आपले सण, एक तंत्र आणि मंत्र.

Submitted by सत्यजित on 17 June, 2011 - 02:47

गेले काही दिवस बर्‍याच ठिकाणी, आपल्या संस्कृतीला लोक नाव ठेवताना दिसली. धर्मावरुन वाद विवाद वाचले. वट सावित्री कसा बुरसटलेला सण आहे हे वाचले. कीव आली आजच्या सो कॉल्ड "आधुनिक विचार सरणीची".

ते सात जन्म आणि यम या पलिकडे आपण जात नाही, ग्लोबल वॉर्मींग बद्दल चर्चा हिरीरीने करतो. मग मॅरेथॉन काय, अर्थ डे, ग्रीन डे काय? हे डे साजरे करणे म्हणजे पुढारलेपण का? वट सावित्री राहो पुराणात पण "Big Banyan day" असं तरी काही साजर करा. एक झाड (सण) मोडलत तरी एक नविन झाड लावालाना, सगळ उजाड करणारी आधुनिकता कसली?
पण वडाला चार फेर्‍या मारुन पुजा करुन ते झाड कापण्या पासुन वाचवता येतं हा विचार नाही दिसला. वॅलेंटाईन डे साजरा करू पण वट पौर्णीमेच्या दिवशी एकमेंका बद्दल असलेल प्रेम नुसतं विश करुन प्रकट करणार नाही . पण वटपौर्णीमेला वटपौर्णीमा करणार्‍यां कडे आणि समस्त नवर्‍याकडे तुच्छ कटाक्ष टाकुन "असा बुरसटलेल्या विचारांचा सण नाही करत जा", असं दाखवुन देण्यात धन्यता मानली जाते आणि त्याच स्वागत होतय.
सातजन्म आणि उपवास या पलिकडे काही न दिसणार्‍या आजच्या आधुनिकतेला काय म्हणावं?

आणि त्यावरच्या बुद्धीहीन प्रतिक्रीया वाचुन भोवळ यायची पाळी.. सात जन्म कसं आणि काय.. अरे काय? वरचा मजला वापरा जरा.

हा धागा मुद्दाम तंत्रज्ञान या विभागात उघडला आहे. प्रथां आणि सणां बाबत वैज्ञानिक पातळीवर चर्चा व्हावी येवढीच इच्छा, देव नको, धर्म नको. मग तो सण कुठल्या का धर्माचा असो. संस्कृती आणि सणं म्हंटल की करा हेटाळाणी, या प्रवृत्तीची मना पासुन वाईट वाटलं आणि संसृतीच्या आडुन नसते उद्योग करणार्‍यांना भर चौकात गोळ्या घालायला हव्यात, त्यांच्या मुळेच आपल्या संस्कृतीची ही गत झाली आहे.

त्या मुळे ज्याना खरोखरच कळत नाही आहे ते ठिक आहे पण हे असच आहे हे छाती ठोकपणे सांगणार्‍यानी थोडा विचार करावा, आपल्या मतं पुढे रेटण्यासाठी चर्चा करु नये. (हुसैनच्या बीबी वर जे चालू).

आपल्या चालीरितीचं आणि सणांच विज्ञाननिष्ठ निरुपण हे ह्या विभागाच प्रयोजन आहे.
फुका टाईमपास नको आणि वैयक्तीक आरोप तर अजिबात नको.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ते सर्व राहू देत हो...

पूर्वीच्या काळी काय होतं आणि सणामागचे विज्ञान..

मला फक्त इतकेच सांगा.. की, वडच्या तोडलेल्या फांद्या विकत आणून त्याची पूजा करणे ही पद्धत नक्की कधी चालू झाली? माझ्या माहितीप्रमाणे, ही जुन्या भारतातली आणि खेड्यापाड्यातल्या बायकाची पद्धत नक्कीच नाही. चांगल्या शिकल्यासवरलेल्या बायका ही अशी पूजा करताना दिसतात. आनंदाची गोष्ट अशी की, कित्येक भटजी "घरी" येऊन ही पूजा नविन नवरीला सांगतात. या आधुनिक भारतातील "विज्ञाननिष्ट" पूजेबद्दल आपण काहीतरी करू शकतो का?

रच्याकने. वडपौर्णीमा, नागपंचमी हे सण त्याकाळच्या बायकांचे ववि होते, हे समजायला कसल्याही शास्त्रीय आधाराची, विज्ञानाची गरज नसावी. Happy

महाराष्ट्र अन काही प्रमाणात कर्नाटक या पलिकडे इतर कुठल्या प्रदेशात वटपौर्णिमा साजरी करतात का ?
मी माझ्या ओळखीतल्या मुंबैत रहाणार्‍या बंगाली, पंजाबी, तेलगू, तुळू, गुजराती, तमिळ, मल्याळम, हिंदी भाषिक मुलींना विचारलं तर त्या सगळ्यांनी 'ये तो तुम लोगोंका फेस्टिव्हल है' म्हटलंय.

भारतातल्या इतर राज्यात या पूजेचं / सणाचं महत्व का नसाव? हा सण नसल्याने त्या राज्यात पर्यावरणात व स्त्री पुरुष नातेसंबंध टिकण्यात काही जास्त अडचणी आहेत का ? बाजो, शासकीय माहिती काढता येईल का याबद्दल
' कोरिलेशन बीट्वीन बॅन्यन ट्री पॉपयुलेशन अँड मॅरिटल डिस्कॉर्ड' ?

मृदुला, वरच्या मजल्यावर जम(व)लेली शताकांची अडगळ काढायचं काम छान करताय. पण अजून बरेच धक्के मारावे लागतील.

वटपौर्णिमेच्या निमित्ताने नटायचं , बाहेर चार बायकांबरोबर फिरून यायचं, छान फळं खायची (जी घरातले दुसरे कुणी नाही खात?) हा नवर्‍याचे आयुष्य वाढवल्याच्या टास्कचा पर्फॉर्मन्स बोनस असतो. विधवांचे टास्क फेल गेल्याने त्यांना हा बोनस मिळत नाही.

एकादशी आणि दुप्पट खाशी ? एकादशीचा उपास सगळे करतात तेव्हा दुप्पट खाणे आलेच. पण हरतालका, करवा चौथ(सूर्योदयापासून चंद्रोदयापर्यंत) यात अगदी निर्जली उपवास करणं आयडीयल मानलं जातं. आणि अशा उपासात घरातल्या लोकांसाठी जेवणं करणं काही चुकत नाही. हरताळकेच्या दिवशी तर दुसर्‍या दिवशीच्या गणेशचतुर्थीची तयारी म्हणून दिवस घराच्या साफसफाईत जायचा.

