तिरंगी स्पॅगेटी

Submitted by लालू on 5 April, 2011 - 22:05

व्हाईट चॉकलेट वापरुन स्पॅगेटी बनवली आहे. आदित्यने इथे नूडल्स बनवताना जे तंत्र वापरले तेच वापरले आहे. रंगीत स्पॅगेटीसाठी त्यात खाण्याचा रंग घातला.

व्हाईट चॉकलेट morsels ग्रोसरी स्टोअरमध्ये मिळतात.

c_morsels.jpg

तिरंगी स्पॅगेटी-
हिरवी जरा जाड दिसते आहे ती साध्या स्ट्रॉ मधून काढली आहे( टिपबद्दल आदित्यचे आभार). किटबरोबर तीनच नळ्या येतात.

c_spag1.jpgc_spag2.jpg

चॉकलेटचे Agar Agar घातलेले मिश्रण जसे थंड होऊ लागते तसतसे घट्ट होत जाते. नळीत भरण्यापूर्वी भांड्यातच घट्ट झालेल्या मिश्रणाचे हे फुगे-

c_ballo.jpg

हे करणे बर्‍यापैकी सोपे होते. काही बिघडले नाही. सिरिंजने लिक्विड चॉकलेट नळीत भरायचे आणि मग नंतर सिरिंजने एका बाजूने हवा भरत बाहेर काढायचे हे सगळे मुलांनी जास्त एंजॉय केले.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Pages