Submitted by रायगड on 17 March, 2011 - 02:16
शाळेत मराठीच्या पाठ्यपुस्तकातील कित्येक कविता आपल्या आठवणीत दरवळत रहातात. काही अजूनेही पूर्ण आठवतात तर काही थोड्या-फार! पण त्या कविता आठवून त्या जुन्या शाळेतल्या आठवणींना उजाळा देण्याची मजा काही औरच!
तुम्हाला कोणत्या कविता आवडायच्या? कोणत्या अजूनही आठवतात? कोणत्या पूर्ण आठवायला आवडेल?
विषय:
शब्दखुणा:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
डॉक. धन्यवाद. मला 'गाई
डॉक. धन्यवाद. मला 'गाई पाण्यावर' आणि 'माझी बाहूली' मधील काही कडवी आठवत नव्हती.
सर्वाना धन्यवाद. अगदी शाळेत वर्गात बसल्यासारख वाटतय. या सगळ्या कविता तेव्हा अगदी तोंडपाठ होत्या. आता काही कडवी आठवत नाहीत.
(No subject)
(No subject)
पन्ख चिमुकले, निळे
पन्ख चिमुकले, निळे जाम्भळे,
हलवूनी झुलते.
फुलपाखरु छान किति दिसते !
असे आहे बहुतेक.
डॉक, वारूळ, वारूळ, मुंग्यांचे
डॉक,
वारूळ, वारूळ, मुंग्यांचे वारूळ. ही पण लिहा. किवितेशेजारी असलेले वारूळाचे चित्र आजही दिसतेय.
श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ
श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे
क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरूनी ऊन पडे....
(No subject)
(No subject)
समाधी कविता.......कवीचं नाव
समाधी कविता.......कवीचं नाव आठवत नाहीये
या दूरच्या दूर ओसाड जागी
किडे पाखरांवीण नाही कुणी
हा भूमिचा भाग आहे अभागी
इथे एक आहे समाधी जुनी
विध्वंसली काळहस्तामुळे ही
हिला या पहा जागजागी फटा
माती खडे आणि आहेत काही
हिच्या भोवती भंगलेल्या विटा
आहे जरी लेख हा छेद गेला
जुन्या अक्षरांतील भेगांमधून
दुर्वांकुरे अन तरु खुंटलेला
निघाला तयांतील भेगांमधुनी
कोठुन ताजी फुले बाभळींनी
हिला वाहिले फक्त काटेकुटे
ही भंगलेली शलाका पुराणी
कुणाचे तरी नाव आहे ईथे
रानातला ऊन मंदावलेला
उदासिन वारा ईथे वाहतो
फांदीतला कावळा कावलेला
भुकेलाच येथे तिथे पाहतो
"समाधी" ही कविता कवि
"समाधी" ही कविता कवि ना.घ.देशपांडे यांची आहे.
`मामाची गाडी' माझी फार लाडकी
`मामाची गाडी' माझी फार लाडकी कविता होती. त्या पानात मी मोराचे पिस ठेवले होते. रंगीत पिसांचा मोठा खजिनाच होता माझ्याकडे. तो आवड्त्या कविता व धडे यात दडवलेला असाय्चा. रम्य त्या आठ्वणी !!
वा डॉक. तुमच्याकडे मोठ्ठाच
वा डॉक. तुमच्याकडे मोठ्ठाच खजिना आहे की.
ती फुलराणी आहे का कोणाकडे?
ती फुलराणी आहे का कोणाकडे?
गीता,प्रतिक्...धन्यवाद्...समा
गीता,प्रतिक्...धन्यवाद्...समाधी कविता व कवीचे नाव दिल्याबद्दल्...खरं तर अगदी उदासवाणी कविता आहे पण त्या उदासिनतेचंच लेखकाने इतकं योग्य वर्णन केलय की ही कविता अजूनही मनात राहिल्ये.
डॉक, तुम्ही या सर्व कविता कुठून post करता? मस्त वाटतय सर्व कविता वाचायला!
बालकवींची एक कविता,
बालकवींची एक कविता, पारवा.
सगळी नाही आठवत, पण,
भिंत खचली कलथून खांब गेला,
उभी पडकी उध्वस्त धर्मशाळा,
तिच्या कौलारी बसुनी पारवा तो,
खिन्न नीरस एकांत गीत गातो.
