’पुरुष’मय स्वप्न!

Submitted by मणिकर्णिका on 31 March, 2011 - 08:45

फ़ार फ़ार वर्षांपूर्वी माझं आणि विनीचं एक स्वप्न होतं.
एक महाल ओनरशिप मध्ये घ्यायचा.
एकदम घियासुद्दीन बाल्बनच्या काळात आल्यासारखं वाटेल असा तो सजवायचा.
आणि सर्वात रम्य कल्पना...सगळे सेवक पुरुष ठेवायचे च्यामायला!
'पुरुष होऊ घातलेले मुलगे' नाहीत, 'मुलगे-पुरुष' नाहीत की पूर्ण मुलगे नहीत तर..पूर्ण पुरुष!
पूर्ण पुरुषांमध्ये ’वरण-भात’ कॅटॅगिरी ला अपात्र ठरवायचं.
रिक्रूट्मेंट ड्राईव्ह ठेवायची.
मऊसूत, कंपासने आखून घ्यावं इतक्या गोल पोळ्या करणारा, कपडे धुणारा, एकही सुरकुती न ठेवता कपडे झटकून वाळत घालणारा, गाद्या घालणारा, चिकन-मॅगी करून हाताशी आणुन देणारा, आम्ही दत्तक घेतलेली मुलं सांभाळणारा.
लोणचं-मुरांबे भरून ठेवणारा, पापड-सांडगे घालणारा ऍड-हॉक बेसिस वर!
डयुटी अवर्स फ़िक्स नाहीत पण फ़ायनान्शियल आणि जॉब सिक्युरिटी ची हमी द्यायची.
मी मदिरापान करून टुन्न झाले आणि मला कोणाशी दोन हात करावेसे वाटले तर त्यासाठी हाय पॅकेजची एक क्रिटीकल पोस्ट ठेवायची.
सगळ्यांना महालात चालवायला बुलेट्स द्यायच्या.
म्हणजे ’कोण आहे रे तिथे?’ असं म्हणून टाळी वाजवली की बुलेटचं ते सेक्साट फ़ायरींग घुमवत एक सेवक बुलेट दामटवत येणार, एकदम स्टड सारखा बुलेट मेनस्टॅंड ला लावणार आणि माझी फ़र्माईश पुरी करणार.
सर्व सेवकांमध्ये ’बुलेट ३५०’ असलेला, ५-९ वगैरे उंची व तेव्हढाच रूंद असलेला, मिडनाईट ब्लू चेक्सचं शर्ट घालून शर्टाचे हात दुमडलेला, फ़िकट निळी डेनिम आणि हातात टॅग ह्युअरचं चामडयाचा पटटा असलेलं घडयाळ घातलेला, दणदणीत मिशी असलेला, भारी ब्लॉग वगैरे लिहीत असलेला सेवक म्हणजे माझ्या मर्जीतला..पटट-दास!
विनीचं थोडयाफ़ार फ़रकाने असंच. पण तिला ती गिळगिळीत ’थंडरबर्ड’ आवडायची.

-------------

परवा विनीचं लग्न झालं.
तिच्या नवरयाला मिशी नव्हती का त्याच्याकडे ’थंडरबर्ड’ पण नव्ह्ती. बुलेट हातात जरी घेतली तरी कोलमडुन पडेल असं प्रकरण होतं ते. थोडक्यात तो ’पुरुष होऊ घातलेला मुलगा’ होता.
स्कूटरवर बसून जाम अवघडायला होतं म्हणाली.
मी तिला माझा जीव की प्राण असलेलं, एके काळच्या बॉयफ़्रेंडने कुठेकुठे लटपटी करून लाडाने आणून दिलेलं (ईश्वर त्याच्या आत्म्यास शांती देवो!) बुलेट ३५० चं अशक्य सीडक्टीव पोस्टर दिलं आहेरात. घळाघळा रडली बिचारी!
आई गं..
आता माझं काय होतंय ते बघायचं.

गुलमोहर: 

अस्सल आणि भारी,रांगडी कल्पना !
Happy
अशा पुरुषांना दाद देणारे,महती माहित असणारे तुमच्या सारखे क्वचितच दिसतात !
तरी या लेखामुळे समस्त अशा स्वदेशातल्या पुरुषवर्गाला अभिमान वाटल्याशिवाय राहणार नाही !
Happy

रचु, सहमत!
अनिल,दाद ठीक आहे पण 'महती 'या शब्दावर सॉलिड ठसका लागला. मला वाटतं मी जे लिहीलंय त्याला 'टेस्ट' किंवा 'अपील असणं ' म्हणतात. मला अपील असणारया गोष्टीबद्दल लिहीणं म्हणजे 'महती सांगणं' होतं असं नाही वाटत मला. बाकी प्रतिसादाबद्दल थँक्स!
उदयवन,
केव्हढा तो कॉन्फिड्न्स...माझ्यावर! Happy

Lol लेख वाचला. मस्त आहे.

