वर्षाविहार २०११ - फार्म लाईफ !!!

Submitted by ववि_संयोजक on 22 June, 2011 - 03:50

नावनोंदणीची अंतिम तारीख वाढवुन १६ जुलै २०११ केली आहे.

मायबोली घेउन येत आहे आमच्या अनेक उपक्रमांपैकी एक ज्याची समस्त मायबोलीकर अत्यंत अतुरतेने वाट पाहतात असा नाविन्यपूर्ण, लज्जतदार, खुमासदार, हवाहवासा वाटणारा तो 'वर्षा विहार'.
अर्थात आपल्या सर्व आवड्त्या नावड्त्या... पाहीलेल्या...न पाहीलेल्या...ख-या आणि अर्थातच कदाचित ड्यु आयडी मायबोलीकरांना प्रत्यक्ष याची देही याची डोळा भेटण्याची पर्वणीच!!!! यंदाचा हा मैत्रीचा सोहळा संपन्न होणार आहे २४ जुलै २०११ या दिवशी कर्जत-चौक फाट्यापासुन साधारण ३०-३२ कि.मी. अंतरावर असलेल्या "फार्म लाईफ होलिडेज" इथे.

************

ऐका हो ऐकाsssssssssssssssss...
ए मग्गन भाउ, ए छग्गन भाउ...
ओ सामलोss रे दामलोss......
ओ ऐका हो ऐकाssss....
ओ रघोब्बा, ओ धोंडीबा
ओ कर्नल सिंगं, ओ जर्नल सिंगं
ओ तुम्हीही ऐकाssss....

ऐका हो ऐकाsssssssssss............
पैशाला दोन खारकाsssssssssssssss ! (क्काय ? Uhoh काय म्हणलात...? तो शब्द वेगळा आहे? खारकांच्या ऐवजी काही तरी वेगळं आहे? कानफटात खायचीय का राव? मायबोलीकर हाणतील धरून मलाबी आन तुमालाबी.)

तर काय सांगत हुतो.....

तात्या, नाना, मामा, काका, भावांनो आन समद्या काकवानो, ताया-बायांनो ध्यान दिवुन ऐका ! पुन्यांदा दवंडी हुनार न्हाय, कुनालाबी चानस भेटनार नाय. लक्ष असु द्या हिकडं...., आमी समदे चाललुया तकडं...

तकडं म्हंजी कुटं...?

तर पावसात भिजाया! दोस्तास्नी आन मैतरणींस्नी भेटाया. हिरव्यागार रानात, पावसाच्या गाण्यात, थेंबाचं संगीत हाय, गारांचा नाच हाय. थोडीशी थंडी हाय, कुणासाठी गुलाबी तं कुणासाठी शराबी. कर्जतच्या पल्याड, चौकच्या अल्याड डोंगराच्या कुशीत मस्त निसर्ग हाय. समद्या मायबोलीकरांना पिरमाचं आवातणं हाय ! चला बिगी-बिगी पिवश्या भरा, तहान लाडू - भुक लाडू घ्या आन निघा. आवं ततं पोचुपत्तुर कायबाय फायजे ना पोटाला. येकडाव ततं पोचलो की हायेच की शिरा-पूरी........!

तर मंडळी....
मायबोली घेउन येत आहे आमच्या अनेक उपक्रमांपैकी एक ज्याची समस्त मायबोलीकर अत्यंत अतुरतेने वाट पाहतात असा नाविन्यपूर्ण, लज्जतदार, खुमासदार, हवाहवासा वाटणारा तो 'वर्षा विहार'.