या सगळ्या उपासांतून बाईला तुझं महत्त्व तुझ्या नवर्‍याच्या आयुष्यावर अवलंबून आहे हेच ठासून सांगितलं जातं.
वटपूजा = वृक्षसंवर्धन इ. इ. वरून थापलेला विज्ञाननिष्ठेचा फसवा मुलामा आहे. आज वडाला पुजणार्‍या बहुतांश स्त्रिया वडाची फांदी घरात आणून पुजतात आणि दुसर्‍या दिवशी तिला निर्माल्याची धनी करतात. त्यांच्याकडे कौतुकभरल्या नजरेने पाहायचं का? आता यात पण वृक्षाला फांद्यांचा भार होतो त्यामुळे त्या वेळोवेळी तोडणे वृक्ष अधिक बहरण्यासाठी गरजेचे आहे, अशीही विज्ञाननिष्ठा दिसेलच.

व्रुक्षसंवर्धनाचा कन्सेप्ट असावा हे विधानच तर्कदुष्ट आहे कारण ज्या काळात ही प्रथा सुरू झाली (असावी) त्या काळात प्रचन्ड जंगले होती. आहे त्या झाडांनीच मुळी शेती आणी वाहतुकीला अडथळा होत असल्याने झाडे तोडावी लागत...
हे म्हणजे सेलेब्रेशनला चॉकलेट्स लागतात अथवा वॅलेन्ताईन डेला हे हे लागते असे प्रवाद पसरवून त्या वस्तूंचे निर्माण आणि मार्केटिंग करण्याचे फन्डे जसे असतात तसे कदाचित दोरे आणि पूजासाहित्य विक्रेत्यानी व्यवसायाची अधिक संधी म्हणून हा सण प्रमोट केला असावा. साबुदाण्याच्या व्यापार्‍यानी जसे उपवासाचे माहात्म्य प्रमोट केले तसे Happy . (उपासाचे बर्गर/पिझ्झे निघालेत का? निघतील निघतील...). पर्वाच आमचा भाजीवाला म्हणीत हुता ' शेपूची भाजी घ्या साहेब; मेन्दूला लै चांगली आस्ती. " कोणाला कशाचं आन बोडकीला केसाचं ! आता लिम्ब्याच असता तर म्हटला असता वटसावित्रीची पूजा करणे कसे आवश्यक आहे ते... व्यावसायिक दृष्टीकोण !

बाकी मॉडर्न युवत्यांप्रमाणे माझाही व.सा. पूजेला विरोध आहे. वटपौर्णिमा हा पुरुषांचा घातवार आहे.सात सात जन्म काढायचे म्हणजे काय हो ! नसती बिलामत. Proud

- न लग्न झालेल्या किंवा विधवा स्त्रियांवर कसलीच जबाबदारी नाही आणि त्या कायम निवांत असत असे म्हणायचे आहे का?
- विधवांसाठी असलेल्या सणाची माहिती द्या. की त्यांना आयुष्य 'एन्जॉय' करायची मुभा नकोच?

>> प्रत्येक घरात विधवा आहेत, त्याना ह्या सणांची जास्त गरज आहे, त्याना करुन घ्या ना सामिल. मीही नाही नाही आणि तुम्ही ही नाही ह्याला काय अर्थ आहे.

फांद्या घरी आणुन पुजा करण, हे कारन न समजुन घेता सण साजरा करण्याच्या प्रवृत्तीच प्रतिक आहे. म्हणुन विज्ञाननिष्ठ निरुपण व्हाव अस मला वाटत.

आज पाडव्याला प्रभातफेरी शिवजयंती असे आधुनिक पद्धातीने सण साजरे होता आहेत तसा ह्या सणच खर महत्व बघुन हा देखिल आधुनिक पद्धतीने साजरा करायला काय हरकत आहे. सावित्री आणि यमा माफ करा.

एक मोठ्ठा प्रतिसाद लिहिला होता तो पोस्ट करण्या आधीच गायब झाला Sad

या सगळ्या उपासांतून बाईला तुझं महत्त्व तुझ्या नवर्‍याच्या आयुष्यावर अवलंबून आहे हेच ठासून सांगितलं जातं. >> भरत ह्या गोष्टी भुतकाळातल्या झाल्या, आपल्याला नव्या पिढीचा विचार करायचा आहे. आणि त्यांच्या साठी एक समृद्ध संस्कृती निर्माण कराची आहे. त्यासाठी जे आहे ते आधी समजुन घ्यायला हव. आम्ही सोफ्टवेअर वाले त्याला सिस्टम अ‍ॅनॅलिसीस आणि रिइंजिनिअरींग म्हणतो.
आता वडाला फेर्‍या मारण्यात काही लॉजिक आहे का? उपवास करण्यात काही लॉजिक आहे का? नाही ना मग बदला ते सगळ.

माझं थोडंसं सिस्टम अ‍ॅनालिसिस : जुन्या काळात बायकांना घराबाहेर पडायला, दुसर्‍या चार बायकांना भेटायला म्हणून वटपौर्णिमा एक निमित्त असायचं. आता त्यांना काही अशा वेगळ्या निमित्ताची गरज नाही.

जर स्त्रीचं महत्त्व तिच्या नवर्‍याच्या अस्तित्वावर अवलंबून नाही, तर नवर्‍याच्या आयुष्यासाठी साकडं घालणं हा मूळ उद्देश असलेला सण कशाला? (वृक्षसंवर्धन हा वटपौर्णिमेचा मूळ उद्देश असं नका सांगू आता)

वडाला फेर्‍या मारणं, उपास करणं हेच बदलतंय की. नाही करत आता लोक.
तुम्ही म्हणताय ते करत रहा, फक्त त्याच्यामागचं लॉजिक बदला.

विधवांना सगळ्यांमध्ये मिसळायला वटपौर्णिमा कशाला करायला हवी? आताच्या सधवा म्हणतात की यात विधवांना येता येत नाही, त्यामुळे आम्हीही जात नाही. काय चुकलं?

संस्कृती ठरवून निर्माण करता येते का? लादता येत असेल.

तुम्ही म्हणताय ते करत रहा, फक्त त्याच्यामागचं लॉजिक बदला. >> मी असं कुठे म्हंटल आहे? असंस्कृत असण्या पेक्षा नविन संस्कृती निर्माण करुया येवढच म्हणतो आहे. आणि त्या अनुशंगाने ही चर्चा व्हायला हवी. झाले लावा आणि जगवण्या साठी वट पौर्णीमेचा उपयोग होतो, त्यामुळे संसृती मानणार्‍याची आणि नवे बदल घडवण्याची हात मिळवणी करता येईल.

