अमानवीय...?

Submitted by आशुचँप on 27 November, 2009 - 09:06

आपल्यापैकी किती जणांचा भुता-खेतांवर विश्वास आहे?
मला मान्य आहे हा खूपच वादाचा मुद्दा आहे. काही जण याचे कट्टर समर्थक असतील तर काही विज्ञाननिष्ठ हे सगळे थोतांड म्हणून उडवून लावतील. मी स्वत:ही या जगात भुता-खेतांची वस्ती असेल असे मानत नाही. तरीदेखील मी हा विषय का आणतोय हे जाणण्यासाठी पुढील अनुभव वाचा.
प्रसंग १ - माझा ट्रेकींग-गुरू उमेशबरोबर आम्ही हरिश्चंद्रगडाचा बेत आखला. होय-नाही करता करता चौघेजण गाड्यांवरून निघालो. मंचर-आळेफाटा-खुबीफाटा मार्गे खिरेश्वरला पोचलो तेव्हा दिवस कलायला लागला होता. तेव्हा वेळ न घालवता पटकन चहा मारून चालायला सुरूवात केली. दाट जंगलातून वाट काढत जेव्हा टोलारखिंडीत पोहोचलो त्यावेळी चांगलाच अंधार पडला होता.
आजुबाजूचे वातावरण अन्य वेळी खूप छान वाटले असते, पण एकतर उमेश वगळता बाकी तिघे पहिल्यांदाच हरिश्चंद्रगडावर येत होतो. त्यातून या अशा अंधार्‍या रात्री (नंतर लक्षात आले त्या दिवशी अमावस्या होती), दाट जंगलात झाडांच्या अस्ताव्यस्त पसरलेल्या फांद्या, खिंडीच्या कोंदट जागेत भयाण वाटत होत्या.
मला वाचल्याचे आठवले की खिंडीमध्ये एक व्याघ्रशिल्प आहे. मी सहज त्याला विचारले "अरे खिंडीत एक व्याघ्रशिल्प आहे ना? कुठे आहे ते?"
त्याने मी जिथे बसलो होतो तिथे टॉर्चचा लाइट टाकला आणि म्हणाला "ते काय तुझ्या मागे"
मी मागे वळून पाहीले आणि एकदम दचकलो. माझ्या मागेच लालभडक शेंदूर फासलेले वाघोबा होते.
मनावर भितीचा अंमल बसत असतानाच आम्ही पुढे चालायला सुरूवात केली. रॉक्-पॅच ओलांडून वरती आलो. अमावस्या असल्यामुळे रात्र जास्तच अंधारी वाटत होती. त्यात कसा कोण जाणे उमेश वाट चुकला. फिर-फिरूनही वाट सापडेना तेव्हा थोडा वेळ थांबायचा निर्णय घेतला.
डिसेंबर असल्याने थंडी बर्‍यापैकी होती. एक मोकळी जागा पाहून बसलो. तोपर्यंत उमेशने पालापाचोळा गोळा करून शेकोटी पेटवली. जरी तो एकदम नॉर्मल असल्याचे दाखवत होता तरी त्याची अस्वस्थता आम्हा तिघांनाही जाणवली. त्याला विचारले तर त्याने उडवून लावले. शेवटी अगदी खनपटीलाच बसलो तेव्हा कुठे म्हणाला "मला या अशा ठिकाणी अजिबात रात्र काढायची नाहीये. फार वाईट अनुभव आहे" त्या ठिकाणी रात्र काढायची आमचीही अजिबात इच्छा नव्हती, तरीपण त्याला अनुभव काय आलाय हे ऐकण्याची जबरदस्त इच्छा झाली.
सगळ्यांनी अगदी आग्रह केल्यानंतर कुठे तो तयार झाला. आम्ही पुढे सरसावून बसलो, सगळे लक्ष त्याच्याकडे लागले. शेकोटीचा तांबडालाल उजेड त्याच्या चेहर्‍यावर पडत होता. आजुबाजूचा भयाण अंधार विसरायला झाला. त्याने जो अनुभव सांगीतला तो त्याच्याच शब्दात.................
साधारण तीन वर्षापूर्वी मी माझ्या काही मित्रांबरोबर या ट्रेकला आलो होतो. आमच्यामध्ये एक फडतरे म्हणून एक जण होता. तो पहिल्यांदाच ट्रेकला येत होता. आत्ता आपण आलो तसेच तेव्हाही संध्याकाळी उशीरा चालायला सुरूवात केली. पण फडतरेला चालवेना आणि तो खालीच बसला. आम्ही त्याला कसाबसा आणखी चालवला पण त्याचा स्टॅमिना अगदीच संपला होता. शेवटी असेच जंगलात थांबायचे ठरवले. सगळेजण ओळीत झोपलो, अर्थातच फडतरे मधे.
रात्री अचानक जाग आली ती फडतरेच्या आवाजामुळे. तो एकदम जोरजोराने ओरडत होता. मला पहिले काही समजेना. आधी वाटले त्याला साप - वगैरे चावला की काय. सगळेजण त्याभोवती गोळा झाले.
तो नुसताच ओरडत होता "नाही नाही ... नको नको"
त्याला शांत करायचा प्रयत्न केला पण तो काही ऐकेना. शेवटी एकजण पुढे झाला आणि त्याने खाण्णकरून त्याला मुस्कडले. त्याचा आवाज तर बंद झाला. तसाच मुसमुसत थोडा वेळ पडून राहीला. नंतर त्याने जे सांगितले ते असे -- त्याला म्हणे स्वप्नात दोघेजण दिसले. ते त्याला म्हणत होते की तु आमच्याबरोबर चल.
अर्थातच आम्ही हा सगळा प्रकार हसण्यावारी नेला. त्याची जाम टिंगल-टवाळी पण केली. या प्रकारानंतर झोप कोणालाच आली नाही. पहाटेपर्यंत इकडतिकडच्या गप्पा मारत बसलो.
सकाळी उठून गडावर गेलो. मंदीरापाशी पहातो तर ही गर्दी. गडावर काही उत्सव असल्याचे माहीत नव्हते. अजून पुढे गेलो तर दोन पोलिसही दिसले. आता आम्ही बुचकळ्यात पडलो. एवढ्या पहाटे पोलिस काय करतायत इथे?
एक गावकरी भेटला. त्याच्याकडून अशी माहीती मिळाली की काल गडावर एक ग्रुप आला होता. त्यातले काही जण पोहायला म्हणून पुष्करणी तळ्यात उतरले आणि बुडून मेले. त्यांच्या डेडबॉडीज काढायचे काम रात्रभर चालले होते. आत्त्ता कुठे त्या मिळाल्या.
अरेरे... का हे लोक असे करतात? असा विचार करत आम्ही आणखी पुढे गेलो. तोच फडतरे घाईघाईने माझ्या जवळ आला आणि म्हणाला "उम्या, आत्ताच्या आत्त्ता गड उतरायचा. काय वाट्टेल ते झाले तरी."
मला कळेना याला आता परत काय झाले.
त्याने मला हळूच बाजूला नेले आणि म्हणाला "अरे या दोन डेडबॉडीज दिसतायत ना? मला हेच दोघे काल रात्री न्यायला आले होते,"

