आपले सण, एक तंत्र आणि मंत्र.

Submitted by सत्यजित on 17 June, 2011 - 02:47

गेले काही दिवस बर्‍याच ठिकाणी, आपल्या संस्कृतीला लोक नाव ठेवताना दिसली. धर्मावरुन वाद विवाद वाचले. वट सावित्री कसा बुरसटलेला सण आहे हे वाचले. कीव आली आजच्या सो कॉल्ड "आधुनिक विचार सरणीची".

ते सात जन्म आणि यम या पलिकडे आपण जात नाही, ग्लोबल वॉर्मींग बद्दल चर्चा हिरीरीने करतो. मग मॅरेथॉन काय, अर्थ डे, ग्रीन डे काय? हे डे साजरे करणे म्हणजे पुढारलेपण का? वट सावित्री राहो पुराणात पण "Big Banyan day" असं तरी काही साजर करा. एक झाड (सण) मोडलत तरी एक नविन झाड लावालाना, सगळ उजाड करणारी आधुनिकता कसली?
पण वडाला चार फेर्‍या मारुन पुजा करुन ते झाड कापण्या पासुन वाचवता येतं हा विचार नाही दिसला. वॅलेंटाईन डे साजरा करू पण वट पौर्णीमेच्या दिवशी एकमेंका बद्दल असलेल प्रेम नुसतं विश करुन प्रकट करणार नाही . पण वटपौर्णीमेला वटपौर्णीमा करणार्‍यां कडे आणि समस्त नवर्‍याकडे तुच्छ कटाक्ष टाकुन "असा बुरसटलेल्या विचारांचा सण नाही करत जा", असं दाखवुन देण्यात धन्यता मानली जाते आणि त्याच स्वागत होतय.
सातजन्म आणि उपवास या पलिकडे काही न दिसणार्‍या आजच्या आधुनिकतेला काय म्हणावं?

आणि त्यावरच्या बुद्धीहीन प्रतिक्रीया वाचुन भोवळ यायची पाळी.. सात जन्म कसं आणि काय.. अरे काय? वरचा मजला वापरा जरा.

हा धागा मुद्दाम तंत्रज्ञान या विभागात उघडला आहे. प्रथां आणि सणां बाबत वैज्ञानिक पातळीवर चर्चा व्हावी येवढीच इच्छा, देव नको, धर्म नको. मग तो सण कुठल्या का धर्माचा असो. संस्कृती आणि सणं म्हंटल की करा हेटाळाणी, या प्रवृत्तीची मना पासुन वाईट वाटलं आणि संसृतीच्या आडुन नसते उद्योग करणार्‍यांना भर चौकात गोळ्या घालायला हव्यात, त्यांच्या मुळेच आपल्या संस्कृतीची ही गत झाली आहे.

त्या मुळे ज्याना खरोखरच कळत नाही आहे ते ठिक आहे पण हे असच आहे हे छाती ठोकपणे सांगणार्‍यानी थोडा विचार करावा, आपल्या मतं पुढे रेटण्यासाठी चर्चा करु नये. (हुसैनच्या बीबी वर जे चालू).

आपल्या चालीरितीचं आणि सणांच विज्ञाननिष्ठ निरुपण हे ह्या विभागाच प्रयोजन आहे.
फुका टाईमपास नको आणि वैयक्तीक आरोप तर अजिबात नको.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

संस्कृती ही प्रवाही गोष्ट आहे. बदलणारच. बदलायलाच हवी.

वटपौर्णिमाही नविन झाडे लावून जरूर साजरी करा. पावसाळ्याआधीचा कोणताही एक दिवस 'वृक्षारोपण दिवस' म्हणून सुरू केला तर?

