कृती १:
साहित्यः अॅस्परॅगस, मीठ, मिरपूड, लिंबाचा रस, ऑलिव ऑईल
कृती:
एका अॅस्परॅगसचे ३ तुकडे अशा प्रकारे अॅस्परॅगस (लांब तुकडे) चिरून घेणे.
आधीच उकळलेल्या पाण्यात अॅस्परॅगस टाकून २ मिनिट्स शिजू द्यायचे.
२ मिनिट्स झाले की हे अॅस्परॅगस गरम पाण्यातून काढून बर्फाच्या/थंडगार पाण्यात टाकायचं (ह्यामुळे त्याचा कलर हिरवागार रहातो)
थोड्यावेळानं अॅस्परॅगस पुसून (कोरडं करून) पॅन मधे टाकायचं -ऑलिव ऑईल स्प्रे करून - त्यावर मिरपूड, मीठ स्प्रिंकल करायचं - अर्धा चमचा वगैरे लिंबाचा रस घालायचा. थोडंस भाजून झालं की खायला घ्यायचं.
जास्त वेळ उकळत्या पाण्यात राहिलं तर ते पिचपिचित होतं - मग खायची तेवढी मजा येत नाही.
मला महान आवडला हा प्रकार!
कृती २:
ही कृती बरीचशी बाणाच्या/कांद्याच्या पातीसारखी आहे.
साहित्यः अॅस्परॅगस, बारिक चिरलेला कांदा, लसूण, मिरच्या, मीठ, लिंबू, गूळ (लिंबू, गूळ ऑप्शनल),दाण्याचं कूट आणि बेसन, फोडणीचं साहित्य
कांद्याची पात भाजीसाठी ज्या आकारात आणि ज्या आकारमानाची चिरतात तसा अॅस्परॅगस चिरून घेणे.
जिरे मोहरी मिरच्या आणि हळदीची फोडणी करून त्यात बारिक चिरलेला कांदा लसूण घालायचा. परतून घ्यायचा
ह्यात अॅस्परॅगस टाकून परतून घ्यायचं - फोडणीच्या तेलात आणि भाजीत बसेल एवढं बेसन लावायचं.
दाण्याचं कूट, आवडत असेल तर लिंबू-गूळ, मीठ घालायचं आणि झाकण ठेवून एक हलकी वाफ येऊन द्यायची (डाळीचं पीठ शिजण्यापुरती वाफ - जास्त वेळ वाफ येऊ दिली तर अॅस्परॅगसचं टेक्श्चर बदलतं आणि तितकी मजा येत नाही)
थोडा वेळ झाकण काढून परतू द्यायचं..
हे नुसतं खायलाही मस्त लागतं. ह्याच्या टेक्श्चर मुळे मला हुरड्याची आठवण झाली.
फोटू.........................
फोटू...........................
नानबा मी कधीही आणल किंवा
नानबा मी कधीही आणल किंवा खाल्ल नाहीये.
आधी तुझ्याकडे येऊनच खाऊन बघते. कधी येऊ?
फोटू नाय काढला
फोटू नाय काढला बागूलबुवा..
अनु, ये कधीही.. आता आपण शेजारी... (पसार्याकडे काणाडोळा करायला लागेल मात्र :P)
नानबा ही कृती तू "नवीन
नानबा ही कृती तू "नवीन पाककृती" न लिहीता "लेखनाचा धागा" म्हणून का लिहीलीयेस?
चुकून.. एडिट करता येतय का
चुकून.. एडिट करता येतय का बघते...
एडिट करता येत नसेल तर नवीन
एडिट करता येत नसेल तर नवीन पाकृ मधे टाकावं लागेल का? का मदतसमीती मदत करू शकेल?
हो नवीन पाककृती म्हणून टाकावी
हो नवीन पाककृती म्हणून टाकावी लागेल. तशी टाकलीस तर अॅडमीनना हा धागा डीलीट करायला सांगता येईल.
मी, अस्पेरॅगस धुउन, थोडं
मी, अस्पेरॅगस धुउन, थोडं तेलात परतुन, तिखट, मीठ, मसाला लावुन तोंडी लावतो. एक मस्त स्वाद असतो त्याला.
तुमची कृती १: करुन पाहतो.
नानबा छान कृती. नक्की करुन
नानबा छान कृती. नक्की करुन बघेन
मी ना जराश्या तेलात जिरं+थोडसं किसलेले आलं टाकुन त्यात अस्पेरॅगस चे धूऊन तुकडे टाकते, आणि शेवटी थोडसं मीठ. अशीपण छान लागतात.
अॅस्पारेगस माझं एकदम आवडतं
अॅस्पारेगस माझं एकदम आवडतं आहे!
कृती क्र २ करुन बघते!
हा घ्या फोटो . पांढरे
हा घ्या फोटो .
पांढरे अॅस्पारॅगस मी उकडून होलांडेज सॉस ( http://en.wikipedia.org/wiki/Hollandaise_sauce ) बरोबर खायला किंवा सूप करायला वापरते .
हिरवे अॅस्पारॅगस सॅलड म्ह्णून वापरते .
हे इकडे मिळतं काय? यातली
हे इकडे मिळतं काय? यातली पोषणमुल्य कोणती?
