Submitted by साधना on 10 March, 2011 - 01:21
निसर्गमित्रांनो, इथे आपण आपले निसर्ग प्रकरण मागील पानावरुन पुढे चालु करुया....
आधीच्या गप्पा -
http://www.maayboli.com/node/21676
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
साधना,शुगोल गांडुळाची छान
साधना,शुगोल

गांडुळाची छान (महती) माहिती दिल्याबद्दल धन्स !
साधना,
सांगायच राहुन गेलं, त्या दिवशी मुंबईला आलोच नाही.
दिनेशदा,

फोटो खुप आवडले.
तो इतका सुंदर गुलाब खरा असेल ? मला तर तो कागदी असावा अस वाटतय
नैरोबीतले झाड मस्त दिनेशदा...
नैरोबीतले झाड मस्त दिनेशदा... या निमित्ताने १०० वी पोस्ट टाकली>>>>डॉ.कैलास गायकवाड
आणि या बरोबरच या धाग्यावरील पोस्ट क्र.१००० संपन्न होत आहे.>>>>शायर हटेला
सर्व निसर्ग मित्रांचे १००० पोस्टबद्दल अभिनंदन!!!
उजू, फुले किती सुंदर आहेत ग?
दिनेशदा, मस्त फोटो. खूप दिवसानी इंद्रधनुष्य पाहिलं. धन्यवाद.
आज पहिल्यांदाच त्रिफळा म्हणजे
आज पहिल्यांदाच त्रिफळा म्हणजे ३ वेगवेगळी फळे आहेत, हे समजलं,त्यांच महत्वही कळालं.पुर्वी वाटायचं कि त्रिफळा नावाची एकच वनस्पती असते,त्याबद्दल कुतुहल तर होतच.
हिरडा आणि बेहडा या वनस्पती म्हणजे मानवाला मिळालेली निसर्गाची देणगीच म्हंटली पाहिजे.
(पण हे मला किती उशीरा कळालं!:रागः) याची झाडे खुप दुर्मिळ आहेत अस दिसतं,सहसा बघायला मिळाले नाहीत.
झाडाचे फोटो गुगलुन काही मोजकेच फोटो दिसले, पण आता प्रत्यक्ष झाड पहायच आहे.
यातला फक्त आवळा तेवढा पाहिला आहे.
दिनेशदा, याबद्दल काही लेख असतील तर कृपया तुम्ही लिंक द्या.

साधना,
आजच्या दिवशीची ही माझी पहिलीच पोष्ट आणि बहुतेक १००१ वी !
कुठेतरी असा मान मिळाला (कि घेतला ?) तरी आनंद होतोच ना !
दिनेशदा, गुलाबाचे फूल, आणि
दिनेशदा, गुलाबाचे फूल, आणि इतर फोटो अतिशय सुंदर!
मला पहीला तिरफला आणि त्रिफळा
मला पहीला तिरफला आणि त्रिफळा मध्ये गोंधळ व्हायचा. पण काही वर्षांपुर्वी हे वेगवेगळ आहे हे समजल.
अनिल हा हिरड्याचा झाडाचा
अनिल हा हिरड्याचा झाडाचा फोटो
आणि हि त्याची फळ
ह्यात काही भाज्यांचेही फोटो
ह्यात काही भाज्यांचेही फोटो आहेत.
http://www.maayboli.com/node/26609
गो ग्रिन
गो ग्रिन नर्सरी
http://www.maayboli.com/node/26612
जागू, निकिता, हे
जागू, निकिता, हे तुमच्यासाठी--- घरगुती कंपोस्ट
१. झाडं विकत आणली की त्याच्या बरोबर प्लास्टीक चे कंटेनर येतात. तसे ५ गॅलन चे, साधारण आपल्या बादली एवढे, कमीत कमी २ कंटेनर घेणे. त्याला तळाला ५ मोठी भोकं असतातच. बादली किंवा प्लॅस्टीकचा डबा काहीही चालेल. त्याला भोकं पाडून घ्यावीत. हे कंटेनर एखाद्या प्लास्टीकच्या पसरट थाळी/प्लेट मधे ठेवावे. हा कंटेनर संपूर्ण बंद होईल अशा झाकणाची पण आवश्यकता आहे. हे झाकण जर हलके असेल तर त्यावर वजनासाठी दगड वगैरे ठेवावा लागेल.
