स्तोत्रे, श्लोक, प्रार्थना यांचा संग्रह

Submitted by अश्विनी के on 19 January, 2010 - 03:10

नमस्कार,

लहानपणी शुभंकरोती म्हणताना आपण काही काही स्तोत्रे, श्लोक म्हणत असू. आपल्या ऋषी-मुनींनी तपसाधना करुन अनेक स्तोत्रे, स्तवने सिद्ध केली आहेत. त्यातील काही आपल्या नित्य पठणात असतात तर काही तात्कालीक कारणासाठी उपासना म्हणून म्हटली जातात. ह्या स्तोत्रांमधे बीजमंत्र सामावलेले असतात व त्यांचे जमेल तसे पठण निश्चितच सकारात्मक बदल घडवून आणते, आपल्या विचारात, प्रारब्धात. विचार सात्विक व्ह्यायला लागले की हातून चूका कमी कमी घडू लागतात, मन (जे आपले प्रारब्ध घडवते) आपल्या ताब्यात येऊ लागते. सगळ्यात ओढाळ मनासारखे काहीच नाही. आजच्या पिढीला व पुढच्या मोठे होऊ घातलेल्या पिढीला मनावर ताबा मिळवण्याची खूप गरज आहे. पुढची पिढी दहशतवादी विचारांची बनायला नको आहे.

प्रकाशाचे उपासक हे शुद्ध दैवतांचीच उपासना करतात ज्यामधे स्वतःचे, कुटुंबाचे, समाजाचे, प्रदेशाचे भले व्हावे, रक्षण व्हावे हा हेतू असतो तर अंधाराचे उपासक हे क्षुद्र दैवतांची उग्र प्रकारे उपासना करतात ज्यामधे दुसर्‍याचे वाईट व्हावे हाच मुख्य हेतू असतो, तंत्रविद्येचा, जारण मारणाचा वापर असतो.

इथे शुद्ध दैवतांच्या उपासनांमधे समावेश होऊ शकणार्‍या स्तोत्रं, श्लोक, प्रार्थना शक्य असल्यास कारण व फलितासह लिहिणे अपेक्षित आहे (मायबोलीवर दुसर्‍या प्रकारचे सदस्य असूच शकत नाहीत म्हणा Happy ) जेणेकरुन मायबोलीवर एकेच ठिकाणी सगळे मिळू शकेल, गूगलवर शोधत बसायची आवश्यकता नाही. स्तोत्र, अध्याय, श्लोक मोठे असतील तर लिंकही देण्यास हरकत नाही (अ‍ॅडमिनची हरकत असल्यास तसे कृपया कळवावे व त्यांच्या आदेशानुसार लिंका देऊ नयेत.)

सर्वांना धन्यवाद Happy आतापर्यंत खालील स्तोत्रे इ. जमा झाली आहेत. जसजशी भर पडेल तसतशी यादी अपडेट करायचा प्रयास करेन.

http://sanskritdocuments.org/sanskrit/by-category/stotra.php इथे भरपूर स्तोत्रं पीडीएफ मध्ये आहेत.

****************************************************************************************************
(खालील स्तोत्रांच्या लिंक अनुक्रमणिका रुपाने देण्याचे काम शाम भागवत ह्यांनी केले आहे. त्यांना मनःपूर्वक धन्यवाद)

