माईनमूळ्याचे लोणचे / गरमरनु अथाणु ( इतर नावे Coleus forskohlii , मंगनीबेर )

Submitted by दिनेश. on 3 May, 2011 - 14:17
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

क्ष

क्रमवार पाककृती: 

क्ष

अधिक टिपा: 

क्ष

पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वरच्या साहित्यात मिरीदाणे नाहियेत मग फोटोत छोटे बॉल्स/corns/kernels दिसतात ते काय आहे?

माईनमुळ्याचं लोणचं ही माझी आठवण बेळगावशी निगडीत आहे .. मस्त लागतं अगदी!

माईनमुळा म्हणजे अळकुड्या, आलं टाईप काहीतरी प्रकार दिसतोय.

>> मुळंच ती पण अळकुड्या टाईप नाही .. आलं, हळद ही फॅमिली .. बरोबर का दिनेश?

हे चविष्ट लागते. एक चांगला पदार्थ! धन्यवाद!

कोल्हापूर व्यतिरिक्त इतर कुठे मिळते का>>> या प्रश्नाचे उत्तर असे आहे की कोल्हापूरची बायको केली तर मिळू शकते. माझी बायको कोल्हापूरची असल्यामुळे .....

.... हे लोणचे न खाताही तिच्या नुसत्या बोलण्यातूनच मला खाल्यासारखे वाटते हे अवांतर!

अभिनंदन दिनेशराव,

आणखीन एक चांगला पदार्थ लिहिलात!

-'बेफिकीर'!

(अवांतर क्रमांक २ - एक फोटो अजून राहिलेला आहे.)

नाही आले हळद कूळ नाही ते. याचे झुडुप असते. पाने तूळशीसारखी असतात. इथे त्याला स्थानिक लोक, सेंट लीफ म्हणतात.

विहिरीत येतात ना माईनमुळं?
मस्त लागते हे लोणचे.
कैरी वगैरे घालू नये. Happy

Happy दिनेश, आमच्या घरच्या अनेक लोणच्यातल सगळ्यात मेन लोणच आहे हे. ह्याच्यानंतर छन्न्याचे लोणचे. हे ताज , करकरित असताना सगळ्यात छान लागत. याच्याशिवाय आमच्या घरातल जेवण कंपलीट होत नाही.
आणि माईनमुळे सगळ्यात जास्त बेळगावला होतात. त्यामुळे आम्ही अजुनही ते शक्यतो बेळगाव मधुनच आणतो.
ताजे तोडुन आणलेले माईनमुळे पाण्यात घालून ठेवायचे. आणि मग चमच्याने त्याची साल काढायची. अतिशय किचकट प्रकार आहे तो. हाताला सगळा राप बसतो. मग चिरुन, कोरडे करुन मसाला घालायचा.

बेळगावच्या पाटणकरांची इतर सगळी लोणची चांगली असतात. माईनमुळ्याच पण मिळत. पण अतिशय मऊ झालेल आणि खारट असत. त्यामूळे नाही चांगल लागत. इथे आहे http://indiapickles.com/pickles.htm

घरुन हे आईच्या हातच लोणच आल कि फोटो टाकिन. हळदी सारख नाही म्हणता येणार . आणि चव थोडी आंबटसर असते.

धन्स सीमा.
खरंच एवढ्या किचकट प्रोसेसनी हे लोणचे करायची आयडीया पहिल्यांदा ज्याला आली असेल तो धन्य. कोल्हापूरात तयार मिळतात ती पण जरा मऊ पडलेली असतात. ताजेच लोणचे खायला छान लागते.
बेळगाव बद्दल मला इथेच कळलं.

वाव! एकदम तोंपासु! पुर्वी खाल्लयं हे लोणचं पण माईनमुळा आणि ओली हळद वेगवेगळे आहेत हे आजच समजलं.

छन्न्याचे लोणचे आणि माईनमुळ्याचे लोणचे हे खास बेळगाव कोल्हापूरचे आकर्षण!!!

पप्पांच्या आजोळी लिंबू-माईनमुळा-हिरवी मिरची असा पण कॉम्बो असतो!!! अफाट लागते ते पण!

मस्त दिसतय ह्म लोणचं.
बरंच ऐकलय (फक्त) या लोणच्याबद्दल. पिंजरा की कुठल्याश्या सिनेमात पण याचा उल्लेख आहे वाटतं.

वा.. फोटो काय जबरी दिसतोय दुसरा.. न्युयॉर्करमधल्या लोणच्याची आठवण झाली.

आजवर माईनमुळे फक्त ऐकलेली. आज पाहायलाही मिळाली. हे लोणचे कधीच खाल्ले नाहीय हे सांगणे नलगे Happy पण बेळगावात माईनमुळे मिळताहेत म्हणजे मला एकदा करुन बघायचा चान्स आहे. माईनमुळांचा सिजन असतो की वर्षाचे १२ही महिने मिळतात?

साधना, सिझनलच असणार आणि याच दिवसात मिळत असणार (हे दिवस लोणच्याचे ना !)
नाहितर कोल्हापूरला, तयार लोणचे मिळते.

सशल, दिनेशदा, मीही हे लोणचे पहिल्यांदा बेळगावलाच आल्यावर खाल्ले होते.
घरी बनविण्याचा खटाटोप मात्र मी केला नाही. पण एकंदरीत इथे खूप प्रसिद्ध आहे हा प्रकार.

हं.........सांगलीला हे मिळायचे. आई नेहेमी याचे लोणचे करायची. मी कधी केलं नाही. पण मस्तच लागते!

Pages