’पुरुष’मय स्वप्न!

Submitted by मणिकर्णिका on 31 March, 2011 - 08:45

फ़ार फ़ार वर्षांपूर्वी माझं आणि विनीचं एक स्वप्न होतं.
एक महाल ओनरशिप मध्ये घ्यायचा.
एकदम घियासुद्दीन बाल्बनच्या काळात आल्यासारखं वाटेल असा तो सजवायचा.
आणि सर्वात रम्य कल्पना...सगळे सेवक पुरुष ठेवायचे च्यामायला!
'पुरुष होऊ घातलेले मुलगे' नाहीत, 'मुलगे-पुरुष' नाहीत की पूर्ण मुलगे नहीत तर..पूर्ण पुरुष!
पूर्ण पुरुषांमध्ये ’वरण-भात’ कॅटॅगिरी ला अपात्र ठरवायचं.
रिक्रूट्मेंट ड्राईव्ह ठेवायची.
मऊसूत, कंपासने आखून घ्यावं इतक्या गोल पोळ्या करणारा, कपडे धुणारा, एकही सुरकुती न ठेवता कपडे झटकून वाळत घालणारा, गाद्या घालणारा, चिकन-मॅगी करून हाताशी आणुन देणारा, आम्ही दत्तक घेतलेली मुलं सांभाळणारा.
लोणचं-मुरांबे भरून ठेवणारा, पापड-सांडगे घालणारा ऍड-हॉक बेसिस वर!
डयुटी अवर्स फ़िक्स नाहीत पण फ़ायनान्शियल आणि जॉब सिक्युरिटी ची हमी द्यायची.
मी मदिरापान करून टुन्न झाले आणि मला कोणाशी दोन हात करावेसे वाटले तर त्यासाठी हाय पॅकेजची एक क्रिटीकल पोस्ट ठेवायची.
सगळ्यांना महालात चालवायला बुलेट्स द्यायच्या.
म्हणजे ’कोण आहे रे तिथे?’ असं म्हणून टाळी वाजवली की बुलेटचं ते सेक्साट फ़ायरींग घुमवत एक सेवक बुलेट दामटवत येणार, एकदम स्टड सारखा बुलेट मेनस्टॅंड ला लावणार आणि माझी फ़र्माईश पुरी करणार.
सर्व सेवकांमध्ये ’बुलेट ३५०’ असलेला, ५-९ वगैरे उंची व तेव्हढाच रूंद असलेला, मिडनाईट ब्लू चेक्सचं शर्ट घालून शर्टाचे हात दुमडलेला, फ़िकट निळी डेनिम आणि हातात टॅग ह्युअरचं चामडयाचा पटटा असलेलं घडयाळ घातलेला, दणदणीत मिशी असलेला, भारी ब्लॉग वगैरे लिहीत असलेला सेवक म्हणजे माझ्या मर्जीतला..पटट-दास!
विनीचं थोडयाफ़ार फ़रकाने असंच. पण तिला ती गिळगिळीत ’थंडरबर्ड’ आवडायची.

-------------

परवा विनीचं लग्न झालं.
तिच्या नवरयाला मिशी नव्हती का त्याच्याकडे ’थंडरबर्ड’ पण नव्ह्ती. बुलेट हातात जरी घेतली तरी कोलमडुन पडेल असं प्रकरण होतं ते. थोडक्यात तो ’पुरुष होऊ घातलेला मुलगा’ होता.
स्कूटरवर बसून जाम अवघडायला होतं म्हणाली.
मी तिला माझा जीव की प्राण असलेलं, एके काळच्या बॉयफ़्रेंडने कुठेकुठे लटपटी करून लाडाने आणून दिलेलं (ईश्वर त्याच्या आत्म्यास शांती देवो!) बुलेट ३५० चं अशक्य सीडक्टीव पोस्टर दिलं आहेरात. घळाघळा रडली बिचारी!
आई गं..
आता माझं काय होतंय ते बघायचं.

गुलमोहर: 

धमाल आहे हा लेख!

बाकी याला अधिक एक!
<<असले सर्वगुणसंपन्न कल्पनाविलाससुद्धा कध्धी कध्धी केले नाहीत या जाणीवेने मला माझ्या पिढीचे अतोनात दु:ख झाले. फिदीफिदी दिवा घ्या>>

<< ’पुरुष’मय स्वप्न! >>

दिवा स्वप्न असेही म्हणू शकता. नाहीतरी हल्ली पुरंध्रींना दिवा म्हणायची रीत प्रचलीत आहे असे कळते.

मुंगेरीलाल के हसीन सपने च्या चालीवर मुंगी बिटीया का हाथीको नोकर रखनेका हसीन सपना| मुंगेरीलाल म्हणजे काही करण्याची क्षमता नसलेली, निव्वळ स्वप्नरंजनात रममाण झालेली क्षीण व्यक्ति.

<<परवा विनीचं लग्न झालं.
तिच्या नवरयाला मिशी नव्हती का त्याच्याकडे ’थंडरबर्ड’ पण नव्ह्ती. बुलेट हातात जरी घेतली तरी कोलमडुन पडेल असं प्रकरण होतं ते. थोडक्यात तो ’पुरुष होऊ घातलेला मुलगा’ होता.
स्कूटरवर बसून जाम अवघडायला होतं म्हणाली. घळाघळा रडली बिचारी!
आई गं..
आता माझं काय होतंय ते बघायचं. >>

विनी विषयी वाईट वाटून घ्यायचं किंवा स्वतःच्या भविष्याची चिंता करायचं काही कारण नाही. व्यक्तिला तिच्या लायकीप्रमाणे फळ मिळतंच किंवा असंही म्हणू शकता की व्यक्तिला जे फळ मिळतं तवढीच तिची लायकी असते.

तेव्हा लायकी चांगली असेल तर काळजीची गरज नाही. तेवढी लायकीच नसेल तर काळजी करूनही काहीच उपयोग नाही.

टीपः- लायकी शब्द आवडत नसल्यास पात्रता / योग्यता या समानार्थी शब्दांपैकी आवडेल तो शब्द टाकून वरील वाक्ये पुन्हा वाचावीत.

हाहाहा सुपर्ब!!!
येस कळलं मला, 'पठाण' मधील जॉन अब्राहम सारखे सेवक हवे होते विनीला Wink
--------------
>>>>>सर्व सेवकांमध्ये ’बुलेट ३५०’ असलेला, ५-९ वगैरे उंची व तेव्हढाच रूंद असलेला, मिडनाईट ब्लू चेक्सचं शर्ट घालून शर्टाचे हात दुमडलेला, फ़िकट निळी डेनिम आणि हातात टॅग ह्युअरचं चामडयाचा पटटा असलेलं घडयाळ घातलेला, दणदणीत मिशी असलेला, भारी ब्लॉग वगैरे लिहीत असलेला सेवक म्हणजे माझ्या मर्जीतला..पटट-दास!

हाहाहा पट्ट-दास. कसला भारी कल्पनाविलास आहे. त्यात तो भारी ब्लॉग लिहीणारा सुद्धा हवा खी: खी: खी:

>>>>>>>वरणभात कॅटेगरी डिस्क्वालिफाय करून तुम्ही (मऊसूत, गोल इ.) पोळ्या आणि मुरांबेच खाणार का! Proud
निव्वळ ख-त-र-ना-क कमेन्ट
----------------------
चुकून वरती 'सगळे साबण व्हर्जिन हवेत' अशी कमेन्ट पेस्टली गेली होती.नशीब लक्षात आले व उडवली.

Pages