पान १
१) गायत्री मंत्र
२) दत्तबावनी
३) श्लोक
४) घोरकष्टोद्धरण स्तोत्र
५) तुळजा भवानी - लिंक
६) श्री भवानी अष्टक
७) श्री साईसच्चरित - लिंक
८) शिवपञ्चाक्षर स्तोत्र
९) करुणा त्रिपदी
१०) धन्य धन्य हो प्रदक्षिणा
११) श्री दत्तस्तव स्तोत्र
आणि श्री वासुदेवानंदसरस्वती (टेंबेस्वामी) यांच्याबद्दलची लिंक केदार जोशी यांच्या पोस्टमधे.
पान २
१२) येई वो विठ्ठले
१३) श्री समर्थ रामदास - लिंक
१४) नव-नाग स्तोत्र
१५) गणपती अथर्वशीर्ष - लिंक
१६) नि:शंक हो निर्भय हो मना रे (श्री स्वामी समर्थ तारक मंत्र)
१७) दत्तमाला मंत्र
पान ३
१८) श्री स्वामी समर्थाष्टक
१९ ) श्रीगणपती स्तोत्र
20) श्री मारुती स्तोत्र (भीमरुपी महारुद्रा)
२१) नवग्रह स्तोत्र
२२) महारुद्र अवतार हा सूर्यवंशी
२३) हनुमंताचा धावा
२४) श्लोक
२५) तीर्थप्राशन, करदर्शन व भूमीवंदन श्लोक
२६) संपूर्ण नवनाग स्तोत्र
२७) शुभंकरोति कल्याणम
२८) कालभैरवाष्टक
२९) श्री गणेश पन्चरत्न स्तोत्र
३०) शनी मंत्र
३१) रुद्र
पान ४
३२) संपु���्ण आरती सन्ग्रह /मनाचे श्लोक/ भगवद गीता - लिंक (गौतम्७स्टार यांची पोस्ट)
३३) श्री आदि शंकराचार्यांनी रचलेली स्तोत्रे - लिंक (चिनूक्स यांची पोस्ट)
३४) जयजयाजी गणपती (गणपती स्तोत्र)
३५) जगन्नाथपंडितांचं गंगालहरी - लिंक (चिनूक्स पोस्ट)
३६) प्रार्थना
३७) श्रीसूक्त - लिंक (चिनूक्स पोस्ट)
३८) विविध स्तोत्रं (ऑडियो) - लिंक (चिनूक्स पोस्ट)
३९) गणेश / विष्णू / राम / हनुमान इत्यादींची स्तोत्रे - लिंक्स (मीनल यांचे पोस्ट)
४०) आद्य शंकराचार्य विरचित तुलजाष्टक
४१) सुंदरकाण्ड - लिंक (GauriC यांची पोस्ट)
४२) पुरुषसूक्त
४३) http://khapre.org/ (स्तोत्रे / पोथ्या व इतर वाड्मयाचा संग्रह (महेश यांची पोस्ट)
44) दत्तलीला मंत्र
४५) मंगलाष्टके - लिंक (महेश यांची पोस्ट)
४६) लक्ष्मी श्लोक / शारदा स्तवन / गणपती श्लोक
पान ५
४७) स्वामी समर्थ माला मंत्र
४८) सूर्याष्टक
४८) हनुमान चलिसा - लिंक (GauriC यांची पोस्ट)
४९) वदनी कवळ घेता - मातृभूमीसाठी
५०) भगवद्गीता / दासबोध - लिंक (saket यांची पोस्ट)
५१) अष्टलक्ष्मी स्तोत्र - लिंक (GauriC यांची पोस्ट)
५२) शांती मंत्र
५३) शिवताण्डव स्तोत्र
५४) श्रीरामाचा पाळणा (pdf फाईल)
५५) महारुद्र अवतार हा सूर्यवंशी - संपूर्ण - जयवी यांची पोस्ट
५६) श्री समर्थ रामदासकृत मारुती स्तोत्र (राष्ट्राच्या सर्वांगिण रक्षणासाठी)
 ५७) मेधासूक्त - लिंक (कदंब यांची पोस्ट)
५८) विष्णूसहस्रनाम / भगवद्गीता - लिंक (महेश देशपांडे यांची पोस्ट)
५८) चर्पटपञ्जरिका स्तोत्रम.
५८) सुंदरकाण्ड ध्वनीरुपात
पान ६
५८) नुपेक्षी कदा राम दासाभिमानी
५९) सूर्यनमस्कार
६०) नवग्रहपीडाहरस्तोत्र
पान ७
६१) रुद्राष्टक - लिंक (माधव यांची पोस्ट)
६२) श्री दुर्गासप्तशती सार
६३) ॠणमोचनमहागणपतिस्तोत्रम्
६४) दत्तदशक स्तोत्र
६५) श्रीमहिषासूरमर्दिनी स्तोत्र
६६) कैलासराणा शिवचंद्रमौळी...
पान ८
६७) श्रीमहालक्ष्मी नमन अष्टक
६८) आदिमाता महिषासुरमर्दिनी चण्डिकेची आरती
६९) श्रीविष्णो: षोडशनामस्तोत्रम्
७०) रामरक्षा
७१) श्री हनुमंतांच्या उपासनेचे कारण व कार्य.
पान ९
७२) श्रीरामांची कर्पुरआरती
७३) मारुती स्तोत्र आणि त्याचे निरुपण (लिंक)
७४) संगितातल्या विविध रागांमधे गायल्या गेलेल्या दत्तबावनीची लिंक (अभि यांची पोस्ट)
७५) पवमान सूक्त - लिंक (अभि यांची पोस्ट)
७६) गणपती स्तोत्र (मराठी)
७७) गायत्री मुद्रा (व्हिडियो) - अभि यांची पोस्ट
पान १०
७८) दयाळू तू देवा खचित आहेसि - संत एकनाथांची रचना
७९) श्री आदिमाता शुभंकरा स्तवनम्
८०) श्री आदिमाता अशुभनाशिनी स्तवनम्
८१) सनातनदेवीसूक्त
८२) शिवषडाक्षर स्त्रोत्र
८३) श्री महालक्ष्मी स्तोत्र
८४) देवीची आराधना
८५) स्वामी समर्थांना स्नान घालताना किंवा स्वामी समर्थांच्या पादुकांवर अभिषेक करताना म्हणावयाचे पद
८६) श्रीमद आद्य शंकराचार्य विरचित नर्मदाष्टक
८७) श्री. प.पू. वासुदेवानंद सरस्वती लिखित "आरती नर्मदेची"
८८) श्रीदासगणूंनी रचलेले श्रीसाईबाबांवरील पद
पान ११
८९) धर्मराजाचे दुर्गास्तवन
९०) अन्नपूर्णास्तोत्रम्
९१) श्रीवासुदेवानंदसरस्वती विरचित "उद्धरी गुरुराया, अनसूया तनया दत्तात्रेय''
९१) सद्गुरु स्तोत्र
९२) विविध आरत्या महालक्ष्मीची आरती
श्री मंगेशाची आरती
श्री शांतादुर्गेची आरती
अंबेची आरती
विडा
९३) श्री रंग बावनी
९४) आपल्या मुलांच्या सुखी भविष्यासाठी देवाची प्रार्थना
पान १२
९५ ) दत्तबावनी (मराठी)
९६) नृसिंहसरस्वतीस्वामी महाराजांवरचे एक मराठी कवन
९७) अमोघशिवकवचम
९८) प्रभो बालांचा तू अससि एक मित्र थोर
९९) अंबे जगदोद्धारिणि गे |
१००) नृसिंहसरस्वती अष्टक
१०१) सत्राणे उड्डाणे हुंकार वदनी..
१०२) लतादीदीं च्या आवाजातली रामरक्षा - श्रीकांत यांच्या पोस्टमधील लिंक
१०३) सूर्यस्तुती
पान १३
१०४) दुर्गाकवच - लिंक (माधव यांची पोस्ट)
१०५) बजरंग बाण
१०६) प्रज्ञाविवर्धन स्तोत्र - लिंक
१०७) श्रीदेवी अपराधक्षमापन स्तोत्रम्
*अर्थासहित) न मन्त्रं नो यन्त्रं तदपि च न जाने स्तुतिमहो
१०८) शांतीपाठाचा अर्थ
१०९) शिव आरती
११०) या कुन्देन्दुतुषारहार धवला
१११) नवनाथ कथा सार - लिंक (माधव यांची पोस्ट)
११२) करुणाष्टकं (रामदास स्वामी)
पान १४
११३) करुणाष्टकांवर चैतन्य महाराज देगलुरकर यांचे प्रवचन - लिंक
११४) श्री लिंगाष्टकः
११५) व्यंकटेश स्तोत्र - लिंक (हसरी यांची पोस्ट)
११६) ५२ श्लोकी गुरुचरित्र
११७) सार्थ दत्तबावनी
पान १५
११८) श्री अक्कलकोट स्वामी स्तोत्र --- महात्म्य
११९) श्री अक्कलकोट स्वामी मानसपूजा
१२०) श्री स्वामी समर्थ स्तवन (नाही जन्म....)
१२०) विविध स्त्रोत्रांची लिंक - joshnilu यांची पोस्ट
१२१) GOD grant me the SERENITY...
१२१) GOD grant me the SERENITY... (मराठीत)
१२२)सर्वसिध्दी मंत्र
१२३) श्री स्वामी समर्थ मानस पूजा
१२४) श्री शिव मानस पूजा
१२५) शनी स्तोत्र
श्रीगुरुचरित्र (पाळावयाचे सामान्य संकेत)
!!भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे.!!
पान १६
१२६) श्री दत्तात्रेय स्तुती
१२७) नवरात्र अष्टमी होम
१२८) देवीची गाणी, संबळ गीत, जोगवा, आरत्या इत्यादी.
१२८) श्रीदेवी उपासना - उपचार पद्धती, श्री गणेशस्तोत्रम , अथ श्री महालक्ष्म्यष्टकम्, अथ तंत्रोक्त देवीसूक्तम्, श्री सरस्वति स्तोत्र, अथ श्री सूक्तम् , श्री गणपतीच्या आरत्या, श्रीदेवीच्या आरत्या, माहुरगडावरी माहुरगडावरी ग तुझा वास, भक्त येतील दर्शनास, श्री महालक्ष्मी आरती - वससी व्यापकरुपे, आरती श्री लक्ष्मी - अंबिके तुझे गे, श्रीयोगेश्वरी (अंबेजोगा‌ई) देवीची आरती, श्रीकरवीरनिवासिनीची (कोल्हापूरची अंबाबा‌ई) आरती, श्री शाकंभरी देवीची आरती, गोंधळाची संबळगीत, श्री देवीचे जोगवा संबळगीत, श्री देवीचे जोगवा, गोंधळ - उदो उदो गर्जुनी , श्रीदेवीची भजने, श्रीदेवीची खेळगाणी, कुंकू,  दंडवत, निरोप आरती, आरती श्री लक्ष्मी - सौम्य शब्दे उदोकारे
१२९) श्रीमहिषासुरमर्दिनी स्तोत्र यूट्यूबवर.
पान १७
१३०) श्री ज्ञानदेव हरिपाठ
१३१) श्री देवी कवच
१३२) सिद्धमंगल स्तोत्र
१३३) रघुपति राघव राजा राम - भजन
१३४) पंचमुखी श्रीवीरहनुमत्कवच स्तोत्र
१३५) श्रीपञ्चम���ख हनुमत्कवचमंत्र
पान १८
१३६) श्री महालक्ष्मी माहात्म्य
१३७) संस्कृत स्तोत्रांच्या लिंक्स (वरदा यांची पोस्ट)
१३८) काकड आरतीच्यावेळचा अभंग
१३९) भग्वद्गीता ऑडियो लिंक (monalip यांची पोस्ट)
१४०) महालक्ष्म्याष्टक स्तोत्रा - ऑडियो लिंक (भरत मयेकर यांची पोस्ट)
पान १९
१४१) चंदन चावल बेल की पतिया - संत मीराबाईंचे भजन
१४२) कालभैरव अष्टकम् (यूट्युब लिंक) - tapasvi यांची पोस्ट
१४३) कुबेर मंत्र (यूट्युब लिंक) - tapasvi यांची पोस्ट
१४४) श्रीगजाननमहाराजांचे प्रति २१ नमस्कारांचे स्तोत्र
१४५) स्वामी स्वरुपानंद - ज्ञानेश्वरी (mukti यांच्या पोस्टमधील यूट्यूब लिंक)
१४६) दत्तलीलामृत आणि सिद्धलीलामृत - लिंक - राधिका यांची पोस्ट
१४०) श्री हनुमान स्तुती
१४७) प्रारंभी विनती करु गणपती...
१४८) श्रीगुरुचरित्र - अध्याय १४वा
१४९) वदनी कवळ घेता, नाव घ्या मातृभूचे !
१५०) श्रीज्ञानेश्वरस्तोत्रम्
१५१) गजानन बावनी
१५१) गजानन बावनी
पान २०
१५२) स्तोत्रांच्या ऑडियो फाईल्सची लिंक (श्रीकांत यांची पोस्ट)
१५३) श्रीवासुदेवानन्दसरस्वतीविरचित गणपतिस्तोत्र
१५४) श्रीगणेशकवच : संकटनाशन श्रीगणेशस्तोत्र
१५५) श्रीसदाशिवेन्द्रस्तवः
१५६) श्रीदिनेशस्तवः
१५७) ललितापञ्चरत्नम्
१५८) त्रिपुरा सुन्दरि स्तोत्र
१५९) विंध्यवासिनीचे स्तोत्र
१६०) श्री विंध्यवासिनी माता आरती
१६१) महिषासुरमर्दिनी स्तोत्रम
१६२) पाण्डुरङ्गाष्टकम
पान २१
१६३) स्वामी स्वरुपानंद (पावस) यांची रचना
१६४) सद्गुरु सुबोध - श्री गोंदवलेकर महाराज
१६५) रामदासस्वामी रचित अंबेची नवरात्राची आरती
१६६) संत एकनाथ महाराज रचित अंबेचा जोगवा
१६७) एकश्लोकी रामायण
१६८) एकश्लोकी मारुती स्तोत्र
१६९) एकश्लोकी भागवत
१७०) श्रीविष्णोषोडशनामस्तोत्रं
१७१) वाढदिवसाला म्हणावयाची प्रार्थना
१७१) श्रीगजानन विजय ग्रंथ- ऑन लाईन डाउन लोड
१७२) श्री तुळजाभवानी अध्याय व तुळजाभवानी कवच - केदार लसणे याच्या पोस्टमधली लिंक
१७३) स्वा.सावरकर रचित स्वतंत्रतादेवी-स्तोत्र : जयोस्तुते
१७४) जिव्हा प्रार्थना
पान २२
१७५) श्रीराधाकृतं गणेशस्तोत्रम् - अभी यांची पोस्ट्/लिंक
१७६) श्री दत्त अथर्वशीर्ष
१७६) गणेशाने केलेले राधास्तोत्र आणि बरेच काही
१७७) एम. एस. सुब्बलक्ष्मी यांच्या आवाजातील महिषासुरमर्दिनी स्तोत्र डाउनलोड करण्यासाठी.लिंक
१७८) ए. आर. रेहमान यांच्या अल्बम मधील महिषासुरमर्दिनी स्तोत्र डाउनलोड करण्यासाठी लिंक
१७९) दत्तमंगलचण्डिकास्तोत्रम्
१८०) ज्वरनाशकस्तोत्रः
१८१) दशरथ महाराज रचीत शनैश्चर स्त्रोत्र
१८२) श्री गणपती विघ्ननाषना मंगलमुर्ती मुषकवाहना
१८३) संपूर्ण अच्यु���ाष्टक - लिंक (अभी यांची पोस्ट)
१८४) महामृत्युंजय जप
पान २३
१८५) शनि वज्रपंज्जर कवचम
१८५) सहस्त्र-नाम तत्युल्यं मंत्र
१८५) जय जय त्रिंबकराज गिरीजानाथा गंगाधरा हो
१८६) दासबोध (लिंक) - श्रीकांत यांची पोस्ट
१८७) गजेंद्रमोक्ष स्तोत्र
१८८) कौसल्या सुप्रजा रामा
पान २४
१८९) कुंजिका स्तोत्र
१९०) मंदिरात पादुकांना नमस्कार करतांना म्हणायचा श्लोक.
१९०) नर्मदाष्टकम् --श्री शंकराचार्य
१९१) श्री रेणुका स्तोत्र
१९२) मानसपूजा (आत्मपूजा)
१९३) गायत्री मंत्राचा अर्थ (शशांक पुरंदरे आणि परब्रह्म यांची पोस्ट)
१९४) श्री दत्त कवच
१९५) नवग्रह स्तोत्र (पौराणिक आणि वैदिक मंत्रांचे संकलित स्तोत्र)
१९६) गुर्वभिन्न गणेश स्तुति
१९७) गीतिपूर्वं श्रीगणपतिस्तोत्रम्
पान २५
१९८) नारायण सूक्त
१९९) नारायण कवच
२००) व्यंकटेश स्तोत्र
२०१) श्रीगुरुपादुकाष्टम्
२०१) श्रीमद् शन्कराचार्यविरचितं शिवपञ्चाक्षरस्तोत्रं
२०२) स्वर्णाकर्षण भैरव स्तुती
पान २६
२०३) श्री गुरुगीता
२०४) श्रीहरि स्तोत्र
२०५) श्रीदुर्गापदुद्धारस्तोत्रम्
२०५) सोळा सोमवारचे व्रत कथा
२०६) समर्थ वाड्मयासाठी लिंक - मी_आर्या यांची पोस्ट
२०७) रात्री शांत झोप लागण्यासाठी श्लोक
२०८) तुळस तोडतांना म्हणायचा मंत्र
२०९) भगवान शिव प्रात: स्मरण स्तोत्र
२१०) श्रीदत्तदास नारायण गोविंद उकिडवे विरचित प प टेंबे स्वामींची आरती
पान २७
२११) गणेश स्तुती
२१२) रामदास स्वामी रचित संपूर्ण गणपती आरती
२१३) ऋण विमोचन नरसिंह स्तोत्रं
२१४) लक्ष्मी सूक्त
२१५) श्री सूक्त
२१६) श्री प्रज्ञावर्धिनी स्तोत्र
२१७) मंत्रमातृकापुष्पमालास्तवः
२१८) अन्नपूर्णास्तुतिः
२१९) श्री बालमुकुन्दाष्टक.
२२०) शाकंभरी (शताक्षी) माहात्म्यम्
पान २८
२२१) आरती भुवन सुंदराची | इंदिरावरा मुकुंदाची - लिंक (माधव यांची पोस्ट)
२२२) ऋणविमोचन गणपति स्तोत्र
२२३) अर्गला स्तोत्र
२२४) श्री हनुमान वडवानल स्तोत्र
२२५) निर्भय निर्गुण (संत कबीर)
२२६) शुन्य गढ शहर, शहर घर बस्ति, कोन सुता कोन जागे है (गोरक्षनाथ)
२२७) कबिर भजन - सुनता है गुरु ग्यानी
२२८) लक्ष्मीनृसिंह करावलंबस्तोत्र
२२९) शनैस्चर कृत श्री नृसिम्ह स्तुति
२३०) कार्थ वीर्यार्जुन द्वादश नाम स्तोत्रम
२३०) श्रीबृहस्पति कवचम्
पान २९
२३१) गोविंद नामावली
२३२) श्री अक्कलकोट स्वामी स्तवन
२३३) "आरती संग्रह (मराठी)" अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅपची लिंक
२३४) गोंदवलेकर महाराजांची प्रवचने (अ‍ॅप्लिकेशन लिंक)
२३५) अन्नपूर्णा स्तोत्र
२३६) श्रीहनुमदष्टकम्‌, शिवकवच (सम्पूर्ण) (लिंक)
२३७) वराह कवच - बाधामुक्तीसाठी (लिंक)
२३७) चिदम्बरेश्वर शिव स्तोत्र (लिंक)
२३८) नारायण स्तोत्र
२३९) सीतानवमीच्या दिवशी म्हणायचा जप
२४०) श्री साईनाथांची अकरा वचने
२४१) शतश्लोकी रामायण
२४२) श्रीरामहृदयम्
२४३) ब्रह्मचिंतन
२४४) सर्व-कामना-सिद्धि स्तोत्र
पान ३०
२४५) मृत्युंजय कवचम्
२४६) अनसूयेचे स्तोत्र
२४७) अष्टक १ ले (नवरात्रात रोज म्हणायचे. वृत्त चामर.)
२४८) गुरु शरणम्
२४९) लक्ष्मी कवच
२५०)अन्नपूर्णाष्टकम् स्तोस्त्रम्
२५१) व्यंकटेश्वर वज्र कवच स्तोत्र
२५२) श्रीपरशुराम स्तुती
पान ३१
२५३ ) परशुरामसहस्रनामस्तोत्र
२५४) श्रीपरशुरामाष्टकम्
२५५) परशुरामाष्टाविंशतिनामस्तोत्रम्
२५६) परशुरामस्तोत्रम्
२५७) संस्कृत स्तोत्रं वगैरे असलेली साईट
२५८) कर्‍हाडच्या कृष्णामाईचं स्तवन
पान ३२
२५९) इंदूकोटी स्तोत्र
२६०) इंदूकोटी स्तोत्र (यूट्यूब लिंक)
२६१) दारिद्रयदुःखदहन शिवस्तोत्र
२६२) गौरीची प्रार्थना
पान ३३
२६३) एकनाथी भागवत - भाग १४ मधील काही भाग
२६४) हनुमंता रामदूता वायुपुत्रा महाबला
२६५) दत्तात्रेय कवचम

