नावनोंदणीची अंतिम तारीख वाढवुन १६ जुलै २०११ केली आहे.
मायबोली घेउन येत आहे आमच्या अनेक उपक्रमांपैकी एक ज्याची समस्त मायबोलीकर अत्यंत अतुरतेने वाट पाहतात असा नाविन्यपूर्ण, लज्जतदार, खुमासदार, हवाहवासा वाटणारा तो 'वर्षा विहार'.
अर्थात आपल्या सर्व आवड्त्या नावड्त्या... पाहीलेल्या...न पाहीलेल्या...ख-या आणि अर्थातच कदाचित ड्यु आयडी मायबोलीकरांना प्रत्यक्ष याची देही याची डोळा भेटण्याची पर्वणीच!!!! यंदाचा हा मैत्रीचा सोहळा संपन्न होणार आहे २४ जुलै २०११ या दिवशी कर्जत-चौक फाट्यापासुन साधारण ३०-३२ कि.मी. अंतरावर असलेल्या "फार्म लाईफ होलिडेज" इथे.
************
ऐका हो ऐकाsssssssssssssssss...
ए मग्गन भाउ, ए छग्गन भाउ...
ओ सामलोss रे दामलोss......
ओ ऐका हो ऐकाssss....
ओ रघोब्बा, ओ धोंडीबा
ओ कर्नल सिंगं, ओ जर्नल सिंगं
ओ तुम्हीही ऐकाssss....
ऐका हो ऐकाsssssssssss............
पैशाला दोन खारकाsssssssssssssss ! (क्काय ?
काय म्हणलात...? तो शब्द वेगळा आहे? खारकांच्या ऐवजी काही तरी वेगळं आहे? कानफटात खायचीय का राव? मायबोलीकर हाणतील धरून मलाबी आन तुमालाबी.)
तर काय सांगत हुतो.....
तात्या, नाना, मामा, काका, भावांनो आन समद्या काकवानो, ताया-बायांनो ध्यान दिवुन ऐका ! पुन्यांदा दवंडी हुनार न्हाय, कुनालाबी चानस भेटनार नाय. लक्ष असु द्या हिकडं...., आमी समदे चाललुया तकडं...
तकडं म्हंजी कुटं...?
तर पावसात भिजाया! दोस्तास्नी आन मैतरणींस्नी भेटाया. हिरव्यागार रानात, पावसाच्या गाण्यात, थेंबाचं संगीत हाय, गारांचा नाच हाय. थोडीशी थंडी हाय, कुणासाठी गुलाबी तं कुणासाठी शराबी. कर्जतच्या पल्याड, चौकच्या अल्याड डोंगराच्या कुशीत मस्त निसर्ग हाय. समद्या मायबोलीकरांना पिरमाचं आवातणं हाय ! चला बिगी-बिगी पिवश्या भरा, तहान लाडू - भुक लाडू घ्या आन निघा. आवं ततं पोचुपत्तुर कायबाय फायजे ना पोटाला. येकडाव ततं पोचलो की हायेच की शिरा-पूरी........!
तर मंडळी....
मायबोली घेउन येत आहे आमच्या अनेक उपक्रमांपैकी एक ज्याची समस्त मायबोलीकर अत्यंत अतुरतेने वाट पाहतात असा नाविन्यपूर्ण, लज्जतदार, खुमासदार, हवाहवासा वाटणारा तो 'वर्षा विहार'.
एक असा उपक्रम ज्यात मायबोलीवरचे सभासदच नव्हेत तर त्यांचे कुटुंबीयही सहभागी होऊ शकतात. मायबोलीवरचं लेखन, इतर अनेक उपक्रम, इथे चालणार्या गप्पा, चर्चा, चेष्टा-मस्करी (आणि क्वचित काही तात्विक मतभेद सुध्दा ) याबद्दल समस्त मायबोलीकरांचे कुटुंबीय रोज काही ना काही ऐकतच असतात. त्या गप्पा, ती धमाल त्यांना प्रत्यक्ष अनुभवायला मिळते ती वर्षाविहारादिवशी. वविदिवशी नवीन भेटीगाठी होतात, ओळखी होतात, आधीच्या ओळखींचं मैत्रीत रुपांतर होतं, मैत्रीचे नवीन धागेही विणले जातात.
