विंबल्डन - २०११

Submitted by Adm on 15 June, 2011 - 11:06

विंबल्डन खुल्या टेनिस स्पर्धेचे यंदाचे १२५ वे वर्ष. यंदा ही स्पर्धा २० जून ते ३ जुलै दरम्यान रंगणार आहे.
आज जाहिर झालेल्या मानांकनानुसार पुरूष एकेरीत नदाल, जोको, फेडरर आणि मरे तर महिला एकेरीत वॉझनियाकी, किम, झ्वोनारेव्हा, ना ली ह्यांना अनुक्रमे पहिले, दुसरे, तिसरे आणि चौथे मानांकन मिळाले आहे. भारताच्या महेश भुपती आणि लिएंडर पेस ह्यांना पुरूष दुहेरीत तिसरे तर रोहन बोपण्णा आणि पाकिस्तानच्या एसान कुरेशी ह्या जोडीला चौथे मानांकन मिळाले आहे.
गतविजेती सेरेना विल्यम्स आणि माजी विजेती व्हिनस विल्यम्स ह्यांनी दुखापतीतून सावरून ह्या स्पर्धेद्वारे पुनरागमन निश्चित केलं आहे. ह्या दोघींना अनुक्रमे आठवे आणि चोविसावे मानांकन मिळाले आहे.

मानांकनानुसार खेळाडू आपापले सामने जिंकत गेल्यास उपांत्यपूर्व फेर्‍या अश्या होतील..

पुरूष एकेरी :
राफा वि बर्डिच
मरे वि रॉडिक
फेरर वि फेडरर
सोड्या वि जोको

महिला एकेरी :
वोझजियाकी वि शारापोव्हा
ना ली वि सेरेना
स्किव्होनी वि अझारेंका
क्विटोव्हा वि झ्वोनारेव्हा (ह्या भागात व्हिनस पण आहे)

हा धागा यंदाच्या विंबल्डनविषयी चर्चा करण्यासाठी....

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बोपन्ना कुरेशी पहिला सेट जिंकून दुसर्‍यात वन ब्रेक डाउन.
इव्हानोव्हिच चक्क दुसर्‍या फेरीत पोचलीय.

इव्हानोव्हिच चक्क दुसर्‍या फेरीत पोचलीय.
>> Biggrin दोनेक वर्षांपूर्वी चांगलं खेळायची. रॅन्क १ होता तेव्हा तिचा. दिसायलापण सुंदर होती. त्यामुळे आवडायची तेव्हा. Proud

आता चौथ्या फेरीपर्यंत पोचायचीसुद्धा मारामार आहे तिच्यासाठी.

वॉवरिंका हा तसा ठीकठाकच आहे, तो शक्यतो चौथ्या फेरीच्या पुढे जाऊ शकत नाही.

दिसायलापण सुंदर होती. ---अजूनपण दिसते की.
पोचली तिसर्‍या फेरीत.
फ्रेंच ओपन जिंकलेय तिने. तेव्हा नेटच चुंबन घेतलं होतं! नेटचं चुंबन घेऊन बॉल पलीकडच्या बाजुला पडला. तेवढ्याने पारडं जड झालं होतं तिचं.

Lol
अहो मंजूतै... तुम्ही तो नोव्होत्नाचा पोस्ट टाकला त्याला डोळे फिरवले कारण संदर्भ गंडला म्हणून.. आता सँटी म्हणाला असता की इव्हानोविक चांगली दिसत नाही.. तर त्यालाही डोळे फिरवले असते.. हा.का.ना.का.. Proud
बोला बोला तुम्ही फ्रेंच वेण्या, ब्रिटीश खुरटे केस, अमेरीकन braiding किंवा टक्कल (ब्लेकचं) किंवा भारतीय नो हेयर स्टाईल.. ह्या कश्याही बद्दल बोला. तुम्हांला फूल परमिशन.. Proud

"इव्हानोव्हिक सुंदर दिसते" >>> वा वा सँटी आणि मयेकरांचं ह्या एका तरी बाबतीत एकमत झालं.. Proud Light 1

सेरेना जिंकली.. ती दुसरी बाई चांगली खेळत होती.. पण आज पुन्हा एकदा सेरेना अनुभवामुळे जिंकली.. मोक्याच्या क्षणी चुका टाळल्या आणि आक्रमक खेळ केला..
जोको ५-० पुढे असताना अचानक २ सर्व्हिस ब्रेक झाल्या ! सोड्या २ सेटने मागे पडलाय हेविट च्या विरुद्ध..

सेरेना अनुभवामुळे जिंकली --> सेरेनानी पहिला टायटल जिंकला तेव्हा हालेप ८ वर्षाची होती Happy
जोको ५-० पुढे असताना अचानक २ सर्व्हिस ब्रेक झाल्या ! --> वो जो ईस्टाईल हे, टेन्शन नही लेने का
सोड्या तिसरा सेट चांगला खेळत आहे.

तिसर्‍या सेट मध्ये पार २१-१९ इथ पर्यंत जाऊन डाऊन..

सोड्या जातोय असं वाटतंय.... पण हेविटही बेभरवश्याचाच आहे.. ही मॅच मारे जिंकेल आणि पुढच्या मॅच मध्ये सडकून मार खाईल..

शारापोव्हा जिंकली !!! सुरुवातीला जरा मागे पडली होती...
पण नंतर चांगली खेळली...
वोझनियाकी पण जिंकली... छान खेळली.. आज बर्‍याचदा नेट जवळ येऊन खेळली.. नाहितर ती नेटजवळ त्यामानाने कमी खेळते..

पेस- भूपती, देववर्मन -निशिकेरी पुरुष दुहेरीच्या दुसर्‍या तर मिर्झा-व्हेस्निना महिला दुहेरीच्या तिसार्‍या फेरीत पोचले.

व्हिनस किरकोळीत जिंकली आज.. चांगलय.. झ्वोनारेव्हा गेल्या मॅचेसही कशीबशीच जिंकली होती...
अझारेंकाची मॅच बरी सुरु आहे.. २ गेम्स ब्रेकरूम मध्ये बघितले आत्ता..

Pages