वर्षाविहार २०११ - फार्म लाईफ !!!

Submitted by ववि_संयोजक on 22 June, 2011 - 03:50

नावनोंदणीची अंतिम तारीख वाढवुन १६ जुलै २०११ केली आहे.

मायबोली घेउन येत आहे आमच्या अनेक उपक्रमांपैकी एक ज्याची समस्त मायबोलीकर अत्यंत अतुरतेने वाट पाहतात असा नाविन्यपूर्ण, लज्जतदार, खुमासदार, हवाहवासा वाटणारा तो 'वर्षा विहार'.
अर्थात आपल्या सर्व आवड्त्या नावड्त्या... पाहीलेल्या...न पाहीलेल्या...ख-या आणि अर्थातच कदाचित ड्यु आयडी मायबोलीकरांना प्रत्यक्ष याची देही याची डोळा भेटण्याची पर्वणीच!!!! यंदाचा हा मैत्रीचा सोहळा संपन्न होणार आहे २४ जुलै २०११ या दिवशी कर्जत-चौक फाट्यापासुन साधारण ३०-३२ कि.मी. अंतरावर असलेल्या "फार्म लाईफ होलिडेज" इथे.

************

ऐका हो ऐकाsssssssssssssssss...
ए मग्गन भाउ, ए छग्गन भाउ...
ओ सामलोss रे दामलोss......
ओ ऐका हो ऐकाssss....
ओ रघोब्बा, ओ धोंडीबा
ओ कर्नल सिंगं, ओ जर्नल सिंगं
ओ तुम्हीही ऐकाssss....

ऐका हो ऐकाsssssssssss............
पैशाला दोन खारकाsssssssssssssss ! (क्काय ? Uhoh काय म्हणलात...? तो शब्द वेगळा आहे? खारकांच्या ऐवजी काही तरी वेगळं आहे? कानफटात खायचीय का राव? मायबोलीकर हाणतील धरून मलाबी आन तुमालाबी.)

तर काय सांगत हुतो.....

तात्या, नाना, मामा, काका, भावांनो आन समद्या काकवानो, ताया-बायांनो ध्यान दिवुन ऐका ! पुन्यांदा दवंडी हुनार न्हाय, कुनालाबी चानस भेटनार नाय. लक्ष असु द्या हिकडं...., आमी समदे चाललुया तकडं...

तकडं म्हंजी कुटं...?

तर पावसात भिजाया! दोस्तास्नी आन मैतरणींस्नी भेटाया. हिरव्यागार रानात, पावसाच्या गाण्यात, थेंबाचं संगीत हाय, गारांचा नाच हाय. थोडीशी थंडी हाय, कुणासाठी गुलाबी तं कुणासाठी शराबी. कर्जतच्या पल्याड, चौकच्या अल्याड डोंगराच्या कुशीत मस्त निसर्ग हाय. समद्या मायबोलीकरांना पिरमाचं आवातणं हाय ! चला बिगी-बिगी पिवश्या भरा, तहान लाडू - भुक लाडू घ्या आन निघा. आवं ततं पोचुपत्तुर कायबाय फायजे ना पोटाला. येकडाव ततं पोचलो की हायेच की शिरा-पूरी........!

तर मंडळी....
मायबोली घेउन येत आहे आमच्या अनेक उपक्रमांपैकी एक ज्याची समस्त मायबोलीकर अत्यंत अतुरतेने वाट पाहतात असा नाविन्यपूर्ण, लज्जतदार, खुमासदार, हवाहवासा वाटणारा तो 'वर्षा विहार'.

एक असा उपक्रम ज्यात मायबोलीवरचे सभासदच नव्हेत तर त्यांचे कुटुंबीयही सहभागी होऊ शकतात. मायबोलीवरचं लेखन, इतर अनेक उपक्रम, इथे चालणार्‍या गप्पा, चर्चा, चेष्टा-मस्करी (आणि क्वचित काही तात्विक मतभेद सुध्दा ) याबद्दल समस्त मायबोलीकरांचे कुटुंबीय रोज काही ना काही ऐकतच असतात. त्या गप्पा, ती धमाल त्यांना प्रत्यक्ष अनुभवायला मिळते ती वर्षाविहारादिवशी. वविदिवशी नवीन भेटीगाठी होतात, ओळखी होतात, आधीच्या ओळखींचं मैत्रीत रुपांतर होतं, मैत्रीचे नवीन धागेही विणले जातात.
अर्थात आपल्या सर्व आवड्त्या नावड्त्या... पाहीलेल्या...न पाहीलेल्या...ख-या आणि अर्थातच कदाचित ड्यु आयडी मायबोलीकरांना प्रत्यक्ष याची देही याची डोळा भेटण्याची पर्वणीच!!!! यंदाचा हा मैत्रीचा सोहळा संपन्न होणार आहे २४ जुलै २०११ या दिवशी कर्जत-चौक फाट्यापासुन साधारण ३०-३२ कि.मी. अंतरावर असलेल्या "फार्म लाईफ होलिडेज" इथे. तर मंडळी, तो दिवस साजरा करण्याची पूर्वतयारी म्हणून काही गोष्टी नियमानुसार आणि ठराविक दिवशी करणं गरजेचं आहे.