मुळात पुरुष जबाबदार आणि प्रेमळ असल्याने त्याकाळी बायका सात सात जन्म त्याना मागून घ्यायच्या

आता इथल्या बाया तुम्हाला दोरे गुंडाळतात बघा... Proud

एवढा आधुनिक विचार त्या काळात सुचला असता तर भारत वेगळाच दिसला असता >>>> अर्रर बाजो,

पूर्वीच्या समृद्ध भारताचे गोडवे अनेक गोरे लोक गात आहेत. हजारो वर्षापूर्वीचे वैदिक कॅलेन्डर केवळ दोन सेकंदाने वगैरे चुकते असे आता गोरे लोक पण म्हणू लागले. फ्रेंच आणि जर्मन लोकतर विज्ञाननिष्ट भारतीय संस्कृती की काय असे बरळू लागले आहेत, इंडिया, क्रेडल ऑफ सिव्हिलाजझेशन की काय असे. पण बहुदा ते सगळे हिंदूत्ववादी किंवा संघाचे आहेत. मला तीच शक्यता वाटते.

(वटपोर्णिमेविषयी काही ज्ञान नाही, पण लगेच भारत बिरत आला की थोडे सांगावे / लिहावे वाटतेच. Happy )

>>पूर्वीच्या समृद्ध भारताचे गोडवे अनेक गोरे लोक गात आहेत.
(आमचे नातेवाईक नसलेले) गोरे म्हणतात म्हणून केवळ प्राचीन भारत समृद्ध म्हणायचा का?

प्राचीन काळच्या समृद्धीविषयी प्रश्नच नाही. वटपोर्णिमेची रूढी (प्राचीन काळात असेल असे वाटत नाही तरी) तेव्हा असती तरी काही फरक पडला नसता. कारण तेव्हा झाडे पुष्कळ नि माणसे थोडी होती.

>>हजारो वर्षापूर्वीचे वैदिक कॅलेन्डर केवळ दोन सेकंदाने वगैरे चुकते
तसे असले तरी सांप्रतकाळातली उपकरणे, औषधे, वाहने यात वापरलेले बहुतेक वैज्ञानिक शोध भारतात लागलेले नाहीत ही वस्तुस्थिती आहे.

असो, मूळ मुद्दा.
नव्या काळातले नवे उत्सव आपापल्या परीने चालू आहेत. उदा. विविध संगीत महोत्सव, नववर्षदिन, मैत्री/ प्रेमदिनासारखे आयात दिवस, 'क्रिकेटोत्सव' (!) Happy
जुन्या उत्सवांना, प्रथांना नवे, विज्ञाननिष्ठ स्वरूप द्यायचे तर त्यासाठी मोठी प्रचार यंत्रणा उभारावी लागेल. आपले एखादे उत्पादन खपवायला असा एखादा उत्सव, त्याच्या विज्ञाननिष्ठ रूपात उपयुक्त आहे असे कोणाच्या लक्षात आले की लगेच ते होईल.

>> जुन्या उत्सवांना, प्रथांना नवे, विज्ञाननिष्ठ स्वरूप द्यायचे तर त्यासाठी मोठी प्रचार यंत्रणा उभारावी लागेल. आपले एखादे उत्पादन खपवायला असा एखादा उत्सव, त्याच्या विज्ञाननिष्ठ रूपात उपयुक्त आहे असे कोणाच्या लक्षात आले की लगेच ते होईल. >>

अनुमोदन.

''Make Friends With a Banyan Tree'' किंवा वडाला राखी बांधणे, वडाची रोपे नियोजित स्थळी लावणे अशासारख्या उपक्रमांमधून आधुनिक प्रकारे वटपौर्णिमा साजरी केली जाऊ शकते की! बरं, त्यासाठी कोणत्याही लिंग, जाती, धर्म, पंथाचा भेदभाव असण्याचा प्रश्नच नाही... ते तर कोणीही करु शकते!
त्याच निमित्ताने वडाच्या औषधी/ पर्यावरणीय महत्त्वाला लोकांसमोर वेगवेगळ्या माध्यमांतून आणता येऊ शकते.

मृदूला तुला माझा मुद्दा कळला नाही. मी वटपौर्णिमा, सत्यनारायण वगैरे भानगडीत पडत नाही.

ते उतर केवळ " आधुनिक विचार त्या काळात सुचला असता तर भारत वेगळाच दिसला असता" ह्या वाक्याला आहे. वटपौर्णिमेशी काही संबंध नाही.