एक असा उपक्रम ज्यात मायबोलीवरचे सभासदच नव्हेत तर त्यांचे कुटुंबीयही सहभागी होऊ शकतात. मायबोलीवरचं लेखन, इतर अनेक उपक्रम, इथे चालणार्‍या गप्पा, चर्चा, चेष्टा-मस्करी (आणि क्वचित काही तात्विक मतभेद सुध्दा ) याबद्दल समस्त मायबोलीकरांचे कुटुंबीय रोज काही ना काही ऐकतच असतात. त्या गप्पा, ती धमाल त्यांना प्रत्यक्ष अनुभवायला मिळते ती वर्षाविहारादिवशी. वविदिवशी नवीन भेटीगाठी होतात, ओळखी होतात, आधीच्या ओळखींचं मैत्रीत रुपांतर होतं, मैत्रीचे नवीन धागेही विणले जातात.
अर्थात आपल्या सर्व आवड्त्या नावड्त्या... पाहीलेल्या...न पाहीलेल्या...ख-या आणि अर्थातच कदाचित ड्यु आयडी मायबोलीकरांना प्रत्यक्ष याची देही याची डोळा भेटण्याची पर्वणीच!!!! यंदाचा हा मैत्रीचा सोहळा संपन्न होणार आहे २४ जुलै २०११ या दिवशी कर्जत-चौक फाट्यापासुन साधारण ३०-३२ कि.मी. अंतरावर असलेल्या "फार्म लाईफ होलिडेज" इथे. तर मंडळी, तो दिवस साजरा करण्याची पूर्वतयारी म्हणून काही गोष्टी नियमानुसार आणि ठराविक दिवशी करणं गरजेचं आहे.

त्यापैकी पहिली गोष्ट म्हणजे वविला येणार्‍यांची नावनोंदणी. वविला registered मायबोलीकर आणि त्यांचे कुटुंबिय (पति/पत्नी/मुले) येऊ शकतात. इच्छुक मायबोलीकरांनी त्यासाठी vavi@maayboli.com या पत्त्यावर ई-मेल करायची आहे.

नावनोंदणी करताना सभासदांनी खालील गोष्टींची माहिती देणे आवश्यक आहे. ईमेल च्यासब्जेक्ट मध्ये ववि२०११ नोंदणी' असे नमुद करण्यास विसर नका.

१. नाव
२. मायबोलीचा user id
३. संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक (भ्रमणध्वनी क्रमांक दिल्यास उत्तम)
४. कुठल्या शहरातून येणार (मुंब‌ई, पुणे इ.)
५. आपला नेहमी वापरात असलेला email id
६. सहभागी होणार्‍या एकूण व्यक्तींची संख्या (प्रौढ/ मुले).
७. लहान मुले (६ ते १० किंवा ३ ते ५ वयोगट) असल्यास त्यांचे वय
८. मायबोली गृपबरोबर बसने येणार की स्वतंत्र येणार?
९. पैसे कसे भरणार? प्रत्यक्ष की ऑनला‌ईन?

नावनोंदणीची अंतिम तारीख आहे १६ जुलै २०११.
एकूण इच्छुकांच्या संख्येनुसार बसभाडे ठरवण्यास मदत होते. त्यामुळे लवकरात लवकर आपली नावनोंदणी करा. नावनोंदणीचे काम पूर्ण झाले की पुढचे महत्त्वाचे काम म्हणजे पैसे जमा करणे.

वर्षाविहार-२०११ साठी वर्गणी आहे :

पुणेकरांसाठी :
प्रौढ : रु. ६२५ प्रत्येकी. (रिसॉर्ट : रु. ३५०, बस : रु. २२५, सा.स. : रु. ५०)

मुंबईकरांसाठी :
प्रौढ : रु. ६०० प्रत्येकी. (रिसॉर्ट : रु. ३५०, बस : रु. २००, सा.स. : रु. ५०)
(फक्त बस खर्चामुळे वर्गणी रक्कम वेगवेगळी आहे.)

मुले (वय ६ ते १० वर्षे) : रु. ३५० प्रत्येकी.
५ वर्षांपर्यंतच्या मुलांना काहीही शुल्क नाही.
पुणे आणि मुंबई इथे १७ जुलै २०११ या एकाच दिवशी वविचे पैसे जमा केले जातील.

पुणे - स्थळ: बालगंधर्व नाट्यगृहाच्या तिकीटखिडकीशेजारील कट्टा. वेळ: १७ जुलै २०११, सं. ५.३० ते ८.००
मुंबई - स्थळ: शिवाजी पार्क, उद्यान गणेश मंदिराच्या प्रांगणात. वेळ: १७ जुलै २०११, सं. ५.३० ते ८.००
समजा पैसे भरून जर आयत्यावेळी काही कारणाने वविला येणं रद्द केलं तर बसचे भाडे वजा करून उरलेले पैसे परत करण्यात येतील.