२. सर्वात खाली मातीचा, भोकं झाकली जातील एवढाच, थर घालावा. त्यावर किचन मधल्या ओल्या कचर्याचा थर, दिवसातून एकदाच, घालावा. ह्यावर मूठ - दोन मूठ माती भुरभुरावी. झाकण लावावे. दर ३ ते ४ दिवसांनी हे वरखाली करावे/ढवळावे. खालच्या ताटलीत ह्यातले पाणी जमा होईल, ते परत ह्यातच टाकावे किंवा झाडांना घालावे. झाडांना घालताना थोडे डायल्यूट करुन घालावे. असे करत हा डबा भरला की झाकण लावून ठेवावा.
३. आता दुसरा कंटेनर वरील प्रमाणे तयार करुन ओला कचरा त्यात टाकायला सुरवात करावी.
४. सुमारे ३-४ आठवड्यात पहील्या डब्यात कंपोस्ट तयार झालेले असेल.
ओल्या कचर्यासंबंधी थोडेसे: मी या कचर्याचे बारीक तुकडे करते. पालेभाज्यांच्या काड्यांचे कात्रीनी तुकडे करुन , कलींगड, खरबूज वगैरे च्या साली कापून, तुकडे करुन. थोडक्यात, १ इंचाहून मोठा तुकडा नसावा. लहान तुकड्यांमुळे कंपोस्टींगची क्रिया लवकर होते.
मी यात खरकटं, आंबलेलं वगैरे अन्नं टाकत नाही. तसेच शाकाहारी असल्यामुळे बोन्स, माशाचे काटे वगैरेचा प्रश्न नाही. लिंबाची साले मोठ्या प्रमाणात नको. कांद्याची साले नको (ही लवकर डीकंपोझ होत नाहीत म्हणून) अंड्याची टरफले कुस्करुन टाकावीत. शेंगांची टरफलं ब्लेंडर मधुन जेवढी बारीक करता येतील तेवढी करुन मग टाकते. देवांचं निर्माल्य अर्थातच.
या मधे मी सहसा बागेतला इतर कचरा टाकत नाही. झाडांना खत द्यायचं म्हणजे काय तर त्यांना nutritional boost द्यायचा. तेव्हा आपण खातो त्या संदर्भा पुरतंच मर्यादीत ठेवते. (हो !आपलीच कामं किती वाढवायची ? या उसगावात नको इतकं स्वावलंबन आहे. )
यावर थेट पाऊस पडणार नाही याची काळजी घ्यावी. थेट ऊन पडलं तर हरकत नाही, मात्र आतलं कल्चर कायम किंचीत ओलसर असू द्यावे.
गेली दोन वर्षे मी या गावठी पद्धतीनी कंपोस्ट बनवतेय.
काही शंका असल्यास जरुर विचारा.
तुमच्या कंपोस्ट प्रकल्पाला शुभेच्छा !
जागू, तुझ्या युसुफ मेहेर अली
जागू,
तुझ्या युसुफ मेहेर अली सेंटर वरच्या चारही पोष्टी, सगळे फोटो खूप आवडले.
शुगोल छान माहीती दिलीस. आता
शुगोल छान माहीती दिलीस. आता दोन्हीही खत करुन बघेन.
शुगोल मस्त माहिती.. अनिल
शुगोल मस्त माहिती..
अनिल
.
.
विकेंडला बाभळीच्या बिया टाकून
विकेंडला बाभळीच्या बिया टाकून दुधाच्या पिशवीत रोपं तयार करायला लावायचीत. माती, गांडुळखत असणारच आहे, परंतु व्यवस्थित रोपं येण्यासाठी अजून काय करु? १५ दिवसांत रुजून यावीत अशी अपेक्षा आहे. १ फुटाचं झाल्यावर वृक्षारोपणासाठी द्यायचीत.
प्लिज अजून काय काळजी घेऊ ते सांगा. गेल्यावर्षी करंज्याच्या बिया लावल्या पण अज्जिबात रुजुन आल्या नव्हत्या.
तसेच "टणटणी" म्हणजे काय. त्याच्या काड्या लावायच्या असतात असं कळलंय. काड्या कुठुन मिळवायच्या?
शुगोल, परत एकदा मस्त
शुगोल, परत एकदा मस्त माहिती.
अनिल, हिरड्याच्या झाडावरचा माझा लेख असेल जून्या मायबोलीवर.
