भोवताली आज माझ्या दांभिकांचा गाव आहे

Submitted by विशाल कुलकर्णी on 21 April, 2011 - 07:50

भोवताली आज माझ्या दांभिकांचा गाव आहे
कोण नाही चोर? जो तो भासवी "मी साव आहे!"..

देव तो माझाच होता, माणसांची साथ होती
राहिलो ना तोच मी पण सभ्यतेचा आव आहे...

आरशाला सांगतो मी रोज गोष्टी वंचनेच्या
काळजावर आजही माझ्या पुराणा घाव आहे...

जोडली होती न तेव्हाही कधी नाती सुखांशी
आजही "आहे सुखी मी" हाच खोटा भाव आहे...

सोडले आहे कधीचे माणसांना शोधणे मी
ना कुणाची आस आता, ना कशाची हाव आहे!

विशाल...

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

सोडले आहे कधीचे माणसांना शोधणे मी
ना कुणाची आस आता, ना कशाची हाव आहे>>> क्लासिक शेर!

-'बेफिकीर'!

गझल हा माझा प्रांत नाही त्यातुन बेफिकीर साहेबांच्या प्रतिसादावर प्रतिसाद बरोबर नाही. आवडली गड्या तुझी गझल.

सोडले आहे कधीचे माणसांना शोधणे मी
ना कुणाची आस आता, ना कशाची हाव आहे!>>>सुंदर शेर!!

एकूणच गझल सफाईदार झाली आहे.

पुढील लेखनास शुभेच्छा!!

वा रे भाऊ एकदम मस्त
आता खरच तुझा हेवा वाटतोय
पंचालेंचा सल्ला इतका प्रभावी ठरेल असे वाटले नव्हते.

वाह.......
मस्तच.....
जोडली होती न तेव्हाही कधी नाती सुखांशी
आजही "आहे सुखी मी" हाच खोटा भाव आहे...
अशक्य भारी....

अरे अमित सल्ला पांचाळेंनी नाही, क्रांतिताईने दिलाय. गझलनवाझ भीमराव पांचाळे हे गझलगायक आहेत, गझलकार नव्हे. इथे क्रांतिताई साडेकर आणि डॉ. कैलास हे माझे गुरू आहेत या क्षेत्रातले Happy
मन:पूर्वक आभार मंडळी !

भोवताली आज माझ्या दांभिकांचा गाव आहे
कोण नाही चोर? जो तो भासवी "मी साव आहे!"..

देव तो माझाच होता, माणसांची साथ होती
राहिलो ना तोच मी पण सभ्यतेचा आव आहे...

सोडले आहे कधीचे माणसांना शोधणे मी
ना कुणाची आस आता, ना कशाची हाव आहे!.............

ये ब्बात... !!! छान शेर आहेत..

Happy

या गझलेवरुन्,मनोहर रणपिसेंची सुप्रसिद्ध गझल आठवली....दोन्ही गझलांची जमीन एकच आहे.

काळजाच्या पायथ्याला वेदनेचा गाव आहे
जीवघेण्या वेदनेला ''प्रेम'' ऐसे नाव आहे.

शिस्त आहे लावली माझिया दु:खास मी
आसवांना पापण्यांशी यायचा मज्जाव आहे.

मक्त्यात तोडलत विशालराव !
(मालक, आता म्हनुच द्या इशालराव !
क्रांती? व्हय,व्हय...क्रांतिच झाली म्हनायची !!
क्रांतिताई बी ह्येच म्हनत्याल..)

व्वा...तंत्रासोबत 'विशाल' मंत्र अगदी निरागसपणे टिकवून ठेवलास हे मात्र ग्रेट. क्रांतीताई आणि डॉ. द्रोणाचार्य पुरस्कार!

ग्रेट.. खूपच छान.. Happy

देव तो माझाच होता, माणसांची साथ होती
राहिलो ना तोच मी पण सभ्यतेचा आव आहे...

आणि शेवटपण लय भारी.. Happy

अप्रतिम शेर आहेत!
सोडले आहे कधीचे माणसांना शोधणे मी
ना कुणाची आस आता, ना कशाची हाव आहे!.............
क्या बात है! विशालजी!

सोडले आहे कधीचे माणसांना शोधणे मी
ना कुणाची आस आता, ना कशाची हाव आहे! >>>> मस्त

बाकी गझल पण सहज आहे...

आता जरा वेगवेगळ्या कल्पना येउद्यात...

मनापासून पुलेशु

Pages