स्वतंत्र येणार्‍यांनी बसभाडे देण्याची अर्थातच गरज नाही.
या पैकी कोठे तुम्हाला पोहोचणे शक्य नसेल तर तुमच्या संपर्कातल्या माबोकरांमार्फत पैसे संयोजकांपर्यंत पोचवा.
ऑनला‌ईन पैसे भरणार्‍यांना ज्या अका‌ऊंटमध्ये पैसे भरायचे आहेत त्याची सर्व माहिती ईमेलने कळविली जाईल.
मुंब‌ई आणि पुणे सोडुन इतर ठिकाणच्या तसेच भारताबाहेरील कोणालाही वर्षाविहारास येणे शक्य असेल तर त्यांनी जरूर यावे.

वर्षाविहार-२०११ संयोजन समिती :

पुणे -

मल्लीनाथ (MallinathK) फोन : ९९६०३६६५६६
राम चिंचलीकर(राम) फोन : ९८५०८८५४२५

मुंबई -

आनंद चव्हाण (आनंदमैत्री) फोन : ९७६९४५४४२९
आनंद केळकर (आनंद्_सुजू) फोन : ९८२०००९८२२
संदिप खांबेटे(घारुआण्णा) फोन : ९८१९९९३६३४

http://www.farmlifeholidays.com या दुव्यावर रिसॉर्टची अधिक माहिती मिळू शकेल. आपल्याला काही शंका असल्यास आपण इथे मेसेज टाकू शकता अथवा vavi@maayboli.com या ई-मेल आयडीवर संपर्क करु शकता.
गेल्या वर्षी यू. के.’ज्‌ रिसॉर्ट इथे पार पडलेल्या ववि-२०१० ला मायबोलीकर आणि त्यांचे कुटुंबीय यांची विक्रमी उपस्थिती होती. तो विक्रम यंदा मोडला जावा अशी सर्वांचीच इच्छा आहे.

वविची रुपरेषा साधारण अशी असेल......

सकाळी ९.३० वाजेपर्यंत पुणे व मुंबईच्या बसेस रिसॉर्टवर पोहोचतील
सकाळी ९.३० ते १०.०० न्याहारी करुया
१०.०० ते १०.३० स्विमिंगपूलात / नदीत/ओढ्यात उतरण्यासाठीचे चेंजिंग
१०.३० ते १२.३० स्विमिंग पूल ,नदीत/ ओढा व इतर उपलब्ध धबधबा डान्स Proud Proud : मधे धम्माल मस्ती
१२.३० ते १.०० परत चेंजिंग
१.०० ते २.०० जेवण
२.३०-४.३० मनोरंजन
५.०० वाजता न्याहारी
५.३० वाजता जड अंत:करणाने आपापल्या शहरात नेणार्‍या बस मधून प्रयाण.

तेव्हा, भेटू या, आपल्या वविला!
बस रुटची माहिती इथेच प्रकाशीत केली जाईल. नोंदणी केलेल्या सर्वांनी कृपया आपला थांबा आणि बरोबर येणार्‍या मंडळींची नाव इमेल करुन कळवावी, ही माहिती वहातूक कंत्राटदाराला परवान्यासाठी लागणार आहे.

सुचना: रिसॉर्ट मधे पाण्यात उतरताना पोहोण्याचा पोषाख असणे आवश्यक आहे. (महिलांसाठी: पोहोण्याचा पोषाख नसल्यास टेरिकॉट्/नायलॉन मटेरिअलचे लेगिंग्ज आणि टि शर्ट चालतील) पाण्यात उतरताना शक्यतो कॉटनचे कपडे/ जीन्स वगैरे गोष्टी टाळाव्यात)

धन्यवाद.
वविसंयोजक.

अरे वा! ठिकाण ठरलं का?
पूण्यापासून किती किमी वर आहे? पोचायला किती वेळ लागेल?