पण प्रत्यक्षात असे कराल का? कारण ...

टॅग हॉयर ते मिशी ते ५'९ (खरे तर दहा) सर्व आहे. नौकरीचा कंटाळा आला आहे व ही नौकरी करण्याची तयारी आहे. पगार किती द्याल? इतर पर्क्स आहेत का?
मउसूत पोळ्यांपेक्षा तिखट जाळ -- टॅग आणि बुलेटला शोभनारी मिसळ चालेल का? मला मस्त येते. Happy

Light 1

live your dreams girls, too much fantasy is bad for someone's health Wink

बी, चांगलंय की मग. बरयाच पुरुषांना येतं हे. आणि प्रतिसादांमध्ये चार-पाच सापडतील तुम्हाला.
केदार, हे सग़ळं 'एलिमिनेशन राऊंड'साठी आहे. पुढे बरंच आहे. Happy
अश्विनीमामी, भा.पो. Happy

मस्त लिहीले आहेस. कल्पना विलास अजुन रंगवायचे असतिल तर मी मदत करेन Wink

तुमचे लग्न झाल्या वर नवर्याचा फोटो टाका इथे............विथ बुलेट..... >>> हे आवडलं.

फोटो तेव्हडा जरुर टाक गं.

तुला शहारुख सारखा रोमँटिक, सलमान सारखी बॉडी आणि चेहरा असणारा, संजिव कपूर सारखा सुग्रण, ह्रितिक सारखा हँडसम आणि डान्सर, आईन्स्टाईनच्या बुद्धिमत्तेवाला, सचिन सारखा विश्वविक्रम करणारा खेळाडु, गुलझार, गालीब वैगरे सारखी कविता, गझल वैगरे लिहीणारा, सर्व प्रोफेशन्सवर (डॉक्टर, इंजिनियर, पायलट, मॉडेलिंग... वगैरे वगैरे... ) प्रभुत्व असणारा स्मार्ट, डॅशिंग पण तुझ्यासमोर सरळ सूत असणारा नवरा मिळो हिच माझी इश्वर चरणी प्रार्थना. Happy

तुला तसा मिळाला तर आपण त्याचे बरेच क्लोन्स तयार करु. Wink

>तुला तसा मिळाला तर आपण त्याचे बरेच क्लोन्स तयार करु. डोळा मारा
Lol

असा कोणी मित्र आढळला तर तुझा आयडी सांगीन होऽ Happy

दाद ठीक आहे पण 'महती 'या शब्दावर सॉलिड ठसका लागला
तुमचा हा 'ठसका' मला अगदी अपेक्षित,वाजीब आहे, म्हणुन हा शब्द मी लगेच माफी मागत मागे घेतो !
बाकी अशापण नोकर्‍या असतात (?) यांनी मी चक्रावून गेलोय !
Happy

परवा असचं घडलं,रात्रीच्या विजयाच्या जोशात,आनंदाच्या भरात, माझ्या गाडीमुळे दुसर्‍या गाडीला थोडं घासल्यामुळे खरचटलं गेल, तर तोच म्हणाला,इटस ओके,दोघांच्या आनंदापुढे हे तर काहीच नाही, कारण आम्ही दोघही जिंकलो होतो ! Happy

सणसणीत आवडला!!!
हे असले 'स्वेप्ट हर ऑफ द फीट' प्रकरण आपल्याला जमायचे नाही त्यामुळे त्या फंदातच पडायचे नाही असे कधीकाळी ठरवले होते त्याची आठवण झाली. अर्थात नंतर प्रत्येकाचा 'स्वीप' आगळा असतो आणि आपल्या 'स्विप'ला कंपॅटीबल असणारे 'फीट' कुठेतरी असतातच हेही कळले!!!

अर्रर्र मिशी!? असो असो.

आमच्या गटातल्या एकीचे मिशीवाल्याचे स्वप्न होते. हात मागे बांधून (सावधान - विश्राम मधल्या विश्राम सारखे) बोलणारा मिशीवाला. एकेकीची स्वप्ने आठवून पुष्कळ खुदखुदले.

बाकी विनीला निरोप, '.. वॉच देम ग्रो.' Happy

jynna jyanna have astil....tyanni ithech aapali maagani kara....

aani je je ase aahet tyani suddha aapali ithe nond kara....

