निसर्गाच्या गप्पा - २

Submitted by साधना on 10 March, 2011 - 01:21

निसर्गमित्रांनो, इथे आपण आपले निसर्ग प्रकरण मागील पानावरुन पुढे चालु करुया.... Happy

आधीच्या गप्पा -
http://www.maayboli.com/node/21676

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुम्ही सगळे किती प्रेमाने आणी आपुलकीने झाडे, फुले, पाने, फळं, भाज्या,वेली, पक्षी, किडे, ह्या सगळ्या विषयी लिहिता. हा धागा फार inspiring आणी encouraging आहे.

पण माझ्या हातून नेहेमीच काही ही लावायला गेलं कि मरतं त्यामुळे मी खरं तर धास्तीच घेतलिये लहानपणा पासून. त्यामुळे घरात फक्त artificial plants आणी फुलांची आवडं असल्याने, ग्रोसरी मधून विकतची फुलं.

हा धागा वाचायला लागल्या पासून कालं एक गोष्टं अतिशय धीर करून केली ती म्हणजे सगळी artificial plants एका मैत्रिणीला देऊन टाकली. त्या शिवाय काही माझ्या कडून जिवंत झाडं आणली जायची नाहीत. खरं तर ती सगळी ट्रॅश मधेच टाकणार होते पण मैत्रिण म्हणाली कि मी घेऊन जाते.

आता हळू हळू एक एक करून रोपं आणायला सुरवात करीन आणी जगली तर इथे अपडेट्स देईन.

दिनेशदा,

१/२ प्रश्न मला पडलेत, एक म्हणजे कलिंगडासारखी उन्हाळी फळं कुठल्याही ऋतूत कशी काय यायला लागली आहेत? आणि साधारणपणे या फळांना वाळू, आणि वाहतं पाणी (किंवा पाण्याचा योग्य निचरा होणारी जमिन) लागते. तर ही फळं कुंडीत, पावसाळ्यात कशी यायला लागली आहेत? आजकाल इथे पुण्यात नोव्हें-डिसें पासून कैर्‍या दिसतात. असं का बरं होत असेल? हवामानातल्या बदलामुळे? की नवनवीन खतं आणि तंत्रज्ञान यांमुळे? (मला माझ्याकडे आत्ता कलिंगड लागलं याबद्दल दु:ख होत नाहीये) पण काहीतरी या झाडांचं, वेलींचं, वनस्पतींचं बिनसलंय असं वाटतंय. कारण यांचे फुलण्याचे, फळण्याचे हंगाम बदलू लागलेत.

तुम्हाला काय वाटतं? प्लीज सांगाल का?

शांकली, मार्केटींग !!
कलिंगडाची लागवड, रमझानचा महिना कधी येतोय त्यावर ठरते. त्यांचा उपवास कलिंगड खाऊन सोडायची प्रथा आहे. आणि ते आपल्यासारखेच चांद्रवर्ष मानत असले तरी, त्यांच्यात ऋतूमानाशी जूळवून घेण्यासाठी अधिक महिना नसतो. त्यामूळे दरवर्षी तो महिना दहा दिवस आधी येतो.

कैर्‍या आता वेगवेगळ्या राज्यातून येतात. महाराष्ट्रातील आंब्याचा सिझन आणि तिथला सिझन यात फरक आहे. तसा आंब्याचा आपल्याकडे सिझन असतो, तसा सगळीकडेच असतो असे नाही. इथे आफ्रिकेत वर्षातून दोनदा मोहोर येतो आणि आंबेही दोनदा येतात.

हे मला काहीच माहित नव्हतं (म्हणजे रमझानचा आणि कलिंगडाचा असा काही संबंध असतो हे) आणि निरनिराळ्या राज्यांतून त्या त्या हवामानानुसार फळं येणार आपल्याकडे विकायला येणार हा मी विचारच केला नव्हता.
धन्यवाद दिनेशदा.

छान,नविन माहिती मिळाली !
रमझानच्या महिन्यात शेतकर्‍यांना कलिंगडाला,लागवड कमी असल्यामुळे चांगला भाव मिळतो.बाकी
वेळी खुप लागवड होते त्यामुळे ३-५ रु किलो असा भाव असतो.
Happy

मी मिरचीचं बी लावलं दोनदा..

पण उगवत नाही. काय कारण असेल?

उंदिर खाण्याची शक्यता किती?

निकिता अग मिरचीच बी उगवायला कठीण नाही लगेच उगवत. सुकलेल्या मिरचीच बी काढून टाकल तरी उगवेल. तु कुठल टाकलस ? आणि कस टाकलस ?

सुकलेल्या मिरचीच टाकल. मिरची फोडुन. वर थोडी माती टाकली. दोन आठवड्यात दोनदा. पण नो लक Sad

माझं असं पहिल्यांदा होतय. नाहीतर गम्मत म्हणुन रोवलेलं लिंबाचं बी पण उगवुन मोठं रोप झालय. Sad
पण ह्यावेळी मुळा पण म्हणावा तसा आला नाही. खोड अगदी कमकुवत. इतक की चुकुन हात लागल की रोपं तुटत आहेत Sad

मला वाटतं उंदिर नाचुन जातोय. खुन करावासा राग येतो Sad

निकिता, पाण्याचा निचरा होत नसेल, किंवा गोगलगायी असतील. (त्या दिवसा लपून बसतात.)
जागू, कलिंगडाला खरे तर रेताड जमीन मानवते. चांगली व्हायला हवीत तूमच्याकडे ती.