अर्थात आपल्या सर्व आवड्त्या नावड्त्या... पाहीलेल्या...न पाहीलेल्या...ख-या आणि अर्थातच कदाचित ड्यु आयडी मायबोलीकरांना प्रत्यक्ष याची देही याची डोळा भेटण्याची पर्वणीच!!!! यंदाचा हा मैत्रीचा सोहळा संपन्न होणार आहे २४ जुलै २०११ या दिवशी कर्जत-चौक फाट्यापासुन साधारण ३०-३२ कि.मी. अंतरावर असलेल्या "फार्म लाईफ होलिडेज" इथे. तर मंडळी, तो दिवस साजरा करण्याची पूर्वतयारी म्हणून काही गोष्टी नियमानुसार आणि ठराविक दिवशी करणं गरजेचं आहे.
त्यापैकी पहिली गोष्ट म्हणजे वविला येणार्यांची नावनोंदणी. वविला registered मायबोलीकर आणि त्यांचे कुटुंबिय (पति/पत्नी/मुले) येऊ शकतात. इच्छुक मायबोलीकरांनी त्यासाठी vavi@maayboli.com या पत्त्यावर ई-मेल करायची आहे.
नावनोंदणी करताना सभासदांनी खालील गोष्टींची माहिती देणे आवश्यक आहे. ईमेल च्यासब्जेक्ट मध्ये ववि२०११ नोंदणी' असे नमुद करण्यास विसर नका.
१. नाव
२. मायबोलीचा user id
३. संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक (भ्रमणध्वनी क्रमांक दिल्यास उत्तम)
४. कुठल्या शहरातून येणार (मुंबई, पुणे इ.)
५. आपला नेहमी वापरात असलेला email id
६. सहभागी होणार्या एकूण व्यक्तींची संख्या (प्रौढ/ मुले).
७. लहान मुले (६ ते १० किंवा ३ ते ५ वयोगट) असल्यास त्यांचे वय
८. मायबोली गृपबरोबर बसने येणार की स्वतंत्र येणार?
९. पैसे कसे भरणार? प्रत्यक्ष की ऑनलाईन?
नावनोंदणीची अंतिम तारीख आहे १६ जुलै २०११.
एकूण इच्छुकांच्या संख्येनुसार बसभाडे ठरवण्यास मदत होते. त्यामुळे लवकरात लवकर आपली नावनोंदणी करा. नावनोंदणीचे काम पूर्ण झाले की पुढचे महत्त्वाचे काम म्हणजे पैसे जमा करणे.
वर्षाविहार-२०११ साठी वर्गणी आहे :
पुणेकरांसाठी :
प्रौढ : रु. ६२५ प्रत्येकी. (रिसॉर्ट : रु. ३५०, बस : रु. २२५, सा.स. : रु. ५०)
मुंबईकरांसाठी :
प्रौढ : रु. ६०० प्रत्येकी. (रिसॉर्ट : रु. ३५०, बस : रु. २००, सा.स. : रु. ५०)
(फक्त बस खर्चामुळे वर्गणी रक्कम वेगवेगळी आहे.)
मुले (वय ६ ते १० वर्षे) : रु. ३५० प्रत्येकी.
५ वर्षांपर्यंतच्या मुलांना काहीही शुल्क नाही.
पुणे आणि मुंबई इथे १७ जुलै २०११ या एकाच दिवशी वविचे पैसे जमा केले जातील.
पुणे - स्थळ: बालगंधर्व नाट्यगृहाच्या तिकीटखिडकीशेजारील कट्टा. वेळ: १७ जुलै २०११, सं. ५.३० ते ८.००
मुंबई - स्थळ: शिवाजी पार्क, उद्यान गणेश मंदिराच्या प्रांगणात. वेळ: १७ जुलै २०११, सं. ५.३० ते ८.००
समजा पैसे भरून जर आयत्यावेळी काही कारणाने वविला येणं रद्द केलं तर बसचे भाडे वजा करून उरलेले पैसे परत करण्यात येतील.
स्वतंत्र येणार्यांनी बसभाडे देण्याची अर्थातच गरज नाही.
या पैकी कोठे तुम्हाला पोहोचणे शक्य नसेल तर तुमच्या संपर्कातल्या माबोकरांमार्फत पैसे संयोजकांपर्यंत पोचवा.
ऑनलाईन पैसे भरणार्यांना ज्या अकाऊंटमध्ये पैसे भरायचे आहेत त्याची सर्व माहिती ईमेलने कळविली जाईल.