हं..एकंदर बायकानी वडाचे संवर्धन करण्यासाठी हे व्रत करायची तयारी दाखवली आहे. पण नवर्‍याच्या दीर्घायुष्यासाठी त्या हे व्रत करायला तयार नाहीत..

लिंबूभाऊ धावा.... काहीतरी लिहा...

वट पौर्णिंमेचा उपवास आपल्या पतीला खूप आयुष्य लाभण्यासाठी ,तसच नागपंचमीचा उपवास भावासाठी,सणावाराला आपल्या माणसाना ओवाळण या प्रथा प्रार्थनेइतकया पवित्र आहेत जर त्यात भाव असेल तर ,जर नसेल तर त्या न पाळाव्यात .त्यामुळे जे लोक या प्रथा पाळतात त्यांची टिंगल टवाळी करण अयोग्यच .या प्रथांमुळे इनिशल स्टेजला आशावाद बळ्कट होतो .संसाराचे आघात झेलायला मन एकदा का कणखर झाल की मग कुठल्या व्रत वैकल्यांची गरजच रहात नाही तरी लोकसंग्रहासाठी त्यांच आचरण जर जेष्ठाकडून झाल तर समाजातील या चालीरीती अजून पुढे रहातील.तुझ आयुष्य माझ्यासाठी महत्वपूर्ण आहे ही जाणीव घरातल्या सदस्यांचा उत्साह वाढवते .जर आपली वागणूकच स्वत:पेक्षा इतराना महत्व देण्याइतकी ब्रॉड मांइंडेड झाली की व्रतवैकल्याना महत्व नाही रहात .तर हे सर्व स्व च्या पलीकडे विचार करायला शिकवणारे बेसीक फंडे आहेत अस मला वाटत् .आता भूक विसरण्यासाठी मन दुसर्‍या कुठल्यातरी समारंभात ,पुजेत ,वडाला फेर्‍या मारण्यात ,नटण्या मुरडण्यात सहज वळत .एकदा भूक तहान जिंकता आली की या पूजा वगैरेची गरज नाही रहात अस असेल कदाचीत .कुठलीही प्रथा जर ती मला माझ्या कुटुंबाशी ,समाजाशी ,देशाशी ,जगाशी नात्यांची वीण पक्की करायचा बेसीक संस्कार घालत असेल तर ती चांगलीच आहे अस आपल माझ मत .

आधुनिक काळात वटपौर्णिमेच्या सणात झालेले व मी पाहिलेले बदल :

१. माझ्या ओळखीतील काही नवरा व बायको दोघेही वट पौर्णिमेचा उपवास करतात. त्या निमित्ताने दोघांनाही उपासाचा फराळ हादडता येतो किंवा फळांवर राहून 'डाएटिंग' चा आनंद मिळतो! Wink

२. पुण्यातील काही शाळांमार्फत/ मधून हरितसेनेचा उपक्रम राबविण्यात येतो. शाळेतील विद्यार्थिनी ग्रुपने वडाची झाडे ''दत्तक'' घेतात (म्हणजे त्या झाडांची निगा - देखभाल करण्याचा निश्चय करतात), किंवा झाडाला प्रतिकात्मक राखी बांधतात. ''तू जशी आमची काळजी घेतोस तशी आम्हीही तुझी काळजी घेऊ'' हा त्यामागील उद्देश. वडाच्या झाडावरील पक्षीजीवन, प्राणीजीवन, पर्यावरणातील त्याचे महत्त्व, त्याचे औषधी गुणधर्म जाणून घेतात. तसेच काही ठिकाणी वृक्षारोपण कार्यक्रमही आयोजित करतात.

मला स्वतःला वडाचे झाड अतिचशय आवडते!! त्याच्या छायेत बसल्यावर घरातील जुन्या, जाणत्या, वडीलधारी व्यक्तीजवळ बसल्यासारखा आनंद मिळतो. माझ्या घरात आजवर कोणी वडाची वटपौर्णिमेला पूजा केलेली नाही वा यापुढेही करतीलच असे नाही. केवळ त्याला हळदीकुंकू वाहूनच त्याचे प्रती आदर व्यक्त करता येतो असे मला वाटत नाही. असे पूजायचे आणि एरवी तिथेच तंबाखू गुटख्याच्या पुड्या टाकायच्या, पिचकार्‍या टाकायच्या, बिडी विझवायची किंवा कचरा टाकायचा हेही वैषम्यजनक आहे. त्याऐवजी वडाच्या झाडाभोवतालचा परिसर स्वच्छ ठेवणे, तिथे घाण होऊ न देणे हे पाहिले तर ते जास्त चांगले! वडाभोवती नुसते गोल गोल हिंडण्याला जर प्रदक्षिणा म्हणत असतील तर तसे करायला मला एरवीही जाम मजा येते. त्यासाठी वटपौर्णिमेचाच दिवस हवा असे नाही.
अर्थात नुसते नटून थटून हातात पूजेची थाळी घेऊन रस्त्याने मिरवत ''मी बाई पतिव्रता'' करत वटपूजेला जाणार्‍या ललनांनाही त्यांच्या त्यांच्या श्रध्देनुसार वटपूजा करण्याचा पूर्ण अधिकार आहे हेही मान्य आहे. (पण त्या पूजेसाठी अनेकदा वडाच्या फांद्यांची जी क्रूर काटछाट होते ती नको वाटते!) लहान असताना वडिलांनी वटवृक्षाचे माहात्म्य वर्णन करणारे काही सुंदर संस्कृत श्लोक शिकविले होते. पारच विसरले ते मी एव्हाना! ते आता परत धुंडाळायला हवेत.

परवा वटपौर्णिमेच्या आदल्या दिवशी आमच्या घराजवळ पूजेचे सामान विकणार्‍या हातगाड्यांची रांग लागली होती. आणि त्यांच्या भोवताली बायकांची हीऽ झुंबड!!! पुढील काळात पुरुषांनाही आपल्या पत्नीच्या आयुष्यासाठी ही पूजा करायला हरकत नाही! Wink

आपल्या संस्कृतीला लोक नाव ठेवताना दिसली. धर्मावरुन वाद विवाद वाचले. वट सावित्री कसा बुरसटलेला सण आहे हे वाचले
हे कुठे म्हणे? असो.

