तिरंगी स्पॅगेटी

Submitted by लालू on 5 April, 2011 - 22:05

व्हाईट चॉकलेट वापरुन स्पॅगेटी बनवली आहे. आदित्यने इथे नूडल्स बनवताना जे तंत्र वापरले तेच वापरले आहे. रंगीत स्पॅगेटीसाठी त्यात खाण्याचा रंग घातला.

व्हाईट चॉकलेट morsels ग्रोसरी स्टोअरमध्ये मिळतात.

c_morsels.jpg

तिरंगी स्पॅगेटी-
हिरवी जरा जाड दिसते आहे ती साध्या स्ट्रॉ मधून काढली आहे( टिपबद्दल आदित्यचे आभार). किटबरोबर तीनच नळ्या येतात.

c_spag1.jpgc_spag2.jpg

चॉकलेटचे Agar Agar घातलेले मिश्रण जसे थंड होऊ लागते तसतसे घट्ट होत जाते. नळीत भरण्यापूर्वी भांड्यातच घट्ट झालेल्या मिश्रणाचे हे फुगे-

c_ballo.jpg

हे करणे बर्‍यापैकी सोपे होते. काही बिघडले नाही. सिरिंजने लिक्विड चॉकलेट नळीत भरायचे आणि मग नंतर सिरिंजने एका बाजूने हवा भरत बाहेर काढायचे हे सगळे मुलांनी जास्त एंजॉय केले.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

लालू तू आता मुलांसाठी मॉलीक्युलर गॅस्ट्रॉनॉमीचा समर कँप सुरू कर. खूप मुले येतील आणि मी पण येईन शिकायला Happy

मस्त. नाव वाचून वाटलं की वर्ल्ड कप जिंकल्यावर झेंड्याच्या रंगाची स्पॅगेटी केलीस की काय.

मस्तच. किती चकचकीत दिसतायत. मुलं भारी आवडीनं खातील. लालूताई तुम्हाला आणि आदित्यला शुभेच्छा! असेच छान छान प्रकार करून आम्हाला खिलवा. Happy

मलाही तेच तीन रंग करायचे होते. Happy ऑरेंज करायला दोन रंग मिक्स केले पण तो वेगळाच झाला आणि फोटोत तर गुलाबीच दिसतो. त्यापेक्षा सरळ केशर वापरलं असतं तर बरं झालं असतं.

'सनी साईड अप' मध्येही योगर्ट ऐवजी व्हाईट चॉकलेट वापरता येईल. आंबा-चॉकलेट चव छान लागेल.

पांढर्‍या चॉकलेटाची स्पॅगेटी ही कल्पना आवडली. रंग मस्त दिस्तात. तिरंग्याचे गडद रंग नाही घातलेस ते चांगलं झालं.

या शेवया सिरिंज किंवा आयसिंगकोनाला हव्या त्या व्यासाची नॉझल लावून नाही का पाडता येणार?

लालू, छानच आहे हा प्रकार,
आपल्याकडे फालुद्यासाठी जी शेव करतात, ती कॉर्नफ्लोअर वापरुन करतात. साखर पाण्यात ती शिजवायची, आणि ते मिश्रण गरम असतानाच, साध्या शेवेच्या सोर्‍याने शेव पाडून ती थंड पाण्यात सोडायची. थोड्या वेळाने घट्ट होते.
याला कुठले वेगळे उपकरण वा मिस्रण लागत नाही, मूलांना असे मिश्रण शिजवून दिले तर त्या शेवेच्या सोर्‍याचा वापर करुन, वेगवेगळे आकार / प्रकार करु शकतील.

मृ, ते मिश्रण लिक्विड असते गं. ते ट्यूबमध्ये भरुन ती ट्यूब बर्फाच्या पाण्यात ठेवायची ३ मिनिटे, मग ते घट्ट होते. पण थेट पाण्यात सोडले तर लगेच घट्ट होणार नाही.
आता दिनेश म्हणतायत ती कॉर्नफ्लोअरची कल्पना चांगली आहे. ते शिजवलेले मिश्रण शेव पाडता येईल इतके घट्ट असणार.

ओ, बरं बरं. मला वाटलं मिश्रण थेट कुठल्यातरी द्रावणात सोडायचं. (कॅविअरला करतात तसं?!)

घट्ट झालेली शेवयी बाहेर कशी काढतात नळीतून?

धन्यवाद अंजली. चॉकलेटच्या स्पॅगेट्या खायला बरेच द्राविडी प्राणायाम् आहेत तर! मुलांना करायला मस्त प्रॉजेक्ट आहे पण!

छान!

प्रत्येक रंगाचं टेक्स्चर वेगळंच दिसतंय .. त्यातल्या त्यात गुलाबी आणि पांढरं बरंचसं सारखं आहे पण हिरवं एकदम वेगळंच दिसतंय ..

Pages