’पुरुष’मय स्वप्न!

Submitted by मणिकर्णिका on 31 March, 2011 - 08:45

फ़ार फ़ार वर्षांपूर्वी माझं आणि विनीचं एक स्वप्न होतं.
एक महाल ओनरशिप मध्ये घ्यायचा.
एकदम घियासुद्दीन बाल्बनच्या काळात आल्यासारखं वाटेल असा तो सजवायचा.
आणि सर्वात रम्य कल्पना...सगळे सेवक पुरुष ठेवायचे च्यामायला!
'पुरुष होऊ घातलेले मुलगे' नाहीत, 'मुलगे-पुरुष' नाहीत की पूर्ण मुलगे नहीत तर..पूर्ण पुरुष!
पूर्ण पुरुषांमध्ये ’वरण-भात’ कॅटॅगिरी ला अपात्र ठरवायचं.
रिक्रूट्मेंट ड्राईव्ह ठेवायची.
मऊसूत, कंपासने आखून घ्यावं इतक्या गोल पोळ्या करणारा, कपडे धुणारा, एकही सुरकुती न ठेवता कपडे झटकून वाळत घालणारा, गाद्या घालणारा, चिकन-मॅगी करून हाताशी आणुन देणारा, आम्ही दत्तक घेतलेली मुलं सांभाळणारा.
लोणचं-मुरांबे भरून ठेवणारा, पापड-सांडगे घालणारा ऍड-हॉक बेसिस वर!
डयुटी अवर्स फ़िक्स नाहीत पण फ़ायनान्शियल आणि जॉब सिक्युरिटी ची हमी द्यायची.
मी मदिरापान करून टुन्न झाले आणि मला कोणाशी दोन हात करावेसे वाटले तर त्यासाठी हाय पॅकेजची एक क्रिटीकल पोस्ट ठेवायची.
सगळ्यांना महालात चालवायला बुलेट्स द्यायच्या.
म्हणजे ’कोण आहे रे तिथे?’ असं म्हणून टाळी वाजवली की बुलेटचं ते सेक्साट फ़ायरींग घुमवत एक सेवक बुलेट दामटवत येणार, एकदम स्टड सारखा बुलेट मेनस्टॅंड ला लावणार आणि माझी फ़र्माईश पुरी करणार.
सर्व सेवकांमध्ये ’बुलेट ३५०’ असलेला, ५-९ वगैरे उंची व तेव्हढाच रूंद असलेला, मिडनाईट ब्लू चेक्सचं शर्ट घालून शर्टाचे हात दुमडलेला, फ़िकट निळी डेनिम आणि हातात टॅग ह्युअरचं चामडयाचा पटटा असलेलं घडयाळ घातलेला, दणदणीत मिशी असलेला, भारी ब्लॉग वगैरे लिहीत असलेला सेवक म्हणजे माझ्या मर्जीतला..पटट-दास!
विनीचं थोडयाफ़ार फ़रकाने असंच. पण तिला ती गिळगिळीत ’थंडरबर्ड’ आवडायची.

-------------

परवा विनीचं लग्न झालं.
तिच्या नवरयाला मिशी नव्हती का त्याच्याकडे ’थंडरबर्ड’ पण नव्ह्ती. बुलेट हातात जरी घेतली तरी कोलमडुन पडेल असं प्रकरण होतं ते. थोडक्यात तो ’पुरुष होऊ घातलेला मुलगा’ होता.
स्कूटरवर बसून जाम अवघडायला होतं म्हणाली.
मी तिला माझा जीव की प्राण असलेलं, एके काळच्या बॉयफ़्रेंडने कुठेकुठे लटपटी करून लाडाने आणून दिलेलं (ईश्वर त्याच्या आत्म्यास शांती देवो!) बुलेट ३५० चं अशक्य सीडक्टीव पोस्टर दिलं आहेरात. घळाघळा रडली बिचारी!
आई गं..
आता माझं काय होतंय ते बघायचं.

गुलमोहर: 

हा लेख दहा वर्षांपूर्वी का नाही लिहिला ?

आमच्या स्त्रीमय स्वप्नांसाठी कामाला आला असता,...
आठवडाभर दाढी मिशी ठेवली असती..पुढचा आठवडा सफाचट

भिब्ररा,
दहा वर्षापूर्वी याच वेळी मी दहावीची सुट्टी मजेत घालवत होते. तेव्हा आपली आवड निवड 'एव्हढी' ठाऊक असायचं काहीच कारण नव्हतं.
<<आमच्या स्त्रीमय स्वप्नांसाठी कामाला आला असता,...
हे काही झेपलं नाही. तेव्हढं डीकोडायचं बघता का?

तुला तसा मिळाला तर आपण त्याचे बरेच क्लोन्स तयार करु. >>>>> हे बाकी मस्त.
असा क्लोन मिळाला तर वटपौर्णिमेच्या पुजा मनापासुन होतील यापुढे ( डोळा मारणे ओघाने आले ईथे).
मणिकर्णिका, मस्त बायो.

पण खुरटी दाढी वगैरे असल्यावर येतो तो केअरलेस लुक छान वाटतो कधीकधी.