>>>२४ जुलै २०११ या दिवशी कर्जत-चौक फाट्यापासुन साधारण ३०-३२ कि.मी. अंतरावर असलेल्या "फार्म लाईफ होलिडेज"

हम ॐगा. Happy

पुण्याहून साधारण १२० किमी होते आहे.. म्हणजे ३:३० तास नक्की... यंदाही प्रयत्न करावा म्हणतोय यायचा..

ईमेल च्यासब्जेक्ट मध्ये 'टि-शर्ट/कॅप नोंदणी' असे नमुद करण्यास विसर नका.>>>>संयोजक, ते "टि-शर्ट/कॅप नोंदणी" च्या ऐवजी योग्य तो बदल कराल का?

>>> गेल्या वर्षी यू. के.’ज्‌ रिसॉर्ट इथे पार पडलेल्या ववि-२००१० ला मायबोलीकर आणि त्यांचे कुटुंबीय <<<
यातिल जादाचे शून्य वजा करा बघू चट्टकिनी! Happy
माझे काहीच नक्की नाही, ऐनवेळेस येऊन टपकलो तर आत घेणार का?

लिंब्या बदल केलेला आहे.
आपला उत्साह पाहुन आनंद वाटला ऎन वेळी आल्यास हरकत नाही फक्त ठरलेल्या वेळेत पोहोचा म्हंजे हेड्काऊंट नीट करता येईल. जमल्यास निघताना संयोजकांशी संपर्क जरुर करावा.

आयला,
ह्या वेळेला पण मिसणार. Sad
नेमका २९ जुलै ला मी पुण्यात येतोय. एका आठवड्याने चूका-मूक.
आता पाहू पुढच्या वर्षी.
यंजाय माडी...

मोनाली
हा गेल्या वर्षीचा रुट आहे.... यावर्षी वेळा बदलू शकतात... पण रुट बहुतेक तोच असेल...

१) बस बोरिवली नॅशनल पार्कहून सुटेल वेळ ५.४५ am
२) जोगेश्वरी हायवे (जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड कॉर्नर) - ६.२० am
३) दीनदयाळ नगर मुलूंड (पुर्व) ६.२५ am
४) ऐरोली ब्रिज ७.१० am
५) ऐरोली सेक्टर ५: ७.१५ am
६) वाशी ७.३० am
७) कळंबोली मॅकडोनल्ड (एक्स्प्रेस हायवेचा स्टार्ट) ८.०० am

संयोजक, धन्यवाद, (यावे असे मनात तर आहे पण यन्दा सगळेच कठीण होऊन बसले आहे, तरी १५/१६ तारखे पर्यन्त चित्र स्पष्ट होईल व तसे नक्कीच कळवीन)
बर, मागे मला कोणतरी म्हणाले होते की छोटे कासव मुम्बईमधे मिळते दोन अडिचशे रुपयापर्यन्त, कोण म्हणले होते अन वविला आणून द्यायची तयारी दाखवली होती तेच मला आठवत नाहीये. जर यायचे नक्की झाले तर मुम्बईहून कासवाचे येण्याचे नक्की करावे ही विनन्ती! Proud Happy

हा गेल्या वर्षीचा रुट आहे.... यावर्षी वेळा बदलू शकतात... पण रुट बहुतेक तोच असेल...

१) बस बोरिवली नॅशनल पार्कहून सुटेल वेळ ५.४५ am
२) जोगेश्वरी हायवे (जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड कॉर्नर) - ६.२० am
३) दीनदयाळ नगर मुलूंड (पुर्व) ६.२५ am
४) ऐरोली ब्रिज ७.१० am
५) ऐरोली सेक्टर ५: ७.१५ am
६) वाशी ७.३० am
७) कळंबोली मॅकडोनल्ड (एक्स्प्रेस हायवेचा स्टार्ट) ८.०० am>>>>>

मन्जे गेल्या वरशी सारखे मालक बस मधुन आर्दे बाहेर येत ओरडून आवाज देत असनार तर... Wink

.

Pages