त्यापैकी पहिली गोष्ट म्हणजे वविला येणार्‍यांची नावनोंदणी. वविला registered मायबोलीकर आणि त्यांचे कुटुंबिय (पति/पत्नी/मुले) येऊ शकतात. इच्छुक मायबोलीकरांनी त्यासाठी vavi@maayboli.com या पत्त्यावर ई-मेल करायची आहे.

नावनोंदणी करताना सभासदांनी खालील गोष्टींची माहिती देणे आवश्यक आहे. ईमेल च्यासब्जेक्ट मध्ये ववि२०११ नोंदणी' असे नमुद करण्यास विसर नका.

१. नाव
२. मायबोलीचा user id
३. संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक (भ्रमणध्वनी क्रमांक दिल्यास उत्तम)
४. कुठल्या शहरातून येणार (मुंब‌ई, पुणे इ.)
५. आपला नेहमी वापरात असलेला email id
६. सहभागी होणार्‍या एकूण व्यक्तींची संख्या (प्रौढ/ मुले).
७. लहान मुले (६ ते १० किंवा ३ ते ५ वयोगट) असल्यास त्यांचे वय
८. मायबोली गृपबरोबर बसने येणार की स्वतंत्र येणार?
९. पैसे कसे भरणार? प्रत्यक्ष की ऑनला‌ईन?

नावनोंदणीची अंतिम तारीख आहे १६ जुलै २०११.
एकूण इच्छुकांच्या संख्येनुसार बसभाडे ठरवण्यास मदत होते. त्यामुळे लवकरात लवकर आपली नावनोंदणी करा. नावनोंदणीचे काम पूर्ण झाले की पुढचे महत्त्वाचे काम म्हणजे पैसे जमा करणे.

वर्षाविहार-२०११ साठी वर्गणी आहे :

पुणेकरांसाठी :
प्रौढ : रु. ६२५ प्रत्येकी. (रिसॉर्ट : रु. ३५०, बस : रु. २२५, सा.स. : रु. ५०)

मुंबईकरांसाठी :
प्रौढ : रु. ६०० प्रत्येकी. (रिसॉर्ट : रु. ३५०, बस : रु. २००, सा.स. : रु. ५०)
(फक्त बस खर्चामुळे वर्गणी रक्कम वेगवेगळी आहे.)

मुले (वय ६ ते १० वर्षे) : रु. ३५० प्रत्येकी.
५ वर्षांपर्यंतच्या मुलांना काहीही शुल्क नाही.
पुणे आणि मुंबई इथे १७ जुलै २०११ या एकाच दिवशी वविचे पैसे जमा केले जातील.

पुणे - स्थळ: बालगंधर्व नाट्यगृहाच्या तिकीटखिडकीशेजारील कट्टा. वेळ: १७ जुलै २०११, सं. ५.३० ते ८.००
मुंबई - स्थळ: शिवाजी पार्क, उद्यान गणेश मंदिराच्या प्रांगणात. वेळ: १७ जुलै २०११, सं. ५.३० ते ८.००
समजा पैसे भरून जर आयत्यावेळी काही कारणाने वविला येणं रद्द केलं तर बसचे भाडे वजा करून उरलेले पैसे परत करण्यात येतील.

स्वतंत्र येणार्‍यांनी बसभाडे देण्याची अर्थातच गरज नाही.
या पैकी कोठे तुम्हाला पोहोचणे शक्य नसेल तर तुमच्या संपर्कातल्या माबोकरांमार्फत पैसे संयोजकांपर्यंत पोचवा.
ऑनला‌ईन पैसे भरणार्‍यांना ज्या अका‌ऊंटमध्ये पैसे भरायचे आहेत त्याची सर्व माहिती ईमेलने कळविली जाईल.
मुंब‌ई आणि पुणे सोडुन इतर ठिकाणच्या तसेच भारताबाहेरील कोणालाही वर्षाविहारास येणे शक्य असेल तर त्यांनी जरूर यावे.

