विंबल्डन - २०११

Submitted by Adm on 15 June, 2011 - 11:06

विंबल्डन खुल्या टेनिस स्पर्धेचे यंदाचे १२५ वे वर्ष. यंदा ही स्पर्धा २० जून ते ३ जुलै दरम्यान रंगणार आहे.
आज जाहिर झालेल्या मानांकनानुसार पुरूष एकेरीत नदाल, जोको, फेडरर आणि मरे तर महिला एकेरीत वॉझनियाकी, किम, झ्वोनारेव्हा, ना ली ह्यांना अनुक्रमे पहिले, दुसरे, तिसरे आणि चौथे मानांकन मिळाले आहे. भारताच्या महेश भुपती आणि लिएंडर पेस ह्यांना पुरूष दुहेरीत तिसरे तर रोहन बोपण्णा आणि पाकिस्तानच्या एसान कुरेशी ह्या जोडीला चौथे मानांकन मिळाले आहे.
गतविजेती सेरेना विल्यम्स आणि माजी विजेती व्हिनस विल्यम्स ह्यांनी दुखापतीतून सावरून ह्या स्पर्धेद्वारे पुनरागमन निश्चित केलं आहे. ह्या दोघींना अनुक्रमे आठवे आणि चोविसावे मानांकन मिळाले आहे.

मानांकनानुसार खेळाडू आपापले सामने जिंकत गेल्यास उपांत्यपूर्व फेर्‍या अश्या होतील..

पुरूष एकेरी :
राफा वि बर्डिच
मरे वि रॉडिक
फेरर वि फेडरर
सोड्या वि जोको

महिला एकेरी :
वोझजियाकी वि शारापोव्हा
ना ली वि सेरेना
स्किव्होनी वि अझारेंका
क्विटोव्हा वि झ्वोनारेव्हा (ह्या भागात व्हिनस पण आहे)

हा धागा यंदाच्या विंबल्डनविषयी चर्चा करण्यासाठी....

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

काय लोक आहेत. स्पर्धा सुरू व्हायच्या आधीच वादावादी सुरू!

Women's tennis मधला इंटरेस्ट कमी होत गेला आणि विलीय्म्स् भगिनी आल्यापासून तो शून्य झाला ..
>>
सशल, असं म्हणू नकोस. त्या दोघींनी महिल टेनिसमध्ये थोडं स्थैर्य आणलं. नाहीतर बाकीच्या खेळाडू म्हणजे एक दोन स्पर्धा बर्‍या खेळल्या की लगेच टेनिस सोडून अनावृत्त व्हायच्या नादाला लागायच्या (म्हणजे मॉडेलिंग) Proud

सँटी.. वादावादी ?? कुठे दिसली तुला ??? ह्याला फार्फार तर मतभेद म्हणता येईल... Proud

टेनिस सोडून अनावृत्त व्हायच्या नादाला लागायच्या >>>>>>> Lol

अजून 'आपल्या बाईं' विषयी कसं कुणी बोललं नाही ? >>>> त्यांच्याविषयी जेव्हड बोलायला हवं त्यापेक्षा जरा जास्तच मागे बोलून झालेलं आहे.. त्यामुळे सध्या नविन काही नाही... Proud

स्पर्धेच वेळापत्रक आले की प्लीज कोणीतरी इथे चिकटवा.
सुमंगल, आमच्याकडे पण स्टेफी गेली आणि मग जास्त पाहिलच नाही कोणी वूमन्स टेनिस.

यावेळेस डेल पोत्रो धुमाकूळ घालणार आहे अस मला वाटतय.
इसनेर कुठल्या ग्रुप मधे आहे बघायला पाहिजे.
नादालचा फ्रेंच सोडल्यास क्ले वरचा परफोर्मन्स चांगला नव्हता. त्यामुळे विंबल्डनला यावर्षी तरी चान्स नाही. सॉरी.
फेडरर सेमी पर्यंत येणारच. पूढे मात्र त्या दिवसाचा फॉर्म. पूर्वी सारखा क्लिअर फेवरिट राहिला नाही. फेवरिट असला तरी.

मी सकाळीच विचार करत होतो.. त्रिविक्रम (आणि त्यांचे विनोद) दिसले नाहीत बर्‍याच दिवसांत टेनीस बाफवर.. आणि आज आलाच विनोद.. Proud

नादालचा फ्रेंच सोडल्यास क्ले वरचा परफोर्मन्स चांगला नव्हता. त्यामुळे विंबल्डनला यावर्षी तरी चान्स नाही. >>>> अहो पण विंबल्डन ग्रासवर असतं ना !