मुंबई आणि पुणे सोडुन इतर ठिकाणच्या तसेच भारताबाहेरील कोणालाही वर्षाविहारास येणे शक्य असेल तर त्यांनी जरूर यावे.
वर्षाविहार-२०११ संयोजन समिती :
पुणे -
मल्लीनाथ (MallinathK) फोन : ९९६०३६६५६६
राम चिंचलीकर(राम) फोन : ९८५०८८५४२५
मुंबई -
आनंद चव्हाण (आनंदमैत्री) फोन : ९७६९४५४४२९
आनंद केळकर (आनंद्_सुजू) फोन : ९८२०००९८२२
संदिप खांबेटे(घारुआण्णा) फोन : ९८१९९९३६३४
http://www.farmlifeholidays.com या दुव्यावर रिसॉर्टची अधिक माहिती मिळू शकेल. आपल्याला काही शंका असल्यास आपण इथे मेसेज टाकू शकता अथवा vavi@maayboli.com या ई-मेल आयडीवर संपर्क करु शकता.
गेल्या वर्षी यू. के.’ज् रिसॉर्ट इथे पार पडलेल्या ववि-२०१० ला मायबोलीकर आणि त्यांचे कुटुंबीय यांची विक्रमी उपस्थिती होती. तो विक्रम यंदा मोडला जावा अशी सर्वांचीच इच्छा आहे.
वविची रुपरेषा साधारण अशी असेल......
सकाळी ९.३० वाजेपर्यंत पुणे व मुंबईच्या बसेस रिसॉर्टवर पोहोचतील
सकाळी ९.३० ते १०.०० न्याहारी करुया
१०.०० ते १०.३० स्विमिंगपूलात / नदीत/ओढ्यात उतरण्यासाठीचे चेंजिंग
१०.३० ते १२.३० स्विमिंग पूल ,नदीत/ ओढा व इतर उपलब्ध धबधबा डान्स
: मधे धम्माल मस्ती
१२.३० ते १.०० परत चेंजिंग
१.०० ते २.०० जेवण
२.३०-४.३० मनोरंजन
५.०० वाजता न्याहारी
५.३० वाजता जड अंत:करणाने आपापल्या शहरात नेणार्या बस मधून प्रयाण.
तेव्हा, भेटू या, आपल्या वविला!
बस रुटची माहिती इथेच प्रकाशीत केली जाईल. नोंदणी केलेल्या सर्वांनी कृपया आपला थांबा आणि बरोबर येणार्या मंडळींची नाव इमेल करुन कळवावी, ही माहिती वहातूक कंत्राटदाराला परवान्यासाठी लागणार आहे.
सुचना: रिसॉर्ट मधे पाण्यात उतरताना पोहोण्याचा पोषाख असणे आवश्यक आहे. (महिलांसाठी: पोहोण्याचा पोषाख नसल्यास टेरिकॉट्/नायलॉन मटेरिअलचे लेगिंग्ज आणि टि शर्ट चालतील) पाण्यात उतरताना शक्यतो कॉटनचे कपडे/ जीन्स वगैरे गोष्टी टाळाव्यात)
धन्यवाद.
वविसंयोजक.
मस्त खुप मज्जा आली... वविला..
मस्त खुप मज्जा आली... वविला..

गाडीत तर नेहमीप्रमाणे गाण्यांची बहार होती जाताना आणि परतताना पण ..
पावसाने तर जय्यत तयारी केलेली मायबोलीकरांच्या वविला... धम्माल आली.
पावसात स्विमींग पूलच्या ईथे नाचायचा कार्यक्रम पार पडला का... मला नाही बघता आले , असेल तर त्याचेही फोटो येऊदेत ...
केळे भरवायच्या स्पर्धेने तर हसून हसून पुरे वाट लागली. आमच्या गृपमध्ये भुंग्याने तर ईतक्या पटकन केले खाल्ले की मजा आली, पण एका सेकंदासाठी नंबर दुसरा आला.
चित्रकला स्पर्धा, लंगडी खेळ .. मस्त
नवीन वृत्तांची वाट बघतेय.. लवकर येऊदेत
हबा नसेल ओढणारा.. नुकताच
हबा नसेल ओढणारा.. नुकताच आजारातून उठलाय तो.. डू आय च होता..