***********************************************************************************

पान १

१) गायत्री मंत्र २) दत्तबावनी ३) श्लोक ४) घोरकष्टोद्धरण स्तोत्र
५) तुळजा भवानी - लिंक ६) श्री भवानी अष्टक ७) श्री साईसच्चरित - लिंक
८) शिवपञ्चाक्षर स्तोत्र ९) करुणा त्रिपदी १०) धन्य धन्य हो प्रदक्षिणा
११) श्री दत्तस्तव स्तोत्र
आणि श्री वासुदेवानंदसरस्वती (टेंबेस्वामी) यांच्याबद्दलची लिंक केदार जोशी यांच्या पोस्टमधे.

पान २

१२) येई वो विठ्ठले १३) श्री समर्थ रामदास - लिंक १४) नव-नाग स्तोत्र
१५) गणपती अथर्वशीर्ष - लिंक १६) नि:शंक हो निर्भय हो मना रे (श्री स्वामी समर्थ तारक मंत्र)
१७) दत्तमाला मंत्र

पान ३

१८) श्री स्वामी समर्थाष्टक १९ ) श्रीगणपती स्तोत्र 20) श्री मारुती स्तोत्र (भीमरुपी महारुद्रा)
२१) नवग्रह स्तोत्र २२) महारुद्र अवतार हा सूर्यवंशी २३) हनुमंताचा धावा २४) श्लोक
२५) तीर्थप्राशन, करदर्शन व भूमीवंदन श्लोक २६) संपूर्ण नवनाग स्तो���्र २७) शुभंकरोति कल्याणम
२८) कालभैरवाष्टक २९) श्री गणेश पन्चरत्न स्तोत्र ३०) शनी मंत्र ३१) रुद्र

पान ४

३२) संपुर्ण आरती सन्ग्रह /मनाचे श्लोक/ भगवद गीता - लिंक (गौतम्७स्टार यांची पोस्ट)
३३) श्री आदि शंकराचार्यांनी रचलेली स्तोत्रे - लिंक (चिनूक्स यांची पोस्ट)
३४) जयजयाजी गणपती (गणपती स्तोत्र) ३५) जगन्नाथपंडितांचं गंगालहरी - लिंक (चिनूक्स पोस्ट)
३६) प्रार्थना ३७) श्रीसूक्त - लिंक (चिनूक्स पोस्ट) ३८) विविध स्तोत्रं (ऑडियो) - लिंक (चिनूक्स पोस्ट)
३९) गणेश / विष्णू / राम / हनुमान इत्यादींची स्तोत्रे - लिंक्स (मीनल यांचे पोस्ट) ४०) आद्य शंकराचार्य विरचित तुलजाष्टक ४१) सुंदरकाण्ड - लिंक (GauriC यांची पोस्ट) ४२) पुरुषसूक्त ४३) http://khapre.org/ (स्तोत्रे / पोथ्या व इतर वाड्मयाचा संग्रह (महेश यांची पोस्ट) 44) दत्तलीला मंत्र ४५) मंगलाष्टके - लिंक (महेश यांची पोस्ट) ४६) लक्ष्मी श्लोक / शारदा स्तवन / गणपती श्लोक

पान ५

४७) स्वामी समर्थ माला मंत्र ४८) सूर्याष्टक ४८) हनुमान चलिसा - लिंक (GauriC यांची पोस्ट) ४९) वदनी कवळ घेता - मातृभूमीसाठी ५०) भगवद्गीता / दासबोध - लिंक (saket यांची पोस्ट) ५१) अष्टलक्ष्मी स्तोत्र - लिंक (GauriC यांची पोस्ट)
५२) शांती मंत्र ५३) शिवताण्डव स्तोत्र ५४) श्रीरामाचा पाळणा (pdf फाईल) ५५) महारुद्र अवतार हा सूर्यवंशी - संपूर्ण - जयवी यांची पोस्ट ५६) श्री समर्थ रामदासकृत मारुती स्तोत्र (राष्ट्राच्या सर्वांगिण रक्षणासाठी) ५७) मेधासूक्त - लिंक (कदंब यांची पोस्ट) ५८) विष्णूसहस्रनाम / भगवद्गीता - लिंक (महेश देशपांडे यांची पोस्ट) ५८) चर्पटपञ्जरिका स्तोत्रम.

