विंबल्डन खुल्या टेनिस स्पर्धेचे यंदाचे १२५ वे वर्ष. यंदा ही स्पर्धा २० जून ते ३ जुलै दरम्यान रंगणार आहे.
आज जाहिर झालेल्या मानांकनानुसार पुरूष एकेरीत नदाल, जोको, फेडरर आणि मरे तर महिला एकेरीत वॉझनियाकी, किम, झ्वोनारेव्हा, ना ली ह्यांना अनुक्रमे पहिले, दुसरे, तिसरे आणि चौथे मानांकन मिळाले आहे. भारताच्या महेश भुपती आणि लिएंडर पेस ह्यांना पुरूष दुहेरीत तिसरे तर रोहन बोपण्णा आणि पाकिस्तानच्या एसान कुरेशी ह्या जोडीला चौथे मानांकन मिळाले आहे.
गतविजेती सेरेना विल्यम्स आणि माजी विजेती व्हिनस विल्यम्स ह्यांनी दुखापतीतून सावरून ह्या स्पर्धेद्वारे पुनरागमन निश्चित केलं आहे. ह्या दोघींना अनुक्रमे आठवे आणि चोविसावे मानांकन मिळाले आहे.
मानांकनानुसार खेळाडू आपापले सामने जिंकत गेल्यास उपांत्यपूर्व फेर्या अश्या होतील..
पुरूष एकेरी :
राफा वि बर्डिच
मरे वि रॉडिक
फेरर वि फेडरर
सोड्या वि जोको
महिला एकेरी :
वोझजियाकी वि शारापोव्हा
ना ली वि सेरेना
स्किव्होनी वि अझारेंका
क्विटोव्हा वि झ्वोनारेव्हा (ह्या भागात व्हिनस पण आहे)
हा धागा यंदाच्या विंबल्डनविषयी चर्चा करण्यासाठी....
हो. आता म्हण गेट वेल सून
हो. आता म्हण गेट वेल सून
पराग, मी विल्यम्स भगिनींबद्दल
पराग, मी विल्यम्स भगिनींबद्दल इथे अवाक्षरही लिहिलेलं नाहीये. अपवाद सेरेना-बार्टोली सामन्याच्या दोन पोस्टी... पण त्यातही सेरेना आणि व्हिनस दोघी मला आवडत नाहीत अशा अर्थाची आणि एकूणच त्यांच्या खेळाविषयी काहीही मते व्यक्त केलेली नाहीत त्यामुळे त्या संदर्भात माझे नाव घेऊ नकोस अशी नम्र विनंती.
याउलट याच बाफच्या पहिल्या पानावर तूच 'सेरेना रानटी खेळते' अशा अर्थाचं मत व्यक्त केलं आहेस
शारापोव्हाच जिंकेल
शारापोव्हाच जिंकेल
काल केवितोवा/क्वितोवा छान खे
काल केवितोवा/क्वितोवा छान खे ळली, अझारेन्काने अगदीच फुसका खेळ केला असं वाटलं. बाकी शारापोव्हा-लिसीकी मॅच इच्छा असूनही पूर्ण बघता नाही आली.
शारापोव्हा लिसिकी दोघी वाईट
शारापोव्हा लिसिकी दोघी वाईट खेळल्या. शारापोव्हाला जास्त ब्रेक पॉइंट्स मिळाले आणि तिने जास्त कन्व्हर्टही केले म्हणून जिंकली एवढेच. मोक्याच्या क्षणी ती कमी वाईट खेळली.
मोक्याच्या क्षणी ती
मोक्याच्या क्षणी ती (शारापोव्हा) कमी वाईट खेळली >>>
मंजू.. माझा संदर्भात गोंधळ
मंजू.. माझा संदर्भात गोंधळ झाला असेल मग..
रानटी खेळते >>>
आपल्या बाई लेडीज डबल्समध्ये सेमीफायनलला पोचल्यात... आत्ता सुरु झालीये मॅच...
मेन्स सिंगल्स सेमीफायनल्स पण सुरु होतील थोड्यावेळात..
झाल्या की त्सोंगाने पहिल्याच
झाल्या की त्सोंगाने पहिल्याच गेममध्ये ब्रेक केली सर्व्ह.
सानिया पण एक ब्रेक डाउन आहे.
ऑलिंपिकमध्ये मिक्स्ड डबल्सचा समावेश + पुढलं ऑलिंपिक लंडनात त्यामुळे टेनिसचे सामने विम्बल्डनात त्यामुळे सानियासाठी योग्य जोडीदार कोण असा चर्चेचा ताजा मुद्दा आहे
सानियासाठी योग्य जोडीदार
सानियासाठी योग्य जोडीदार कोण>>> काय चेष्टा करताय मयेकर.. सानियाला योग्य जोडीदार एकच शोएब...
जोकोने सेट घेतला पहिला.
जोकोने सेट घेतला पहिला.
सानियासाठी योग्य जोडीदार
सानियासाठी योग्य जोडीदार कोण>>> काय चेष्टा करताय मयेकर.. सानियाला योग्य जोडीदार एकच शोएब...
<<<<<<<<<<<<
मग आता काय शोएबला टेनिसचे धडे घ्यायला लावाता कि काय!