सूर्य मध्यान्ही नभी उभा राहे,
घार मंडळ त्याभवती घालताहे,
पक्षी पानांच्या शांत सावल्यांत,
सुखे साखरझोपेत पेंगतात.
तुला नाही परी हौस उडायाची,
गोड हिरव्या झुबक्यात दडायाची..
मला सध्या एवढीच आठवतेय ही कविता.
रश्मि ~ "फुलराणी" ही अत्यंत
रश्मि ~ "फुलराणी" ही अत्यंत सुंदर कविता मी इथे टाईप करीत आहे, पण मला टायपिंगचा थकवा बिलकुल जाणवणार नाही. त्याला कारण म्हणजे ओळीओळीला "ती फुलराणी" असे काही आपल्यासमोर बागडत येते की माणूस कितीही थकला तरी तिच्याकडे पाहून पुन:श्च टवटवीत होतो. अगदी अतुलनीय अशी जादू आहे बालकवींच्या शब्दसामर्थ्यात.
"फुलराणी"
हिरवे हिरवेगार गालिचे हरित तृणाच्या मखमालीचे
त्या सुंदर मखमालीवरती फुलराणी ही खेळत होती.
गोड निळ्या वातावरणांत अव्याज मने होती डोलत;
प्रणयचंचला त्या भ्रूलीला अवगत नव्हत्या कुमारिकेला.
आईच्या मांडीवर बसुनी झोंके घ्यावे, गावीं गाणी;
याहुनिं ठावे काय तियेला साध्या भोळ्या फुलराणीला ?
पुरा विनोदी संध्यावात डोलडोलवी हिरवे शेत;
तोच एकदा हांसत आला चुंबून म्हणे फुलराणीला
"छानी माझी सोनुकली ती कुणाकडे ग पाहत होती ?
कोण बरे त्या संध्येतून ह्ळुंच पाहते डोकावून ?
तो रविकर का गोजिरवाणा आवडला अमुच्या राणींना ?"
लाजलाजली या वचनांई साधी भोळी ती फुलराणी.
आंदोली संध्येच्या बसुनी झोंके झोंके घेते रजनी;
या रजनीचे नेत्र विलोल नभी चमकती ते ग्रहगोल !
जादूटोणा त्यांनी केला चैन पडेना फुलराणीला
निजली शेते, निजले रान निजली प्राणी थोर लहान
अजून जागे फुलराणी ही आज कशी ताळ्यावर नाही ?
लागेना डोळ्याशी डोळा काय जाहले फुलराणीला ?
या कुंजातुन त्या कुंजातुन इवल्याशा या दिवट्या लावुन,
मध्य्रात्रिच्या निवांत समयी खेळखेळते वनदेवी ही
त्या देवीला ओव्या सुंदर निर्झर गातो; त्या तालावर -
झुलुनी राहिले सगळे रान स्वपन्संगमी दंग होउन !
प्रणयचिंतनी विलीनवृत्ती कुमारिका ही डोलत होती;
डुलतां डुलतां गुंग होउनी स्वप्ने पाही मग फुलराणी
"कुणी कुणाला आकाशात प्रणयगायने होते गात;
ह्ळुच मागुनी आले कोण कुणी कुणा दे चुंबनदान !"
प्रणय-खेळ हे पाहुनि चित्ती विरहार्ता फुलराणी होती;
तो व्योमींच्या प्रेमदेवताअ वार्यावरती फिरता फिरता -
हळूच आल्या उतरून खाली फुलराणीसह करण्या केली.
परस्परांना खुणवुनि नयनी त्या वदल्या "ही अमुची रानी"
स्वर्भूमीचा जुळवित हात नाचनाचतो प्रभातवात;
खेळुनी दमल्या त्या ग्रहमाला हळुहळु लागति लपावयाला
आकाशींची गभीत शांती मंदमंद ये अवनीवरती;
विरूं लागले संशयजाल लंपत ये विरहाचा काल
शुभ्र धुक्याचे वस्त्र लेवुनी हर्षनिर्भरा नटली अवनी.
स्वप्नसंगमी रंगत होती तरीहि अजुनी फुलराणी ती !
