फ़ार फ़ार वर्षांपूर्वी माझं आणि विनीचं एक स्वप्न होतं.
एक महाल ओनरशिप मध्ये घ्यायचा.
एकदम घियासुद्दीन बाल्बनच्या काळात आल्यासारखं वाटेल असा तो सजवायचा.
आणि सर्वात रम्य कल्पना...सगळे सेवक पुरुष ठेवायचे च्यामायला!
'पुरुष होऊ घातलेले मुलगे' नाहीत, 'मुलगे-पुरुष' नाहीत की पूर्ण मुलगे नहीत तर..पूर्ण पुरुष!
पूर्ण पुरुषांमध्ये ’वरण-भात’ कॅटॅगिरी ला अपात्र ठरवायचं.
रिक्रूट्मेंट ड्राईव्ह ठेवायची.
मऊसूत, कंपासने आखून घ्यावं इतक्या गोल पोळ्या करणारा, कपडे धुणारा, एकही सुरकुती न ठेवता कपडे झटकून वाळत घालणारा, गाद्या घालणारा, चिकन-मॅगी करून हाताशी आणुन देणारा, आम्ही दत्तक घेतलेली मुलं सांभाळणारा.
लोणचं-मुरांबे भरून ठेवणारा, पापड-सांडगे घालणारा ऍड-हॉक बेसिस वर!
डयुटी अवर्स फ़िक्स नाहीत पण फ़ायनान्शियल आणि जॉब सिक्युरिटी ची हमी द्यायची.
मी मदिरापान करून टुन्न झाले आणि मला कोणाशी दोन हात करावेसे वाटले तर त्यासाठी हाय पॅकेजची एक क्रिटीकल पोस्ट ठेवायची.
सगळ्यांना महालात चालवायला बुलेट्स द्यायच्या.
म्हणजे ’कोण आहे रे तिथे?’ असं म्हणून टाळी वाजवली की बुलेटचं ते सेक्साट फ़ायरींग घुमवत एक सेवक बुलेट दामटवत येणार, एकदम स्टड सारखा बुलेट मेनस्टॅंड ला लावणार आणि माझी फ़र्माईश पुरी करणार.
सर्व सेवकांमध्ये ’बुलेट ३५०’ असलेला, ५-९ वगैरे उंची व तेव्हढाच रूंद असलेला, मिडनाईट ब्लू चेक्सचं शर्ट घालून शर्टाचे हात दुमडलेला, फ़िकट निळी डेनिम आणि हातात टॅग ह्युअरचं चामडयाचा पटटा असलेलं घडयाळ घातलेला, दणदणीत मिशी असलेला, भारी ब्लॉग वगैरे लिहीत असलेला सेवक म्हणजे माझ्या मर्जीतला..पटट-दास!
विनीचं थोडयाफ़ार फ़रकाने असंच. पण तिला ती गिळगिळीत ’थंडरबर्ड’ आवडायची.
-------------
परवा विनीचं लग्न झालं.
तिच्या नवरयाला मिशी नव्हती का त्याच्याकडे ’थंडरबर्ड’ पण नव्ह्ती. बुलेट हातात जरी घेतली तरी कोलमडुन पडेल असं प्रकरण होतं ते. थोडक्यात तो ’पुरुष होऊ घातलेला मुलगा’ होता.
स्कूटरवर बसून जाम अवघडायला होतं म्हणाली.
मी तिला माझा जीव की प्राण असलेलं, एके काळच्या बॉयफ़्रेंडने कुठेकुठे लटपटी करून लाडाने आणून दिलेलं (ईश्वर त्याच्या आत्म्यास शांती देवो!) बुलेट ३५० चं अशक्य सीडक्टीव पोस्टर दिलं आहेरात. घळाघळा रडली बिचारी!
आई गं..
आता माझं काय होतंय ते बघायचं.
मनापासून शुभेच्छा. असा
मनापासून शुभेच्छा. असा सर्वगुणसंपन्न पुरुष जन्माला आला असेलच, तर तो अवश्य भेटो.
वयं काय तुमची. आँ ? ___ असले
वयं काय तुमची. आँ ?

___
असले सर्वगुणसंपन्न कल्पनाविलाससुद्धा कध्धी कध्धी केले नाहीत या जाणीवेने मला माझ्या पिढीचे अतोनात दु:ख झाले.
वरणभात कॅटेगरी डिस्क्वालिफाय
वरणभात कॅटेगरी डिस्क्वालिफाय करून तुम्ही (मऊसूत, गोल इ.) पोळ्या आणि मुरांबेच खाणार का!
स्वाती इज म्हणिंग द राईट.
स्वाती इज म्हणिंग द राईट.
आमेन
जबरी आहे. स्वातीशीही सहमत.
स्वातीशीही सहमत. किती दिवस तेच वरणभात, पोळ्या नी मुरांब्याची स्वप्नं बघायची. जरा हटके छोले भटुरे वगैरे पण येऊ द्या.
भारी!!
भारी!!
रैना, अगणित मोदक ग!!!
रैना, अगणित मोदक ग!!!
स्वाती >>टॅग ह्युअरचं टायगर
स्वाती
>>टॅग ह्युअरचं
पट्ट दासाला??