पान ६

५८) नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ५९) सूर्यनमस्कार ६०) नवग्रहपीडाहरस्तोत्र ६१) रुद्राष्टक - लिंक (माधव यांची पोस्ट)

पान ७

६२) श्री दुर्गासप्तशती सार ६३) ॠणमोचनमहागणपतिस्तोत्रम् ६४) दत्तदशक स्तोत्र ६५) श्रीमहिषासूरमर्दिनी स्तोत्र ६६) कैलासराणा शिवचंद्रमौळी...

पान ८

६७) श्रीमहालक्ष्मी नमन अष्टक ६८) आदिमाता महिषासुरमर्दिनी चण्डिकेची आरती ६९) श्रीविष्णो: षोडशनामस्तोत्रम् ७०) रामरक्षा ७१) श्री हनुमंतांच्या उपासनेचे कारण व कार्य.

पान ९

७२) श्रीरामांची कर्पुरआरती ७३) मारुती स्तोत्र आणि त्याचे निरुपण (लिंक) ७४) संगितातल्या विविध रागांमधे गायल्या गेलेल्या दत्तबावनीची लिंक (अभि यांची पोस्ट) ७५) पवमान सूक्त - लिंक (अभि यांची पोस्ट) ७६) गणपती स्तोत्र (मराठी) ७७) गायत्री मुद्रा (व्हिडियो) - अभि यांची पोस्ट

पान १०

७८) दयाळू तू देवा खचित आहे���ि - संत एकनाथांची रचना ७९) श्री आदिमाता शुभंकरा स्तवनम् ८०) श्री आदिमाता अशुभनाशिनी स्तवनम् ८१) सनातनदेवीसूक्त ८२) शिवषडाक्षर स्त्रोत्र ८३) श्री महालक्ष्मी स्तोत्र ८४) देवीची आराधना ८५) स्वामी समर्थांना स्नान घालताना किंवा स्वामी समर्थांच्या पादुकांवर अभिषेक करताना म्हणावयाचे पद ८६) श्रीमद आद्य शंकराचार्य विरचित नर्मदाष्टक ८७) श्री. प.पू. वासुदेवानंद सरस्वती लिखित "आरती नर्मदेची" ८८) श्रीदासगणूंनी रचलेले श्रीसाईबाबांवरील पद

पान ११
८९) धर्मराजाचे दुर्गास्तवन ९०) अन्नपूर्णास्तोत्रम् ९१) श्रीवासुदेवानंदसरस्वती विरचित "उद्धरी गुरुराया, अनसूया तनया दत्तात्रेय'' ९१) सद्गुरु स्तोत्र ९२) विविध आरत्या ९३) श्री रंग बावनी ९४) आपल्या मुलांच्या सुखी भविष्यासाठी देवाची प्रार्थना

पान १२
९५ ) दत्तबावनी (मराठी) ९६) नृसिंहसरस्वतीस्वामी महाराजांवरचे एक मराठी कवन ९७) अमोघशिवकवचम ९८) प्रभो बालांचा तू अससि एक मित्र थोर ९९) अंबे जगदोद्धारिणि गे | १००) नृसिंहसरस्वती अष्टक
१०१) सत्राणे उड्डाणे हुंकार वदनी.. १०२) लतादीदीं च्या आवाजातली रामरक्षा - श्रीकांत यांच्या पोस्टमधील लिंक १०३) सूर्यस्तुती

पान १३

१०४) दुर्गाकवच - लिंक (माधव यांची पोस्ट) १०५) बजरंग बाण १०६) प्रज्ञाविवर्धन स्तोत्र - लिंक १०७) श्रीदेवी अपराधक्षमापन स्तोत्रम् १०८) शांतीपाठाचा अर्थ १०९) शिव आरती ११०) या कुन्देन्दुतुषारहार धवला १११) नवनाथ कथा सार - लिंक (माधव यांची पोस्ट) ११२) करुणाष्टकं

पान १४

११३) करुणाष्टकांवर चैतन्य महाराज देगलुरकर यांचे प्रवचन - लिंक ११४) श्री लिंगाष्टकः ११५) व्यंकटेश स्तोत्र - लिंक (हसरी यांची पोस्ट) ११६) ५२ श्लोकी गुरुचरित्र ११७) सार्थ दत्तबावनी

पान १५

११८) श्री अक्कलकोट स्वामी स्तोत्र --- महात्म्य ११९) श्री अक्कलकोट स्वामी मानसपूजा १२०) श्री स्वामी समर्थ स्तवन (नाही जन्म....) १२०) विविध स्त्रोत्रांची लिंक - joshnilu यांची पोस्ट १२१) GOD grant me the SERENITY... १२२)सर्वसिध्दी मंत्र १२३) श्री स्वामी समर्थ मानस पूजा १२४) श्री शिव मानस पूजा १२५) शनी स्तोत्र

पान १६

१२६) श्री दत्तात्रेय स्तुती १२७) नवरात्र अष्टमी होम १२८) देवीची गाणी, संबळ गीत, जोगवा, आरत्या इत्यादी. १२९) श्रीमहिषासुरमर्दिनी स्तोत्र यूट्यूबवर.

पान १७

१३०) श्री ज्ञानदेव हरिपाठ १३१) श्री देवी कवच १३२) सिद्धमंगल स्तोत्र १३३) रघुपति राघव राजा राम - भजन १३४) पंचमुखी श्रीवीरहनुमत्कवच स्तोत्र १३५) श्रीपञ्चमुख हनुमत्कवचमंत्र

पान १८
१३६) श���री महालक्ष्मी माहात्म्य १३७) संस्कृत स्तोत्रांच्या लिंक्स (वरदा यांची पोस्ट) १३८) काकड आरतीच्यावेळचा अभंग १३९) भग्वद्गीता ऑडियो लिंक (monalip यांची पोस्ट) १४०) महालक्ष्म्याष्टक स्तोत्रा - ऑडियो लिंक (भरत मयेकर यांची पोस्ट)

पान १९
१४१) चंदन चावल बेल की पतिया - संत मीराबाईंचे भजन १४२) कालभैरव अष्टकम् (यूट्युब लिंक) - tapasvi यांची पोस्ट १४३) कुबेर मंत्र (यूट्युब लिंक) - tapasvi यांची पोस्ट १४४) श्रीगजाननमहाराजांचे प्रति २१ नमस्कारांचे स्तोत्र १४५) स्वामी स्वरुपानंद - ज्ञानेश्वरी (mukti यांच्या पोस्टमधील यूट्यूब लिंक) १४६) दत्तलीलामृत आणि सिद्धलीलामृत - लिंक - राधिका यांची पोस्ट १४७) प्रारंभी विनती करु गणपती... १४८) श्रीगुरुचरित्र - अध्याय १४वा १४९) वदनी कवळ घेता, नाव घ्या मातृभूचे ! १५०) श्रीज्ञानेश्वरस्तोत्रम् १५१) गजानन बावनी

पान २०
१५२) स्तोत्रांच्या ऑडियो फाईल्सची लिंक (श्रीकांत यांची पोस्ट) १५३) श्रीवासुदेवानन्दसरस्वतीविरचित गणपतिस्तोत्र १५४) श्रीगणेशकवच : संकटनाशन श्रीगणेशस्तोत्र १५५) श्रीसदाशिवेन्द्रस्तवः १५६) श्रीदिनेशस्तवः १५७) ललितापञ्चरत्नम् १५८) त्रिपुरा सुन्दरि स्तोत्र १५९) विंध्यवासिनीचे स्तोत्र १६०) श्री विंध्यवासिनी माता आरती १६१) मह���षासुरमर्दिनी स्तोत्रम १६२) पाण्डुरङ्गाष्टकम

पान २१
१६३) स्वामी स्वरुपानंद (पावस) यांची रचना १६४) सद्गुरु सुबोध - श्री गोंदवलेकर महाराज १६५) रामदासस्वामी रचित अंबेची नवरात्राची आरती १६६) संत एकनाथ महाराज रचित अंबेचा जोगवा १६७) एकश्लोकी रामायण १६८) एकश्लोकी मारुती स्तोत्र १६९) एकश्लोकी भागवत १७०) श्रीविष्णोषोडशनामस्तोत्रं १७१) वाढदिवसाला म्हणावयाची प्रार्थना १७२) श्री तुळजाभवानी अध्याय व तुळजाभवानी कवच - केदार लसणे याच्या पोस्टमधली लिंक १७३) स्वा.सावरकर रचित स्वतंत्रतादेवी-स्तोत्र : जयोस्तुते १७४) जिव्हा प्रार्थना

पान २२

१७५) श्रीराधाकृतं गणेशस्तोत्रम् - अभी यांची पोस्ट्/लिंक १७६) श्री दत्त अथर्वशीर्ष १७७) एम. एस. सुब्बलक्ष्मी यांच्या आवाजातील महिषासुरमर्दिनी स्तोत्र डाउनलोड करण्यासाठी.लिंक १७८) ए. आर. रेहमान यांच्या अल्बम मधील महिषासुरमर्दिनी स्तोत्र डाउनलोड करण्यासाठी लिंक १७९) दत्तमंगलचण्डिकास्तोत्रम् १८०) ज्वरनाशकस्तोत्रः १८१) दशरथ महाराज रचीत शनैश्चर स्त्रोत्र १८२) श्री गणपती विघ्ननाषना मंगलमुर्ती मुषकवाहना १८३) संपूर्ण अच्युताष्टक - लिंक (अभी यांची पोस्ट) १८४) महामृत्युंजय जप