तेजोमय नव मंडप केला लख्ख पांढरा दहा दिशांला;
जिकडेतिकडे उधळित मोती दिव्य वर्हाडी गगनी येती
लाल सुवर्णी झगे घालुनी हांसतहांसत आले कोणी;
कुणी बांधिला गुलाबि फेट झकमकणारा सुंदर मोठा !
आकाशी चंडोल चालला हा वाङनिश्चय करावयाला;
हे थाटाचे लग्न कुणीचे ? साध्या भोळ्या फुलराणीचे !
गाउं लागले मंगलपाठा सृष्टीचे गाणारे भाट
वाजवि सनई मारुतराणा कोकिळ घे तानांवर ताना !
नाचुं लागले भारद्वाज वाजविती निर्झर पखवाज,
नवरदेव सोनेरी रविकर नवरी ही फुलराणी सुंदर !
लग्न लागते ! सावध सारे ! सावध पक्षी ! सावध वारे !
दंवमय हा अंतःपट फिटला भेटे रविकर फुलराणीला !
वधूवरांना दिव्य रवांनी कुणी गाईली मंगल गाणी;
त्यांत कुणीसे गुंफित होते परस्परांचे प्रेम ! अहा ते !
आणिक तेथिल वनदेवीही दिव्य आपुल्या उच्छ्वासांही
लिहीत होत्या वातावरनी फुलराणीची गोड कहाणी !
गुंगतगुंगत कवि त्या ठाया स्फूर्तीसह विहराया जाई;
त्याने तर अभिषेकच केला नवगीतांनी फुलराणीला !
रायगड, सर्वप्रथम तुम्हाला
रायगड, सर्वप्रथम तुम्हाला धन्यवाद देते !
डॉक, तुम्हाला तर मी फक्त "ग्रेट" एवढ्च म्हणू शकते. कालच मी शोभा१२३, बरोबर ह्या कवितांविषयी बोलत होते तर तीने सांगितले की तुम्ही त्या कविता लिहिल्यात. काय सुंदर कविता आहेत हो ह्या? ह्या सर्व कविता त्यांतील चित्रांसह आठवतायत शाळेतले ते रम्य दिवस आठवून मन अगदि प्रसन्न झाले.
प्रतिक देसाई, बालकवींच्या ह्या "फुलराणी" कवितेबद्द्ल काय बोलायचे? "अप्रतिम"! किति सुंदर !!
सर्वांच्याच कविता मी वाचतेय. खूप छान धागा आहे हा!
प्रज्ञा ९ आणि बालकवि आवडीने
प्रज्ञा ९ आणि बालकवि आवडीने वाचणार्या अन्य सर्वांसाठी ~ बालकवि यांची त्यांच्या अन्य निसर्गकवितेशी फटकून असणारी ही एक उदास छटेची कविता ~ पारवा
पारवा
भिंत खचली कलथून खांब गेला
जुनी पडकी उद्ध्वस्त धर्मशाला
तिच्या कौलारी बसुनि पारवा तो
खिन्न नीरस एकांतगीत गातो
सूर्य मध्यान्ही उभा राहे
घार मंडळ त्याभवती घालताहे
पक्षी पानांच्या शांत सावल्यांत
सुखे साखरझोपेत पेंगतात.
तुला नाही परि हौस उडायाची
गोड हिरव्या झुबक्यात दडायाची
उष्ण झळ्या बाहेर तापतात
गीतनिद्रा तव आंत अखंडित
चित्त किंवा तव कोवळ्या विखारे
दुखतेखुपते का सांग सांग बा रे
तुला काही जगतात नको मान
गोड गावे मग भान हे कुठून
झोप सौख्यानंदात मानवाची
पुरी क्षणही कोठून टिकायाची
दुःखनिद्रे निद्रिस्त बुध्दराज
करूणगीते घुमवीत जगी आज.
दुःखनिद्रा ती आज तुला लागे
तुझे जगही निद्रिस्त तुझ्या संगे
फिरे माझ्या जगतात उष्ण वारे
तुला त्याचे भानही नसे बा रे.
प्रतिक देसाई, ही कवितासुद्धा
प्रतिक देसाई, ही कवितासुद्धा फार आवडली! खरंच ह्या कविता शांतपणे वाचताना त्या कवींची प्रगल्भता बघून थक्क व्हायला होते.
