’पुरुष’मय स्वप्न!

Submitted by मणिकर्णिका on 31 March, 2011 - 08:45

फ़ार फ़ार वर्षांपूर्वी माझं आणि विनीचं एक स्वप्न होतं.
एक महाल ओनरशिप मध्ये घ्यायचा.
एकदम घियासुद्दीन बाल्बनच्या काळात आल्यासारखं वाटेल असा तो सजवायचा.
आणि सर्वात रम्य कल्पना...सगळे सेवक पुरुष ठेवायचे च्यामायला!
'पुरुष होऊ घातलेले मुलगे' नाहीत, 'मुलगे-पुरुष' नाहीत की पूर्ण मुलगे नहीत तर..पूर्ण पुरुष!
पूर्ण पुरुषांमध्ये ’वरण-भात’ कॅटॅगिरी ला अपात्र ठरवायचं.
रिक्रूट्मेंट ड्राईव्ह ठेवायची.
मऊसूत, कंपासने आखून घ्यावं इतक्या गोल पोळ्या करणारा, कपडे धुणारा, एकही सुरकुती न ठेवता कपडे झटकून वाळत घालणारा, गाद्या घालणारा, चिकन-मॅगी करून हाताशी आणुन देणारा, आम्ही दत्तक घेतलेली मुलं सांभाळणारा.
लोणचं-मुरांबे भरून ठेवणारा, पापड-सांडगे घालणारा ऍड-हॉक बेसिस वर!
डयुटी अवर्स फ़िक्स नाहीत पण फ़ायनान्शियल आणि जॉब सिक्युरिटी ची हमी द्यायची.
मी मदिरापान करून टुन्न झाले आणि मला कोणाशी दोन हात करावेसे वाटले तर त्यासाठी हाय पॅकेजची एक क्रिटीकल पोस्ट ठेवायची.
सगळ्यांना महालात चालवायला बुलेट्स द्यायच्या.
म्हणजे ’कोण आहे रे तिथे?’ असं म्हणून टाळी वाजवली की बुलेटचं ते सेक्साट फ़ायरींग घुमवत एक सेवक बुलेट दामटवत येणार, एकदम स्टड सारखा बुलेट मेनस्टॅंड ला लावणार आणि माझी फ़र्माईश पुरी करणार.
सर्व सेवकांमध्ये ’बुलेट ३५०’ असलेला, ५-९ वगैरे उंची व तेव्हढाच रूंद असलेला, मिडनाईट ब्लू चेक्सचं शर्ट घालून शर्टाचे हात दुमडलेला, फ़िकट निळी डेनिम आणि हातात टॅग ह्युअरचं चामडयाचा पटटा असलेलं घडयाळ घातलेला, दणदणीत मिशी असलेला, भारी ब्लॉग वगैरे लिहीत असलेला सेवक म्हणजे माझ्या मर्जीतला..पटट-दास!
विनीचं थोडयाफ़ार फ़रकाने असंच. पण तिला ती गिळगिळीत ’थंडरबर्ड’ आवडायची.

-------------

परवा विनीचं लग्न झालं.
तिच्या नवरयाला मिशी नव्हती का त्याच्याकडे ’थंडरबर्ड’ पण नव्ह्ती. बुलेट हातात जरी घेतली तरी कोलमडुन पडेल असं प्रकरण होतं ते. थोडक्यात तो ’पुरुष होऊ घातलेला मुलगा’ होता.
स्कूटरवर बसून जाम अवघडायला होतं म्हणाली.
मी तिला माझा जीव की प्राण असलेलं, एके काळच्या बॉयफ़्रेंडने कुठेकुठे लटपटी करून लाडाने आणून दिलेलं (ईश्वर त्याच्या आत्म्यास शांती देवो!) बुलेट ३५० चं अशक्य सीडक्टीव पोस्टर दिलं आहेरात. घळाघळा रडली बिचारी!
आई गं..
आता माझं काय होतंय ते बघायचं.

गुलमोहर: 

पदरी पडलं अन पवित्र झालं<< नो बॉस. आम्ही पवित्र तेच पदरी पाडून घेणार..... शुभेच्छा

मजा आली स्वप्न वाचताना Happy

असले सर्वगुणसंपन्न कल्पनाविलाससुद्धा कध्धी कध्धी केले नाहीत या जाणीवेने मला माझ्या पिढीचे अतोनात दु:ख झाले. >>> अगदी अगदी.

