डोक्यावर, मिशांवर ठीक आहे, पण आपल्या नाकात केळे गेले तर काय- या विचाराने सारे शहारले. आमच्या ग्रुपात भुंग्याने खाऊ घालणार्‍याला (बागेश्री) काहीही न समजू देता आदिकाळातल्या स्टाईलीने २-३ सेकंदात केळ फस्त करून ट्रेंड सेट केला. पण दुर्दैन म्हणाजे हीच पद्धत वापरून इतर गटांनी वापरून बाजी मारली. एका सेकंदाने आम्ही हरलो. मंजू आणि केश्वीच्या या केळ्वणाचे तर शुटिंगच करायला हवे होते.
यात शेवटी कोण जिंकले रे? ते लिहा.
लहान मुले आणि डुआय यांचा स्वतंत्र लंगडीचा डाव आयोजित करण्यात येऊन या खेळाची सांगता झाली.
.
मग चित्र काढायची स्पर्धा. एका थीमवर एकच चित्र ग्रुपातल्या पाच जणांनी एकेक मिनिट वेळ वापरून पूर्ण करायचे, अशी चार ग्रुपांची चार चित्रे- हीही मस्तच कल्पना होती. मागल्या वविला मारल्या तशाच उड्या चित्र काढताना पल्लीने यावेळीही माराव्यात, म्हणजे तिच्या ग्रुपच्या चित्राचा पचका होईल, अशी प्रार्थना मी केली, पण काही उपेग नाही झाला. त्यांनी धबधबा सदृश काहीतरी काढले होते, पण ते मला सारखे हरिहरेशवरच्या घळिसारखे वाटत होते. त्या उलट आमच्या चित्रात आम्ही सोडलेल्या मोकळ्या पांढर्‍या जागेला खूप सिग्निफिकन्स आहे, असं मी परीक्षकांना कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न केला, पण कायच उपेग नाही झाला. त्यांचा पहिला नि आमचा दुसरा नंबर आला.
.
अशा वातावरणात या अफाट ट्रान्समध्ये गेलेल्या वविकरांना 'मायबोली, जाहिराती आणि ई-कॉमर्स' सारख्या विषयावर कसे आणायचे याचे मला टेंशनच आले. पण तरी सार्‍यांनी शांतपणे ऐकून घेतले. प्रश्नही विचारले. धन्यवाद मित्रांनो. Happy हे सारे स्वतंत्र धागा करून इथे टाकले आहे. तिथे कृपया प्रश्न / सूचना लिहा.
.

मग पुन्हा उपमा, गरम चहा आणि तुफ्फान पाऊस. रोपवाटप कार्यक्रम. ग्रुप फोटो.
येताना हिम्याने गाडी चालवली.
.
अनेक गोष्टी राहून गेल्या असतील, त्या आठवल्या तर लिहीन. नाहीतर इतरांनी लिहा प्लीज.

सगळ्यात भारी म्हणजे विन्याला गणेशने टँकमधे ढकलुन साळसुद्पणे त्याच्याच शेजारी बसुन त्याला 'कुणी रे ढकलले' विचारणे Proud
नंतर विन्या,"च्यायला, मला परत जर ढकलल ना बुडुन जाईन"

शुकु तुमच्या टीम ने नारळाच्या झाडावर आंबे काढले होते ना??? कारण नंतर तो गणेश सगळ्याना हे नारळ आहेत बघा बघा असे सांगत होता... Lol
दक्षीणाच्या टीम ने गॉगल घालुन पाउस काढला त्यामुळे तो काळा झाला.. Proud
हबा.. Proud

माझय मते- 'हबा शिवराळ आहे' असं कौतुक म्हणातो आहे असं दक्षिणेला मी सांगितलं, आणि मी असं का म्हणतो आहे- असं दक्षिणेने हबाला विचारलं- असं झालं असं मला वाटतं, पण असं नसेल तर कसं झालं ते मला सांगा, म्हणजे मी हबाला बरोब्बर सिक्वेन्स लावून सांगतो.

सगळीच चित्रे छान होती. परि़क्षकांना जे आवडलं ते पहिलं आलं. ते बदकाचं चित्रही खुपच छान होतं. त्याला मोरासारखी पिसं फुटायला नुकतीच सुरूवात झाली आहे आणी तेवढ्यात त्याच्या खाली चार पाच ढग, वर चार पाच ढग जमा झालेत आणि बदकाला मोराची पिसे असा अनैसर्गिक प्रकार घडू नये म्हणून दोन्हीकडून काळा काळा केमीकलचा पाऊस पाडून पिसे जाळण्याचा प्रयत्न करत आहेत असे भावपुर्ण, साष्रुनयन चित्र होते ते...