पान २३
१८५) शनि वज्रपंज्जर कवचम १८६) दासबोध (लिंक) - श्रीकांत यांची पोस्ट १८७) गजेंद्रमोक्ष स्तोत्र १८८) कौसल्या सुप्रजा रामा

पान २४
१८९) कुंजिका स्तोत्र १९०) मंदिरात पादुकांना नमस्कार करतांना म्हणायचा श्लोक. १९१) श्री रेणुका स्तोत्र १९२) मानसपूजा (आत्मपूजा) १९३) गायत्री मंत्राचा अर्थ (शशांक पुरंदरे आणि परब्रह्म यांची पोस्ट) १९४) श्री दत्त कवच १९५) नवग्रह स्तोत्र (पौराणिक आणि वैदिक मंत्रांचे संकलित स्तोत्र) १९६) गुर्वभिन्न गणेश स्तुति १९७) गीतिपूर्वं श्रीगणपतिस्तोत्रम्

पान २५
१९८) नारायण सूक्त १९९) नारायण कवच २००) व्यंकटेश स्तोत्र २०१) श्रीगुरुपादुकाष्टम् २०२) स्वर्णाकर्षण भैरव स्तुती

पान २६
२०३) श्री गुरुगीता २०४) श्रीहरि स्तोत्र २०५) श्रीदुर्गापदुद्धारस्तोत्रम् २०६) समर्थ वाड्मयासाठी लिंक - मी_आर्या यांची पोस्ट २०७) रात्री शांत झोप लागण्यासाठी श्लोक २०८) तुळस तोडतांना म्हणायचा मंत्र २०९) भगवान शिव प्रात: स्मरण स्तोत्र २१०) श्रीदत्तदास नारायण गोविंद उकिडवे विरचित प प टेंबे स्वामींची आरती

पान २७
२११) गणेश स्तुती २१२) रामदास स्वामी रचित संपूर्ण गणपती आरती २१३) ऋण विमोचन नरसिंह स्तोत्रं २१४) लक्ष्मी सूक्त २१५) श्री सूक्त २१६) श्री प्रज्ञावर्धि���ी स्तोत्र २१७) मंत्रमातृकापुष्पमालास्तवः २१८) अन्नपूर्णास्तुतिः २१९) श्री बालमुकुन्दाष्टक. २२०) शाकंभरी (शताक्षी) माहात्म्यम्

पान २८
२२१) आरती भुवन सुंदराची | इंदिरावरा मुकुंदाची - लिंक (माधव यांची पोस्ट) २२२) ऋणविमोचन गणपति स्तोत्र २२३) अर्गला स्तोत्र २२४) श्री हनुमान वडवानल स्तोत्र २२५) निर्भय निर्गुण (संत कबीर) २२६) शुन्य गढ शहर, शहर घर बस्ति, कोन सुता कोन जागे है (गोरक्षनाथ) २२७) कबिर भजन - सुनता है गुरु ग्यानी २२८) लक्ष्मीनृसिंह करावलंबस्तोत्र २२९) शनैस्चर कृत श्री नृसिम्ह स्तुति २३०) कार्थ वीर्यार्जुन द्वादश नाम स्तोत्रम

पान २९
२३१) गोविंद नामावली २३२) श्री अक्कलकोट स्वामी स्तवन २३३) "आरती संग्रह (मराठी)" अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅपची लिंक २३४) गोंदवलेकर महाराजांची प्रवचने (अ‍ॅप्लिकेशन लिंक) २३५) अन्नपूर्णा स्तोत्र २३६) श्रीहनुमदष्टकम्‌, शिवकवच (सम्पूर्ण) (लिंक) २३७) वराह कवच - बाधामुक्तीसाठी (लिंक) २३७) चिदम्बरेश्वर शिव स्तोत्र (लिंक) २३८) नारायण स्तोत्र २३९) सीतानवमीच्या दिवशी म्हणायचा जप २४०) श्री साईनाथांची अकरा वचने २४१) शतश्लोकी रामायण २४२) श्रीरामहृदयम् २४३) ब्रह्मचिंतन २४४) सर्व-कामना-सिद्धि स्तोत्र

पान ३०

२४५) मृत्युंजय कवचम् २४६) अनसूयेचे स्तोत्र २४७) अष्टक १ ले (नवरात्रात रोज म्हणायचे. वृत्त चामर.) २४८) गुरु शरणम् २४९) लक्ष्मी कवच २५०)अन्नपूर्णाष्टकम् स्तोस्त्रम् २५१) व्यंकटेश्वर वज्र कवच स्तोत्र २५२) श्रीपरशुराम स्तुती

पान ३१

२५३ ) परशुरामसहस्रनामस्तोत्र २५४) श्रीपरशुरामाष्टकम् २५५) परशुरामाष्टाविंशतिनामस्तोत्रम् २५६) परशुरामस्तोत्रम् २५७) http://sanskritdocuments.org/sanskrit/by-category/stotra.php २५८) कर्‍हाडच्या कृष्णामाईचं स्तवन

पान ३२
२५९) इंदुकोटी स्तोत्र २६०) इंदूकोटी स्तोत्र (यूट्यूब लिंक) २६१) दारिद्रयदुःखदहन शिवस्तोत्र २६२) गौरीची प्रार्थना

पान ३३
२६३) एकनाथी भागवत - भाग १४ मधील काही भाग २६४) हनुमंता रामदूता वायुपुत्रा महाबला २६५) दत्तात्रेय कवचम

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गीतांजली,

http://ioustotra.blogspot.com/2008/11/pradnyavivardhan-stotra.html इथे तुम्हाला हवी असलेली माहिती आहे.

कार्तिकेय हे आपल्या मेंदूच्या हायपोथॅलॅमस भागाचे स्वामी समजले जातात.

|| श्रीदेवी अपराधक्षमापन स्तोत्रम् ||

न मन्त्रं न यन्त्रं तदपि च न जाने स्तुतिमहो
न च आव्हानं ध्यानं तदपि न च जाने स्तुतिकथा |
न जाने मुद्रा: ते तदपि च न जाने विलपनं
परं जाने मातः त्वद्-अनुसरणं क्लेशहरणम् || १ ||

विधे: अज्ञानेन द्रविणविरहेण-आलसतया
विधेय-अशक्यत्वात् तव चरणयो: या च्युति: अभूत् |
तदेतत् क्षन्तव्यं जननि सकलोद्धारिणी शिवे
कुपुत्रो जायेत क्वचिदपि कुमाता न भवति || २ ||

पृथिव्यां पुत्रास्ते जननि बहवः सन्ति सरला:
परं तेषां मध्ये विरल-तरलः अहं तव सुतः |
मदीयः अयं त्यागः समुचितं इदं नो तव शिवे
कुपुत्रो जायेत क्वचितदपि कुमाता न भवति || ३ ||

जगन्मातः मातः तव चरणसेवा न रचिता
न वा दत्तं देवि द्रविणम् अपि भूयः तव मया |
तथा अपि त्वं स्नेहं मयि निरुपमं यत् प्रकुरुषे
कुपुत्रो जायेत क्वचिदपि कुमाता न भवति || ४ ||

परित्यक्ता देवा विविध-विध-सेवाकुलतया
मया पञ्चाशीते: अधिकम् अपनीते तु वयसि |
इदानीं चेत् मातः तव यदि कृपा न अपि भविता
निरालम्बः लम्बोदर-जननि कं यामि शरणम् || ५ ||

श्वपाकः जल्पाकः भवति मधुपाक-उपम-गिरा
निरातङ्को रङ्को विहरति चिरं कोटि-कनकै: |
तव अपर्णे कर्णे विशति मनुवर्णे फलमिदं
जनः को जानीते जननि जपनीयं जपविधौ || ६ ||

चिताभस्म-आलेपः गरलम्-अशनं दिक्पट-धरो
जटाधारी कण्ठे भुजगपतिहारी पशुपति: |
कपाली भूतेशो भजति जगदीशैकपदवीं
भवानि त्वत्-पाणिग्रहण-परिपाटी-फलमिदम् || ७ ||

न मोक्षस्य आकाङ्क्षा भव-विभव-वाञ्छा अपि च न मे
न विज्ञान-अपेक्षा शशिमुखि सुखेच्छा अपि न पुनः |
अतः त्वां संयाचे जननि जननं यातु मम वै
मृडानी रुद्राणी शिव शिव भवानी इति जपतः || ८ ||

न आराधितासि विधिना विविधोपचारै:
किं रुक्षचिन्तनपरै: न कृतं वचोभि: |
श्यामे त्वमेव यदि किञ्चन मयि अनाथे
धत्से कृपां उचितं अम्ब परं तव एव || ९ ||

आपत्सु मग्नः स्मरणं त्वदीयं,
करोमि दुर्गे करुणार्णवेशि |
नैतत् शठत्वं मम भावयेथा:
क्षुधा-तृषार्ता जननीं स्मरन्ति || १० ||

जगदम्ब विचित्रं अत्र किं परिपूर्णा करुणा अस्ति चेन्मयि |
अपराध-परम्परा-परं न हि माता समुपेक्षते सुतम् || ११ ||
मत्समः पातकी नास्ति पापघ्नी त्वत्समा न हि |
एवं ज्ञात्वा महादेवि यथायोग्यं तथा कुरु || १२ ||

|| एवं श्रीशंकराचार्यविरचितं देव्यपराधक्षमापनस्तोत्रं संपूर्णम् ||

अत्यंत कडक स्तोत्र असल्याने वरील स्त्रोत्राचा पठणासाठी नेम धरु नये असं म्हणतात. म्हणजे अमक्या इतके वेळा रोज म्हणेन वगैरे...नाहितर शेंडी तुटो वा पारंबी, तो नेम पुर्ण करावाच लागतो. त्यापेक्षा आपल्याला जमेल तेव्हा जमेल तेवढे वेळाच हे वाचावे.
-----

किं रुक्षचिन्तनपरै: न कृतं वचोभि: | - ह्या ओळीत रुक्षचिन्तनपरै: च्या ऐवजी रुक्षविन्तनपरै: टाईप केले गेले होते. रोज यूट्यूबवर लावून सोबत म्हणताना इथे योग्य बदल करायचे लक्षात येई पण राहून जात असे. आता हा बदल केला आहे.