(No subject)
ए तो हबा होता ना? >>> मंजुडी
ए तो हबा होता ना? >>> मंजुडी खुर्चीवर बसलेल्या असताना खुर्ची ओढायला मी काय खरोखरचा हनुमान आहे का? लेकरावर असे आळ घेऊ नका? डुआयच होता.
रच्याकने, घारूआण्णांची गरूडझेप ज्या माणसाच्या देहाला धडकली तो देह बरा आहे ना? आणि खेळताना पडलेले सगळे विसेकजण आज बरे असतील ही अपेक्षा.
जल्ला मी संयोजकांना यो च्या
जल्ला मी संयोजकांना यो च्या लावणीचा सीक्वेल बघणेका हय म्हणून स्पेशल रीक्वेस्ट केली होती. कुणीच मनावर नाय घेतलं.
चांदोमामाचे लहानग्यांना दिलेले कवितेचे पुस्तक (आमच्या राजसच्या भाषेत पुक्कक) मस्त आहे.
वविचे ठिकाण मात्र फारच आत होते. ४ तास मोदक आपला कार चालवतोच आहे, तरी फार्म लाईफची पाटी दिसायचे नाव नाही. सकाळी ४ तास आणि संध्याकाळी अडिच तास असा जवळपास ७ तास प्रवास आणि प्रत्यक्ष ववि मध्ये ६ तास सहभाग अशी मी, मोदक अणि आमच्या पिल्लूची वविची कहाणी सुफळ संपूर्ण झाली.
नाही तो हबाच असावा. कारण जी
नाही तो हबाच असावा. कारण जी काय पडापडी झाली त्या सगळ्याला हबाच्या अफलातुन कल्पनाच कारणीभुत होत्या. (आठवा लंगडीचा खेळ आणि किती पडले आणि किती धडपडले ते)
रच्याकने, घारूआण्णांची
रच्याकने, घारूआण्णांची गरूडझेप ज्या माणसाच्या देहाला धडकली तो देह बरा आहे ना? >>>>>>:हहगलो:
हबा, तू टेबलाविषयी बोलतोयेस
हबा, तू टेबलाविषयी बोलतोयेस का?? तो तुटला माणसाच काही कळ्ळ नाही
कारण जी काय पडापडी झाली त्या
कारण जी काय पडापडी झाली त्या सगळ्याला हबाच्या अफलातुन कल्पनाच कारणीभुत होत्या. >>> हो ना... पायाच्या ऐवजी हात दुखत आहेत :p
हबा, तुझं घड्याळ, मोबाईल सगळं
हबा, तुझं घड्याळ, मोबाईल सगळं व्यवस्थित आहे ना?
रच्याकने, तुला पाण्यात ढकलणार्याला शोधलंस का ?
अरे ते शीर्षकात वृत्तांत शब्द
अरे ते शीर्षकात वृत्तांत शब्द नीट लिहा!
निंबुडा... त्या पाटीचा पेशल
निंबुडा... त्या पाटीचा पेशल फोटो लवकरच टाकण्यात येईल.... शेवटच्या वळणावर एकच पाटी असलेले महान रिसॉर्ट आहे ते.. त्यांनी मायबोलीकरांच्या स्वागताची पाटी मात्र लावली होती.. तिचा फोटो कुणी काढला असेल तर तो टाका..
श्रीशैल पण मिळालेले पुस्तक तो
श्रीशैल पण मिळालेले पुस्तक तो रात्री उशाशीच घेऊन झोपलेला..
संयोजक... वृत्तांतासाठी वेगळा
संयोजक... वृत्तांतासाठी वेगळा धागा उघडा की.. इथेच कशाला वृत्तांत...
त्यांनी मायबोलीकरांच्या
त्यांनी मायबोलीकरांच्या स्वागताची पाटी मात्र लावली होती.. तिचा फोटो कुणी काढला असेल तर तो टाका>>>>>>>त्याचा फोटो रोहितच्या कॅमेर्यात आहे. जल्ला, माझ्या कॅमेराचा कार्ड फुल्ला झाला होता.
"ह.बा., आपण पहिल्यांदाच
"ह.बा., आपण पहिल्यांदाच भेटतोय"
)
"हो.... नमस्कार! मी हणमंत शिंदे. माझा मायबोली आयडी ह.बा. आहे"
(याच्यात घारूअण्णांचा वारस होण्याचं पोटेन्शियल आहे असं वाटतं की नै?
"अरे.... तिला माहितेय. तिनेच तुला 'ह.बा.' अशी हाक नाही का मारली..."