संसृतीच्या आडुन नसते उद्योग करणार्‍यांना भर चौकात गोळ्या घालायला हव्यात
यात फांद्या तोडून पूजा करणार्‍या बायकांचाच नंबर लागायचा आधी!

विज्ञाननिष्ठ स्वरुप असो वा नसो. माणूस आणि निसर्ग कोणाचेही नुकसान न करता, त्रास न देता वैयक्तिक आनंदासाठी सण केले तर कुठं बिघडलं?

ते सर्वसमावेशक असलेच पाहिजेत असं कुठं आहे? "सात जन्म" इ. भाग सोडल्यास फक्त भावना लक्षात घ्यायची असेल तर उद्या कोणी जोडीदाराच्या दीर्घायुष्यासाठी वड पुजून किंवा न पुजता केला सण तर बाकीच्यांचे काय जाते? काय हो विकु? हा तर पूर्णपणे वैयक्तिक सण आहे. दिवाळीच्या पाडव्याला विवाहित बायांनी नवर्‍याकडून काही घेऊ नये मग, कारण नसलेल्यांना ते मिळत नाही म्हणून! असं प्रत्येक वेळी सर्वांना सामावून घ्यायचं म्हटलं तर नात्यांवर आधारीत सण करताच येणार नाहीत.

मेधा, वटपौर्णिमा नसली तरी तश्याच प्रकारचा 'करवा चौथ' आहेच की उत्तरेत.

हळदीकुंकवाचे एक वेळ म्हणता येईल की करणारीने विधवांना बोलावले नाही तर तो भेदभाव झाला. त्या सणात थेट नवर्‍याचा काही संबंध नाही. एकत्र येऊन थोडा वेळ गप्पा गोष्टी, खाणे पिणे यात घालवायचा तर नवरा असला नसला तरी फरक पडायला नको. त्याचे स्वरुप बदलायला लागलेही आहे. (जुन्या माबोतली चर्चा वाचा)

छाया देसाई, छान लिहिलंय.

कुठलीही प्रथा जर ती मला माझ्या कुटुंबाशी ,समाजाशी ,देशाशी ,जगाशी नात्यांची वीण पक्की करायचा बेसीक संस्कार घालत असेल तर ती चांगलीच आहे अस आपल माझ मत . >> परफेक्ट !!! मला येवढच म्हणायच होत, छाया ने एका वाक्यात मांडल. प्रत्य्के गोष्टीत काही चांगल शोधा, नाही सापडल तर सोडुन द्या, पण वाईट शोधायच म्हंटल तर जगात चांगल काहीच उरत नाही.

>> परफेक्ट !!! मला येवढच म्हणायच होत
ओह.. अस होय... तुझ्या लेखावरून तर तसं काहिच वाटत नाही Happy
लेखातून... आपल्या चालिरिती ही आपली 'संस्कृती' आणि त्यामागची 'पारंपरिक' कारणमिमांसा सध्याच्या काळात लागू होत नसली तरीही त्या (चालिरिती) आचरण्यासाठी (कुठलीतरी) वैज्ञानिक कारणं शोधून काढायला हवीत... असा एकंदर सूर (मला) वाटला. तुझा लेख objectively विचार करतो तर छायाची प्रतिक्रिया subjective आहे.

सॅम, तोच तर प्रॉब्लेम आहे, मी माझ्या लेखात आणि खालिल चर्चेत स्पष्ट केलं आहे. आणि संस्कृती म्हंटल की सारासार विचार न कराता हेटाळणी करणार्‍यान्नी विचार करावा, त्यांचे मुद्दे योग्य असतिल पण तो संस्कॄचीचा दोश नसुन संस्कृतीचा विपर्यास झाल्यामुळे झालेली गत आहे. आपली संस्कॄती ही खरीच थोर आहे, काही रिती कालबाह्य झाल्या आहेत त्या सोडून किंवा त्यात योग्य ते बदल करुन, आपल्या संस्कृतीचे जतन व्हावे ही इच्छा.

आपल ते टाकाऊ आणि पाश्चात्यांचे ते टीकाऊ मानण्यात काय धन्यता आहे. आपण त्यांच्या कडुन चांगल तर काही घेत नाही पण आपल जे चांगल आहे ते फक्त संस्कृती म्हणुन सोडायला द्यायला अधीर झालो आहोत. आपणच आपल्या गोष्टींना नाव ठेवायची़ मग इतर तर टपलेलेच आहेत. इतर धर्माचे त्यांच्या अघोरी प्रथा देखिल धर्म म्हणुन पाळता आहेत आणि आपला धर्म परिवर्तनशील असुन देखिल आपण धर्म त्यागायला निघालो आहोत आणि कारण नसताना देखिल आपल्या संस्कृतीची हेटाळणी करण्यात धन्यता मानतो आहोत. ह्या देशात इतरही धर्म आहेत ज्यांच प्रस्थ अकारण वाढतं आहे ते जोमाने प्रचारही करता आहेत. हिंदु धर्माच्या प्रथा आणि चालीरीती ह्या मुस्लीम धर्माच्या प्रथा पेक्षा नक्कीच स्त्री प्रधान आहेत. त्याच्या प्रथा वाईट आहेत, जाचक आहे, आणि हिंदु प्रथा सारख्या परिवर्तनशील ही नाहीत, तरीही धर्म म्हंटल की आपण निधर्मी होतो, प्रथा म्हंटल की आपण पुढारलेले असल्याचे ढोंग करतो, का? का आपल्याला आपल्या धर्मात आणि संस्कृतीत काहीच चांगल दिसत नाही? पुरुष प्रधान या पलिकडे गाडं जातच नाही, इतर धर्माकडे बघा, त्यांच प्रस्थ वाढल तर तुमच पुढारलेपण तुम्हाला अंगिकारता येईल? जातिय व्यवस्थेने आधीच बहुजन समाजाला हिंदू धर्मा पासुन तोडल आहे, त्यात धर्माचा काय दोश होता. खेडोपाडी आजही उच्च जातीचे दलितांवर फक्त दलित म्हणुन अत्याचार करता आहेत. आपला धर्म आणि जातिय व्यवस्था ह्याचा काही संबंध नाही. हिंदू धर्माचा खरच विचार केला तर एक लक्षात येईल उत्तर भारतात साजरे होणारे सण हे दक्षिण भारतातिल सणां पेक्षा वेगळे आहेत. येवढच काय तर प्रत्येक भाषीकांच कॅलेंडर सुद्धा वेगळ आहे, येवढच काय तर देवही वेगळे आहेत, प्रथा वेगळ्या आहेत. मग मला असं वाटत की प्रत्येक भागातल्या प्रथा ह्या त्या त्या भागातिल निसर्ग आणि समाज संस्थेला अनुसरुन निर्माण झाल्या आहेत. ब्रम्हा (निर्माण), विष्णू (संवर्धन), महेश (अंत) ह्या तिन संकल्पना समान आहेत. अजुन पुढे लिहायचय.. लिहीन.

