निसर्गाच्या गप्पा - २

Submitted by साधना on 10 March, 2011 - 01:21

निसर्गमित्रांनो, इथे आपण आपले निसर्ग प्रकरण मागील पानावरुन पुढे चालु करुया.... Happy

आधीच्या गप्पा -
http://www.maayboli.com/node/21676

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दिनेशदा आहो लहानपणी ह्याच्या भरपुर वेण्या करुन माळल्याही आहेत शाळेत जाताना. सि.न्गल्ची , डबलची आणि चटईची अशी ३ प्रकारच्या वेण्या करायचे मी.

जागू, मनिप्लांटबद्दल लेख लिहिलाय बरं का.
आणि परत कधी अशा वेण्या केल्या ना, तर त्याचे फोटो अवश्य काधायचे.

इथे मिनेसोटात सध्या ४०-४५ डिग्री फ. झालंय .आत्ता काही लावता येईल का/ तयारी करता येयील का.. पाऊस असेल आता २-३ महिने आणि सलग सूर्य प्रकाश मिळणार नाही..
दिनेशदा तुम्ही जे लेख लिहिता न ते मी गोष्ट म्हणून सांगते जरा रुपांतर करून .. त्यामुळे मोठ्या मुलाला ह्यावेळेस स्वतः गार्डन तयार करायचं आहे .. तो वाट बघतोय कधी उन्हाळा येयील.. आणि बिया टाकून झाडे उगवतील... Happy

प्रित, पावसाळा असेल तर पालेभाज्या लावता येतील ना. साधारणपणे तूमच्याकडे ज्या बिया मिळतात, त्या पाकिटावर लागवड कधी करायचे ते लिहिलेले असते. अनेक झाडांना थेट सूर्यप्रकाश नसला पण प्रकाश असला तरी चालतो.
आणि गोष्टीमधे कसे रुपांतर केले, ते मलाही वाचायला आवडेल. (कधी मुलांना सांगायची संधी मिळाली, तर तसे सांगीन.)

जिप्स्या. पंकज होता त्यावेळी, पण खूप बारिक होता.
आता सगळ्यांचीच नाही नावे आठवत, पण नलिनी, जी एस, आरती, गिरिराज आणि त्याची बायको, कूल आणि त्याची बायको असे बरेच जण होतो. नुसती धमाल केली होती.
साधना, पंकज आणि मी वेगळे गेलो होतो, त्यामूळे येताना आणखी नदीत वगैरे डुंबून घेतले होते.

तुम्ही मी नाही म्हटल्यावर मला वाटले आपण खाली नेरडा खात राहिलो त्यामुळे फोटोत मिसलो. पण पक्षिणबाई दिसल्याबरोबर म्हटले तुम्ही नाहीत हे शक्यच नाही.... Happy जीएस नंतर कुरबूरत होता की झाडबाबा आणि पक्षीबाईंमुळे सगळा उशीर झाला. दोघेही अतिशय रेंगाळत गड चढले. पक्षिणबाई प्रत्येक झाड बघत होत्या आणि झाडबाबा प्रत्येक पक्षी बघत होता Proud

जिप्स्या माझ्या मागेच पंकज आहे. आपला छोटा दोस्त ओमकार नाहीय मात्र फोटोत. त्याची गेल्याच आठवड्यात बारावीची परिक्षा संपली. आज दहावीची परिक्षा संपतेय.

अनेक झाडांना थेट सूर्यप्रकाश नसला पण प्रकाश असला तरी चालतो. >> दिनेशदा, काही नावे द्याल का अजुन? आमच्याकडे सध्या मी फक्त अळु लावलाय तो तरी चांगला आलाय. पण अजुन काय लावु?

इथे नैरोबीत पण हवा बरीच ढगाळ असते. तरी सर्व पिके जोमाने वाढतात.
मला वाटते, कंदमूळे लावून बघता येतील जसे कि रताळे (याची पाने सुंदर असतात.) हळद पण चांगली होईल. मूगाच्या काही जातींची पाने पण छान दिसतात.
राजगिरा पण इथे मस्त फोफावतो.

मी आल्याचा तुकडा मातीत पुरलाय, पण त्याला काही कोंब वगैरे आल्याचे दिसत नाही. किती दिवसांनी कोंब येतात?

जिप्स्या माझ्या मागेच पंकज आहे.>>>>>दिसला पंकज, ओळखु येत नाहीये Happy दिनेशदा पण दिसले. Happy खुप जुना फोटो आहे वाटत. कुठला ट्रेक ???

रच्याकने, पक्षिणबाई कोण? आणि फोटोत जी एस कुठे आहेत. (मायबोलीवर जेंव्हा आले तेंव्हा जी एस आणि चाफा यांच्या वृतांत आणि कथा (अनुक्रमे) याचा पंखा होतो. Happy

आस : रताळे काहि दिवस घरी राहिले कि त्याला गडद गुलाबी कोंब येतात. तेवढा तूकडा कापून पेरायचा. रत्याळ्याच्या वेलाचा तूकडा खोचला तरी तो जगतो.

अमि : आल्याला कोंब आल्यावर जमिनीत खोचले तर उगवायची जास्त शक्यता असते. बाजारात खूपदा ते कोंब कापून टाकलेले असतात. आणि ते आले काही वेळा कूजायला लागलेले असते. पेरण्यासाठी बाजारातल्या धूतलेल्या आल्यापेक्षा, माती लागलेले आले जास्त चांगले.