वर्षाविहार-२०११ संयोजन समिती :

पुणे -

मल्लीनाथ (MallinathK) फोन : ९९६०३६६५६६
राम चिंचलीकर(राम) फोन : ९८५०८८५४२५

मुंबई -

आनंद चव्हाण (आनंदमैत्री) फोन : ९७६९४५४४२९
आनंद केळकर (आनंद्_सुजू) फोन : ९८२०००९८२२
संदिप खांबेटे(घारुआण्णा) फोन : ९८१९९९३६३४

http://www.farmlifeholidays.com या दुव्यावर रिसॉर्टची अधिक माहिती मिळू शकेल. आपल्याला काही शंका असल्यास आपण इथे मेसेज टाकू शकता अथवा vavi@maayboli.com या ई-मेल आयडीवर संपर्क करु शकता.
गेल्या वर्षी यू. के.’ज्‌ रिसॉर्ट इथे पार पडलेल्या ववि-२०१० ला मायबोलीकर आणि त्यांचे कुटुंबीय यांची विक्रमी उपस्थिती होती. तो विक्रम यंदा मोडला जावा अशी सर्वांचीच इच्छा आहे.

वविची रुपरेषा साधारण अशी असेल......

सकाळी ९.३० वाजेपर्यंत पुणे व मुंबईच्या बसेस रिसॉर्टवर पोहोचतील
सकाळी ९.३० ते १०.०० न्याहारी करुया
१०.०० ते १०.३० स्विमिंगपूलात / नदीत/ओढ्यात उतरण्यासाठीचे चेंजिंग
१०.३० ते १२.३० स्विमिंग पूल ,नदीत/ ओढा व इतर उपलब्ध धबधबा डान्स Proud Proud : मधे धम्माल मस्ती
१२.३० ते १.०० परत चेंजिंग
१.०० ते २.०० जेवण
२.३०-४.३० मनोरंजन
५.०० वाजता न्याहारी
५.३० वाजता जड अंत:करणाने आपापल्या शहरात नेणार्‍या बस मधून प्रयाण.

तेव्हा, भेटू या, आपल्या वविला!
बस रुटची माहिती इथेच प्रकाशीत केली जाईल. नोंदणी केलेल्या सर्वांनी कृपया आपला थांबा आणि बरोबर येणार्‍या मंडळींची नाव इमेल करुन कळवावी, ही माहिती वहातूक कंत्राटदाराला परवान्यासाठी लागणार आहे.

सुचना: रिसॉर्ट मधे पाण्यात उतरताना पोहोण्याचा पोषाख असणे आवश्यक आहे. (महिलांसाठी: पोहोण्याचा पोषाख नसल्यास टेरिकॉट्/नायलॉन मटेरिअलचे लेगिंग्ज आणि टि शर्ट चालतील) पाण्यात उतरताना शक्यतो कॉटनचे कपडे/ जीन्स वगैरे गोष्टी टाळाव्यात)

धन्यवाद.
वविसंयोजक.

>>>> फोटो बघायला शंभर पापं भरली असली पाहिजेत का??
गुब्बे............. Lol
अग ते रामभौच सान्गू शकेल, कारण त्याला दिसताहेत जिप्स्याकडचे फोटु! सान्गरे रामभौ तू अस काय केलस जेणेकरुन तुला ते फोटो दिसताहेत Wink

परवा वविला एक गम्मत झाली. ते तिकडे तस गिर्‍याला दोरी लावुन बाहेर काढणे चालले होते. दोरी कुणीतरी दुसर्‍यान्नीच दिली होती. गिर्‍याला बाहेर काढल्यावर दोरी ज्यान्ची त्यान्ना दिली, सगळे परतू लागले. मी पुन्हा मागे जाऊन काही राहिल नाही ना ते बघत होतो. तर एक प्लॅस्टिकची पिशवी दिसली भरलेली, म्हणले असतील कपडे वगैरे, म्हणून "कुणाची आहे पिशवी?" असे विचारत उचलली, तोवर त्या दोरीवाल्या दूसर्‍या भलत्याच वविबाहेरच्या माबोव्यतिरिक्तच्या कम्पुतला एकजण तत्परतेने पुढे आला ती पिशवी घ्यायला. तोवर मी पिशवीत डोकावुन बघितले होते.
तर काय?
आत बिसलरीच्या बर्‍याच बाटल्या होत्या, भरलेल्या, फक्त आतिल द्रव्व्याच्या रन्गावरुन तरी पहिल्यान्दा मला ते गोमूत्र असल्याचे भासले. मग कळले, ते प्लॅस्टिकचे खम्बे होते! Proud
[मी मुकाट्याने पिशवी ज्याचीत्याला परत केली हे सान्गायला नकोच, नै का? ]