साजिरा, म्हणजे एकुणात हबाला शिवराळ म्हणण्यात टेबलावरचे सगळेच कार्यकर्ते सामिल होते तर, बिचारी दक्षी बळीचा बकरा झाली म्हणायची Lol
राम, आमच्या चित्रातल्या झाडाला नारळ नव्हते रे. कुणीतरी पळवुन नेले होते बहुतेक Happy

माझय मते- 'हबा शिवराळ आहे' असं कौतुक म्हणातो आहे>>> अरे सगळ्या मायबोलीला एक वर्षापासून माहिती आहे मी काय आणि कसा आहे ते आता कोण म्हणला तर "आड्याल तुरकाटी पड्याल तुरकाटी... आमाला काय बोलल ** ** ****"

साजिर्‍या.. खरेच रे.. लिंब्याचे आभार मानायचे राहुन गेले.. लिंब्या तुझ्या कालच्या मदतीसाठी , तु माबो वर केलेल्या अपराधापैकी २०% अपराध माफ रे .. Proud

माझ्या टिमच्या चित्रावर लैच बोलायलय पब्लिक.. Uhoh
आमच्यावर अन्याव झालाहे लोखो.... सगळ्यांना ५ मिनिटाचं टायमिंग देऊन सुद्धा डुआयने आमचं टायमिंग लौकर संपवलं... कारण तो तोंडाने सेकंद मोजत होता Proud आमचा पयला गडी बॅटींग करून डू ने घालवला तरी पल्ली अजून चित्रावर संस्कार करतच होति.. Sad
ये ना चॉलबे.. Proud

शुकु तुमच्या टीम ने नारळाच्या झाडावर आंबे काढले होते ना??? कारण नंतर तो गणेश सगळ्याना हे नारळ आहेत बघा बघा असे सांगत होता...>>>>:हहगलो:

>>>> तु माबो वर केलेल्या अपराधापैकी २०% अपराध माफ रे Lol
ओहोहो, अस हे होय, म्हणजे माझ्या शत्रूपक्षापैकी केवळ २० टक्केच वविला हजर होते की काय? Proud
तरीच मला भारीच चुकल्याचुकल्यासारख वाटत होत.
आभार कसले मानतो, त्यावेळची ती गरज होती, नन्तर दोरीची गरज भागवायचा देखिल प्रयत्न केला पण लहान दोरी असे म्हणून ती दोरी रिजेक्ट करण्यात आली. दुसरी मोठी मिळाली म्हणून काम झाल.

लिंबुचे माझ्यातर्फे सुद्धा अनेक आभार.
मागच्या वविला सुद्धा हातात काठी घेऊन सर्वत्र संचार करून "सबकुछ ठिक है" चा पहारा देत होता, या वर्षी सुद्धा भर पावसात आम्हाला वारे गावात येऊन मार्गदर्शन केले शिवाय आमच्या मागे येणार्‍या गाड्यांसाठी सुद्धा तिथे थांबून राहिला.. Happy

साजिर्‍याने केलेलं लंगडीचं वर्णन तर.. Rofl

खरंतर आमचंच चित्र छान होतं Biggrin आम्ही साकव, डोंगर, झाडं, नदी, पक्षी, नदीच्या सुक्या पात्रातली झोपडी असं बरंच काही एकाच चित्रात कोंबलं होतं Wink

मंजू आणि पल्ली, मी आणि निलिमा अशी जोडी होती. निलिमाने कुलुपात चावी घुसवावी तसं केळं माझ्या तोंडात कोंबलं आणि ९ सेकंदांत केळं गायब झाल्याने आमचा पैला नंबर आला.

खरंतर आमचंच चित्र छान होतं आम्ही साकव, डोंगर, झाडं, नदी, पक्षी, नदीच्या सुक्या पात्रातली झोपडी असं बरंच काही एकाच चित्रात कोंबलं होतं >>>>अके, १०० मोदक Happy
तेच चित्र सर्वोत्कृष्ट होतं. त्यालाच पहिलं बक्षिस मिळायला पाहिजे होतं. Happy

Pages