बाजो Lol

मृदुला, अनुमोदन.
आपण बरेच चांगले शोध लावले असतील म्हणून सगळ्याच सणावारांना आता अर्थ आहे असं म्हणण्यात किंवा त्यांच्यात लॉजिक शोधत बसून काही अर्थ नाही.

सगळ्याच सणावारांना आता अर्थ आहे असं म्हणण्यात किंवा त्यांच्यात लॉजिक शोधत बसून काही अर्थ नाही. >>

परत एकदा मी तसे अजिबात म्हणत नाही! गरजही नाही. मी संस्कृतीरक्षक वा पाईक नाही. तसेच माझे वैयक्तीक विचार काय आहेत हे पण सांगायची गरज नाही. आधूनिक विचार तेंव्हाच्या भारतात होते का? ह्याचा नी केवळ ह्याचा माझ्या उत्तराशी संबंध आहे. ह्या बाफशी नाही.

हो हो भाऊ. पण माझी पोस्ट बाफंशी संबंधीत आहे फक्त तुझ्या पोस्टीशी नाही. मला माहित आहे तू संर. किंवा पाईक नाहीयेस ते.

छ्या ! भाउबीज, रक्षाबंधन, गोकुळाष्टमी, रामनवमी, पाडवा, लक्ष्मीपुजन, हनुमान जयंती, व्यासपौर्णिमा आपण उगाच साजरी करतो. काय पण विज्ञानाचा बेस नाही. सगळ्या साल्या बुरसटलेल्या अंधश्रद्धा! बंद करायला हवेत हे सगळे सण..

मनस्मी, वर आधी लिहायचं राहिलं. अर्थ असला किंवा नसला तरी सणवार करुन उपयोग काय किंवा ते करुन नये असं माझं म्हणणं आजिबात नाही. आपली संसकृती म्हणून सणवार करण्यात पण खुप मजा आहे. मी स्वतः करतो. फक्त ते कसे लॉजिकल आहेत असं जस्टिफाय करायची गरज नाही येवढच मी म्हणत होतो. Happy

पुर्वी च्या "भारतातल्या" बायका नोकरी करत नव्हत्या हे एक कारण असावे आपले बहुतांश सणवार हे त्यांच्या भोवती गुंफलेले असण्याचे. त्यात 'तु' - 'तु' - 'मी' - 'मी' करण्यापेक्षा आता आपापल्या सवडीने / आवडीने ज्यांना जसे जमेल तसे करावे. पण करणार्‍याला हीन लेखण्यात काही अर्थ नाही.

आमच्या शास्त्राच्या मॅडम प्रत्येक सणाचे संदर्भासहीत महत्व खुप छान समजावुन सांगायच्या [ 'logical reasoning' ]

>> कीव आली आजच्या सो कॉल्ड "आधुनिक विचार सरणीची".
>> वरचा मजला वापरा जरा.

... अशी सुरवात केली तर चर्चा कशी होणार? सुरशच्या प्रतिक्रीयेतली भाषा बघ... मग परत थंड डोक्याने लेख लिहायचा प्रयत्न कर.

>> आपल्या चालीरितीचं आणि सणांच विज्ञाननिष्ठ निरुपण हे ह्या विभागाच प्रयोजन आहे.
या चालीरिती जेंव्हा सुरू झाल्या तेंव्हा काय उद्देश होता आणि आत्ताच्या परिस्तितीत तो किती सुसंगत आहे हे महत्वाचे. जेंव्हा त्या चालीरितींवर टिका होते तेंव्हा त्या मूळ उद्देशावर टिका होत असते. मुळात प्रत्येक चालिरितीत मारुन मुटकून वैज्ञानिक/आधुनिक दृश्टिकोन शोधुन काढायचा, हा हट्ट का? आपल्या अनेक सणांमधे निसर्गाची नासधूस / प्रदूशण होतं... मग तिथे दुसरा कुठलातरी positive मुद्दा शोधुन काढायचा आणि निसर्गाची नासधूस / प्रदूशण याकडे दुर्लक्ष करायचं का? मग वटपौर्णिमेचे निसर्गप्रेम कुठे गेले?