( je ase naahit tyanni fakt pratikriya nondvaa) ... Happy

पुरुषांनी जे हजारो वर्शे केले त्याच्या बेड्य गळत नाहीत. स्वप्नेही त्यंच्या स्वप्नांसारखीच ? कोणच्यातरी शोशणावर / ऑब्जेक्टिफिकेशन मधे सुख मानणारी / शोधणारी?

म्हणजे कुणावर तरी राज्य गाजवा वा कुणाचे तरि दास व्हा ह्या पलिकडे विचार सोडा पण़ स्वप्नेही जात नाहीत?

विद्रोह विनोद एका पातळिवर प्रस्थपित अन्याय मन्य करतो का? असा प्रष्ण पडला

लेखन शैलि आवडली...

वर्षा, क्लोन्स ची आयडीया भ न्ना ट!<<डॅशिंग पण तुझ्यासमोर सरळ सूत असणारा नवरा मिळो
तुझ्या तोंडात साखर गं बाई!

आगाऊ,
प्रतिक्रिया आवडली. काही मुलांना आपण खूपच साधे आहोत, नेमक्या वेळी आपल्याला बोलायला सुचत नाही या गोष्टीच्या काँप्लेक्समध्ये असतात पण अशा साध्यासुध्या मुलांचं अपील असणारयाही मुली असतात. जसं तुम्ही म्हणताय <<अर्थात नंतर प्रत्येकाचा 'स्वीप' आगळा असतो आणि आपल्या 'स्विप' कंपॅटीबल असणारे 'फीट' कुठेतरी असतातच हेही कळले.

अनिल, चालायचंच. Happy

मृदुला, मिशीवाल्यांचं अपील असणारया बरयाच पोरींवर असंच खुदखुदायला होतं. का? काय माहीत. तुला पछाडलेला मधला भरत जाधवचा पांचट ज्योक ठाऊक आहे का? 'मिशांना पाणी घालतोय रोज' वाला?

उदयवन Happy

अगं मिशीचं काय मला छान राखलेल्या दाढीचं पण अप्रूप होतं. मिळाला बाबा दाढीमिशीवाला नवरा... Happy
बाकी आगावा स्वीप आणि कंपॅटिबल फीट बद्दल अनुचमोदन!!
पहिल्या भेटीत एकट्याने आइसक्रिम खाणे(तूच ना रे तो?) पासून नवर्‍याने बायकोला आणलेलं पहिलं फूल म्हणजे गोबी का फूल इथपर्यंत माबोवर लिहिले गेलेले सगळे किस्से आठवले या स्वीप आणि कंपॅटिबल फीटच्या मुद्द्यातून.. Happy

नी, अगदी गं. पण मला दाढीचं एव्हढं अप्रूप नाही. पण खुरटी दाढी वगैरे असल्यावर येतो तो केअरलेस लुक छान वाटतो कधीकधी.
मला अख्खाच्या अख्खा कबीर बेदी कधीही आवडला नाही, ऍब्सोल्युट डोक्यात जातो पण त्याची दाढी आवडायची-आवडते..
दाढी ऑप्शनल असली तरी मिशी इझ मस्ट. मग ती कुठल्याही प्रकारची चालते. उपेंद्र लिमये टाईप झाडी मिशी, अतुल कुलकर्णी टाईप कोरीव किंवा गंगाजल मध्ये अजय देवगण ची आहे तशी. मला पर्सनली अरविंद स्वामीची(रोझा, बॉंम्बे वाला) मिशी आवडते.
आपला मुंबई पोलिस क्राईम ब्रांचचा जॉंईंट कमिशनर हिमांशु रॉय आहे बघ. ग्रॅंड पर्सनॅलिटी (माझ्या मते)
आणि मला अजून नवरा मिळायचाय. Happy
बघूयात.

ऑ???फक्त मस्त? हे अंडरस्टेटमेंट आहे.
पण टेकन ना?? Sad
राहू देत, तुझ्यासमोर जास्त नाही बोलत मी.
भाऊ आहे का गं लहान तुझ्या नवरयाला? डिट्टो असाच?.

Lol मणी, किती वेळा ती नीरजाची आर्जवं करत्येस जाऊ बनण्यासाठी? Wink

बाकी अरविंदस्वामीची मिशी Happy अपुनभी मिशी फॅन.

आता अ‍ॅडमिनदादांना साकडं घातलंय की मला इतकं डेस्परेट नका दाखवू नी समोर, डीलीट करा राव ते बल्क प्रतिसाद.
आता बघूयात कधी पावतात ते. नी ने काही मनावर घ्यायच्याआधी पावले म्हणजे मिळवलं. Wink

Pages