क्रिकेट नाहीच खेळत आहेत निदान
क्रिकेट नाहीच खेळत आहेत निदान टेनिस तरी खेळेल...
जोको त्सोंगाला सरळ सेट मध्येच हारवतोय वाट्टं.. परवा सारखा कम बॅक केला तरच काही तरी वेगळा निकाल नाहीतर टाटा बाय बाय..
त्सोंगा परत तेच करणार की काय
त्सोंगा परत तेच करणार की काय ?
जोको तिसर्या सेटमध्ये ६-५ सर्व्हिंग फॉर मॅच होता. ! तो सेट टायब्रेकरला जाऊन त्सोंगाने जिंकला..
त्सोंगा फारच चार्ज्ड वाटतो
त्सोंगा फारच चार्ज्ड वाटतो आहे.. पण जोकोनी परत एकद चवथ्या सेट मध्ये लगेचच एक ब्रेक घेतलाय..
जोको जिंकला!!!
जोको जिंकला!!!
जिंकला जोको... शेवटचा सेटचे
जिंकला जोको... शेवटचा सेटचे एक दोन गेम्स पाहिले.. सर्व्हिस आणि क्रॉस कोर्ट शॉट्स भारी मारले जोकोने..
आणि आता तो रँक १ झाला..
येस्स्स!!
येस्स्स!!
जोको
जोको
अशी नम्र विनंती >>>>सिंडे,
अशी नम्र विनंती >>>>सिंडे, तब्येत बिघडली आहे की काय ? >> मला वाटते सिंडीला म्हणायचेय कि "तुम्ही दोघे तिच्या विपूमधे भांडा (म्हणजे follow करायला सोपे होईल)". कदाचित Wimbledon पेक्षा ते जास्त interesting असेल
पहिली सेमीफायनल मस्त झाली.
पहिली सेमीफायनल मस्त झाली. दोघेही छान खेळले.
आता रविवारी काहीही झाले तरी सोमवारी जोको नवा नंबर वन.
मिर्झाबाई महिला दुहेरी आणि मिश्र दुहेरीत बाहेर. कोणी रे ते शोएब मलिकचं नाव काढणारं?
इकडे "कमॉन अँडी" चा गजर झाला,
इकडे "कमॉन अँडी" चा गजर झाला, म्हणून बघितले, तेव्हढ्यात नदालने ब्रेकची संधी साधली. मरे काही खास खेळत नाहीये. पहिला सेट कसा काय जिंकला?
नदाल चांगलाच धोपटतोय अँडीला.
नदाल चांगलाच धोपटतोय अँडीला. २-१ सेटस (६-२, ६-२) आणि ब्रेकने पुढे आहे.
आता नदाल किंवा जोको. कुणीही
आता नदाल किंवा जोको. कुणीही जिंकला तरी चालेल.
हो ना .. ज्योको जिंकू शकेल
हो ना ..
ज्योको जिंकू शकेल का?
शेवटच्या सेटमधले पहिले ३
शेवटच्या सेटमधले पहिले ३ गेम्स पाहिले.. नदालचं कोर्ट कव्हरेज अफाट होतं नेहमीप्रमाणेच !
सकाळमध्ये ही बातमी होती काल मरेबद्दलल..
http://www.esakal.com/esakal/20110629/5182837419982841627.htm
आता दरवर्षीच "मरे" त्याला प्रेक्षक काय करे ! आजपण बरा खेळता खेळता अचानक ढेपाळला तो..
आता नदाल किंवा जोको. कुणीही जिंकला तरी चालेल. >>>> मला पण
फायनल चुरशीची होणार. जोको
फायनल चुरशीची होणार. जोको कदाचित नदालला भारी पडेल असं वाटतंय.
पहिला सेट आणि दुसर्या
पहिला सेट आणि दुसर्या सेटच्या चार गेमपर्यंत राफाची फर्स्ट सर्व्ह चालत नव्हती (<५०%) फोरहँड दगा देत होता. रिटर्न्स नेटशी अडत होते.दुसर्या सेटच्या चौथ्या गेममध्ये मरेला ब्रेकची संधी होती, आणि अगदी सोपा फटका नेटच्या जवळ येऊन त्याने लाँग मारला.
इथे पूर्ण चित्र पालटले. राफाच्या खेळातले सगळे दोष क्षणात गायब झाले; खरं तर पलीकडच्या बाजूला गेले. मरेचा फोरहँड घसरला.चेहरा तसा नेहमी पडलेलाच असतो, आता पार जमिनीत गाडला गेला.
तिसर्या सेटमध्ये राफाने सुरुवातीलाच ब्रेक घेईपर्यंत मॅच पाहिली.
आजच्या फायनल च्या निमेत्ताने
आजच्या फायनल च्या निमेत्ताने एकही पोस्ट नाही?
गो ज्योको! गो राफा! :p
थ्रु आऊट शेर्पोवा अडखळत
थ्रु आऊट शेर्पोवा अडखळत होती\\
फार सरळ मॅच झालीए
पाहतंय का कोणी फायनल? सुरूवात
पाहतंय का कोणी फायनल? सुरूवात तरी चांगली झाली आहे.
Pages