होय, प्रज्ञा१२३. देवाने काय
होय, प्रज्ञा१२३. देवाने काय विलक्षण प्रतिभा बहाल केली होती या निसर्गप्रेमी साहित्यिकास. त्यांच्या कोणत्याही कवितेतील कोणतीही ओळ वाचली तरी त्याचे प्रत्यंतर येते. अपघाताने मृत्यु आल्यामुळे मराठी शारदेच्या प्रांगणातून त्या प्रतिभेला अकाली आपल्यातून जावे लागले अन्यथा अजूनही अशीच जादूमय कवितेची दालने त्यानी रसिकांसमोर सादर केली असती.
एक छोटी बहीण आपल्या 'गोजिर्या' भावास पाहून म्हणते :
"कधि हा हसतो, कधि हा रडतो,
हात पहा हा कसे हलवितो !
घेतो काही टाकुनि देतो,
का रे भाऊ तुज कडेवरी का घेऊं ?
"कसा मला हा पाहुन हसतो !
माझे केस कसे बघ धरतो
लागलीच मग सोडुनि देतो
चल रे भाऊ ! खेळाया आपण जाऊं."
किती साध्या सरळ आणि कमालीच्या सहज ओळी आहेत ह्या ! पण बालकविंनी तेवढ्यात त्या इवल्याशा भावाबद्दल त्या बहिणीस वाटणारा आनंद असा काही जिवंत केला आहे की ते हसरे घरच नजरेसमोर तरळते.
सुंदरच.
मस्त धागा सुरु केलात.
मस्त धागा सुरु केलात. धन्यवाद....
माझी आवडती कविता:
नव्या मनुतिल नव्या दमाचा शुर शिपाई आहे
कोण मला अडवु शकते ते मी पाहे...
....
खुशाल फुटक्या बुरुजावरती पणजोबांचे भुत वसो
ही वाडी ... तुमची तुमास ती लखलाभ असो..
कोणाला पुर्ण येत असेल तर प्लिज इथे पोष्ट करा... डॉ. मस्तच... मजा आली....
त्या नंतर
घाटातली वाट, काय तिचा थाट मुरकते गिरकते लवते पाठोपाठ
खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला .....पिलासाठी तिनं जीव झाडाले टांगला...
आज ये साजिरा पाहुणा गोजिरा ....
आणि पहिलीच्या पुस्त्कात शेवटी एक कविता होती,
आभाळ वाजलं धडाड्धुम..
वारा सुटला सूं सूं सूं...
वीज चमकली चक चक चक....
धन्यवाद मित्रांनो, खरच खूप
धन्यवाद मित्रांनो,
खरच खूप आनन्ददायक आहे हे सदर!
मला बहिणाबाईंची 'माझी मुक्ताई मुक्ताई' कविता फार आवडायची
ती देत आहे.थोड्या चुका झाल्यास क्षमा करा!
==============================
माझी मुक्ताई मुक्ताई -बहिणाबाई चौधरी
माझी मुक्ताई मुक्ताई
दहा वर्साचं लेकरू
चांगदेव योगियानं
तिले मानला रे गुरू
"अरे संन्याश्याची पोरं"
कुनी बोलती हिनई
टाकीदेयेलं पोराचं
तोंड कधी पाहू नई
"अरे असं माझं तोंड
कसं दावू मी लोकाले?"
ताटीलायी ग्यानदेव
घरामदी रे दडले
उबगले ग्यानदेव
घडे असंगाशी संग
कयवयली मुक्ताई
बोले ताटीचे अभंग
घेती हिरिदाचा ठाव
ऐका ताटीचे अभंग
एकाएका अभंगात
उभा केला पांडुरंग
गह्यरले ग्यानदेव
डोये गेले भरीसनं
असा भाग्यवंत भाऊ
त्याची मुक्ताई बहीन
अजून एक गर्जा
अजून एक
गर्जा जयजयकार
==============================
गर्जा जयजयकार कुसुमाग्रज
गर्जा जयजयकार क्रांतिचा गर्जा जयजयकार
अन् वज्रांचे छातीवरती घ्या झेलुनी प्रहार
खळखळु द्या या अदय शृंखला हातापायात
पोलादाची काय तमा मरणाच्या दारात?
सर्पांनो उद्दाम,आवळा कसूनिया पाश
पिचेल मनगट परी उरातिल अभंग आवेश
तडिताघाते कोसळेल का तारांचा संभार?