लालूच्या पोस्टला अनुमोदन.

घालायचाच असेल तर दोन्ही बाजूंकडून हवा तेव्हढा वितंडवाद घालता येतो हे वरच्या बर्‍याच पोस्ट्स्मधे दिसतेच Happy

दिवाळीच्या पाडव्याला विवाहित बायांनी नवर्‍याकडून काही घेऊ नये मग, कारण नसलेल्यांना ते मिळत नाही म्हणून! >> तसंही ओवाळणी ही वरिष्ठांनी कनिष्ठांना घालायची गोष्ट -त्यामुळे घेऊच नये Wink

<<संस्कृती म्हंटल की सारासार विचार न कराता हेटाळणी करणार्‍यान्नी विचार करावा, त्यांचे मुद्दे योग्य असतिल पण तो संस्कॄचीचा दोश नसुन संस्कृतीचा विपर्यास झाल्यामुळे झालेली गत आहे. आपली संस्कॄती ही खरीच थोर आहे, काही रिती कालबाह्य झाल्या आहेत त्या सोडून किंवा त्यात योग्य ते बदल करुन, आपल्या संस्कृतीचे जतन व्हावे ही इच्छ>>

आपल्या संकृतीतल्या खटकणार्‍या गोष्टींवर टीका करणारे तेवढे सारासार विचार न करता संपूर्ण संस्कृतीची हेटाळणी करतात हा निष्कर्श कोणत्या आधारावर काढला?
संस्कृतीतले तुम्हाला अपेक्षित असलेले `योग्य' ते बदल अशा लोकांमुळेच घडून आले आहेत.
बाकी काही झालं तरी सर्वदृष्ट्या आमचीच संस्कृती श्रेष्ठ असं म्हणणारेच सारासार विचार करत नाहीत असं वाटतं.

बाकी हा धागा सुरु करताना `वडाला दोरे गुंडाळणे आणि उपास करणं यात वावगं काय आहे' अशी असलेली तुमची भूमिका आता या गोष्टी कालबाह्य झाल्या आहेत इथवर बदललेली दिसते. अभिनंदन!

अन्कॅनी, नवर्‍याच्या दीर्घायुष्यासाठी ही कल्पना जोडीदाराच्या दीर्घायुष्यासाठी अशी फिरवलीत. यात सोयिस्करपणा नसावा अशी आशा आहे.

स्त्री जेव्हा नवर्‍याच्या दीर्घायुष्याची कामना करते, त्यासाठी व्रत ठेवते , तेव्हा तिला नुसतंच नवर्‍याचं दीर्घायुष्य अपेक्षित नसतं. त्यापेक्षा जास्त तिला स्वतःचं अहेवपणी मरण अपेक्षित असतं. अहेवपणी मरण आलेल्या स्त्रीचा मृतदेह नवरीसारखा सजवला जातो, तेच एखाद्या स्त्रीचा नवरा मेला, की त्याच्या अंत्यसंस्कारांबरोबरच तिचे सौभाग्यालंकार(?) उतरवायचे विधीही आज अगदी एकविसाव्या शतकात शिकलेल्या लोकांतही केले जातात.
स्त्री घरातल्या सर्वांच्या आरोग्याची कालजी दैनंदिन जीवनात वहातच असते, जोडीला व्रतवैकल्ये करून देवाला त्यासाठी साकडंही घालत असते. पण त्या स्त्रीच्या आरोग्याबद्दल घरातली किती लोक जागरुक असतात?

आपली संस्कृती टिकवायचा प्रयत्न करायला, दुसर्‍या संस्कृतींच्या आक्रमणाचे भय का दाखवायला लागते?

हिंदु धर्माच्या प्रथा आणि चालीरीती ह्या मुस्लीम धर्माच्या प्रथा पेक्षा नक्कीच स्त्री प्रधान आहेत. त्याच्या प्रथा वाईट आहेत, जाचक आहे,

होय. सती जाणे, केशवपन.. या परंपरा मुसल्मानांच्याच तर होत्या ! त्या इंग्रजानी कायदा करुन बंद पाडल्या..

पण त्या स्त्रीच्या आरोग्याबद्दल घरातली किती लोक जागरुक असतात? >> हे जे काही बदल आपल्याला अपेक्षित आहेत हे तुम्ही कसे साध्य करणार आहात? आजही प्रत्येक देवळाबाहेरच्या रांगा पहा ते पहाता हे भिकार हे भंगार म्हणुन तुम्ही मत परिवर्तन करु शकाल का? पाच गोष्टींमधली एक गोष्ट वाईट आहे म्हणुन बाकिच्या चारही फेकुन द्या हा विचार उच्च आहे.

बाकी हा धागा सुरु करताना `वडाला दोरे गुंडाळणे आणि उपास करणं यात वावगं काय आहे' अशी असलेली तुमची भूमिका आता या गोष्टी कालबाह्य झाल्या आहेत इथवर बदललेली दिसते. अभिनंदन! >> माझे आधीचे पोस्ट न वाचता हा तुम्ही तुमचा करुन घेतेलेला समज आहे. वडाला दोरे का गुंडाळावे हे समजुन घ्या आणि वडाला दोरे न गुंडाळता तेच कसं साध्य करता येईल ते बघा. म्हणुन मी हेच म्हणतो आहे, की तुम्ही एखादी गोष्ट का करता त्याचे काय फायदे आहेत तोटे आहेत ते समजुन घ्या (ह्याला विज्ञाननिष्ठ निरुपण) म्हण्तो आहे.
वरती विज्ञाननिष्ठ निरुपणाची काय गरज आहे? असे प्रश्न मांडले आहेत त्या लोकांनी काय चांगल करता येईल हे मांडलेल नाही, म्हणजे आम्हीही काही करत नाही तुम्ही ही काही करु नका. प्रत्येक ठिकाणी स्त्रीयांनीच हे का कराव? ह्याह्च स्त्रीया, लिपस्टिक लावताना, टीकली लावताना, इतर स्त्री सुलभ गोष्टी करताना हा प्रश्न विचारतात का? तुम्ही हे सगळ करु नका किंवा हे करता म्हणुन हे करा अस मी म्हणत नाही. पण एक वट सावित्री हा दिवस आला की प्रत्येक गोष्ट स्त्रीया एकदम जाग्या होतात. बाकीचे सण ठीक आहे पण वाटसावित्रीला आम्ही भांडणारच, नवर्‍याचे दिर्घायुष्य हा एकच विचार आहे का ह्या सणा मागे? बाकीच्या महत्वाच्या बाबींना बगल देउन एकच रेटा का लावायचा? मकर संक्रात, हळदी-कुंकू, दिवाळी, गणपती ह्या सणां मध्ये का स्त्री वरिल अत्याचार दिसत नाही? का जिकडे तिकडे खिल्ली उडवाणारी विधानं दिसत नाहीत. आज एक सर्च मारा आणि बघा वड आणि यम ह्यावरुन चालेले टीपी दिसेल.