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझे असेच अनुभव आहेत...
माझी आई गेली तेव्हा तिच्या डोळ्यांत मला ते दिसलं होतं... ती जे काही बोलत होती, सांगत होती ते निरवानिरवीचं आहे हे कळलं होतं...

माझ्या ऑफिसपासून घरी जाणार्‍या रस्त्यावर लालबागच्या पुलाचं काम सुरू आहे... तिथून जाताना मला नेहमी असं वाटायचं की हा पूल पडणार... मी खूप घाबरत घाबरत त्या पुलाकडे बघत तिथून जायचे... काही दिवसांनी मी ऑफिसला आले आणि त्या पुलाचा, मी जिथे बघत होते त्याच्या बाजूचा भाग पडल्याची बातमी आली... मी सुन्नच झाले.. सुदैवाने त्यात काही जीवितहानी झाली नाही... मी लगेच माझ्या एका ओळखीच्या न्यूमरॉलॉजिस्ट्चा सल्ला घेतला... असे वाईट घटनांचे इंन्ट्युशन्स मला खूप येतात...

एकदा ऑफिसात असताना वॉटरप्युरीफायरकडे जात असताना अचानक माझ्या डोळ्यासमोर दृष्य आले की, माझे वडील आजारी आहेत आणि मला मध्यरात्री मोबाईलवर फोन आलाय. ध्यानी मनी काही नसताना अचानक स्वप्नासारखा तो प्रसंग डोळ्यासमोर येऊन गेला. त्याच रात्री आईचा मध्यरात्री फोन आला. काहीच शारीरीक त्रास नसताना वडीलांना फीट येऊन ते बेशुद्ध झाले होते.