पाण्याचा निचरा होत आहे.

गोगलगायींसारख छोटं काहितरी दिसतं. पण मला वाटतं ते कल्चर आहे. मोठ होतं नाही.

काल माझ्याकडे ७-८ ब्रम्हकमळे फुलली पण लक्षातच राहील नाही बघायची. सकाळी पाहील तर सगळी फुलुन गेली होती.

माझ्या अंगणात भरपुर कलिंगडाची रोप उगवलि आहेत. पण आता कलिंगड चांगले राहतील का वेलिंवर ?
>>>>>>>...जागू माझ्याही कुंडीत कलिंगडाची रोपं आली आहेत...
सध्या एक बुलबुलांचं कुटुंब दुपारी कलकल करत कढिलिंबाच्या फळांचा फडशा पाड्ताहेत. झाडाखालीही बरीच फळं पडतात.

गोव्याला माझ्या घरी कढीलिंबाचे झाड होते, त्यालाही भरपूर फळे लागायची. दिसायला आकर्षक होती म्हणून मी खाउनही बघितली, पण काहिच चव नव्हती. आणि वासही नव्हता.
पण मला वाटते त्या झाडाची पिल्ले मूळांपासूनच तयार होतात. (बियांपासून नाही), एक मोठे झाड असले कि आजूबाजूला भरपूर रोपे दिसतात. मोठ्या झाडाखाली छोटी झाडे जगत नाहीत, या नियमाला हे झाड अपवाद असावे.

आणि हा पिंजर्‍याआडचा पक्षीराज. फोटोत अनेक त्रुटी आहेत तरी इथे द्यायचा मोह आवरला नाही.

निकिता,
मिरचीचं बी खोलवर टाकु नका, मातीही बदलुन बघा,कोरड्या मातीत टाकून नंतर २-३ वेळा थोडं पाणी द्या.

दिनेशदा,
तस कढीपत्त्याचं झाड जवळपास नसतानाही त्याची लहान रोपे उगवुन आलेली पाहिल्याच आठवतयं,बीमधुनही ही रोप तयार होत असेल.
पण हे झाड कुठेही/कुठल्याही प्रकारच्या मातीत येत नसावं असा अंदाज आहे,काही ठिकाणी ही झाडं खुप जोमानं वाढलेली दिसतात.
Happy

दिनेशदा, माझ्याही कढीलिंबाला खूप फळे येतात. ती पिकून काळी पडतात. नंतर गळुन जातात. या फळांपासून रोपे येतात. सध्ध्या माझ्याकडे कंपोस्ट मधील बियांपासून आपोआप ४-५ रोपे उगवली आहेत.

कढीपत्ता आफ्रिकेत सुद्धा आहे. अमाप वाढतो, पण स्थानिक लोक खात नाहीत.
म्हणजे भारतीयांनीच आणला असणार इथे.

ओल्या नारळाबरोबर कढीपत्ता अवश्य वापरावा, त्याने कोलेष्ट्रोल वर नियंत्रण राहते असे वाचले होते.
मला लहानपणापासून भाजी आमटीतला कढीपत्ता खायची सवय आहे. काही काही लहान मूले तर वेचून वेचून कढीपत्ता, जिरे, मोहरी, कोथिंबीर सगळेच काढून टाकतात.. खातात काय कुणास ठाऊक ?

अश्विनी मग तुला चांगल कारण मिळाल दुसरी झाडे लावायला आता त्याच पिशव्यांमध्ये जांभूळाच्या बिया, आंब्याचे बाठे, पेरुच्या बिया, कढीलिंब आणि भरपुर झाडे आहेत लावण्यासारखी ती लाव.

कढीलिंबाची चर्चा वाचुन सुमंगलला खुप आनंद होईल. तिला ते झाड खुप आवडत.

मी पाहील्या आहेत कढीपत्त्याला बिया. माझ्याकडचा कडीपत्याला बाजुला रोपे फुटतात भरपुर त्यामुळे मुळ झाड उंच होत नाही.

माझ्याकडेसुद्धा ५ ब्रम्हकमळाची (निवडुंगाची ! :)) फुली आज ऊमलतील. किती छान दिसतात ना ती फुले?

काही काही लहान मूले तर वेचून वेचून कढीपत्ता, जिरे, मोहरी, कोथिंबीर सगळेच काढून टाकतात.. खातात काय कुणास ठाऊक ?>>>>>>>>>>>>>> अगदी अगदी १०००००% अनुमोदन!

अहो ह्या सर्व जिनसांना 'काय पालापाचोळा' घातलाय असं म्हणून वैतागून काढून टाकतात, अगदी कोथिंबीर सुद्धा! काय खावं तेही कळत नाही. शेवग्याच्या शेंगा घालून आमटी, पिठलं काही केलं की मुलींच्या कपाळावर आठ्याच असतात. काय पण ना हल्लीची मुलं!

ब्रह्मकमळाची (निवडुंगाची) फुलं फारच सुंदर दिसतात. आणि सुगंध किती छान असतो!

Pages