हे बघ अश्विनी , इथे सगळी
हे बघ अश्विनी , इथे सगळी माहिती आहे .
http://en.wikipedia.org/wiki/Asparagus
प्रोटिन्स , व्हिटॅमिन्स ए , बी ६ , सी , के आणि पोटॅशियम असल्याने आणि तरीही लो कॅलरीज असल्याने अॅस्पारॅगस खाणे आरोग्यासाठी चांगले .
Asparagus racemosus म्हणजे आपली शतावरी .
ठेंकू संपदा शतावरी ? मग
ठेंकू संपदा
शतावरी ?
मग आरोग्याला चांगलंच की.
इथे त्याचे असले दांडुके विकायला आलेले दिसत नाहीत.
http://www.maayboli.com/node/
http://www.maayboli.com/node/19540
या दोन वेगवेगळ्या वनस्पति आहेत.
अश्विनी , दोन्ही वेगळ्या
अश्विनी , दोन्ही वेगळ्या आहेत हं .
आय होप काही गोंधळ होणार नाही . 
बरोबर दिनेशदा , म्हणूनच आपल्या शतावरीचं शास्त्रीय नांव दिलंय मी .
बरं बरं. थँक्स दिनेशदा आणि
बरं बरं. थँक्स दिनेशदा आणि संपदा
अॅस्परॅगस ठाण्यात शोधलं पाहिजे. आवडो न आवडो, यातील आवश्यक खनिजांसाठी खाल्लं पाहिजे.
नानबा, छान आहेत पाकृ. दुसरी
नानबा, छान आहेत पाकृ. दुसरी करुन पाहते. त्याआधी शतावरी कुठे मिळते का ते पाहते
मी अजुन इथे पाहीलेले
मी अजुन इथे पाहीलेले नाहीत.
बाकी कृती छान.
नानबा कधी येऊ खायला?
नानबा कधी येऊ खायला?
अजुन एक अॅस्पारॅगसची रेसिपी
अजुन एक अॅस्पारॅगसची रेसिपी nonveg खाणार्यांसाठी : अॅस्पारॅगस उकडून घ्यायचे. ham चे पात्तळ गोल काप घ्यायचे. त्यात अॅस्पारॅगस रोल करायचे. एका baking दिश ला butter लावायचे. त्यात हे रोल ठेवायचे , वरून chees घालायचे. oven preheat करायचा . त्यात हि बकिंग डिश ठेऊन ५-७ मिनिटे bake करायेचे. just chees मेल्ट होईल इतकेच.
खूप पटकन होणारी आणि मस्त डिश आहे.
मुंबईला अॅस्पारागस, ग्रांट
मुंबईला अॅस्पारागस, ग्रांट रोडच्या भाजी गल्लीत बघितली होती. बाकी ठिकाणी पण मिळत असेल.
अॅस्परॅगस अजून काही मराठमोळं
अॅस्परॅगस अजून काही मराठमोळं नाव आहे का? कारण भाजीवाल्यांना ते अॅस्परॅगस नाव माहित असलं तर ठिक आहे.
केश्विनी, अगं ती आपल्याकडे
केश्विनी,
अगं ती आपल्याकडे exotic vegetable या सदरात मोडते. कुठल्यातरी फॅन्सी जागीच (उदा- हायपरसिटी) मिळेल आणि हौस म्हणून करणार असशील तर ठिक नाहीतर पास केलेस तरी चालेल.
नानबा- गुडवन.
नानबा, इथे लिहायचं राहूनच
नानबा, इथे लिहायचं राहूनच गेलं होतं. अगदी तुझ्या पद्धतीनेच ( लिंबू, गुळासकट ) भाजी करते इथलं वाचल्यापासून. फारच छान लागते. धन्यवाद
नानबा, छान आहे पाकृ १. ही मी
नानबा, छान आहे पाकृ १. ही मी NDTV वर पण पाहिली होती. थोडासा बदल म्हणजे, त्याने ऑलिव्ह ऑइल स्प्रे करुन मग MW मधे बनवली होती.
पुण्यात शिवाजी मार्केट (कॅम्प) मधे सहज मिळते ही भाजी. दोराबजी मधे सकाळी लवकर गेलं तर असते. फार जास्त ठेवत नाहीत, त्यामुळे दुपारी/संध्याकाळी गेलं तर मिळत नाही.
नशीब बुवा तुम्हा भारतीयांचे,
नशीब बुवा तुम्हा भारतीयांचे, श्रीमंत आहात. इथे अस्पॅरागस फार महाग वाटते. पण कुठल्याहि सुपरमार्केट मधे मिळते!
इकडे पण अशा फॅन्सी भाज्या
इकडे पण अशा फॅन्सी भाज्या महागच असतात.
फार कशाला मश्रुम, बेबी कॉर्न या देसी भाज्याही चांगल्याच महाग असतात.
ही तर मूळची आफ्रिका-आशियातली
ही तर मूळची आफ्रिका-आशियातली ना?
नानबा, लिंबूरसाची कल्पना
नानबा, लिंबूरसाची कल्पना नव्हती माहिती. मिरपुड खाल्ली माझे अंग एकदम उष्ण होते म्हणून मी मिरपुड खात नाही. आता लिंबुरसाचा प्रयोग करुन पाहीन.
संपदा, इथे फक्त हिरवीच शतावरी मिळते. पांढरी कधी पाहिलीच नव्हती.
Pages