अगं नाही.. मी पक्षीणबाई नाही Proud

दिनेशच्या पुढ्यात खांद्यावर ओढणी घेऊन आहेत त्या पक्षीणबाई Happy त्यांचे नाव तेव्हाच विसरलेले, आता उगाच आठवायचा प्रयत्न करुन डोक्याच्या हार्डडिस्कला ताण दिला तर क्रॅश व्हायची. दिनेशना आठवत असेल कदाचित.

जिप्स्या तु मला ओळखलेस याचे आश्चर्य वाटले. मी स्वतः मला ओळखु शकले नाही. पण पंकज, पक्षीणबाई आणि दिनेश आहेत म्हटल्यावर मीही फोटो काढेपर्यंत पोचले असणार याची खात्री पटली आणि मग अंदाजपंचे माझा फोटो ओळखला, तेही डोक्यावरच्या टॉवेलमुळे. तसली टॉवेल्स इथे मिळत नाहीत. आसाम स्पेशल आहेत. इथे आसाम फेस्टीवल असेल तर मिळतील. फोटो २००५ मधला आहे.
दिनेशच्या समोर अरबी वेशातली एक माबोकरीण आहे तिच्या मागे टोपीतला जीएस. आणि सगळ्यात कोप-यात पाठीला सॅक लावून आहे तो आपला सचिन. इतर सगळ्यांची नावे इथे सांगत बसले तर अ‍ॅडमिन येतील दांडा घेऊन. आपल्या निसर्गप्रेमींच नावे तेवढी सांगितली. बाकीचे लोक इथे असतात पण आपल्यासारखे पडिक नसतात Happy

माझ्या ऑफिसात झाडे खुप आहेत. दोन आठवड्यांपुर्वी पार्किंगमधुन येत होते तेव्हा एक झाड - झाड कसले माझ्यापेक्षा तिन्चार फुट उंचीचे रोप म्हणायला पाहिजे असे दिसले. तसे ते वाटेवरच आहे पण वाटेवरची झाडे रोज रोज पाहिल्यामुळे दिसेनाशी होतात Happy अतिपरिचयात अवज्ञा असे काहीसे होते. तर दोन आठवड्यांपुर्वी झाडावर एकही पान नव्हते पण सहजच लक्ष गेले तर साधारण एक ते तिन इंच व्यासाचे गोल गरगरती चेंडू लटकत होते. ते चेंडू दिसायला गुळगुळीत पण देठाकडे मात्र जर्रासेच लांबुडके. फोटो काढणार काढणार म्हणतना राहुन गेले. चेंडू आधी मातकट हिरवे होते आणि मग ते वडाच्या फळांचा रंग घेते झाले. मग पडले बिचारे झाडावरुन. माझे फोटोप्रकरण राहुन गेले. मग काही दिवस ते झाड असेच ओकेबोके होते. मी रोज तिथुन जावूनही त्या झाडाची पाने मला आजवर कधीच का दिसली नाहीत याबद्दल मी रोज स्वतःशीच आश्चर्य व्यक्त करत होते.

आज सकाळी येताना परत पाहिले. आणि काय आश्चर्य... त्याला चक्क फुले................. आधी फळे आली आणि आता फुले???????????????? आणि थोडी पोपटी पानेही. अद्वितीय सौंदर्य लाभलेली ती फुले पाहताच पाचुंदा/वरुण ची आठवण झाली. अर्थात वरुणाला पाहिले नाहीय मी, इथे दिनेशनी टाकलेला फोटोच पाहिलाय. पण त्या फुलांना पाहताच ही नक्कीच वरुणाची फुले आहेत याची खात्री पटली. सकाळी सुर्य नेमका तिथेच असतो त्यामुळे फोटो घेता येत नाही. शिवाय रस्त्यावर गाड्या असल्याने सिक्युरीटीची माणसे घोंघावत असतात. ऑफिस कॉम्प्लेक्स मध्ये फोटोग्राफीवर बंदी आहे.
आता जेवायला गेले की काढते फोटो. झाडांचे फोटो काढायला बंदी नसावी. मी काढलेत, अजुन मला तरी कोणी धरलेले नाही (कोण धाडस करणार इतके :P)

कुठल्या झाडाचा

अद्रुश्य नावाच्या एका दुर्मिळ वृक्षाचा हा दांडा मारताना आपल्याला दिसत नाही पण त्याचा फटका जोरदार बसतो. आणि तु काय विचारतोस?? तुला बसला नाही काल परवाच??????

दिनेशदा,
फोटो छान आलाय !
तुम्हाला,साधना यांना फोटोत शोधुन शोधुन थकलो ... नंतर वाचल !

दोघेही अतिशय रेंगाळत गड चढले. पक्षिणबाई प्रत्येक झाड बघत होत्या आणि झाडबाबा प्रत्येक पक्षी बघत होता
पुढच्या ट्रेकवेळी गड चढताना साधना आणि दिनेशदा यांना सगळ्यांच्या पुढे होतील, कारण त्यांनी न पाहिलेलं झाड किंवा पक्षी तिथे नक्कीच नसतील असं मला वाटतं !
Happy

Pages