बर, आनन्दयात्रीने दैनिक प्रहार मधे लिहिलेला हा एक उपयुक्त लेख, त्याची ही लिन्क
रिक्षा :
http://epaper.prahaar.in/detail.php?cords=2,86,1476,1230&id=story2&pagen...
ट्रेकिंगबद्दल विशेष आर्टिकल, त्यात आनन्दयात्रीचे विचार व्यक्त झालेत! म्हणजे त्याने तो लेखही डिक्टेक्ट केलाय Happy पुढल्या वविकरता सेव्ह करुन ठेवा

आत बिसलरीच्या बर्‍याच बाटल्या होत्या, भरलेल्या, फक्त आतिल द्रव्व्याच्या रन्गावरुन तरी पहिल्यान्दा मला ते गोमूत्र असल्याचे भासले. मग कळले, ते प्लॅस्टिकचे खम्बे होते!>>>>>>:हहगलो:

जिप्स्या, आईशप्पथ मी त्या माणसाला स्पष्टपणे म्हणलो देखिल "येवढ गोमूत्र? ..... (पॉझ) नै नै, हे भलतच द्रव्य दिस्तय, आमच्या कामाच नै"

लिंबुदा Proud

जेंव्हा रोप आणायला गेले तेंव्हा दोन माणसं (माबोकर नव्हे) दोन खंबे घेऊन येताना दिसले, तेंव्हा कुणीतरी म्हणालं कि यातलाच एक खंबा गिरीला द्या बघा कसा स्वत: चालतच काठावर येतो की नाही ते Proud

<मग आंधळे होऊन केळी खाऊ खालायचा अभिनव उपराळा. गालावर, गळ्यात, कपाळावर, डोक्यावर, मिशांवर ठीक आहे, पण आपल्या नाकात केळे गेले तर काय- या विचाराने सारे शहारले. आमच्या ग्रुपात भुंग्याने खाऊ घालणार्‍याला (बागेश्री) काहीही न समजू देता आदिकाळातल्या स्टाईलीने २-३ सेकंदात केळ फस्त करून ट्रेंड सेट केला. >> त्या उलट आमच्या चित्रात आम्ही सोडलेल्या मोकळ्या पांढर्‍या जागेला खूप सिग्निफिकन्स आहे>> साजिरा, तुफ्फ्फ्फान वर्णन, मित्रा!! Rofl

हबा... साष्रुनयन चित्र Proud
मंजु डी पार्टनर पार्ट्नर क्या कर रैली है! पल्ली म्हन की सरल सरल... जल्ला पार्ट्नर म्हणुन हिणवती मला.. बंधार्‍यावर 'मी कोण' म्हणुन मला वळखायला लावलंस आणीक आता येवढं एक केळं तीन केळी समजून खाल्ली राव आन म्हनतीस 'पार्टनर! छ्यॅ
गणेश किती तरी वेळ मला त्यांच्या चित्रात 'दडलेला' गहन अर्थ सम्जावुन सांगत होता.... असु दे असु दे Rofl
ए, वार्षिक ववि च्या ऐवजी सहामाही ववि करता येइल का? Uhoh
रच्याकने, त्या फार्म हौसला पोचण्याअधी आम्ही कळंब फाट्याचं दर्शन घेउन परत आलो... मोबाइल ला रेंजपण नाही. जाम भूक लागलेली. म्हणुन मग शेवटपर्यंत खात राहुन कसर भरुन काढली. अक्षरशः श्रीखंड सुद्धा भात समजुन खाल्लं Proud कोण मला चिडवत होतं रे खाताना?

अरे जिप्सी, Lol बहुतेक तेव्हा मी गाडीच्या डिकीतुन दोरी आणायला परत गेलो होतो त्यामुळे ते बघितल-ऐकल नाही (अन नन्तर शेवटी जे बघितल ते गोमूत्राचे लिहिले तर त्यावरुन विकृत ठरवला गेलो तिकडे शिष्टान्च्या दरबारी! Sad पण असो, पूर्वग्रहान्च्या काहीकाही ठोकल्या गेलेल्या/ठोकून घेतलेल्या खुन्ट्या फारच बळकट रित्या फिट्ट पक्क्या बसलेल्या अस्तात)

पल्ले Lol
तुमराइच इंतजार था।
म्हटलं, केळं भरवतानाच्या भावना इथे व्यक्त केल्या, केळं खाणारी काही सांगतेय का बघूया.. Lol
बाकी सगळ्यांनी मंजूडी-पल्ली म्हणत कल्ला केला तरी तू येईपर्यंत मी गप् रायले.

ए, वार्षिक ववि च्या ऐवजी सहामाही ववि करता येइल का?
हो करता येईल ना... पण फक्त मुंबई करांसाठी. Proud

Pages