विंबल्डन - २०११

Submitted by Adm on 15 June, 2011 - 11:06

विंबल्डन खुल्या टेनिस स्पर्धेचे यंदाचे १२५ वे वर्ष. यंदा ही स्पर्धा २० जून ते ३ जुलै दरम्यान रंगणार आहे.
आज जाहिर झालेल्या मानांकनानुसार पुरूष एकेरीत नदाल, जोको, फेडरर आणि मरे तर महिला एकेरीत वॉझनियाकी, किम, झ्वोनारेव्हा, ना ली ह्यांना अनुक्रमे पहिले, दुसरे, तिसरे आणि चौथे मानांकन मिळाले आहे. भारताच्या महेश भुपती आणि लिएंडर पेस ह्यांना पुरूष दुहेरीत तिसरे तर रोहन बोपण्णा आणि पाकिस्तानच्या एसान कुरेशी ह्या जोडीला चौथे मानांकन मिळाले आहे.
गतविजेती सेरेना विल्यम्स आणि माजी विजेती व्हिनस विल्यम्स ह्यांनी दुखापतीतून सावरून ह्या स्पर्धेद्वारे पुनरागमन निश्चित केलं आहे. ह्या दोघींना अनुक्रमे आठवे आणि चोविसावे मानांकन मिळाले आहे.

मानांकनानुसार खेळाडू आपापले सामने जिंकत गेल्यास उपांत्यपूर्व फेर्‍या अश्या होतील..

पुरूष एकेरी :
राफा वि बर्डिच
मरे वि रॉडिक
फेरर वि फेडरर
सोड्या वि जोको

महिला एकेरी :
वोझजियाकी वि शारापोव्हा
ना ली वि सेरेना
स्किव्होनी वि अझारेंका
क्विटोव्हा वि झ्वोनारेव्हा (ह्या भागात व्हिनस पण आहे)

हा धागा यंदाच्या विंबल्डनविषयी चर्चा करण्यासाठी....

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गिव्ह हिम बेनेफिट ऑफ डाऊट! >>>>> डाऊट नाहीचे काही तिथे.. ! विंबल्डन सारख्या स्पर्धेत गतविजेता आणि प्रथम मानांकित असताना दुखापतीचं कोणी नाटक करतय असं वाटत असेल तर त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.. !
( फुकटात लिहायला मिळतय.. लिहा काहीही !! हटकेश्वर हटकेश्वर !!)

बार्तोली खूप जास्त एक्साईट होत होती म्हणून चुका करकरून हरली असं नाही वाटलं? खरंतर उगाच तिसर्‍या सेटपर्यंत गेली ती मॅच, लिसिकीनेही अनेक चुका केल्या दुसर्‍या सेटमध्ये. शारापोव्हाने तर किबुल्कोव्हाला अगदीच किरकोळीत काढले. तिच्या बुलेट्स आदल्या दिवशीच संपल्या वाट्टं! >>>>>> अनुमोदन पूनम.. Happy

टॉमिक आणि जोकोचे पहिले २ सेट पाहिले.. चांगली चालू आहे मॅच..

मिल्या.. हो रे बरोबर आहे.. डेल पोट्रोने हरवलय दोघांनाही एकाच ग्रँडस्लॅममध्ये.. माझ्या आठवणीप्रमाणे कुठल्या तरी ATP event मध्ये जोकोने पण हरवलं होतं.. पण अर्थात ती ग्रँडस्लॅम नव्हती..

नख कुरतडण्यासाठी निमित्त देणार्‍या मॅचेस सुरु आहेत अगदी.. Happy

नीट न वाचता दुसर्‍याला मूर्खात काढायची इथली सवय जुनी आहे. तेव्हा जे "पैसे देऊन " तसलं लिहीतात त्यांना शुभेच्छा पण द्यायची जरूर वाटत नाही.

जोको ची मॅच पाचव्या सेट मध्ये जाईल असे वाटत असतानाच तिसर्‍या सेट मध्येच संपली आणि फेडेक्सची मॅच चार मध्येच संपले असे पाचव्या सेट मध्ये गेली..

<<नादाल आता रीअ‍ॅलिटी शो मध्ये काम करु शकेल. प्रचंड ड्रामा चालू आहे. आज दुखापत, मग खेळणार की नाही. मग स्कॅन, मग सगळं आलबेल>>
हो आणि मॅच संपल्यावर शर्ट काढायचं ,प्रेक्षकांमधून येणारे ऊSSSSह आSSSSह ऐकून गालातल्या गालात हसायचं.

गो पराग गो......

फेडरर गेला फुकटात . जोको - फेडी नाही Sad
नदाल वरची अभ्यासपूर्ण टीका वाचून मात्र वाईट वाट्ल . Sad आपल्याला एखादा खेळाडू आवडत नसेल पण शारिरिक क्षमतेची पूर्ण कसोटी पहाणार्या क्लेवर ६ वेळा जिंकणार्या खेळाडू बद्दल किमान आदर ठेवायला सच्चा टेनिसप्रेमीला हरकत नसावी .

फेडेक्स घरी... जोको किंवा नदाल जिंकणार.. पण फेडी त्सोंगा कडून हरणे अपेक्षित नव्हते... हारलेल्या प्रत्येक सेट मध्ये सुरुवातीलाच सर्व्हिस ब्रेक झाली.. आणि त्याला फक्त पहिल्या सेट मध्ये एकच सर्व्हिस ब्रेक करता आली...