मला "ओम सहना ववतु" (ओम कसा टाईप करायचा?) या शांती मंत्राचा खरा अर्थ हवा आहे. इंटरनेटवर थोडे वेगवेगळे अर्थ दिसले.

अश्विनी,
देव्यपराधक्षमापनस्तोत्र पाहिले
लिखाण काही ठिकाणी संधी तोडून केलंय ते दुरुस्त कराल का?
अजून एक म्हणजे, हे स्तोत्र कडक आहे असे नाही (मुळातच देवीची अपराधांसाठी क्षमा मागितली आहे त्या स्तोत्रात, त्यामुळे कडक वगैरे नसावं. थोड्या वेळात त्याचा अर्थ देतो माझ्या मतीप्रमाणे)

- चैतन्य.


जमलं. धन्यवाद शैलजा.
अर्थाबरोबरच मला हा मंत्र योग्य प्रकारे कसा लिहावा ते हवं आहे.
काही ठिकाणी "ॐ सहना ववतु" लिहिलेलं दिसलं तर काही ठिकाणी "ॐ सह नाववतु" किंवा "ॐ सह ना ववतु" असंही आढळलं.

वर्षा-
सह नाववतु हे योग्य आहे.
नौ + अवतु = नाववतु अशी संधी तिथे आहे.
पुढे सह नौ भुनक्तु पण आहेच- त्यावरून आधीही 'नौ' असंच असेल असा अंदाजही बांधता येतो.
अर्थासाठी थोडं शोधावं लागेल- शोधून सापडला, तर देईन अर्थ इथे.

ॐ सह नाववतु | सह नौ भुनक्तु | सह वीर्यं करवावहै |
तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै ||

धन्यवाद,
चैतन्य.

चैतन्य, सॉरी रे ! ते स्तोत्रं टाईपकेल्यानंतर लॉग आउट केलं आणि ३ तारखेला लंच नंतर माबोवर येऊ शकले तोपर्यंत हा धागा खूप मागे गेला असल्याने पुढच्या पोस्ट्स वाचल्या गेल्या नाहीत.

चैतन्य दीक्षित यांनी दिलेले स्तोत्र व त्याचा अर्थ खालिलप्रमाणे आहे :-

न मन्त्रं नो यन्त्रं तदपि च न जाने स्तुतिमहो
न चाह्वानं ध्यानं तदपि च न जाने स्तुतिकथा: |
न जाने मुद्रास्ते तदपि च न जाने विलपनं
परं जाने मातस्त्वदनुसरणं क्लेशहरणम् ||१||
-अर्थः मला ना मंत्र माहिती ना कुठलं यंत्र माहिती. तुझी स्तुती कशी करू हेही मी जाणत नाही. पूजाविधीमध्ये असलेले आवाहन, ध्यान इत्यादी, किंवा ध्यान(योग)मार्गात असलेल्या अनेक मुद्रा वगैरेही मी जाणत नाही. मी फक्त एकच जाणतो, तुझं अनुसरण करणं, जे की सगळे क्लेश दूर करणारं आहे.

विधेरज्ञानेन द्रविणविरहेणालसतया
विधेयाशक्यत्वात्तवचरणयोर्या च्युतिरभूत् |
तदेतत्क्षन्तव्यं जननि सकलोद्धारिणि शिवे
कुपुत्रो जायेत क्वचिदपि कुमाता न भवति ||२||

-अर्थः माझ्याकडे पूजनाच्या विधींबद्दलचं ज्ञान नाही, पूजा करावी म्हटलं तर पुरेसं द्रव्य(पैसा) नाही, आणि तोही असला तरी मूलतः असलेला आळस या अशा गोष्टींमुळे मी तुझ्या चरणांपासून दूर झालो. पण हे सकलोद्धारिणि, शिवे, माते, माझे हे अपराध पोटात घाल. कारण एक वेळ कुपुत्र जन्माला येईल, पण माता कधीही कुमाता नसते.

पृथिव्यां पुत्रास्ते जननि बहवः सन्ति सरला:
परं तेषां मध्ये विरलतरलोऽहं तव सुतः |
मदीयोऽयं त्यागः समुचितमिदं नो तव शिवे
कुपुत्रो जायेत क्वचिदपि कुमाता न भवति ||३||

-अर्थः या भूतलावर तुझे अनेक सरलमार्गी पुत्र असतील/आहेत, पण त्यांच्या मध्ये मीच असा तरल स्वभावाचा असा तुझा पुत्र आहे. माझा असा त्याग करणं तुला शोभत नाही, कारण एक वेळ कुपुत्र जन्माला येईल, पण माता कधीच कुमाता नसते.

जगन्मातर्मातस्तवचरणसेवा न रचिता
न वा दत्तं देवि द्रविणमपि भूयस्तव मया |
तथापि त्वं स्नेहं मयि निरुपमं यत्प्रकुरुषे
कुपुत्रो जायेत क्वचिदपि कुमाता न भवति ||४||

-अर्थः हे जगन्माउली, मी तुझ्या चरणांची सेवा कधी केली नाही किंवा मी तुझ्यासाठी म्हणून कधी द्रव्य वेचलं नाही. तरिसुद्धा तू तुझं निरुपम प्रेम माझ्यावर ठेवलंस. म्हणतात ना, एक वेळ कुपुत्र जन्माला येऊ शकेल, पण माता कधीच कुमाता नसते.

परित्यक्ता देवा विविधविधसेवाकुलतया
मया पञ्चाशीतेरधिकमपनीते तु वयसि |
इदानीं चेन्मातस्तव यदि कृपा नापि भविता
निरालम्बो लम्बोदरजननि कं यामि शरणम् ||५||

-अर्थः वयाची पंच्याऐशीहून अधिक वर्षे सरली, मी इतर सगळ्या देवांचा आणि विविधप्रकारच्या सेवांचा (देवाच्या सेवांचा, उपासना इ.चा) त्याग केला- का? तर मला तुझी कृपा हवी आहे म्हणून.
आणि आता जर तुझी कृपा झाली नाही, तर हे लंबोदरजननी, मी निरालंब(निराधार) असा आता कुणाला शरण जाऊ?

श्वपाको जल्पाको भवति मधुपाकोपमगिरा
निरातङ्को रङ्को विहरति चिरं कोटिकनकै: |
तवापर्णे कर्णे विशति मनुवर्णे फलमिदं
जनः को जानीते जननि जपनीयं जपविधौ ||६||

- अर्थः (या श्लोकाचा अर्थ नीट शोधला पाहिजे) पण वरवरचा अर्थ-
तुझ्या नामाचे वर्ण (नावात येणारी अक्षरे) कानात नुसती शिरली तरीही, वायफळ बडबड करणार्‍याची वाणि मधुपाकासमान गोड होते आणि जो रंक आहे तो चिरकाळ कोटिसुवर्ण(मुद्रा) भोगू लागतो. हे केवळ तुझ्या नामजपाचे फल. पण तुझ्या अशा या जप करण्यास योग्य अशा जपविधीचा महिमा कोण जाणतो? (कुणीच नाही)

चिताभस्मालेपो गरलमशनं दिक्पटधरो
जटाधारी कण्ठे भुजगपतिहारी पशुपति: |
कपाली भूतेशो भजति जगदीशैकपदवीं
भवानि त्वत्पाणिग्रहणपरिपाटी फलमिदम् ||७||

अर्थ- फार सुंदर अर्थ आहे. शंकराचं वर्णन केलंय- शंकर चिताभस्म लावतात, वैराग्यास योग्य असं अन्न सेवन करतात, दिगंबर राहतात, जटा वाढवलेल्या आहेत, गळ्यात भुजंगरूपी हार धारण करतात, पशुपती आहेत, भूतांचे नाथ आहेत- असे असूनसुद्धा त्यांना सगळे जगदीश म्हणतात.
हे, त्यांनी तुझ्याशी विवाह केला याचंच तर फळ आहे.

न मोक्षस्याकांक्षा भवविभववाञ्छापि च न मे
न विज्ञानापेक्षा शशिमुखिसुखेच्छापि न पुनः |
अतस्त्वां संयाचे जननि जननं यातु मम वै
मृडाणी रुद्राणी शिव शिव भवानीति जपतः ||८||

-अर्थ: थोडंसं उलट्या क्रमानं आलंय खरं, पण- मला मोक्षाची इच्छा नाही, या संसारात वैभव मिळावे अशी इच्छा नाही, मला विशेष ज्ञान मिळावं अशी अपेक्षा नाही की चंद्रमुखी स्त्रीचं सुख मिळावं अशीही इच्छा नाही.
म्हणून, हे जननि, माझं तुझ्याकडे एकच मागणं आहे, की माझा संपूर्ण जन्म, तुझ्या आणि शिवाच्या नामस्मरणात जावो.

नाराधितासि विधिना विविधोपचारै:
किं रुक्षचिन्तनपरैर्न कृतं वचोभि: |
श्यामे त्वमेव यदि किञ्चन मय्यनाथे
धत्से कृपामुचितमम्ब परं तवैव ||९||

-अर्थः - मी तुझी विधिवत उपचारांनी किंवा रुक्षचिंतनपर वचनांनीही आराधना केली नाही . श्यामे(कालिकामाता) तूच मज अनाथावर तुला उचित वाटेल ती कृपा कर.

