Submitted by विशाल कुलकर्णी on 21 April, 2011 - 07:50
भोवताली आज माझ्या दांभिकांचा गाव आहे
कोण नाही चोर? जो तो भासवी "मी साव आहे!"..
देव तो माझाच होता, माणसांची साथ होती
राहिलो ना तोच मी पण सभ्यतेचा आव आहे...
आरशाला सांगतो मी रोज गोष्टी वंचनेच्या
काळजावर आजही माझ्या पुराणा घाव आहे...
जोडली होती न तेव्हाही कधी नाती सुखांशी
आजही "आहे सुखी मी" हाच खोटा भाव आहे...
सोडले आहे कधीचे माणसांना शोधणे मी
ना कुणाची आस आता, ना कशाची हाव आहे!
विशाल...
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
सोडले आहे कधीचे माणसांना
सोडले आहे कधीचे माणसांना शोधणे मी
ना कुणाची आस आता, ना कशाची हाव आहे>>> क्लासिक शेर!
-'बेफिकीर'!
गझल हा माझा प्रांत नाही
गझल हा माझा प्रांत नाही त्यातुन बेफिकीर साहेबांच्या प्रतिसादावर प्रतिसाद बरोबर नाही. आवडली गड्या तुझी गझल.
सोडले आहे कधीचे माणसांना
सोडले आहे कधीचे माणसांना शोधणे मी
ना कुणाची आस आता, ना कशाची हाव आहे!>>>सुंदर शेर!!
एकूणच गझल सफाईदार झाली आहे.
पुढील लेखनास शुभेच्छा!!
वा रे भाऊ एकदम मस्त आता खरच
वा रे भाऊ एकदम मस्त
आता खरच तुझा हेवा वाटतोय
पंचालेंचा सल्ला इतका प्रभावी ठरेल असे वाटले नव्हते.
पंचालेंनी काय सल्ला दिला ते
पंचालेंनी काय सल्ला दिला ते कृपया समजल्यास बरे वाटेल.
धन्यवाद!
-'बेफिकीर'!
काय सॉल्लिड गझल लिहिलि आहेस
काय सॉल्लिड गझल लिहिलि आहेस विशाल भाउ! कोणता शेर आवडला म्हणून सांगू? सगळेच इतके अप्रतिम आहेत.. जियो!!
वाह....... मस्तच..... जोडली
वाह.......
मस्तच.....
जोडली होती न तेव्हाही कधी नाती सुखांशी
आजही "आहे सुखी मी" हाच खोटा भाव आहे...
अशक्य भारी....
अरे अमित सल्ला पांचाळेंनी
अरे अमित सल्ला पांचाळेंनी नाही, क्रांतिताईने दिलाय. गझलनवाझ भीमराव पांचाळे हे गझलगायक आहेत, गझलकार नव्हे. इथे क्रांतिताई साडेकर आणि डॉ. कैलास हे माझे गुरू आहेत या क्षेत्रातले
मन:पूर्वक आभार मंडळी !
भोवताली आज माझ्या दांभिकांचा
भोवताली आज माझ्या दांभिकांचा गाव आहे
कोण नाही चोर? जो तो भासवी "मी साव आहे!"..
देव तो माझाच होता, माणसांची साथ होती
राहिलो ना तोच मी पण सभ्यतेचा आव आहे...
सोडले आहे कधीचे माणसांना शोधणे मी
ना कुणाची आस आता, ना कशाची हाव आहे!.............
ये ब्बात... !!! छान शेर आहेत..
या गझलेवरुन्,मनोहर रणपिसेंची सुप्रसिद्ध गझल आठवली....दोन्ही गझलांची जमीन एकच आहे.
काळजाच्या पायथ्याला वेदनेचा गाव आहे
जीवघेण्या वेदनेला ''प्रेम'' ऐसे नाव आहे.
शिस्त आहे लावली माझिया दु:खास मी
आसवांना पापण्यांशी यायचा मज्जाव आहे.
>>>सोडले आहे कधीचे माणसांना
>>>सोडले आहे कधीचे माणसांना शोधणे मी
ना कुणाची आस आता, ना कशाची हाव आहे!<<<
वा ! मस्त!
मस्त रे विशल्या
मस्त रे विशल्या
विशालभाऊ मस्त लिवलंत.. आवडलं
विशालभाऊ
मस्त लिवलंत.. आवडलं आपल्याला. लिवत -हावा
सोडले आहे कधीचे माणसांना
सोडले आहे कधीचे माणसांना शोधणे मी
ना कुणाची आस आता, ना कशाची हाव आहे!
खूप खूप सही!
मक्त्यात तोडलत विशालराव
मक्त्यात तोडलत विशालराव !
(मालक, आता म्हनुच द्या इशालराव !
क्रांती? व्हय,व्हय...क्रांतिच झाली म्हनायची !!
क्रांतिताई बी ह्येच म्हनत्याल..)
व्वाव्वा विशाल!! क्या बात
व्वाव्वा विशाल!! क्या बात है!!! आवडली खूपच!!
व्वा...तंत्रासोबत 'विशाल'
व्वा...तंत्रासोबत 'विशाल' मंत्र अगदी निरागसपणे टिकवून ठेवलास हे मात्र ग्रेट. क्रांतीताई आणि डॉ. द्रोणाचार्य पुरस्कार!
मनःपूर्वक धन्यवाद मंडळी !
मनःपूर्वक धन्यवाद मंडळी !
आवडली रे !
आवडली रे !
आवडेश!
आवडेश!
खूप छान!
खूप छान!
भावार्थ खुप आवडला.
भावार्थ खुप आवडला.
धन्यवाद मंडळी !
धन्यवाद मंडळी !
ग्रेट.. खूपच छान.. देव तो
ग्रेट.. खूपच छान..
देव तो माझाच होता, माणसांची साथ होती
राहिलो ना तोच मी पण सभ्यतेचा आव आहे...
आणि शेवटपण लय भारी..
ठांकु बर्का मुक्ताई
ठांकु बर्का मुक्ताई
अप्रतिम शेर आहेत! सोडले आहे
अप्रतिम शेर आहेत!
सोडले आहे कधीचे माणसांना शोधणे मी
ना कुणाची आस आता, ना कशाची हाव आहे!.............
क्या बात है! विशालजी!
विशालभौ, तगडी जमलीये !
विशालभौ, तगडी जमलीये !
संतोषजी, नाखु मनःपूर्वक आभार
संतोषजी, नाखु मनःपूर्वक आभार !!
सोडले आहे कधीचे माणसांना
सोडले आहे कधीचे माणसांना शोधणे मी
ना कुणाची आस आता, ना कशाची हाव आहे! >>>> मस्त
बाकी गझल पण सहज आहे...
आता जरा वेगवेगळ्या कल्पना येउद्यात...
मनापासून पुलेशु
धन्यवाद मिल्याभौ... नक्की
धन्यवाद मिल्याभौ...
नक्की प्रयत्न करेन
वा.... मस्त गझल
वा.... मस्त गझल
Pages