हरला की फेडरर !! पहिला सेट पाहिला होता.. तेव्हा तरी चांगला खेळत होता.. घरी जाऊन हायलाईट्स बघायला हवे पुढचे..
ज्योकोची मॅच पाचव्या सेटला जात्ये असं वाटत असताना अचानक संपली.

आपल्याला एखादा खेळाडू आवडत नसेल पण शारिरिक क्षमतेची पूर्ण कसोटी पहाणार्या क्लेवर ६ वेळा जिंकणार्या खेळाडू बद्दल किमान आदर ठेवायला सच्चा टेनिसप्रेमीला हरकत नसावी . >>>>> बरोबर आणि हेच विल्यम्स भगिनींवर उथळ टीका करणार्‍यांनाही सांगा.. (राक्षस म्हणा नाहितर आणखी काही.. सगळ्यांच्या नाकावर टिच्चून तब्बल १० वर्ष दोघींपैकी एकतरी फायनला पोचली आणि दोघींमिळून ९ विजेतेपद मिळवली.. !!!)

गो पराग गो...... >>>>> मयेकर.. मला कुठे घालवताय ? Happy

अगदी अगदी निराशा केली फेडीने ....

लई वाईट खेळला फेडी Sad च्यायला मी बघायला लागलो आणि सोंगा ला पहिला ब्रेक मिळाला... Sad

खरंतर फेडी हरला ह्यापेक्षाही त्याने ज्या पद्धतीने मॅच बहाल केली ह्याचं जास्त वाईट वाटलं Sad दोन सेट अप असलेला इतका अनुभवी खेळाडू. एक ब्रेक काय केली त्सोंगाने सर्व्हिस आणि तीन सेट गमावले! अनबिलिव्हेबल!! त्या नंतर फेडीने एकदाही त्सोंगावर प्रेशर टाकणारा खेळ केला नाही. ना नेटजवळ गेला, ना आक्रमक झाला हे फार खटकलं Sad एकदा तरी त्याने तो 'फेडेक्स' खेळ केला असता, तर चित्र उलट दिसलं असतं का? अर्थात त्सोंगाचं क्रेडिट काढून घ्यायचे नाही. त्याचे नेटच्या जस्ट पलिकडे टाकलेले शॉट्स सुरेख होते.. त्याची न जोकोची मॅच मस्त होईल.

नदालच जिंकावा असं वाटत असलं तरी फेडी हरला आणि जसा हरला ह्याचं दु:ख आहेच.. असो.
राऽऽफा!! राफा!! Happy

उठा मंडळी.

अझारेंका गेली.
शारापोव्हाला जागं व्हायला ३ गेम्स आणि ५ डबल फॉल्ट्स लागले.

पराग, स्पष्ट सांगतो, वैयक्तिक टीका करायची जरूर नाहीये. माझी मतं मी मांडली, तू तुझी मांड, पण खेळाविषयी. विल्ल्यम भगिनी कशा चांगल्य आहेत त्यावर बोल. काल 'फुकट' वगैरे बोलून सुरुवात तू केली होतीस. आता तेच वाढवू नकोस.

मी मूळ प्रतिसादात नादाल खोटं करतो असं म्हणालो नव्हतो आणि त्याच्याबद्दल मला किती आदर असवा हे मला ठरवू दे. त्यावरुन मला काहीही बोलायचा तुला अधिकार नाही.

तुला फोटोग्राफीमधलं किती कळतं हे तुझ्या अनेक प्रतिसादांवरुन मी पाहिलं आहे, पण मी तुझ्यावर टीका करायला आलो नव्हतो, आणि येणारही नाही, तेव्हा माझ्या वाटेला जाऊ नकोस. तुझा शहाणपणा तुझ्या घरी.

पिरीअड.

जिंकली शारापोव्हा !!!
पहिल्या ब्रेकनंतर मी सोडून दिलं स्कोर ट्रॅक करणं.. मयेकरांची पोस्ट पाहिल्यानंतरही गेलो नाही.. मला वाटलं फ्रेंच ओपन सारखं होतं की काय परत... फायनलला सुरुवातीपासून जागं रहायला हवं (तिने)..

-----------------------------------------------------------------------------------------------------------------

वैयक्तिक टीका करायची जरूर नाहीये. >>>> वैयक्तिक टीका कुठे होती हे समजलं नाही.
फुकट >>> त्यात काय चूक होतं. इथे सगळेच फुकटच तर लिहितात.

पण खेळाविषयी. >>>> विल्यम्स भगिनींना तू "राक्षस" त्यांच्या खेळावरून म्हणत होतास हे मला समजलं नाही. मा.बु.दो.स.
आधी मंजू, आडो ह्यांनीही त्यांना विल्यम्स भगिनी आवडत नाहीत असं म्हंटलं होतं, पण त्यात अशी कुठली विशेषणं नव्हती त्यामुळे त्या त्यांच्या खेळाबद्दल बोलत आहेत असं मला वाटलं. आणि त्यांच्या मताचा मला आदर आहे.

तुला फोटोग्राफीमधलं किती कळतं हे तुझ्या अनेक प्रतिसादांवरुन मी पाहिलं आहे, >>>> चांगलं आहे. पण ह्या आणि ह्या
पण मी तुझ्यावर टीका करायला आलो नव्हतो, आणि येणारही नाही, >>>> वाक्यांचा एकमेकांशी आणि ह्या बाफशी संबंध काय ते कळलं नाही ते पण असो.

तुझा शहाणपणा तुझ्या घरी. >>>> हो तेच तर... Proud

पिरीअड >>>> गूड !

अशी नम्र विनंती >>>>सिंडे, तब्येत बिघडली आहे की काय ? Proud

Pages