कधीहि तारांचा संभार.....
पदोपदी पसरून निखारे आपुल्याच हाती
होउनिया बेहोष धावलो ध्येयपथावरती
कधि न थांबलो विश्रांतीस्तव पाहिले न मागे
बांधु न शकले प्रीतीचे वा कीर्तीचे धागे
एकच तारा समोर आणिक पायतळी अंगार
होता पायतळी अंगार.....
नाचविता ध्वज तुझा गुंतले शृंखलेत हात
तुझ्या यशाचे पवाड गाता गळ्यात ये तात
चरणांचे तव पूजन केले म्हणुनि गुन्हेगार!
देता जीवन अर्घ्य तूजला ठरलो वेडेपीर
देशिल ना पण तुझ्या कुशीचा वेड्यांना आधार?
आई,वेड्यांना आधार?.....
श्वासांनो, जा वायुसंगे ओलांडुनि भिंत
अन् आईला कळवा अमुच्या हृदयातिल खंत
सांगा वेडी तुझी मुले ही या अंधारात
बद्ध करांनी अखेरचा तुज करती प्रणिपात
तुझ्या मुक्तिचे एकच होते वेड परी अनिवार
तयांना वेड परी अनिवार.....
कशास आई भिजविसि डोळे उजळ तुझे भाल
रात्रीच्या गर्भात उद्याचा असे उष:काल
सरणावरती आज आमुची पेटताच प्रेते
उठतिल त्या ज्वाळातुन भावी क्रांतीचे नेते
लोहदंड तव पायामधले खळाखळा तुटणार
आई, खळाखळा तुटणार.....
कृद्ध भूक पोटात घालु द्या खुशाल थैमान
कुरतडु द्या आतडी करू द्या रक्ताचे पान
संहारक काली, तुज देती बळीच आह्वान
बलशाली मरणाहुन आम्हा अमुचा अभीमान
मृत्यंजय आम्ही आम्हाला कसले कारागार?
अहो, हे कसले कारागार?.....
आता कर ओंकारा, तांडव गिळावया घास
नाचत गर्जत टाक बळीच्या गळ्यावरी फास
रक्तमांस लुटण्यास गिधाडे येउ देत क्रूर
पहा मोकळे केले आता त्यासाठी ऊर
शरिराचा कर सुखेनैव या सुखेनैव संहार
मरणा, सुखेनैव संहार.....
गर्जा जयजयकार क्रांतिचा गर्जा जयजयकार!
===============================
रामकुमार
आमची एक अतिशय आवडती कविता
आमची एक अतिशय आवडती कविता होती:
कशासाठी पोटासाठी खंडाळ्याच्या घाटासाठी
चला खेळू आगगाडी झोका उंच कोण काढी
बाळू नीट कडी धर झोका हाले खालीवर
तार खांब हे वेगात मागे मागे धावतात
तार खालीवर डोले तिच्यावर दोन होले
झाडी फिरे मंडलात रूळ संगे धावतात
इंजिनाची बघा खोडी बोगद्यात धूर सोडी
पूर्ण कविता आता आठवत नाही.
(No subject)
(No subject)
(No subject)
(No subject)
...
...
मला तर दरवर्षीची एक एक कविता
मला तर दरवर्षीची एक एक कविता आठवते
तरी त्यातल्या त्यात किनारा फार आवडायची मला...सातवीला होती
घननीळ सागराचा घननाद येत कानी
घुमती दिशादिशात लहरींमधील गाणी
चौफेर सुर्यज्वाळा वारा अबोल शांत
कोठे समुद्रपक्षी गगनी फिरे निवांत
आकाश तेजभारे माडांवरी स्थिरावे
भटकी चुकार होडी लाडात संथ धावे
वाळुत स्तब्द्ध झाला रेखाकृती किनारा
जवळी असुन पाणी अतृप्त तो बिचारा
जलधी बरोबरीचे आभासमान नाते
त्याची न त्यास धरती संकेत फक्त खोटे
सानिध्य सागराचे आकाश पांघराया
परी साथ ना कुणाची अस्तित्व सावराया
या शेवटच्या ओळी सारख्या सारख्या संदर्भासहीत स्पष्टीकरणासाठी यायच्या...:)
Pages