आणि संस्कृती म्हणजे नक्की काय? मायबोलीची देखिल एक संस्कृती आहे. ती आपण सगळ्यांनी मिळुन निर्माण केली आहे. एक चांगली संस्कृती आणी ती सर्वांच्या प्रयत्नाने टिकुन आहे म्हणुन तुम्ही आम्ही इथे येतो आहोत. लेखनाचा दर्जा, कविता पाडणे, अश्लील विधाने, भाषा आणि इतर अनेक गोष्टींबद्दल इथे तावातावाने वाद होतात. हे चालणार नाही, अ‍ॅडमीनकडे तक्रारी, हे मायबोलीच्या संस्कृती मध्ये बसत नाही, ह्यानी दर्जा खालावतोय काय नी काय? बर्‍याच ठिकाणी स्त्री स्वातंत्र्याचाच मुद्दा उचलुन उदो चालू आहे, व्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा का नाही? बरं ह्याची काय कारण असवित हे सांगितल तरी त्याना राग येतो. झाल ते झाल एक नवि सुरवात करु म्हंटल, तरी ते आधीच असं का? ह्याच रडगाण गाण्यत मग्न, प्रत्येक गोष्टीत नकारात्म दृष्टीकोन दिसुन येतो आणि इतरांची मने कलुषित करण्यात आनंद मिळताना दिसतो. एकाने चालू केलं की ईतर्ही आधळेपणाने अनुकरण करतात मग ते सण असोत किंवा नसोत. मा़झ्या मागे दहा जण आले म्हणुन मी शहाणा झालो मग मी खड्यात गेलोआ काय नी अजुन काही केल काय, मा़झी मर्जी, मी सांगितल नव्हत मागे या म्हणुन हा उद्दामपणा. जेंव्हा दहा लोक तुमच्या मागे येतात तेंव्हा त्या दहा लोकांची जाबाबदारी तुम्ही घेणं ही मानवता आणि हेच समाज कार्य.

कालच न्यूज चॅनल वाले, "दलित लडकी पे बलात्कार" म्हणुन बोंबलत होते. बलात्कार हा मुद्दा आहे की दलित हा मुद्दा आहे? "दलित और महीला सी एम हे राज्या में दलित लडकी पे बलात्कार". म्हणजे पुरुष सी एम असेल तर बलात्कार चालेल, अदलित सी एम असेल तर बलात्कार चालेल? बलात्कार्‍याला फाशीची शिक्षा व्हावी का नको हे का वादाचे मुद्दे? त्यात एक महीला कार्यकरतीच ह्या ला विरोध करताना दिसली,मला तर त्या मागे इतरां पेक्षा काही तरी वेगळा विचार मांडायचा अट्टाहास दिसतो. अत्याचार्‍याला योग्य दंड मिळावा म्हणुन आणि पिडीताला न्याय मिळावा आशी कळकळ कुठेच दिसत नाही. ह्या हिन कृती मागेही फक्त राजकारण होताना दिसत. मुद्दा काय तर कुठल्या गोष्टीला तुम्ही प्राधन्य देता? माझ्या मते पर्यावरण महत्वाच तर तुमच्या मते उपवास करावा किंवा नाही करावा याला प्राधान्य.

की त्याच्या अंत्यसंस्कारांबरोबरच तिचे सौभाग्यालंकार(?) उतरवायचे विधीही आज अगदी एकविसाव्या शतकात शिकलेल्या लोकांतही केले जातात.>> आता हे बदलायच म्हंटल तर पुर्ण संस्कृतीचे हेटाळाणी करुन उपयोग आहे का? ज्या वाईट चालीरिती आहेत आणि त्या आचरणात आणणार्‍याना त्या कशा वाईट आहेत हे समजवुन सांगणे गरजेच आहे. जे चांगल आहे ते करु आणि हे वाईट आहे त्याचा त्याग करू हे म्हणायला तुम्ही तयार नाही. सगळ्याच गोष्टींना चुक म्हणालात तर, "ही लोक चांगल असो किंवा वाईट असो ते वाईटच म्हणणार ह्यांना संस्कृती खुपते, का वाईट हे सांगत नाहीत, मग ह्यांच ऐकाच कशाल? आम्ही जे करतो आहोत तेच करत राहू" अस म्हंटलतर तुम्ही काय साध्य केलत?

इतर ठिकाणच्या चर्चेत मांडलेला मुद्दा इथे पुन्हा मांडतो आहे.

"आपली संकृती स्त्रीयांचा आदर कारावा हेच सांगते.आज आपला देश सर्वात भ्रष्ट आहे, आयटी मध्ये पुढे आहे, प्रगतशिल आहे, अस्वच्छ आहे आणि बराच काही चांगला वाईट आहे, त्याचा आणि आपल्या संस्कृती काही एक संबंध नाही.
अ‍ॅटम बाँब बनवता येतात म्हणुन अणुतंत्रज्ञान वाईट कसं? तस लोक काय वागतात हा त्यांच्या संस्काराचा प्रश्न आहे संस्कृतीचा नाही.

स्त्रीवर अत्याचार करा सांगणार्‍या संस्कृतीत, देवी ह्या सर्व शक्तीशाली कशा मानल्या नसत्या.? शक्ती हा शब्दच स्त्रीलिंगी कसा असता? आईला सर्वात वरच स्थान कसं मिळाल असतं? देवांना आईची उपमा का दीली असती, आईबाप आणि मायबाप म्हणताना माय आई हे शब्द पहीके का येतात?
झाडाच्या फांद्या नासल्या आहेत मुळ नाही. तांदळाच्या पोत्यात खडे आले म्हणुन आपण तांदळाच पोतं खड्यांच म्ह्णुन फेकुन देत नाही, आणि भातशेती खड्यांची शेती म्हणुन पेटवुन देत नाही. काळपरत्वे खडे हे येणारच, किडं ही लागणारच ती वेळच्या वेळी शोधुन, तांदुळ स्वच्छ ठेवणे हे जास्त योग्य. दुर्दैवाने आत्ता अख्ख पोत कीडलं आहे आणि दोश शेताला आणि शेतकर्‍याला दिला जातो आहे."