मी लगेच माझ्या एका ओळखीच्या न्यूमरॉलॉजिस्ट्चा सल्ला घेतला... असे वाईट घटनांचे इंन्ट्युशन्स मला खूप येतात...
ठमे,
हे आधीच नाही सांगायच नाही का ?
मलाबी सेम कथा ! मला बरं वाटल असतं ना ..!
Happy

माझ्या मित्राची गोष्ट
समीरला एका रात्री स्वप्न पडल की तो त्याच्या नाटक गृप मधल्या फडक्यांबरोबर मुस्लिम मोहल्ल्यत गेलाय आणि तिथे त्यानी दत्ताच दर्शन घेतल.

हे स्वप्न त्याने सांगितल तेव्हा खरा धक्का बसला कारण

त्याच रात्री फडक्यानाही स्वप्न पडल की ते मोहल्ल्यात दत्ताच्या दर्शनाला गेलेत तेही समीरबरोबरच.

मोहल्ल्यात एक राम आहे पण दत्त नाही पण आजही त्याबद्दल आश्वर्य व्यक्त होतय

"चिमणराव" तुम्हाला फक्त भुतांचे स्माईली पाहुन "थ्रिल फिल्ल" होतो असं म्हणायचं आहे का?
.
.
.
.
तर... मला सांगा...!

लहानपणी प्रायमरी शाळेत असता हे planchate चे उद्योग केलेत.. अगदी खोलीत अंधार करून, चौरंगावर पावडर टाकून,ए,बी,सी,डी ,झेड पर्यन्त चे चिटोरे कडेकडेने नीट लावून ठेवायचे. मग मधोमध एक मेणबत्ती ठेवायची. तिच्यावर एक काचेचा ग्लास उपडा करून लगेच तीन जणांनी आपापली तर्जनी हलकेच त्यावर ठेवायची.थोड्या वेळाने ग्लास हलू लागे. मग निरराळे प्रश्न विचारून यस्,नो, किंवा काही उत्तरे ही ग्लास फिरून फिरून स्पेल करे. मग जे कुणी आलं असेल त्याला प्रार्थना करून परत जायला सांगायचे. खरच थोड्या वेळाने ग्लास फिरणं बंद व्ह्यायचा.. लहानपणी कधी या प्रकाराची भीती वाटली नाही,पण आता नाही करवणार असलं काही ..

Happy संजीव.. तेंव्हा आईला कळलं असतं तर घडगत नव्हती.. Proud भुतापेक्षा तीचीच भीती वाटत असावी तेंव्हा

अजून कुणी ट्राय केलय का .. आज ही कोडं उलगडलं नाहीये कि ग्लास कसा हालायला सुरुवात करे..

अस म्हणतात की हे सायकोलॉजील आहे. भावना साधारण एकच असते त्यामुळे आपणच मिळून तो ग्लास हलवतो वगैरे ऐकलय.

आम्ही नववीत होतो. माझ्या मित्राच्या सुनीलच्या शेजारी एक पाटणकर नावाचे गृहस्थ रहात त्यानी केलय. सुनील आणि एक मुलगी होती बरोबर रश्मी.
रश्मी सातवीत होती.
दोघांचेही दहावीचे मार्क बरोबर आलेले.

एल ओ एल

प्लँचेटचे उद्योग आम्हीपण खूप वेळेला केलेत. आणि माझा त्या वयातला युक्तीवाद असा होता की आपण महात्माजींच्या आत्म्याला बोलवूया (त्यावेळ लगे रहो मुन्नाभाई प्रदर्शित व्हायचा होता)...म्हणजेच अगदीच खरे निघाले तर ते अहिंसक त्यामुळे धोका काही होणार नाही.:)
आणि त्या वयात मी मार्क किती, पास होणार का वगैरे प्रश्न न विचारता महात्माजींना माझे लग्न कोणच्या वर्षी होणार हे विचारले होते आणि खरे म्हणा किंवा योगागोग तो आकडा बरोबर निघाला...

>> महात्माजींना माझे लग्न कोणच्या वर्षी होणार हे विचारले होते >> काय काय करायला लावता रे बिचार्‍या गांधींच्या आत्म्याला! Lol

प्लँचेटवरून आठवला
एक्झॉर्सिस्ट पाहिलाय का? मी लहानपणी पाहीलेला जेव्हा व्हीडीओ प्रकरण नव होत तेव्हा.
अस्ली फाटलेली दिवसा बाहेर पडतानाही भिती वाटायची.
तोच थरार आजही अनुभवता येतो.