स्वाती.. विंबल्डनच्या वेबसाईट वर Schedule of the play ह्या विभागात प्रत्येक दिवसाचा अगदी नीट schedule दिलेलं असतं.. मी वर लिंक डकवतो...

पूनम.. आत्ता आलीस आणि आता एकदम फायनल झाल्यावर येणार का ? रेग्यूलरली येत जा.. Happy
तू आणि हिम्या मिळून त्या मयुरेशला धरून आणा.. गायब झालाय तो..

मलापण तो डेल पोट्रो चांगला वाटतो, पण तो भरोसेमंद नाहीये. आत्ता फ्रेन्च ओपनमध्ये त्याला जोकोने हरवले. खरंतर पहिला सेट पोट्रोने जिंकला होता आणि दुसरा जोकोने. उरलेली मॅच कशामुळेतरी दुसर्‍या दिवशी खेळली गेली. तर हा हिरो पाऊण एक तासात पुढचे दोन सेट ६-१ ६-२ असं हरून मोकळा झाला.

अचानक टेनिस बाफांवर एवढ्या मुली कशा काय यायला लागल्या? कोणी चांगला दिसणारा नवीन खेळाडू आलाय का? Wink

नादालचा फ्रेंच सोडल्यास क्ले वरचा परफोर्मन्स चांगला नव्हता. त्यामुळे विंबल्डनला यावर्षी तरी चान्स नाही. >>>> अहो पण विंबल्डन ग्रासवर असतं ना !>> क्ले वरचा सुद्धा. Happy

मरे क्विन्स क्लब जिंकून लक्ष वेधून घेतोय. पण अवसान घातकी आहे. ब्रिटीश लोकांना यावर्षी बरेच दिवस विंबल्डन बरे जाइल असे दिसतय. सेमी पर्यंत.

http://www.wimbledon.com/en_GB/index.html घ्या Happy

नदाल जिंकावा असं वाटत असलं तरी फेडीच फेव्ह आहे. Happy

स्टेफी ग्राफ खेळायची थांबल्यावर Women's tennis मधला इंटरेस्ट कमी होत गेला आणि विलीय्म्स् भगिनी आल्यापासून तो शून्य झाला ..>>> मग तू मेन्स टेनीस पहा Happy

मी पण आले Happy

किम दुर्दैवी Sad
माझा तो फेडी (सध्या तरी)

स्टेफीबाबत अनुमोदन. पण बेकर आणि आगासी गेल्यावर माझा पुरुषांमधलाही इंटरेस्ट संपला. Wink

>> पण बेकर आणि आगासी गेल्यावर माझा पुरुषांमधलाही इंटरेस्ट संपला.

हो, बेकर, एडबर्ग नंतर थोडाकाळ मी सँप्रस चे गेम्स बघितले पण मग नंतर काही कारणाने टेनिस बघणंच थांबलं ..

फेडरर ची उमेदीची (:p) सगळी वर्षं मी बघितलंच नाही टेनिस .. आता मात्र नादाल, ज्योको आणि खेळतोय तोपर्यंत फेडरर ला नक्की फॉलो करणार ..

फचिन, एवढ्या मुली जमण्याचं कारण ज्योको च असेल .. Happy

डुआय, मला किम क्लाईज्स्टर्स आवडते ..तिचे मागचे US Open आणि AUS Open बघितले मी ..

जिम कुरीयरचा खेळ तितकासा आवडायचा नाही. तो जिंकायचा, पण नशिब त्याच्या बाजूने आहे म्हणून जिंकतोय असंच वाटत आलं आहे. त्याच्यात लढाऊ वृत्ती गैरहजर होती.

एडबर्गच्या हातातली अंगठी मला भारीच आवडायची. आणि फ्रेंचप्लेट घालणारी जेनिफर कॅप्रियाती (आठवलं नाव). तिचं बघून आम्हीही मस्त फ्रेंचप्लेट घालून खेळायचो. खरंच सोईस्कर केशभुषा आहे ती.

आता मी असे विषय काढतेय पाहिल्यावर पग्या मला बदडेलच, पण पग्या, सॉरी! चर्चेसाठी हेही अत्यावश्यक विषय आहेत. Proud

क्वार्टरफायनलपासून पुढे एकही मॅच स्ट्रेट सेटमध्ये संपता कामा नये - हे माझं फार वर्षांपासूनचं स्वप्न आहे Wink प्रत्येक ग्रँडस्लॅमच्या बाबतीतच...

अचानक टेनिस बाफांवर एवढ्या मुली कशा काय यायला लागल्या? कोणी चांगला दिसणारा नवीन खेळाडू आलाय का? >>> Lol

व्हीनस हरली की!
(हे चांगलं झालं की वाईट हे ठरवता येत नाहीये)

मन्जू, मेरी पियर्स आठवते मला सागरवेणी म्हटलं की.

