आंबाड्याची चटणी

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 30 June, 2011 - 03:07
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

५-६आंबाडे (धुवुन फोडी करुन)
ओल खोबर १ वाटी
२ मिरच्या (तिखट हवी असल्यास जास्त घ्या)
थोडी कोथिंबीर (ऑप्शनल)
मिठ

क्रमवार पाककृती: 

वरील सर्व जिन्नस एकत्र करुन मिक्सरमध्ये चटणी करावी.

(किती सोप्पी रेसिपी एका ओळीतच संपली)

वाढणी/प्रमाण: 
लहानमुले असतील तर परत परत मागतात.
अधिक टिपा: 

माझ्या मुलीला हिरव्या रंगाची चटणी आवडते म्हणून मी सगळ्या चटण्यांमध्ये कोथिंबीर घालते. हिरवी नसेल तर ती खात नाही.

एक दोन पाकळ्या लसुण टाकला तरी चालतात.

माहितीचा स्रोत: 
आई
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी चटणी फॅन आहे, त्यामुळे कुठलीही चटणी/पिकलची रेसिपी दिसली की लगेच करुन बघते. यम्मी दिसते आहे एकदम.
आंबाडा, कैरीडीचा छोटा भाउ का? चित्र तरी बाळकैरीचं दिसतं आहे. कुठे मिळतो? चवीला कसा असतो?

जागुले प्लेटमध्ये मीठ दाखवायचं राहून गेलं का? नमूद कर, नाहीतर काही महाभाग तशीच करतील चटणी.. Proud

बाकी दिसतेय एकदम तोंपासु बरं का Happy

चटणी मस्त दिसते जागुताई.
मराठवाडयात याला आंबटकाई म्हणतात.आई याच लोणचं करते. अमेरीकेत कुठे मिळेल का?

आश. भारतात मिळत आंबाड्याच लोणच कधी आलीस की घेउन जा. इथे भारतातल्याच अर्ध्या लोकांना आंबाडा माहीत नाही तर अमेरीकेत कसा माहीत असेल ?

चातका हा तुझा केसांचा आंबाडा झालाय का Lol

जागु,
आंबाडे कोणत्या भागात मिळतात..सिझन आताच असतो का? कमरख ची चटणी अशीच हिरवीगार होते ..युपी,मप्र मधे --कमरख बाराही महिने मिळते..कमरख आंबट्गोङ काहीसे रसदार असते..

हो ग साधना चटणी मस्तच लागते. तु अगदी कोवळे पण मग पाहीले नसशील. नुसते मिठ मसाला लावुन खायला मज्जा येते. सुलेखा मुम्बई कोकणात मिळतात आम्बाडे.

जागु,
आंबाडे म्हणजे लहान कैरी सारखेच दिसतात,दोन्ही एकच का ?
आंबाड्याची भाजी घरी अनेकवेळा खाल्ली आहे पण बाकी त्याबद्दल काही माहिती नाही.