मणिकर्णिका,
धन्यवाद !
किती बरं वाटलं, प्रथमच कुणीतरी (जबाबदार व्यक्तीमत्व !) अस समर्थन केल्याचं अगदी जवळुन पाहतोय, चला आता २-३ दिवस आपली दाढी पुढे ढकलली तरी काही वाईट वाटुन घ्यायचं काम नाही !
Lol

उदयवन...
अनुमोदन ! (..कारण नुसत्या प्रतिक्रिया टाकत बसण्यात काय ती मजा ?)
Happy

हा चालेल का ??????????? मिशा सुध्दा आहेत.......... Happy
drt.JPG

कि हा चालेल याला मिश्या नाही आहे............. Sad
Royal_Enfield_Bullet_C5_Military 5.jpg

याचे वय जास्त आहे थोडे पण बुलेट आहे ना......
frfs.JPG

डोक्यावर केस कमी आहेत........पन..............बुलेट आहे ना.....
rrtert.JPG

आणि हा आयात केलेला................
triumph-thruxton-11.jpg.

बस झालीत कि अजुन पाठवु............???????

>>मृदुला, मिशीवाल्यांचं अपील असणारया बरयाच पोरींवर असंच खुदखुदायला होतं. का? काय माहीत.
खरंय.
आणि खुरट्या दाढीशी सुद्धा सहमत.

>>तुला पछाडलेला मधला भरत जाधवचा पांचट ज्योक ठाऊक आहे का? 'मिशांना पाणी घालतोय रोज' वाला?
ज्योक माहित नाही गं. गेल्या कित्येक वर्षात एकही मराठी चित्रपट बघितला नाहीये. Sad

मणिकर्णिका

उसमे झेपनेका कुछ नही हय ( दमलो )

दहा वर्षांपूर्वी आमचं स्वप्नरंजन चालायचं. पण मंदबुद्धी असल्यानं मुलींना काय आवडतं हे समजेपर्यंत घात झाला होता. आत्ता बायको पत्ता लागू देत नाही.... तेव्हां हा लेख २१ अपेक्षित सारखा वाटला असता..

-.दहावीच्या उल्लेखाने अस्वस्थ झालेला
भित्या पाठी ब्रम्हराक्षस

पूर्ण लेख मस्तच आणि प्रतिसादही मस्त....उदयएक, तुमच्या प्रचिंनी मस्त करमणूक झाली Proud

स्वप्नरंजन भारीये. यादीच करायची झाली तर मला वाटतं कमीत कमी इतके लागतील

एक सही रोमँटीक (झकास दिसणारा, सरप्राइज गिफ्ट देणारा, म्रूदूभाषी वगैरे वगैरे) , न सांगता मनातलं ओळखणारा इत्यादी इत्यादी
एक ज्याला टापटीप स्वच्छ्ता यांची प्रचंड आवड आहे असा
एक अत्यंत बुद्धीवान - चौदा विद्या आणि चौसष्ठ कलांवर प्रभुत्व असलेला वगैरे..
एक उत्तम स्वयंपाक नंतरच्या आवराआवरीसह आणि स्वच्छतेसह करणारा

वरच्या सगळ्या गोष्टी एका पुरुषात मिळणं केवळ अशक्य .. ! त्यातली एक जरी एका पुरुषात असेल तरी रगड ... Happy

मी खूप विचार करतोय पण जाम या वाक्यांचा अर्थ मला कळत नाहीये. का इथे काही दोन दोन अर्थाची गोची आहे? मणिकर्णिकाताई सांगणार का?

मी मदिरापान करून टुन्न झाले आणि मला कोणाशी दोन हात करावेसे वाटले तर त्यासाठी हाय पॅकेजची एक क्रिटीकल पोस्ट ठेवायची.
सगळ्यांना महालात चालवायला बुलेट्स द्यायच्या.
म्हणजे ’कोण आहे रे तिथे?’ असं म्हणून टाळी वाजवली की बुलेटचं ते सेक्साट फ़ायरींग घुमवत एक सेवक बुलेट दामटवत येणार, एकदम स्टड सारखा बुलेट मेनस्टॅंड ला लावणार आणि माझी फ़र्माईश पुरी करणार.

१) दोन हात करणे म्हणजे काय? मारामारी करणे? मग त्या साठी जास्त पगार (हाय पॅकेज) कशाला?

२) स्वतःला मारून घ्यायला कशाला कुणाला पगारावर ठेवायचं?

३) माझी फ़र्माईश पुरी करणार म्हणजे नक्की काय करणार?

मदिरापान केल्यावर पैसे देऊन पुरुषाकडून काहीतरी काम करून घ्यायचंय पण ते नक्की कुठचं?

हा लेख आवडलेल्या सगळ्यांना माझा प्रश्न. तुम्ही पुरुषांना विचारता, आया बहिणी नाहीत का तुला?

मग मी विचारतो..

"तुम्हाला कोणी वडील भाऊ नाहीत का हो? आवडेल का तुम्हाला त्यांनी हे काम केलेलं?"

यतिन, पहिल्या पोस्टीबद्दल
Lol Lol Lol Lol Lol

आणि दुसर्‍या पोस्टीबद्दल - हा नवीनच पैलू दिसतोय... कंगोरा, दृष्टिकोन वगैरे वगैरे...

यतिन,
तुमचे सवाल चाबुकफोड बरं का !!
Happy
पण शेवटी याची उत्तरे समजुन घ्यायची असतात, तेरि भी चुप मेरि भी चुप !
जस्ट मजा ले लो ,और क्या ?
Wink

राजकाशाना | 7 April, 2011 - 16:12 नवीन

लेख ब्लॉगवर वाचला होता. तेव्हाही करमणूक झाली होती. >>>> पण इथे जास्त करमणुक होते !! प्रतिसाद असतात ना Biggrin

>पण इथे जास्त करमणुक होते !! प्रतिसाद असतात ना
खरे आहे. आणि यावरून निघालेले धागे फारच मनोरंजक आहेत. Happy

Pages