फचिनला एक तुक :प

नदाल! नम्र आणि गुणवान आणि लायक खेळाडू. कप त्याचाच आहे!

नदाल जिंकणार. फेडी संपल्यात जमा आहे. (कौन बोला मेरेकू टेनिसका समझता नही. पाच साल का था तबसे देखेला है विंबल्डन. स्टेफी जित्ती थी और हमरा खानदान का बोरिस बेडेकर उस साल),

एवढ्या मुली जमण्याचं कारण ज्योको च असेल ..>> काय हे ज्योक की काय Proud पीट कुठे आगासी कुठे अन् हे ध्यान कुठे Wink

मला किम क्लाईज्स्टर्स आवडते .>>> काय सांगतेस मलाही Happy

स्टेफी द ग्रेट! आणि हिंगीस! (होय गं मंजू होय. धन्स. स्पोर्टस्टार मधले फोटो अजून आहेत तिचे अन् अ‍ॅनाचे Happy )

मोनिका, मारिया, गॅब्रिएना, मेरी, अ‍ॅना आणि आपली सानिया ह्याही आवडायच्या

नदाल जिंकणार>>कप त्याचाच आहे>> ओ ते पुढच्या वर्षी बरंका Wink

टण्या, आता तुझं लक्ष तिथं असायला हवं यू नो लव - गेम!

Light 1

हिंगीस नै का आवडायची ड्वाया तुला? Wink

मेरी पियर्स... मला तिची आणि स्टेफिची फायनल आठवते. नंतर तिने जिद्दिने विंबल्डन जिंकून दाखवलीच.

पराग, साइट ब्लॉक आहेत त्यामुळे टाईमटेबल पहाता येत नाही. म्हणून मला टाईमटेबल हवे आहे.

मंजूतै... मेरी पियर्स तिच्या कारकिर्दीत एकदाही विम्बल्डनच्या फायनला गेलेली आठवत नाहीये.. आणि स्टेफी विरुद्ध पण एकदाही ग्रॅण्डस्लॅममध्ये फायनल खेळलेली नाहीये...

संदर्भासाठी हे वाचा http://en.wikipedia.org/wiki/Mary_Pierce

सॉरी सॉरी एकदमच सॉरी. अतिआत्मविश्वासात एकदम स्विंग खेळले. Happy
माझा याना नोवोत्ना आणि मेरी पियर्समधे गोंधळ झाला.

(आता लालूला माझंही नाव तिच्या यादीत घालायला हरकत नाही Wink )

जिम कुरीअर उलट प्रचंड जिद्दी होता असं माझं मत आहे. कमी गुणवान पण अफाट जिद्दी.

यावेळी सेरेना जर अंतिम फेरीत आली नाही तर एक रशिअन जिंकणार.

व्हीनस हरली की! >>>>> Uhoh कुठे ?? म्हणजे कुठल्या स्पर्धेत?? अजून विंबल्डनची मुख्य स्पर्धा सुरु व्हायची आहे हो पौ तै.. !!!

मेरी पियर्स... मला तिची आणि स्टेफिची फायनल आठवते. नंतर तिने जिद्दिने विंबल्डन जिंकून दाखवलीच. >>>>> पुन्हा Uhoh हिम्याने वर लिहिलच आहे... तुला मेरी पियर्स आणि स्टेफी ग्रॅफची मॅच हवी असेल तर ती फ्रेंच ओपन मधली सेमी फायनल होती... ज्यात मेरी ६-२ ६-२ जिंकली होती...

हां आणि तुम्ही ह्या सगळ्या विषयांवर बोलू शकता काही हरकत नाही.. त्यासाठी exclusive धागा आहे..
हे बघ.. http://www.maayboli.com/node/16852

आवरा !!! (इव्हेंटच्या आधी(च) हजार बाष्कळ पोस्टी टाकायला हा काही बारा-गटग बाफ नाहीये :फिदी:)

ड्रॉ जाहिर झाले होsssssssss

मानांकनानुसार खेळाडू आपापले सामने जिंकत गेल्यास उपांत्यपूर्व फेर्‍या अश्या होतील..

पुरूष एकेरी :
राफा वि बर्डिच
मरे वि रॉडिक
फेरर वि फेडरर
सोड्या वि जोको

महिला एकेरी :
वोझजियाकी वि शारापोव्हा
ना ली वि सेरेना
स्किव्होनी वि अझारेंका
क्विटोव्हा वि झ्वोनारेव्हा (ह्या भागात व्हिनस पण आहे)

Pages