रस्ता चुकलेल्या योग्य मार्गावर आणायला जाउ म्हटलत तर त्याच्या सकट तुही खड्यात जा हे तत्वज्ञान मला पटत नाही. काय चांगल काय वाईट ह्याची चर्चा ही करायला तुम्ही तयार नाही, बदल घडवुन आणणे तर दुरच.

जाता जाता..
आपली संस्कृती टिकवायचा प्रयत्न करायला, दुसर्‍या संस्कृतींच्या आक्रमणाचे भय का दाखवायला लागते? >> जर सत्य परिस्थीतीच तुम्हाला भय वाटत असेल तर डोळेझाक करुन ती बदलणार नाही. मी फक्त सत्य परिस्थीती सांगितली आणि त्याच तुम्हाला भय वाटलं यातच सगळ आलं.

असो कुणाला जर "आपले सणांत काय चांगले काय वाईट ही चर्चा कराची असेल " तर सुरवात करु नाहीतर हा विभाग बंद करायला काहीच हरकत नाही.

त्या इंग्रजानी कायदा करुन बंद पाडल्या.. >> वाह, म्हणजे राजाराम मोहन राय, महात्मा फुले, सत्य शोधक समाजाच श्रेय इंग्रजाना का? इंग्रज स्वातंत्र्या बरोबर, वैचारीक गुलामगीरी देखिल देउन गेले.
जिजाबाई सती गेल्या होत्या का? की शिवाजी राजे मुसलमान होते?

"शास्त्र असे सांगते"
सणवार, व्रते, प्रथा, परंपरा या संदर्भात जाणून घेण्या साठी आवर्जून वाचावे असे हे एक पुस्तक आहे.

अजून एक या विषयाशी संबंधीत छान पुस्तक नुकतेच वाचले. मुख्य म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोनातून आणि खेरीज नविन पिढीला या सर्वाबद्दल माहिती असावी व त्याचे बहुतांशी तर्कसुसंगत विवेचन या पुस्तकात आहे. शिवाय आपल्याकडील व पश्चिमेतील डॉक्टर, संशोधक ई. चे अनुभव व स्पष्टीकरण हेही असल्याने मंत्र, तंत्र, वगैरेकडे बघायचा सर्वसमावेशक दृष्टीकोन मिळतो असे वाटते. काही थोडे चमत्कार प्रसंग दिले आहेत पण ते "प्रार्थनेची शक्ती" या अनुशंगाने दिले आहेत.
तरी ईच्छुकांनी आवर्जून वाचावे:
"स्तोत्र मंत्रांचे विज्ञान (काल-आज-ऊद्या)"- प्रसाद प्रकाशन, पुणे

प्रस्तावनेत व शेवटी लेखक/प्रवचनकार लिहीतातः
या सर्व प्रवचन-लेखनामागचा उद्देश एव्हडाच आहे की, तरूण पिढीला ऋषिमुनींबद्दल, आपल्या प्राचीन संस्कृतीबदल आदर व अभिमान वाटावा व ज्या बुध्दिजीवी व तर्कवाद्यांना हे सर्व अर्थहीन, अंधश्रध्देचे, अवैज्ञानिक वाटते त्यांच्या दृष्टिकोनात थोडा तरी बदल व्हावा.

जाचक प्रथा या घराणे, पैसा, सत्ता असली की बदलतात.. राजघरान्यात काही का चालेना, सर्वसामान्य स्त्रीयांसाठी असनारी सतीची चाल इंग्रजांमुळेच बंद पडली, हे वास्तव आहे. लोकमत जर अनुकुल असते, तर स्पेशल कायदा करायची गरजच पडली नसती.

मी सद्यथितीतल्या चालिरितिंनाच संस्कृति मानतो.. जेंव्हा चालीरिती बदलतात तेंव्हा संस्कृती बदलते असं समजतो. त्यामुळे पुराणात 'स्त्री'चे गोडवे गायले असले तरी सध्या घरोघरी काय चालते ते मला महत्वाचे वाटते. आणि स्त्रीवर तिच्या जन्माच्या आधीपासून अन्याय करणारे बहूतेक लोक धार्मिक आणि चालिरिती पाळणारेच असतात! तशी आपली संस्कृती/धर्म विरोधाभासांनी ठासून भरलेली आहे. उदा. सर्व शक्तीशाली देवी आणि स्त्रियांची वागणूक. आता स्त्रीला योग्य वागणूक मिळावी म्हणून देवीचा दाखला देण्याएवढी लोकं अडाणी आहेत का? धर्म-संस्कॄतीचे references न देता एक माणुस म्हणून स्त्रीला समान कर्तव्य/अधिकार देणं सुशिक्षित लोकांनाही पटू नये?

माझ्यामते बहुतेक जण त्यांच्या कुवतीनुसार विचार करूनच चालीरिती पाळायच्या की नाही ते ठरवतात. बहुतांश जणांना जर वटसावित्रीचा सण ridiculous वाटत असेल तर त्यांनी काहिही विचार न करता हे मत बनवलय असं तू का मानतोस? उलट जुन्या चालीरिती अंधळेपणाने पाळणार्‍यांपेक्षा त्या त्यागणारे निदान थोडातरी विचार करतात... त्यामुळेच तुझे विचार दुटप्पी वाटतात. वडपैर्णीमेचे पूर्वीचे संदर्भ आता राहिले नाहीत हे तू मान्य करतोस असं वाटतय. पण एकिकडे वड/यम यांची टिंगल करणार्‍यांचा तुला राग येतो. मग वडाभोवती उगाच दोरे गुंडाळणार्‍यांचा का येत नाही? त्यांना थोडीच पर्यावरणाशी काही घेणंदेणं असतं? ते थोडीच तुझ्यासारखे 'विज्ञाननिष्ठ निरुपण' करतात. तरिही तुझा या प्रथेला विरोध दिसत नाही. त्यामुळे एकंदर काय, 'कुठल्या का' कारणासाठी जुन्या चालिरिती पाळण्यात तुला रस वाटतोय, असा सूर निघतो. जी लोकं अंधपणे पाळणार नाहीत त्यांच्यासाठी 'विज्ञाननिष्ठ निरुपण'!!!

