Submitted by रायगड on 17 March, 2011 - 02:16
शाळेत मराठीच्या पाठ्यपुस्तकातील कित्येक कविता आपल्या आठवणीत दरवळत रहातात. काही अजूनेही पूर्ण आठवतात तर काही थोड्या-फार! पण त्या कविता आठवून त्या जुन्या शाळेतल्या आठवणींना उजाळा देण्याची मजा काही औरच!
तुम्हाला कोणत्या कविता आवडायच्या? कोणत्या अजूनही आठवतात? कोणत्या पूर्ण आठवायला आवडेल?
विषय:
शब्दखुणा:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्त धागा. मला माझी पहिलीची
मस्त धागा.
मला माझी पहिलीची (पहिलीचीच ना?) कविता आठवते आणि आवडतेही.
उठ मुला, उठ मुला
बघ हा अरुणोदय झाला
किलबिलती बागडती
झाडांवरती पक्षी किती
फुलांवरी फुलांवरी
पतंग मोदे मजा करी
झटकन बसे पटकन उठे
उंच भरार्या घेत सुटे
शीतल हा वात पहा
आळस हरण्या येत अहा
पूर्वेला रवि आला
मुला उठाया कथित तुला
कवीचे नाव काय होतं बाई? अजून काही कडवी होती का? बहुधा नसावीत.
अजून काही आठवणीतल्या शालेय
अजून काही आठवणीतल्या शालेय कविता :
१. इवल्या इवल्याश्या टिकल्या टिकल्यांचे
देवाचे घर बाई उंचावरी
ऐक मजा तर ऐक खरी
२. या झोपडीत माझ्या
३. भव्य हिमालय तुमचा आमचा केवळ माझा सह्यकडा
४. लेझिम चाले जोरात
५. श्रावणमासी हर्ष मानसी
या आणि इतर कितीतरी ....
मामी,यातल्या बहुतेक सगळ्या
मामी,यातल्या बहुतेक सगळ्या माझ्याकडे आहेत...
इथे टाकल्या तर चालतील का? म्हणजे प्रताधिकार वगैरे बाबी यायला नकोत.
वारुळ वारुळ्,मुंग्यांचे वारुळ पासून आणखी बर्याच आहेत.
प्रताधिकार काही वर्षांनंतर
प्रताधिकार काही वर्षांनंतर नाहिसा होतो ना? पण मायबोलीची पॉलिसी काय आहे हे पहायला हवे.
ही आम्हाला होती
ही आम्हाला होती पुस्तकात.
सर्वात्मका शिवसुंदरा
स्वीकार या अभिवादना ।
तिमिरातुनी तेजाकडे
प्रभु आमुच्या ने जीवना ॥
सुमनात तू गगनात तू
तार्यांमध्ये फुलतोस तू
सद्धर्म जे जगतामधे
सर्वांत त्या बसतोस तू ॥
चोहीकडे रुपे तुझी
जाणीव ही माझ्या मना
श्रमतोस तू शेतांमधे
तू राबसी श्रमिकांसवे॥
जे रंजले वा गांजले
पुसतोस त्यांची आसवे
स्वार्थाविना सेवा जिथे
तेथे तुझे पद पावना ॥
न्यायार्थ जे लढती रणी
तलवार तू त्यांच्या करी
ध्येयार्थ जे तमि चालती
तू दीप त्यांच्या अंतरी ॥
ज्ञानार्थ जे तपती मुनी
होतोस त्यांची साधना
करुणाकरा करुणा तुझी
असता मला भय कोठले ॥
मार्गावरी पुढती सदा
पाहीन मी तव पावले
सुजनत्व या हृदयामधे
नित जागवी भीतीविना ॥
नेटवरून साभार!
लाडकी बाहुली होती माझी
लाडकी बाहुली होती माझी एक,
मिळणार तशी ना शोधून दुसरया लाख.
किती गोरी गोरी, गाल गुलाबच फुलले,
अन ओठ जसे की अत्ताच खुदकन हसले.
झाकती ऊघडती निळे हासरे डोळे,
हासती केस ते सुंदर काळे कुरळे.
अंगात शोभला झगा रेशमी लाल,
केसावर फुलले लाल फितीचे फूल.
मी तिजसह गेले माळावर खेळाया,
मैत्रिणी म्हणाल्या साई सुट्यो हो या या.
मधली काही कडवी मला आठवत नाही.
किती शोध शोधली, कुठे न परी ती दिसली,
परतले घरी मी होऊन हिरमुसलेली.
स्वप्नात तिने मम रोज एकदा यावे,
हलवून मला हळू माळावरती न्यावे.
पाऊस ऊघडता गेले माळावरती,
गवतावर ओल्या मजला सापडली ती.
कुणी गेली होती गाय तुडवूनी तिजला,
पाहूनी दशा ती रडूच आले मजला.
मैत्रिणी म्हणाल्या काय अहाहा ध्यान,
केसांच्या झिपरया रंग ही गेला उडून.
पण आवडली ती तशीच मजला राणी,
लाडकी बाहूली माझी माझी म्हणूनी.
किती गोरी गोरी, गाल गुलाबच
किती गोरी गोरी, गाल गुलाबच फुलले,
अन ओठ जसे की अत्ताच खुदकन हसले.
हासती केस ते सुंदर काळे कुरळे.
