कृती १:
साहित्यः अॅस्परॅगस, मीठ, मिरपूड, लिंबाचा रस, ऑलिव ऑईल
कृती:
एका अॅस्परॅगसचे ३ तुकडे अशा प्रकारे अॅस्परॅगस (लांब तुकडे) चिरून घेणे.
आधीच उकळलेल्या पाण्यात अॅस्परॅगस टाकून २ मिनिट्स शिजू द्यायचे.
२ मिनिट्स झाले की हे अॅस्परॅगस गरम पाण्यातून काढून बर्फाच्या/थंडगार पाण्यात टाकायचं (ह्यामुळे त्याचा कलर हिरवागार रहातो)
थोड्यावेळानं अॅस्परॅगस पुसून (कोरडं करून) पॅन मधे टाकायचं -ऑलिव ऑईल स्प्रे करून - त्यावर मिरपूड, मीठ स्प्रिंकल करायचं - अर्धा चमचा वगैरे लिंबाचा रस घालायचा. थोडंस भाजून झालं की खायला घ्यायचं.
जास्त वेळ उकळत्या पाण्यात राहिलं तर ते पिचपिचित होतं - मग खायची तेवढी मजा येत नाही.
मला महान आवडला हा प्रकार!
कृती २:
ही कृती बरीचशी बाणाच्या/कांद्याच्या पातीसारखी आहे.
साहित्यः अॅस्परॅगस, बारिक चिरलेला कांदा, लसूण, मिरच्या, मीठ, लिंबू, गूळ (लिंबू, गूळ ऑप्शनल),दाण्याचं कूट आणि बेसन, फोडणीचं साहित्य
कांद्याची पात भाजीसाठी ज्या आकारात आणि ज्या आकारमानाची चिरतात तसा अॅस्परॅगस चिरून घेणे.
जिरे मोहरी मिरच्या आणि हळदीची फोडणी करून त्यात बारिक चिरलेला कांदा लसूण घालायचा. परतून घ्यायचा
ह्यात अॅस्परॅगस टाकून परतून घ्यायचं - फोडणीच्या तेलात आणि भाजीत बसेल एवढं बेसन लावायचं.
दाण्याचं कूट, आवडत असेल तर लिंबू-गूळ, मीठ घालायचं आणि झाकण ठेवून एक हलकी वाफ येऊन द्यायची (डाळीचं पीठ शिजण्यापुरती वाफ - जास्त वेळ वाफ येऊ दिली तर अॅस्परॅगसचं टेक्श्चर बदलतं आणि तितकी मजा येत नाही)
थोडा वेळ झाकण काढून परतू द्यायचं..
हे नुसतं खायलाही मस्त लागतं. ह्याच्या टेक्श्चर मुळे मला हुरड्याची आठवण झाली.
मस्त.. इथे अॅस्परॅगस बघूनच
मस्त.. इथे अॅस्परॅगस बघूनच इतका आवडतो की त्याची काहीतरी रेसिपी हवीच होती. धन्यवाद!
Pages