आपत्सु मग्न: स्मरणं त्वदीयं
करोमि दुर्गे करुणार्णवेशि
नैतच्छठत्वं मम भावयेथा:
क्षुधातृषार्ता जननीं स्मरन्ती ||१०||

जगदम्ब, विचित्रमत्र किं परिपूर्णा करुणास्ति चेन्मयि |
अपराधपरम्परापरं न हि माता समुपेक्षते सुतम् ||११||
मत्समः पात़की नास्ति पापघ्नी त्वत्समा न हि
एवं ज्ञात्वा महादेवि यथायोग्यं तथा कुरु ||१२||

अर्थ- हे करुणासागर दुर्गे, आपत्तींमध्ये मी तुझंच स्मरण करतो. यात कुठलीही लबाडी नाही (केवळ आपत्ती असली की मला तुझी आठवण येते असं नाही) पण तहान-भुकेने व्याकूळ झालेल्या लेकराला जशी आईच आठवते, तद्वत मी तुझं आपत्तींमध्ये स्मरण करतो.
आणि हे जगदंबे, माझ्यावर तुझी परिपूर्ण अशी करुणा/कृपा आहे यात नवल ते काय?
कारण मुलाने कितीही अपराध केले तरीही आई त्याची उपेक्षा कधीच करत नाही.
हे देवी, माझ्यासारखा पातकी या जगात दुसरा कुणीही नाही. पण हे जितकं खरं आहे तितकंच हेही खरंच आहे की तुझ्यासारखी पापांचा नाश करणारी दुसरी कुणीही नाही, त्यामुळे हे माझे भाव जाणून तुला माझ्याबाबतीत जे योग्य वाटेल ते तू कर.

||इति श्रीमत्परमहंस-परिव्राजकाचार्य श्रीमच्छङ्कराचार्यविरचितं देव्यापराधक्षमापनस्तोत्रं सम्पूर्णं ||

<<मला "ओम सहना ववतु" (ओम कसा टाईप करायचा?) या शांती मंत्राचा खरा अर्थ हवा आहे. इंटरनेटवर थोडे वेगवेगळे अर्थ दिसले.<<

माझ्याकडे असलेल्या नारेश्वर येथील स्वामी रंगावधुत यांच्या 'रंगवाकसुधा' या पुस्तकातील अर्थ देत आहे.
हा वैदिक पंचशील मंत्र आहे.

"सह नाववतु'- (सह नी अवतु) तो परमपिता परमेश्वर आपले दोघांचे (गुरु-शिष्याचे) रक्षण करो! एक संरक्षित आणि दुसरा उपेक्षित राहिला तर कालान्तराने दोघांचा नाश होतो.

"सह नौ भुनक्तु"-
आपण दोघे ऐश्वर्य आणि विविध सुखोपभोग भोगु! एक सुख-सोयींमधे लोळेल, चांदीच्या ताटात रोज मिष्टान्न खाईल आणि दुसरा दु:खात तळमळेल, जेमतेम कोद्री (तृणधान्य) सुद्धा न मिळवेल, तर एक अपचन आणि दुसरा उपासमारीचे भक्ष्य होऊन दोघेही विनाशाच्या पंथास जातील.

'सह वीर्य करवावहै'- आपण दोघे शक्तिमान बनु या, दोघेही बलाची उपासना करुया, सात्विक सामर्थ्य मिळवु या! एक सबळ आणि दुसरा निर्बळ असेल, तर समाजात नेहमी शीत किंवा उष्ण युद्धाचे वातावरण राहील आणि त्याच्या गुप्त प्रकट ज्वाळेत समस्त विश्व भाजुन निघेल.

'तेजस्विनावधीतमस्तु'-
(तेजस्विनी अधीतमस्तु)
आपले उभयतांचे अध्ययन तेजस्वी असो! यातुन एकमेकांविषयी परस्पर देवत्वाची भावना प्रकटेल, एकमेकांविषयी आदर आणि सहानुभूतीची ज्योत जागेल आणि तरच मनुष्यात खरी मानवता जागेल. मनुष्य एकमेकांसाठी जीव देइल आणि व्यक्तिगत स्वार्थ बाजुला ठेवुन परमार्थात पावले टाकील. स्व विसरुन सर्वांमधे सामावुन जाईल आणि विश्वात शांती व समृद्धीचे साम्राज्य पसरले जाईल.

'मा विद्विषावहै' -
आपण कधी ही एकमेकांचा द्वेष करु नये! 'मी' मधे 'तू' आणि 'तू' मधे 'मी' बघुन सर्वत्र मी-तू, माझे-तुझे पलीकडे, एक, अविनाशी, अखंड परमतत्वाचे दर्शन करुन सर्वत्र एक, अभंग, आध्यात्मिक एकता अनुभवून जगातुन रागद्वेष, दु:ख-दारिद्र्य, युद्ध-संघर्ष यास हद्दपार करुन सुख, शांति, व आनंदाने आनंदाकडे प्र्स्थान करुया!

उलट वाणीने 'हंस' उच्चाराने
गुरु-शिष्याचा भेद तो जाळतो ( सोSहं- हंसः )

नयना, धन्यवाद Happy

बर्‍याच ठिकाणी कुठलंही चांगलं सेवाकार्य पुर्ण झाल्यावर किंवा निदान त्या दिवसापुरतं थांबवताना हा शांतीपाठ घेतला जातो. एकतर सत्कार्य करतानाचं मनाला मिळत असलेलं समाधान आणि जोडीला हा शांतवणारा श्लोक.....खरंच एकप्रकारच्या प्रसन्न शांततेचा अनुभव येतो.

गणेशपुरीच्या प.पू. स्वामी नित्यानंद आश्रमातुन काही धार्मिक पुस्तके विकत घेतली होती. त्यातलं 'रुद्र' हे एक पुस्तक, यात रुद्रातील चमकम, नमकम अर्थासहीत दिले आहेत. एक शिव आरतीही त्यात आहे. कैलासावरील शिवपुजेचं इतकं सुंदर वर्णन इतरत्र कुठे असेल तर सांगा. (विशेषतः ३रे आणि ४थे पद) Happy

चाल: ओम जय जगदीश हरे सारखी

|| शिव आरती ||

ओम जय गंगाधर हर| शिव जय गिरिजाधीश, शिव जय गौरीनाथ|
त्वं मां पालय नित्यं, त्वं मां पालय शंभो, कृपया जगदीश| ओम हर हर हर महादेव || धृ ||

कैलासे गिरिशिखरे कल्पद्रुमविपिने, शिव कल्पद्रुमविपिने, गुंजति मधुकर पुंजे (२),कुंजवने गहने|
कोकिल कूजति खेलति हंसावलिललिता, शिव हंसा वलिललिता| रचयति कलाकलापं (२), नृत्यति मुदसहिता, ओम हर हर हर महादेव || १||

तस्मिंल्ललितसुदेशे शालामणिरचिता, शिव शालामणिरचिता| तन्मध्ये हरनिकटे (२), गौरीमुदसहिता|
क्रीडां रचयति भूषां रंजितनिजमीशं, शिव रंजितनिजमीशं| इन्द्रादिक सुरसेवित, ब्रम्हादिक सुरसेवित (२) प्रणमति ते शीर्षम, ओम हर हर हर महादेव|| २||

विबुधवधूर्बहु नृत्यति हृदये मुदसहिता, शिव हृदये मुदसहिता| किन्नरगानं कुरुते (२), सप्तस्वरसहिता| धिनकत थै थै धिनकत मृदंग वादयते, शिव मृदंग वादयते| क्वण क्वण ललिता वेणु (२), र्मधुरं नादयते,
ओम हर हर हर महादेव|| ३||

रुणु रुणु चरणे रचयति नूपुरमुज्वलितं, शिव नूपुरमुज्वलितं| चक्रावर्ते भ्रमयति (२), कुरुते तां धिक ताम|
तां तां लुपचुप तालं नादयते, शिव तालं नादयते| अंगुष्ठांगुलिनादं (२), लास्यकतां कुरुते,
ओम हर हर हर महादेव|| ४||

कर्पुरद्युतिगौरं पंचाननसहितं, शिव पंचाननसहितं| त्रिनयनशशिधरमौलि: (२),विषधरंकण्ठयुतम| सुन्दरजटाकलापं पावकयुतभालं शिव पावकयुतभालं| डमरुत्रिशुलपिनाकं (२), करधृतनृकपालं,
ओम हर हर हर महादेव || ५||

शंखनिनादं कृत्वा झल्लरि नादयते, शिव झल्लरि नादयते| नीराजयते ब्रम्हा, नीराजयते विष्णुर्वेदऋचां पठते| इति मृदुचरणसरोजं हृत्कमले धृत्वा, शिव हृत्कमले धृत्वा| अवलोकयति महेशं, अवलोकयति सुरेशं, ईशम अभिनत्वा| ओम हर हर हर महादेव|| ६||

रुण्डै: रचयति मालां पन्नगमुपवीतं, शिव पन्नगमुपवीतं| वामविभागे गिरिजा, वामविभागे गौरी रुपमतिललितम| सुन्दरसकलशरीरे कृतभस्माभरणं, शिवकृतभस्माभरणं| इति वृषभध्वजरुपं, हरशिवशंकररुपं, तापत्रयहरणं, ओम हर हर हर महादेव || ७||

ध्यानं आरति समये हृदये इति कृत्वा, शिव हृदये इति कृत्वा| रामं त्रिजटानाथं (२), ईशम अभिनत्वा| संगीतमेवं प्रतिदिनपठनं यः कुरुते, शिव पठनं यः कुरुते| शिवसायुज्यं गच्छति (२), भक्त्या यः श्रुणुते|
ओम हर हर हर महादेव || ८||

ओम जय गंगाधर हर, शिव जय गिरिजाधीश, शिव जय गौरीनाथ| त्वं मां पालय नित्यं, त्वं मां पालय शम्भो, कृपया जगदीश| ओम हर हर हर महादेव ||

या कुंदे:दुतुशार हार धवला या शुभ्र वस्त्रांवृता!.ह्या विणावर दंड्मंडीत करा या श्वेत पद्मासना
या ब्रम्हाच्युत शंकर भिर्दैवेसदा वंदिता ! सामापातु ......निशेष जाड्या पहा!