अश्विनी, बाभळीच्या बिया किडक्या नसतील तर हमखास उगवतील. काही खास काळजी नको.
टणटणी म्हणजे घाणेरी. तिचा आधीच नको तितका प्रसार झालाय, आणखी लागवड नको.
अश्विनी नुसत रोप उगवायला एवढे
अश्विनी नुसत रोप उगवायला एवढे बास ग. खत जास्त नको. कारण नविन रोपट्याला जास्त खत सहन होत नाही कधी कधी. पण बाभळी तशी कणखर असते.
जांभुळ, आंब्याच्या पण लाव ना बिया. मस्त मोठ झाड होत आणि पक्षांना तसेच माणसांनाही फळे मिळतात.
वृक्षारोपणासाठी फळझाडेही पाहा
वृक्षारोपणासाठी फळझाडेही पाहा हो....
अश्वे, आपण कडधान्याला कसे मोड आणतो तसे मोड आणायचा प्रयत्न कर आणि त्या मोड आलेल्या बीया मोड खाली जाईल असे पाहुन पिशवीत ठेऊन त्यावर अर्धा इंच माती पसर. १००% रिझल्ट मिळेल.
बीया लावताना मातीत जास्त खोल पेरल्या तर येणा-या पहिल्या पानांना वरची माती बाजुला सारुन डोके वर काढता येणार नाही ना.. म्हणुन मोठ्या बीया पेरल्यावर त्यांच्यावर साधारण अर्धा इंचभर माती पसरावी, त्यापेक्शा जास्त पसरु नये.
अर्थात हे प्रमाण तसे बीच्या आकारावरही आहे. जेवढे बी लहान (जसे मोहरी किंवा कॉसमॉस, पिटुनियासारखी फुले) तेवढे ते वरच्या मातीच्या थराजवळ असावे.
धन्यवाद साधना, तसंच
धन्यवाद
साधना, तसंच करेन.
जागू, जांभूळ्/आंब्याची भरपूर रोपं जमतात गं पण बाभळी वगैरे नसतात. जंगल भागात लावायचीत.
दिनेशदा, टणटणी म्हणजेच घाणेरी हे माहितच नव्हतं. आमच्या ग्रामविकास प्रोजेक्टमध्ये जो "परसबाग" उपक्रम चालू आहे तिथे जनावरं घुसून परसबागेची वाट लावतायत. त्यांना तिथे यावंसं वाटू नये म्हणून टणटणी लावायचीय. खेडोपाडी प्रोजेक्ट देऊन टाकताना जनावरांपासून संरक्षण ह्याबद्दलही उपाय सांगता आले पाहिजेत ना?
पण, बी रुजवायला गांडुळखत
पण, बी रुजवायला गांडुळखत चालेल का ? नुसतीच माती आणि पाणी पुरेसे आहे. रोप तयार झाल्यावर खत घालावे असे मला वाटते.
ती गांडुळ 'बिया' खाउन टाकु शकतात.
अश्विनी, त्यासाठी बोगनवेल
अश्विनी, त्यासाठी बोगनवेल वापरु शकलीस तर उत्तम. घाणेरी न लावलेलीच बरी. [दिनेश, कारणे सवीस्तर लिहीणार का ?
]
बोगनवेलाला काटे असतात, त्यामु ळे जनावरे फिरकत नाहीत. कमी पाण्यावर जगणारी वेल आहे, व्यवस्थीत कटींग केले की दाट कुंपण तयार होते आणि २-३ रंग एकत्र लावले तर देखणे पण दिसते.
याची पण काडी लावलेली चालते.
अश्विनी, कुंपणासाठी (बकर्या
अश्विनी, कुंपणासाठी (बकर्या / माकडांपासून संरक्षण) सिताफळाचा उपयोग होऊ शकतो. बकर्या कण्हेरी पण खाणार नाहीत. टणटणीची फळे मात्र त्या खातात. निवडुंगाचा पण पर्याय आहे. मेंदी, कडूपाने पण लावता येईल. यांना नीट कापून आकार देता येतो.