>> संस्कृती आणि सणं म्हंटल की करा हेटाळाणी, या प्रवृत्तीची मना पासुन वाईट वाटलं
मलाही. पण काये... वैज्ञानिक / rational विचारसरणीचा उपयोग जुन्या चालिरिती तपासायला करायचा सोडून, काहिही करून त्या justify करायच्या या हट्टापायी काहीजण सरसकट सगळ्याच चालिरितींचा त्याग करतात.

अक्षयतृतीयेच्या दुसर्‍या दिवशी नगर जिल्ह्यात एका नदीच्या तीरावर असलेल्या दोन गावात गोफणींनी दगड मारून लढाई होते. त्याला गोफणगुंड्यांची लढाई म्हणतात . तसेच नागपूरजवळ मध्यप्रदेश बॉर्डरला दोन गावात अशीच लढाई होते. त्याला गोटमार म्हणतात. आमच्या एका शिष्याने तेथे जाऊन खोलात चौकशी केली असता तेथील ग्रामस्थानी फार्फार पूर्वी सेन्ट्रीपेटल फोर्स आणि सेन्ट्रीफ्युगल फोर्स , अक्स्सेलरेशन, वेक्टर्स याचा वैज्ञानिक अभ्यास करण्यासाठी ही प्रथा सुरू केली होती असे कळले. खुद्द माझ्याच गावात जसा विविध मंत्रानी मानवावर सुपरिणाम होतो हे आता सिद्ध झाले असले तरी ते विज्ञान आमचा भिक्षुकाचे वंशज बगंभट याना पूर्वीच ठाऊक होते.म्हणून त्यानी मंत्रानी गावातल्या सगळ्या धायगुडवंशीय लोकांची आयुष्ये व्यापली.. याउलट गावातील मावळतीकडं र्‍हाणार्‍या पिर्‍या नाइकाच्या बापजाद्याना शिमग्यात देण्यात येणार्‍या शिव्या व बोम्बा यांच्या फ्रिक्वेन्सीमुळे त्येच्या म्हषींचे दूध वाढते याचे फिजिऑलॉजिकल शास्त्रीय सत्याचे आकलन झाले होते . म्हणून दर ग्रहणात शास्त्रज्ञ टेलिस्कोपी घेऊन विविध सत्यांची प्रचिती घेतात तसे पिर्‍या नाइक आणि त्याची भावकी दर शिमग्याला शिव्या व बोम्बाजन्य विविध प्रिक्वेन्सींचा दुग्धोत्पादनावर व मानवी जीवनावर परिणाम याचा अभ्यास करून विविध शास्त्रीय हायपॉथेसीसे पडताळून पहातात.
इतर मंदबुद्धी येरू त्याची काहीतरी धार्मिक गोष्टींची सांगड घालतात हे चुकीचेच...

Rofl

अशी सुरवात केली तर चर्चा कशी होणार? सुरशच्या प्रतिक्रीयेतली भाषा बघ... मग परत थंड डोक्याने लेख लिहायचा प्रयत्न कर. >> मन्य, भावनेच्या ओघात लिहुने गेलो. क्षमस्व!

