विंबल्डन - २०११

Submitted by Adm on 15 June, 2011 - 11:06

विंबल्डन खुल्या टेनिस स्पर्धेचे यंदाचे १२५ वे वर्ष. यंदा ही स्पर्धा २० जून ते ३ जुलै दरम्यान रंगणार आहे.
आज जाहिर झालेल्या मानांकनानुसार पुरूष एकेरीत नदाल, जोको, फेडरर आणि मरे तर महिला एकेरीत वॉझनियाकी, किम, झ्वोनारेव्हा, ना ली ह्यांना अनुक्रमे पहिले, दुसरे, तिसरे आणि चौथे मानांकन मिळाले आहे. भारताच्या महेश भुपती आणि लिएंडर पेस ह्यांना पुरूष दुहेरीत तिसरे तर रोहन बोपण्णा आणि पाकिस्तानच्या एसान कुरेशी ह्या जोडीला चौथे मानांकन मिळाले आहे.
गतविजेती सेरेना विल्यम्स आणि माजी विजेती व्हिनस विल्यम्स ह्यांनी दुखापतीतून सावरून ह्या स्पर्धेद्वारे पुनरागमन निश्चित केलं आहे. ह्या दोघींना अनुक्रमे आठवे आणि चोविसावे मानांकन मिळाले आहे.

मानांकनानुसार खेळाडू आपापले सामने जिंकत गेल्यास उपांत्यपूर्व फेर्‍या अश्या होतील..

पुरूष एकेरी :
राफा वि बर्डिच
मरे वि रॉडिक
फेरर वि फेडरर
सोड्या वि जोको

महिला एकेरी :
वोझजियाकी वि शारापोव्हा
ना ली वि सेरेना
स्किव्होनी वि अझारेंका
क्विटोव्हा वि झ्वोनारेव्हा (ह्या भागात व्हिनस पण आहे)

हा धागा यंदाच्या विंबल्डनविषयी चर्चा करण्यासाठी....

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तिथली चर्चा आणि पोस्टची संख्या वाचूनच फेफरं भरली होती मला.. त्यामुळे तिथली चर्चा इथे कशाला परत.. आपला घोडा असाही फेडेक्सच आहे.. त्यामुळे काय फरक पडत नाय... पूर्वी जसा बेकर होता तसा...

सरिना गेली aegon international मधुन. हि तिची पहिली WTA after come back. कशी काय खेळतेय?

ओह्, ह्यावेळी त्या विलीयम्स् भगिनी असतील का? स्टेफी ग्राफ खेळायची थांबल्यावर Women's tennis मधला इंटरेस्ट कमी होत गेला आणि विलीय्म्स् भगिनी आल्यापासून तो शून्य झाला ..

(ही वाईट वृत्ती झाली पण मी प्रामाणिकपणे कबूल करतेय ..)

गो ज्योको, गो नाडाल! :p

Women's tenis मधला इंटरेस्ट कमी होत गेला >>> इतका की टेनिसचे स्पेलिंग लक्षात नाही ? Proud

माझा तो ज्योको >>>> Rofl चमनला बोलवा... ! तुम्ही तुमचा तो फेडरर म्हणा मग.. Proud

ही वाईट वृत्ती झाली >>> हो अगदी अगदी.. Proud व्हिनस चांगली खेळते विंबल्डनमध्ये.. म्हणजे तिचं खेळणं सेरेना इतकं ताकदवान (आणि रानटी) वाटत नाही..

आत्ताच हाती आलेल्या वृत्तानुसार पायाला झालेल्या दुखापतीमुळे किमने विंबल्डन स्पर्धेतून माघार घेतली आहे. Sad

"I'm very very disappointed to have to withdraw from Wimbledon after injuring my foot again at the tournament in 'S Hertogenbosch. At this moment I feel frustrated that it has to happen now before one of my favourite tournaments. I've always enjoyed being a part of the Wimbledon atmosphere but I have no other choice now but to rest, recover and to not play tennis for a few weeks."

असं तिने सुत्रांशी बोलताना सांगितलं...

आपला घोडा तर नदाल . चांगली बातमी म्हणजे त्याला No 1 Seeding मिळालय .
म्हणजे जोको आणी फेडरर परत एकमेकात झुंजून मरणार Happy

ह्यावेळी फेडरर मरावा .. >> पण माझ्या मते तरी जोको मेलेला नदालला (पर्यायाने मला) चांगला .
फ्रेंच मधे पण जर फायनलला जोको आला असता तर काय खर नव्हत रे बाबा .

मी या धाग्यावर बहिष्कार टाकत आहे.
हल्ली कोणीही येतात आणि काहीही बडबडतात. त्यांना टेनीसमधले ओ की ठो कळत नाही! (उदा. सशल आणि टण्या)

धाग्यास शुभेच्छा!

हेमाशेपो.

'कावळ्याच्या शापाने गाय मरत नसते' हे ज्या टेनीस फॅन्स ना पटत नाही त्यांनीं ओ की ठो न कळाणार्‍या लोकांपायी असे बहिष्कार घातले तर तुम्हारी बला से! :p

Pages