बाभळी प्रामुख्याने मोकळ्या भागात वाढतील. जंगलात फारश्या दिसत नाहीत. जंगलात लावायला कौशी, कुंभा, चारोळी, हादगा हेही पर्याय आहे
सर्व निसर्गप्रेमींसाठी आणि
सर्व निसर्गप्रेमींसाठी आणि आयफोन मालकांकरता: एक नवीन (माझ्याकरता) अॅप आहे जी डाऊनलोड केल्यास एखाद्या झाडाचं पान जर आयफोनसमोर धरलंत तर ते स्कॅन केलं जाऊन झाडाचे/पानाचे डिटेल्स लगेचच कळतात.
अश्विनी, बिया रुजायला खत
अश्विनी, बिया रुजायला खत नको. माती च बरी. माती कायम ओलसर असायला पाहिजे. बिलकूल कोरडी होता कामा नये. तसंच थोडीशी ऊबदार आणि अंधारी जागा बी रुजायला फार मदत करते. एकदा का कोंभ फुटून वर आला का मग ती रोपे प्रकाशात, पण थेट ऊन्हात नाही, आणून ठेवावी. मॉडरेट पाणी द्यावं.
आरती, अगं गांडुळखतात गांडुळं
आरती, अगं गांडुळखतात गांडुळं नसतात. ते खत गांडुळांनी तयार केलेलं असलं तरी पिटातून बाहेर काढलेल्या चहापावडरीसारख्या सुक्या दिसणार्या खतात गांडुळं नसतात. माती मध्ये समप्रमाणात गांडुळ खत किंवा शेण खत मिसळायचा विचार आहे. माझ्याकडे ४ बिया आहेत. दोन साठी खत मिसळेन आणि २ साठी नुसती माती.
दिनेशदा, माळरानाची जंगलं करता आली तर खूप छान होईल ना?
बाभळी लावण्यामागे अजूनही काही अभ्यासून धरलेले हेतू आहेत बहुतेक. इथे शहरात बसून जेवढं करता येईल तेवढं आपण करायचं.
बाकीचे तुम्ही सगळ्यांनी सुचवलेले पर्याय देखिल प्रोजेक्टवाल्यांकडे मांडेन. सर्वांचे खूप आभार
त्यांना तिथे यावंसं वाटू नये
त्यांना तिथे यावंसं वाटू नये म्हणून टणटणी लावायचीय. खेडोपाडी प्रोजेक्ट देऊन टाकताना जनावरांपासून संरक्षण ह्याबद्दलही उपाय सांगता आले पाहिजेत ना?

सागरगोट्याचे कुंपण सगळ्यात बेस्ट. आणि हा ऋतू सागरगोट्याची झाडे लावायला एकदम उपयुक्त.
इथे पाहा - http://sundayfarmer.wordpress.com/2010/10/08/hedge-miracle/
इथे चांगली माहिती आहे. ह्या ब्लोगवर उंदरांपासुन शेत वाचवण्याचेही उपाय आहेत (एक उपाय दिनेशनी सांगितला आहेच - ट्युबलाईट्सचा
)
माळरानाची जंगलं करता आली तर
माळरानाची जंगलं करता आली तर खूप छान होईल ना?
उंदीरमारी उर्फ ग्लिरीसिडिया या कामी खुप छान आहे असे मी वाचलेय, प्रत्यक्ष अनुभव मात्र नाही. पण ग्लिरीसिडिया बक-या खातात, त्यामुळे ती काळजी घ्यावी लागते.
अश्विनी अग जनावरांपासुन
अश्विनी अग जनावरांपासुन संरक्षणासाठी कितीतरी झाडे आहेत. जशी जंगली भेंडी, पारिंगा, खरवत, आईन अशी मोठी झाडे तर रंगणारी मेहेंदी, कडू मेहेंदी अशी झुडपे.
सर्व निसर्गप्रेमींसाठी आणि
सर्व निसर्गप्रेमींसाठी आणि आयफोन मालकांकरता: एक नवीन (माझ्याकरता) अॅप आहे जी डाऊनलोड केल्यास एखाद्या झाडाचं पान जर आयफोनसमोर धरलंत तर ते स्कॅन केलं जाऊन झाडाचे/पानाचे डिटेल्स लगेचच कळतात.>>>>>धन्स सायो,
मस्त माहिती. माझ्यासाठीही नविनच :-).
सायो नाव काय त्या अॅप चे ?
सायो नाव काय त्या अॅप चे ? असे अॅप आले हे आश्चर्यच आहे.
http://lifehacker.com/5800648
http://lifehacker.com/5800648/leafsnap-is-an-electronic-field-guide-for-...
दिनेश, ही लिंक.
Pages