आणि हे (so called) 'विज्ञाननिष्ठ निरुपण' चुकीच्या प्रथांचे देखिल होउ शकते. यावर तुला काय वाटत? (उदा. Eugenics: Eugenics is the "applied science or the bio-social movement which advocates the use of practices aimed at improving the genetic composition of a population," usually referring to human populations.)

कुठलाही सण आला की असला एक धागा निघतोच ! आता सरळ सणांच्याच नावाने पर्मनंट धागे करावेत, दरवेळी त्यातच लिहायचे... आगामी आकर्षण : नागपंचमी, हादगा, गणपती स्पेशल

आपल्या चालीरितीचं आणि सणांच विज्ञाननिष्ठ निरुपण हे ह्या विभागाच प्रयोजन आहे.>> कशासाठी? काय प्रयोजन? आपल्या संस्कृतीमधल्या गोष्टी सायंटीफिक आहेतच, असल्याच पाहिजेत हा अट्टाहास कशाला? आणि ज्या शास्त्राच्या मदतीने किंवा कसोटीवर ही तपासणी चालली आहे ते शास्त्र तरी आपल्या संस्कॄतीचे प्रॉडक्ट आहे का? मग त्याच्या चौकटीतपण आमचेच खरे, आम्ही केंव्हापासूनचे शाणे हा सोस कशाला?

<<पण त्या स्त्रीच्या आरोग्याबद्दल घरातली किती लोक जागरुक असतात? >> हे जे काही बदल आपल्याला अपेक्षित आहेत हे तुम्ही कसे साध्य करणार आहात?>>
बदल घडायला सुरुवात झालीय. स्त्रीला तिचं अस्तित्व, आरोग्य आणि आयुष्य इतर कुणाच्याही इतकंच महत्त्वाचं हे पटायला लागून.

<<माझे आधीचे पोस्ट न वाचता हा तुम्ही तुमचा करुन घेतेलेला समज आहे. वडाला दोरे का गुंडाळावे हे समजुन घ्या आणि वडाला दोरे न गुंडाळता तेच कसं साध्य करता येईल ते बघा. >>बरं . मला नाही समजलं. सांगा वडाला दोर का गुंडाळले जायचे?
पर्यावरणरक्षणाचे प्रयत्न करताना त्याची गरज संस्कृतीरक्षणाऐवजी दैनंदिन जगण्याशी घातली तर /तरीही लोकांना पटेल.
<असे प्रश्न मांडले आहेत त्या लोकांनी काय चांगल करता येईल हे मांडलेल नाही, म्हणजे आम्हीही काही करत नाही तुम्ही ही काही करु नका.> हे कुठे दिसलं? मी आधीच म्हटलं की असे प्रश्न विचारणार्‍यांमुळेच समाजातल्या काही कुप्रथा नष्ट झाल्यात.
<प्रत्येक ठिकाणी स्त्रीयांनीच हे का कराव??> हो. मग त्याचं विज्ञाननिष्ट निरुपण करा की.

<<की त्याच्या अंत्यसंस्कारांबरोबरच तिचे सौभाग्यालंकार(?) उतरवायचे विधीही आज अगदी एकविसाव्या शतकात शिकलेल्या लोकांतही केले जातात.>> आता हे बदलायच म्हंटल तर पुर्ण संस्कृतीचे हेटाळाणी करुन उपयोग आहे का? ज्या वाईट चालीरिती आहेत आणि त्या आचरणात आणणार्‍याना त्या कशा वाईट आहेत हे समजवुन सांगणे गरजेच आहे. जे चांगल आहे ते करु आणि हे वाईट आहे त्याचा त्याग करू हे म्हणायला तुम्ही तयार नाही. सगळ्याच गोष्टींना चुक म्हणालात तर, "ही लोक चांगल असो किंवा वाईट असो ते वाईटच म्हणणार ह्यांना संस्कृती खुपते, का वाईट हे सांगत नाहीत, मग ह्यांच ऐकाच कशाल? आम्ही जे करतो आहोत तेच करत राहू" अस म्हंटलतर तुम्ही काय साध्य केलत?>>

हा निष्कर्श कुठून आला? एखादी गोष्ट पिढ्यानपिढ्या चालू आहे, ती कशाकरता याचा विचार एखादा माणूस करतो. जेव्हा पटेल असं उत्तर मिळत नाही, तेव्हाच ती सोडायचा विचार करतो. तेव्हा त्याला यात चांगलं काय याचं उत्तर मिळत नाही. तर 'मग आतापर्यंत चालत आलं ते काय उगाच? ऋषीमुनींनी सांगून ठेवलंय(?) म्हणजे त्यामागे काहीतरी कारण असेलच ना. असं उत्तर मिळतं. आपल्याला दिसलेली एखादी गोष्ट किंवा काही गोष्टी वाइट म्हणजे सगळी संस्कृतीच वाईट, द्या टाकून असं म्हणणारा माझ्या पाहण्यात नाही. तुम्ही मात्र ही विधानं विरोधकांच्या तोंडात कोंबताय.

<< काय चांगल काय वाईट ह्याची चर्चा ही करायला तुम्ही तयार नाही, बदल घडवुन आणणे तर दुरच.>> चर्चा होऊन बदल घडूनही आले. तुम्ही जरा उशिरा जागे झाला असाल. (नॉट लिटरली अँड नॉट अ‍ॅट ऑल पर्सनली)

<<आपली संस्कृती टिकवायचा प्रयत्न करायला, दुसर्‍या संस्कृतींच्या आक्रमणाचे भय का दाखवायला लागते? >> जर सत्य परिस्थीतीच तुम्हाला भय वाटत असेल तर डोळेझाक करुन ती बदलणार नाही. मी फक्त सत्य परिस्थीती सांगितली आणि त्याच तुम्हाला भय वाटलं यातच सगळ आलं.>>
अजिबात भय वाटत नाही. चांगलं असेल ते काळाच्या ओघात टिकेलच असा विश्वास आहे.तसं भय दाखवायचा प्रयत्न होतोय हे मात्र लक्षात येतंय.

बापरे कुठुन कुठे पोचली सगळी चर्चा?
असो. परवा सकाळमधे वाचल्याच स्मरणात आहे की कुठल्याश्या गावात काही पुरुषांनीही वटपौर्णिमा साजरी केली अगदी वडाच्या झाडाला दोरे गुंडाळुन वगैरे.
बाकी चांगली माहिती मिळतेय चालु राहु देत.

Pages