हे स्तोत्र पुर्ण नाही मध्ळे शब्द निटसे आठवत नाही आहे तरी कृपया हे पुर्ण करुन ह्यातील चुका दुरुस्त कराव्या..

स्मिता ,हा श्लोक असा आहे
या कुन्देन्दुतुषारहार धवला या शुभ्रवस्त्रावृता II
या वीणावर दण्डमण्डितकरा या श्वेत पद्मासना Ii
या ब्रम्हाच्युतशंकरप्रभृतिभिर्देवै: सदा वंदिता II
सा मां पातु सरस्वती भगवती नि:शेष जाड्या पहा II

श्री समर्थ रामदास स्वामी यांनी रचलेली करुणाष्टके येथे देत आहे:

अनुदिनी अनु तापे तापलो रामराया |
परम दिन दयाळा निरसी मोहमाया ||
अचपळ मन माझे नावरे आवरीता |
तुजवीण क्षीण होतो धाव रे धाव आता || १ ||

भजन रहित रामा सर्वही जन्म गेला |
स्वजनजनधनाचा व्यर्थ म्यां स्वार्थ केला ||
रघुपती मती माझी आपुलीसी करावी |
सकळ त्यजुनी भावे कास तुझी धरावी || २ ||

विषय जनित सूखे सौख्य होणार नाही |
तुजवीण रघुनाथा वोखटे सर्व काही ||
रविकूळटीळका रे हित माझे करावे |
दुरित दुरी हरावे सस्वरुपी भरावे || ३ ||

तनु मन धन माझे राघवा रूप तुझे |
तुजवीण मज वाटे सर्व संसार वोझे ||
प्रचलित न करावी सर्वथा बुद्धी माझी ||
अचळ भजनलीला लागली आस तुझी || ४ ||

चपळपण मनाचे मोडीता मोडवेना |
सकळ स्वजन माया मोडिता मोडवेना ||
घडी घडी विघडो हा निश्चयो अंतरीचा |
म्हणुनी करूणा हे बोलतो दीनवाचा || ५ ||

जळत हृदय माझे जन्म कोट्यानुकोटी |
मजवरी करुणेचा राघवा पूर लोटी ||
तळमळ निववी रे राम कारुण्यासिंधू |
षडरिपु कुळ माझे तोडीयाचा विरोधू || ६ ||

तुजवीण करूणा हे कोण जाणेल माझी |
शिणत शीणत पोटी पाहिली वाट तुझी ||
झडकरी झड घाली धाव पंचानना रे |
तुजवीण मज नेते जम्बुकी वासना रे || ७ ||

सबळ जनक माझा राम लावण्याकोटी |
म्हणवुनी मज पोटी लागली आस मोठी ||
दिवस गणित बोटी प्राण ठेवुनी कंठी |
अवचट मज भेटी हात घालीन मिठी || ८ ||

जननी जनक माया लेकरू काय जाणे |
पाय न लगत मुखी हाणता वत्स नेणे ||
जळधारकण आशा लागली चातकासी |
हिमकर अवलोकी पक्षीया भूमीवासी || ९ ||

तुजवीण मज तैसे जाहले देवराया |
विलग विषम काळी तूटली सर्व मायां ||
सकळजनसखा तू स्वामी आणिक नाही |
वमक वामन जैसे त्यागिले सर्व काही || १० ||

स्वजनधनाचा कोण संतोष आहे |
रघुपतीविण आतां चित्त कोठे न राहे ||
जिवलग जिव घेती प्रेत सांडूनी जाती |
विषय सकळ नेती मागुता जन्म देती || ११ ||

सकळ जन भवाचे आथिले वैभवाचे |
जिवलग मग कैचे चालती हेचि साचे ||
विलग विषम काळी सांडिली सर्व माळी |
रघुवीर सुखदाता सोडवी अंत काळी || १२ ||

सुख सुख म्हणता हे दु:ख ठाकुनि आले |
भजन सकळ गेले चित्त दुश्चित झाले ||
भ्रमित मन कळेना हित ते आकळेना |
परम कठीण देही देह्बुध्दी वळेना || १३ ||

उपरती मज रामी जाहली पूर्ण कामी |
सकळ भ्रम विरामी राम विश्राम धामी ||
घडी घडी मन आता रामरुपी भरावे |
रघुकुळटिळका रे आपुलेसे करावे || १४ ||

जळचर जळवासी नेणती त्या जळासी |
निशिदिन तुजपाशी चूकलो गुणराशी ||
भूमीधार निगमासी वर्णवेना जयासी |
सकळभूवनवासी भेट दे रामदासी || १५ ||

असंख्यात ते भक्त होऊनी गेले |
तीही साधनांचे बहु कष्ट केले ||
नव्हे कार्यकर्ता भूमीभार झालो |
तुझा दास मी व्यर्थ जन्मास आलो || १६ ||

बहू दास ते तापसी तीर्थवासी |
गिरीकंदरी भेटी नाही जनासी ||
स्थिती ऐकता थोर विस्मित झालो |
तुझा दास मी व्यर्थ जन्मास आलो || १७ ||

सदा प्रेमराशी तया भेटलासी |
तुझ्या दर्शने स्पर्शने सौख्यराशी ||
अहंता मनी शब्दज्ञाने बुडालो |
तुझा दास मी व्यर्थ जन्मास आलो || १८ ||

तुझ्या प्रीतीचे दास जन्मास आले |
असंख्यात ते कीर्ती बोलुनी गेले ||
बहु धोरणा थोर चकित झालो |
तुझा दास मी व्यर्थ जन्मास आलो || १९ ||

बहुसाल देवालये हाटकांची |
रसाळ कळा लाघवे नाटकांची ||
पूजा देखिता जाड जीवी गळालो |
तुझा दास मी व्यर्थ जन्मास आलो || २० ||

कित्येकी देह त्यागिले तुजलागी |
पुढे जाहले संगतीचे विभागी ||
देहेदु:ख होता वेगी पळालो |
तुझा दास मी व्यर्थ जन्मास आलो || २१ ||

किती योगमूर्ती किती पूण्यमूर्ती |
किती धर्म संस्थापना अन्नशांती ||
पस्तावलो कावलो तप्त झालो |
तुझा दास मी व्यर्थ जन्मास आलो || २२ ||

सदा सर्वदा राम सोडुनी कामी |
समर्था तुझे दास आम्ही निकामी ||
बहू स्वार्थ बुद्धिने रे कष्टविलो |
तुझा दास मी व्यर्थ जन्मास आलो || २३ ||

नसे भक्ती ना ज्ञान ना ध्यान काही |
नसे प्रेम हे राम विश्राम नाही ||
असा दिन अज्ञान मी दास तुझा |
समर्था जनी घेतला भार माझा || २४ ||

उदासीन हे वृत्ती जीवी धरावी |
अति आदरे सर्व सेवा करावी ||
सदा प्रीती लागो तुझे गुण गाता |
रघुनायका मागणे हेची आता || २५ ||

सदा सर्वदा योग तुझा घडावा |
तुझे कारणी देह माझा पडावा ||
उपेक्षु नको गुणवंता अनंता |
रघुनायका मागणे हेची आता || २६ ||

नको द्रव्य दारा नको येरझारा |
नको मानसी ज्ञानगर्वे फुगारा ||
सगुणी मना लावी रे भक्तिपंथा |
रघुनायका मागणे हेची आता || २७ ||

मनी कामना कल्पना ते नसावी |
कुबुध्धी कुडी वासना निरसावी ||
तुटो संशयो तोडी संसारव्यथा |
रघुनायका मागणे हेची आता || २८ ||

समर्थापुढे काय मागो कळेना |
दुराशा मनी बैसली हे ढळेना ||
नको संशयो निरसी सर्व चिंता
रघुनायका मागणे हेची आता || २९ ||

ब्रीदाकारणे दिन हाती धरावे |
म्हणे दास भक्तांसी रे उद्धरावे ||
तुटो ब्रीद आम्हासी सांडोनी जाता |
रघुनायका मागणे हेची आता || ३० ||

विश्रांती देही अणुमात्र नाही |
कुळाभिमाने पडलो प्रवाही ||
स्वहीत माझे होता दिसेना |
तुजवीण रामा मज कंठवेना || ३१ ||

विषयी जनाने मज लाजवीले |
प्रपंचसंगे आयुष्य गेले ||
समयी बहु क्रोध शांती घडेना |
तुजवीण रामा मज कंठवेना || ३२ ||

संसार संगे बहु पीडलो रे |
कारुण्यसिंधू मज सोडावी रे ||
कृपा कटाक्षे सांभाळी दीना |
तुजवीण रामा मज कंठवेना || ३३ ||

आम्हा अनाथांसी तू एक दाता |
संसारचिंता चुकवी समर्था ||
दासा मनी आठव विसरेना |
तुजवीण रामा मज कंठवेना || ३४ ||

|| जय जय रघुवीर समर्थ ||

मला स्वाध्याय च्या सन्ध्याकाल च्या आरत्या हव्या आहेत. कोनाकदे अस्तिल तर क्रुपया लिन्क द्या किन्वा लिहुन असेल तर द्या.

Pages