टायगर वुड्सचा ब्रँड ?
खास लोकांना Rolex वगैरे द्यावे. फेडीचे!
सर्वेपि सुखिनः
सर्वेपि सुखिनः सन्तु:
भारीच्चात
कोलमडुन पडेल असं प्रकरण >>>>>
कोलमडुन पडेल असं प्रकरण >>>>>
फिकर नो थोडा खर्च केला तर होइल ८०-९० किलोचा. 
. धमाल लिहलय ....
. धमाल लिहलय ....
....
यप्पीSSSSSSSS ........ सर्व
यप्पीSSSSSSSS ........
सर्व स्त्रियांच्या लग्नाआधीच्या सुखस्वप्नांना वाचा फोडल्याबद्दल धन्यवाद! नंतर आहेच ... पदरी पडलं अन पवित्र झालं!
मात्र हे स्वप्न आहे हे तुला आधीच माहिताय ते बरं. फारसं अपेक्षाभंगाचं पातक घडणार नाही.
(No subject)
(No subject)
हाहा!!! कस्लं भारी !!
हाहा!!! कस्लं भारी !!
सही आहे
सही आहे
सहिये...तुझ्य नशिबी स्कूटर न
सहिये...तुझ्य नशिबी स्कूटर न येवो ही सदिछा.!
बाकी लोणची-पापड्-मुरांबे-सांडगे म्हणजे एकदम नो बॉस!
सही आहे ...
सही आहे ...
भारीये!
भारीये!
लेख आवडला हाउसहजबन्ड ही एक
लेख आवडला
हाउसहजबन्ड ही एक अतिशय मस्त कन्सेप्ट आहे !!
बर्याच्शा अटी वेठबिगारी सदृष दिसतात ...काही तरी "रीवार्ड" द्याकी त्या बिचार्या गुलामाला
आम्ही दत्तक घेतलेली मुलं सांभाळणारा >>>> ह्या अटीतला दत्तक हा शब्द काढाल आणि मुलं हे बहुवचनी आहे हे क्लीयर कराल आणि फ़ायनान्शियल आणि जॉब सिक्युरिटी ची हमी . . हे नक्की असेल ....तर आपण एका पायावर तयार आहे हाउसहजबन्ड व्हायला ...:फिदी:
रैना ताई, नो दिवे. पोरी -पोरी
रैना ताई, नो दिवे. पोरी -पोरी मिळून कल्ला करता यावा म्हणूनच ही पोस्ट आहे.
(पोरांचेही स्वागत आहे)
स्वातीतै,
'वरणभात' कॅटॅगिरीच्या काँटेक्स्ट बद्दल तुझा घोटाळा झालाय काहीतरी. 'वरण भात' कॅटॅगिरी म्हणजे वरणभात आवडणारे/बनवता येणारे पुरुष नाहीत काही. "आम्हाला सगळं असंच लागतं ब्वॉ" असं रटत राहणारे पुरुष.
माझ्या एक मित्राला वरणाच्या हळदुल्या पिवळ्या रंगाचं टेक्स्चरही सेम लागायचं, भात आंबेमोहोरच लागायचा. तो लिंबू घालून वरणभात खायचा तो मोठ्ठा सोहळा असायचा आणि वरुन हे आहेच " आम्हाला स गळं असंच लागतं ब्वॉ " तो आपल्या नाकाचा मध्य धरुन ४ सेंटीमीटर डावीकडे गेल्यावर डोक्यावर एक सरळ रेघ मारली की त्याच्याशी १० अंशाचं इलेव्हेशन असणाराच भांग पाडायचा. रोज. तेव्हढाच. एक अंश इकडे नाही की तिकडे नाही. अशा ऑब्सेहिव्ह, सोहळेबाज, रिच्युअलिस्टीक माणसांना आम्ही 'वरणभात' कॅटॅगिरी म्हणतो.
बाकी तायांनो, पोळ्या-मुरांब्याबद्दल बोलत असाल तर मी 'बेसिक्स' कधी विसरत नाही.
लालू,
अगं त्याचं त्यानेच घालून यावं तर आवडेल मला. मी त्याला देणार? टॅग ह्युअर?..अडलंय माझं...
मामी,
पदरी पडलं अन पवित्र झालं<< नो बॉस. आम्ही पवित्र तेच पदरी पाडून घेणार.
लोक्स,
धन्यवाद हो!
(No subject)
काय काय फर्माईशी असतील ?
काय काय फर्माईशी असतील ?
जे लिहिलंयस ते, आणि त्याखाली
जे लिहिलंयस ते, आणि त्याखाली दिलेलं एक्स्प्लनेशन.....दोन्ही लय भारी!!! आवडलंच!!!!!!!!!!!
प्रज्ञा९ ,
प्रज्ञा९ ,
मणि हे लिहून बुलेटची
मणि हे लिहून बुलेटची 'अॅम्बॅसिडर'च झालीस कि चक्क !
रच्याकने,पुढचा लेख विनी 'स्टॅलियन रॅम्बो' नायतर 'ब्रॅड पिट' वर लिहीणार आहे काय?
विनीला हे असंच हवं होतं ना?

(No subject)
(No subject)
Pages