मात्र एव्हील डेड पाहून आपण का घाबरलेलो तेच कळत नाही. त्यावेळी हा चित्रपट पाहीलेला एखादातरी सांगायचाच की घरी घड्याळाचे काटे उलटे फिरले.

>> महात्माजींना माझे लग्न कोणच्या वर्षी होणार हे विचारले होते

आशु, ते महात्माजी नव्हते रे..... मोहनदासच्या नावाखाली करमचंद आला होता गांधींचे रूप घेऊन Proud

आशु.. Rofl Rofl
म्हमईकर.. प्लँचेट चं वारंच पसरलं होतं रे शाळेत तेंव्हा..उगमस्थान काही आठवत नाही आता..

प्लँचेटचा हा उद्योग आम्हीपण केला होता हॉस्टेलवर असतांना....त्यावेळेस राजीव गांधींच्या आत्म्यापासुन तर राज कपुर पर्यंत आम्ही तयारी केली होती. पण आमच्यातल्याच भांडणाने प्लँचेट सक्सेस झालं नाही! Sad

आम्ही लहान असतांना मामाने प्लँचेट केलेलं! माझ्याच आजोबांना बोलावुन काय काय ते प्रश्न विचारले....पहिल्यांदा दुसराच आत्मा आला म्हणे त्यांच्या नावासारखच नाव असलेला! मग त्याला घालवता घालवता नाकी नऊ आलेले 'तुम्हाला रामाची शप्पथ "! असं सारखं बोलल्यावर मग 'तो' गेला.
नंतर ख-या आजोबांना बोलावलं ...त्यांना 'तुम्हाला नातवंड किती?' असे प्रश्न विचारुन आधी ते खरेच आहे ना याची खातरजमा केली गेली! Happy ...लगे हात मी पण 'मी स्कॉलरशीपची परीक्षा पास होईल का? कितवा नंबर येइल ? वै. विचारुन घेतले. गंमत म्हण्जे 'त्यां'नी दिलेली उत्तरे खरी निघाली! Happy

<<<एक्झॉर्सिस्ट पाहिलाय का? मी लहानपणी पाहीलेला जेव्हा व्हीडीओ प्रकरण नव होत तेव्हा<<<
एक्झॉर्सिस्ट मी लहानपणी दोन्ही हातांनी डोळे झाकत झाकत पाहिलेला त्यामुळे खरी मजा कळली नाही. पण अगदी आता आता पुन्हा एकदा बघितला....तेव्हा बी पी वाढला होता हे खरं! Happy

>>>> महात्माजींना माझे लग्न कोणच्या वर्षी होणार हे विचारले होते

बिचारे गांधीजी! त्यांनी पुन्हा एकदा "हे राम!" म्हटलं असेल Happy

>>एक्झॉर्सिस्ट पाहिलाय का?

अर्धवट पाहिलाय आणि ह्या जन्मी तरी कधी पूर्ण पाहेन असं वाटत नाही. ती मुलगी जिन्यावरून उलटी चालत येते तो सीन तर हॉरिबल आहे. Sad

महात्माजींच्या आत्म्याला बोलवूया (त्यावेळ लगे रहो मुन्नाभाई प्रदर्शित व्हायचा होता)...म्हणजेच अगदीच खरे निघाले तर ते अहिंसक त्यामुळे धोका काही होणार नाही.
<<< :))

ocean-triangle कुनि वाचल का????
me mazya 6vit vachla bhutancha gosti mast aahet aani sobat photos pan aahet... tya mule jara patta ... Wink amchya shaleche barech anubhav aahet pan typer (aai)
uthla ki takte.. me fast lihu nai shakat.. Sad -aishwarya

अरेच्चा! मला एकदम कळेचना की साधना इंग्लीशमध्ये का लिहितेय आणि आईला टायपर का म्हणते आहे? म्हटलं ही काय भुताटकी? शेवटचं aishwarya वाचून उलगडा झाला. Proud

भुत नाबाद ४५०,
भुतांचे अनुभव वाचायला आवडले, पण ज्यांनी अनुभवले त्यांच्या त्या वेळच्या परिस्थीतीची कल्पना केली की अंगावर शहारे येतात,
एका व्यक्तीने एका स्त्री भुता सोबत संसार केल्याची कथा मी एका पुस्तकात वाचली आहे.
भयानक रे भुता.

Pages