कुठल्याही प्रथा ह्य बिन बुडाच्या बनवल्या आहेत आणि त्या बेस लेस आहेत अस मला वाटत नाही.
वटसावित्री बद्दल मला काय वाटत,
हा सण स्त्रीयांनीच का करावा १) आपले बरेच सण हे स्त्री प्रधान आहेत, जेणे करुन स्त्रीयां एकत्र येता यावं, चांगल चुंगल करुन खाता याव. म्हणुन आपले उपवास आणि इतर धर्माचे उपवासात फार फरक आहे. एकादशी नी दुप्पट खाशी ही मुभा आहे Happy
२) वडच का? वडाच्या आणि पिंपळाच्या झाडा भोवती एक गुढ वलय निर्माण करण्यात आल आहे. कारण ही झाड दिर्घायुशी आहेत, त्याना तोडुन पर्यावरणाची हानी होते आणि ती भराभर वाढतही नाहीत. म्हणुन त्यांच रक्षण करण्यासाठी ही एक प्रथा.
३) बहुतेक सण हे लग्न झालेल्या स्त्रीयांशी जास्त निगडित असतात, त्याच प्रमुख कारण, लग्न झालेल्या स्त्रीयांवर जबाबदारी जास्त, त्यांच्यावर बंधन जास्त असतात. मग अशा स्त्रीयांनी एंजॉय कधी करायच, चार मैत्रीणींनी एकत्र येऊन मजा करण्याची, घरा बाहेर पडण्याची एक संधी.
४)यमाशी वाद, स्त्रीयां स्त्री शक्ती बद्दल माहीती करुने देणे, अगदी यम ही आला तरी स्त्री त्याला पराभुत करु शकते असा आत्मविश्वास त्यांच्यात निर्माण करावा. स्त्रीयांच हळवा स्वभाव बघता हे महत्वाच होत.
५) नवरा बायकोने आपल्या प्रेमाची दिलेली साक्ष, एकमेंकाची साथ करण्याचा निश्चय. अगदी म्रुत्यू नंतरही अगदी जन्मोजन्मी. तस पुढचा जन्म कुणाला माहीत, पण एकमेंकांवर पराकोटिच प्रेम कराव. नवर्‍यावर संकट आल त्॑र माज घारात रांधणारी स्त्री यमाशी हि झगडू शकते याची जाणीव पुरषांनाही व्हावी आणि आत्मशक्ती स्त्रीयांनाही कळावी म्हणुन बांधलेली एक कथा. गोष्टीतुन ज्ञान प्रबोधन काही नविन नाही. ईसाप निती, चाणाक्य आशा अनेक कथा आहेत. पण त्यातली शिकवण महत्वाची काही चुकीचं असल्यास त्यात बदल करायला हवेत हे नक्की.

तेंव्हा आपला भारत येवढा प्रगत होता का? तर नक्कीच होता. योगा, आयुर्वेद, पाकशास्त्र, खगोल शास्त्र, हे वानगीला आहेत. आजचा भारत असा का आहे ह्याची अनेक कारण आहेत ती चर्चा दुसरी कडे करु.

अर्थात हे माझ मत आहे अजुनही काही विचार असतिलही कदाचीत.

सत्या, हे गप्पांचं (वाहतं) पान झालं आहे, आमच्या सुरुवातीच्या पोस्ट्स वाहून गेलेल्या दिसतायत.

सत्या, हे गप्पांचं (वाहतं) पान झालं आहे, आमच्या सुरुवातीच्या पोस्ट्स वाहून गेलेल्या दिसतायत. >> अरे आता बांध कसा घालायचा, अ‍ॅडमिनला हलवायला हवं )

>>त्याच प्रमुख कारण, लग्न झालेल्या स्त्रीयांवर जबाबदारी जास्त
>> मग अशा स्त्रीयांनी एंजॉय कधी करायच,

- न लग्न झालेल्या किंवा विधवा स्त्रियांवर कसलीच जबाबदारी नाही आणि त्या कायम निवांत असत असे म्हणायचे आहे का?
- विधवांसाठी असलेल्या सणाची माहिती द्या. की त्यांना आयुष्य 'एन्जॉय' करायची मुभा नकोच?

नागपंचमी सणाबाबत तुमचे काय मत आहे. मी आधी लिहिले होते त्याप्रमाणे नागाला दूध न देता दोन उंदीर पकडून खाऊ घालावेत काय? (सण विज्ञाननिष्ठ होण्यासाठी?)

बाजो Rofl
बाकी किवेच्या वाक्यानंतर काही वाचायची इच्छाच राह्यली नसल्याने मूळ लिखाणावर नो कॉमेंटस...