फक्त बुलेटच कोलमडलीये ना अजून... आगे आगे देखो होता है क्या! Proud
ह्रथिकसारखा डान्सर पण अपडेट करा की ओ स्वप्नात.. डोळे उघडले की दिसेल गणपती डान्स! Wink

मणि Rofl
रैना,
<<वयं काय तुमची. आँ ?
असले सर्वगुणसंपन्न कल्पनाविलाससुद्धा कध्धी कध्धी केले नाहीत या जाणीवेने मला माझ्या पिढीचे अतोनात दु:ख झाले.
>>
अगदी अगदी Lol
मणि एवढे सगळे करुन ५.९ का ग? ६ वगरे नको का? Wink

हा स्वप्नातला राजकुमार जॉन अब्राईम+संजीव कपूर+राहूल महाजनच Proud कॉम्बीनेश वाटतोय.
द्रौपदीने अशाच सर्वगुण संपन्न पतीची अपेक्षा केली होती, n she scores 5 Wink Good Luck

मणि, तुझा हा मिशीवाला कल्पनाविलास मला माहित्ये बरं... Wink
भेटेल बरं लवकरच... आणि बघ त्याच्या आयुष्यात एखादी व्हॅम्प पण असणार नाही... Biggrin
एंजॉय!!!

>>पदरी पडलं अन पवित्र झालं<< नो बॉस. आम्ही पवित्र तेच पदरी पाडून घेणार

जियो बॉस!!! ह्यापुढचं माझं वाक्य "पवित्र काही नाही मिळालं तर रिता पदर फारच वाईट नाही दिसत" Proud

>>जॉन अब्राईम+संजीव कपूर

हे कॉम्बो बेस्ट आहे. फक्त लुक्स जॉनचे आणि पाककौशल्य संजीवचं - ह्याच्या उलटं नको!

डुआया, तू देणारेस का पुर्वतयारी करुन संजिवला? Wink त्यासाठी पण एक चाकराला पडचाकर ठेवेल की ती Wink

कवि.. Lol
आमची भयानक स्वप्नं आठवून बदबदा हसूनच घेतलं मी!>>> मंजुडी सेम पिंच तुला पण माझ्याकडून

भारी लिवलंयास.... Lol

आमचे कल्पनाविलास कॉमनमध्ये रचले जायचे, बर्‍याचदा ते प्रतिक्रियात्मक असायचे, सूड - टवाळी - आचरटपणाने भर्पूर....त्यात दया माया नसायची... कोणाचा मनात ठसठसत असलेला राग बाहेर पडायचा तर कोणाच्या मनातली असूया.... कोणाच्या मनातलं असं बरंच काही.... फार इंटरेस्टिंग असायचे ते प्रकरण.... अशा प्रकारे मैत्रिणी एकत्र जमून ''गॉसिपिंग'' करण्याला सारी दुपार / रात्र अपुरी ठरायची. (गॉसिपिंग ऐवजी आम्ही वापरायचो तो शब्द इथे देत नाहीए Wink :दिवा:) असे स्वप्नरंजन पार पडले की मन, हृदय कसे हलके हलके व्हायचे.... ज्यांचे बॉयफ्रेंड्स असायचे त्या आपापल्या बॉयफ्रेंडांबरोबर पुन्हा मोकळ्या मनाने टी.पी. करायला मोकळ्या.... ज्या सुटवंग असायच्या त्याही निर्मळ मनाने पुनश्च टी पी करायला मोकळ्या! Wink

वर्षू, 'तौलिया लाओ' Biggrin संदर्भासहीत स्पष्टीकरण प्लीज!

कविता, सॉलिड बॅकींग अप. धन्यवाद!

आशूडी, मंजूडी Lol

सावलीतै, ५.९ चा फंडा मेल करते तुला. इथे नको.

अकु, <<गॉसिपिंग ऐवजी आम्ही वापरायचो तो शब्द इथे देत नाहीए.
उगाच उत्सुकता वाढलिये. मी थोडेफार गेसेस मारलेत काय असावं याबाबत. पण खरंच ते इथे लिहीण्यासारखं नाहीये. Happy

स्वप्ना, 'नसलेला' रिता पदर! Lol

ठमे, काsssश, यू नो व्हॉट!

लोकहो, धन्यवाद्स!

@ Kavita, Yup! If an opportunity strikes to make a lot of money thru all this... I'm ready Wink

असले सर्वगुणसंपन्न कल्पनाविलाससुद्धा कध्धी कध्धी केले नाहीत या जाणीवेने मला माझ्या पिढीचे अतोनात दु:ख झाले. >>> Happy

हा स्वप्नातला राजकुमार जॉन अब्राईम+संजीव कपूर+राहूल महाजनच कॉम्बीनेश वाटतोय.>>>> जॉन अब्राईम+संजीव कपूर एकवेळ ठिक पण राहूल महाजन ईईईई..... काहीतरीच काय Biggrin

Pages