"अं... हो बरोबर."
व्यस्त आणि ग्रस्त अश्या संयोजकांची वविची सांगता झाल्यानंतरची अवस्था....
कारण जी काय पडापडी झाली त्या
कारण जी काय पडापडी झाली त्या सगळ्याला हबाच्या अफलातुन कल्पनाच कारणीभुत होत्या >>> तू कधी पडलीस? पडायला तू उठलीसच कधी? जरा तरी लंगडी घातलीस का? ती एक बिचारी (आयडी माहिती नाही) उत्साहात लंगडी घालायला गेली आणि दोन्ही गुडघे आणि पायाचा अंगठा फोडून घेतला तरी आनंदाने मश्तच होता हा लंगडीचा गेम म्हणाली. याला म्हणतात स्पिरीट!
जल्ला मी संयोजकांना यो च्या
जल्ला मी संयोजकांना यो च्या लावणीचा सीक्वेल बघणेका हय म्हणून स्पेशल रीक्वेस्ट केली होती. कुणीच मनावर नाय घेतलं.
यावेळेस लावणीचा बेत नव्हता.... यावेळेस तो शिला आणी जलेबीबाई साकारनार होता. पण दोघी ऐन मोक्याला गायवल्या.
याला म्हणतात स्पिरीट! ते
याला म्हणतात स्पिरीट!
ते स्पिरीट मुंबैचं होतं...
"ह.बा., आपण पहिल्यांदाच
"ह.बा., आपण पहिल्यांदाच भेटतोय"
मस्त जोक आहे. पण कधी झाला हा?
"हो.... नमस्कार! मी हणमंत शिंदे. माझा मायबोली आयडी ह.बा. आहे" >>>
अरे हे विसरलोस... (याच्यात
अरे हे विसरलोस...
(याच्यात घारूअण्णांचा वारस होण्याचं पोटेन्शियल आहे असं वाटतं की नै? खो खो )


या वेळेला बसेस वर माबोचे
या वेळेला बसेस वर माबोचे बॅनर्स आणि झेंडे कसे नव्हते?
मस्त जोक आहे. पण कधी झाला
मस्त जोक आहे. पण कधी झाला हा?>>>>>>>>>> स्म्रुतिभ्रंशाची साथ सुरु झालिरे का रे?
आनंद... हे हे हे.. हबा
आनंद... हे हे हे..
हबा तुझ्या आणि दक्षिणा मधले सकाळी सकाळी झालेले संवाद महान होते...
रच्याकने काल कौतुक शिरोडकर ह्यांचा वाढदिवस होता आणि त्यांनी तो मायबोलीकरांबरोबर साजरा केला..
याच्यात घारूअण्णांचा वारस
याच्यात घारूअण्णांचा वारस होण्याचं पोटेन्शियल आहे असं वाटतं की नै? >>> मस्तच. त्यांची संपत्ती किती आहे? त्याना स्वकष्टार्जीत वारस नाही का? त्यानी मला याविषयी काहीच सांगीतले नाही.
हबा, तू कुठे भटकत होतास मी
हबा, तू कुठे भटकत होतास मी लंगडी घातली तेव्हा??? आणि रच्याकने आम्ही आमचं स्पिरीट रंगकामात दाखवल की
आता तुम्ही आमचा नंबर दिला नाही ही गोष्ट वेगळी
हबा तुझ्या आणि दक्षिणा मधले
हबा तुझ्या आणि दक्षिणा मधले सकाळी सकाळी झालेले संवाद महान होते... >>> दक्षीताई पहिल्यांदाच भेटल्या होत्या म्हटलं ओळखीसोबत थोडं मर्गदर्शनही घ्यावं. म्हणून सल्ला घेतला. पण तिथल्या च्यायला गोडपणा आजिबात नव्हता.
अयाया..... सॉल्लिड आहेत एकेक
अयाया..... सॉल्लिड आहेत एकेक किस्से. आशुतोष आहे का? त्याला फोन करायचीदेखिल भिती वाटतेय.
मंजूडी ... दोन्ही किस्से हहपुवा.
मस्तच. त्यांची संपत्ती किती
मस्तच. त्यांची संपत्ती किती आहे? त्याना स्वकष्टार्जीत वारस नाही का? त्यानी मला याविषयी काहीच सांगीतले नाही.>>>>>
हिम्या
हिम्या
Pages