वडाच्या झाडाची पुजा करण्यात कुणालाच काही वावग वाटायच कारण नाहीच आहे. त्या पाठीमागे शास्त्रीय कारण असेलही. प्रश्न आहे तो त्या पाठिमागे थोतांडरुपी काहीतरी रुढी बाळगण्याचा.
वडाला दहा प्रदीक्षीणा घातल्या कि सात जन्म हाच पती मिळेल आणि उपास करणे वगैरे गोष्टी काढून टाकल्या तर नुस्त्या वडाची मनोभावे पुजा करायला कुणाची हरकत नसावी.
पुर्वी स्त्रीयांना स्वातंत्र्य नव्हत म्हणुन अशा टाईपच्या प्रथा पाडल्या गेल्या हे ही ठीक. पण त्यात पुरुषांना परत स्थान दीलच पाहिजे का?
दुसर म्हणजे वृक्षारोपणाचा हेतुने ही परंपरा सुरु करण्यात आली हे मान्य. पण चार फांद्या तोडून ती पुजण्यात धन्यता बाळगणं चुकीच नाही का? ह्यातून मुख्य हेतु कसा साधला जाणार? आणि खरोखर किती बायकां मुख्य हेतु चांगला आहे म्हणुन वृक्षारोपणासाठी काही करताना दिसताहेत?

व्हॅलेंटाइन डे बरोबर तुलना चुकीची वाटते. कारण तो फक्त बायकांनीच साजरा करावा अस वर्गीकरण त्यात केलेलं नाही.

रुढी , परंपरा जरुर संभाळाव्यात. त्या फक्त स्वार्थी आणि विशिष्ट वर्गाचा उदोउदो करणार्‍या असु नयेत एवढी अपेक्षा आजच्या मॉडर्न स्त्रीने करण यात चुकीच काय आहे ?

छ्या ! भाउबीज, रक्षाबंधन, गोकुळाष्टमी, रामनवमी, पाडवा, लक्ष्मीपुजन, हनुमान जयंती, व्यासपौर्णिमा आपण उगाच साजरी करतो. काय पण विज्ञानाचा बेस नाही. सगळ्या साल्या बुरसटलेल्या अंधश्रद्धा! बंद करायला हवेत हे सगळे सण..

अरेरे !
या सणांना विज्ञानाचा बेस नाही हे खरेच आहे. पण म्हणून कोणतेही सण न साजरे करता वर्षभर उदासपणे बसून रहावे असे कुणी म्हणत नाहिये. तिळगूळ, कोजागिरी, तुम्ही लिहिलेले सण, जरूर आनंदाने साजरे करूयात, फक्त त्यांना ओढून ताणून शास्त्रीय सिद्ध करण्याचा अट्टाहास नको इतकेच.

रुढी , परंपरा जरुर संभाळाव्यात. त्या फक्त स्वार्थी आणि विशिष्ट वर्गाचा उदोउदो करणार्‍या असु नयेत एवढी अपेक्षा आजच्या मॉडर्न स्त्रीने करण यात चुकीच काय आहे ?

अगदी ! म्हणूनच वटपोर्णिमा वगैरे बंद झालेलेच बरे. विधवांना, परित्यक्त्यांना ज्या सणातून खड्यासारखे वगळले जाते तो कसला आलाय सण! आणी पुरुष "पिंपळ सत्यावान" सारखा एखादा उपवास का करत नाहीत ?

अगदी ! म्हणूनच वटपोर्णिमा वगैरे बंद झालेलेच बरे. विधवांना, परित्यक्त्यांना ज्या सणातून खड्यासारखे वगळले जाते तो कसला आलाय सण! आणी पुरुष "पिंपळ सत्यावान" सारखा एखादा उपवास का करत नाहीत ?>>

पण सण modify करून आनंदाने साजरे का करू नयेत? जसं, कोणत्याच सणातून कोणालाच वगळू नये. प्रत्येक सणामागचं अगदी शास्त्रीय कारणच शोधलं पाहिजे असं नाही, एक सगळ्यांनी मिळून आनंदात घालवायचा दिवस त्याच्या मागच्या प्रथा जाणून घेऊन काळानुसार बदल करून साजरा करावा.

BA JO Lol

हा सण स्त्रीयांनीच का करावा ? >>>>> पण मग स्त्रीयांनाच ठरवू देत ना हे व्रत करायचं की नाही ते!

लोकशाहीच्या व्याख्येप्रमाणे व्याख्या करायची झाली तर वटपौर्णिमा हे स्त्रीयांनी पुरुषांकरता केलेलं वडाचं व्रत अशी होईल. ती बदलून स्त्री-पुरुषांनी पर्यावरणाकरता केलेलं झाडांचं व्रत अशी करायला हवी. Happy

Pages