झाकती ऊघडती निळे हासरे डोळे,
>>> हे असं आहे.
आणि ते 'लाल फितीचे फुल' आहे.
मस्तच कविता.
शाळेतल्या १० वर्षात पाठ
शाळेतल्या १० वर्षात पाठ झालेली पहिली कविता...ज्यामुळे कवितांची आवड निर्माण झाली ती कविता ...
ओळखलत का सर मला !
पावसात आला कोणी ?
कपडे होते कर्दमलेले, केसावरती पाणी.
क्षणभर बसला नंतर हसला , बोलला वरती पाहून
गंगामाई पाहुनी आली गेली घरट्यात राहून
माहेरवाशिन पोरीन सारखी चार भिंतीत नाचली
मोकळ्या हाती जाईल कशी
बायको मात्र वाचली
भिंत खचली चूल विझली होते नव्हते नेले
प्रसाद म्हणुनी पापण्यान मध्ये पाणी थोडे ठेवले
कारभारनीला घेउनी संगे सर आता लढतो आहे
पडकी भिंत बांधतो आहे , चिखल गाळ काढतो आहे
खिशा कडे हात जाताच हसत हसत उठला
पैसे नकोत सर मला जरा एकटे पण वाटला
मोडून पडला संसार जरी मोडला नाही कणा
पाठी वरती हाथ ठ्ठेऊन नुसते लढ म्हणा !
मी सहवीत असतानाचि माझ्या
मी सहवीत असतानाचि
माझ्या चन्दनि खोडाचा
मन्त्र झिजणे झिजणे
ऊणे लिम्पयला माझे
घालि सुगन्धाचे लेणे
झीज केशरि तयाचि
तप्त जीवा लागि उटी
आत उमले भावना
शान्त शीतल गोरटी
एक बहिणा बाइन्चि अरे खोप्या
एक बहिणा बाइन्चि
अरे खोप्या मधि खोपा
सुगरनिचा चान्गला
देखा पिलासाटी तिन
झोका झाडाले टान्गला
पिल निजलि खोप्यात
जसा झुलता बन्गला
जीव तिचा पिलामधि
जीव झाडाले टान्गला
कोणाला पुढ्चे आटवते का?
त्या दुरच्या, दुर ओसाड
त्या दुरच्या, दुर ओसाड जागी,
किडे पाखरांविण नाही कुणी,
हा भुमिका भाग आहे अभागी,
इथे एक आहे समाधी जुनी....
विध्वंसला काळ मंदावलेला
उदासीन वारा इथे वाहतो,........................
कोणाला पुर्ण कविता आठवत असेल तर क्रुपया इथे द्या.
मामी धन्यवाद . दुरुस्ती
मामी धन्यवाद . दुरुस्ती केलेय.
तळ्याकाठी गाती
तळ्याकाठी गाती लाटा,
लाटांमध्ये उभे झाड,
झाडावर धीवराची
हाले चोच लाल जाड ||१||
शुभ्र छाती, पिंगे पोट,
जसा चाफा यावा फुली,
पंख जणु थंडीमध्ये
बंडी घाले आमसुली ||२||
जांभळाचे तुझे डोळे,
तुझी बोटे जास्वंदीची,
.....
.... ||३||
...
...
पाण्यावर उडताना
नको मारु मात्र मासा..||४||
मधल्या ४ ओळी आत्ता आठवत नाहीयेत.. नंतर टाकेन.
सुंदर धागा! विस्म्रुतीत
सुंदर धागा! विस्म्रुतीत गेलेल्या बालपणीच्या कविता (आणि बालपणही !) आठवायला लागले ! धन्यवाद!
मी फक्त वाचून मनापासुन पतिसाद देउ शकते. चालेल ना?
गाई पाण्यावर काय म्हणूनी
गाई पाण्यावर काय म्हणूनी आल्या---------- कवी बी.
इथेही बघा. बर्याच कविता आणि
इथेही बघा. बर्याच कविता आणि धडे मिळतील. त्या बाफाच्या माळ्यावर बांधून टाकलेले गठ्ठे (अर्काईव्हज्) आहेत तेही बघा.
http://www.maayboli.com/hitguj/messages/46/4554.html
रे हिंदबांधवा...
रे हिंदबांधवा...
(No subject)
(No subject)
(No subject)
घरटा -- बालकवी
घरटा -- बालकवी
उरलेल्या कविता नंतर...
उरलेल्या कविता नंतर...
(No subject)
मोनाली, चिंगी, आठवतायत या
मोनाली, चिंगी, आठवतायत या कविता!
मोनाली, ही समाधी कविता मी सुद्धा केव्हाची शोधत्ये. कोणाला पूर्ण माहिती असेल तर टाका
मी ही कविता कृपया इथे! कोणाची आहे ही कविता, माहित्ये का?
चिंगी, ही खंड्या कविता चौथीच्या पुस्तकात होती.
शेवटच्या कडव्याच्या पहिल्या २ ओळी अश्या :
गड्या पाखरा तू असा
सारा देखणा रे कसा
पाण्यावर उडताना
नको मारू मात्र मासा!
कवी कोण माहित्ये का?
डॉ, 'गाई पाण्यावर' मध्ये
डॉ, 'गाई पाण्यावर' मध्ये दुसरं आणि तिसरं कडवं आहे ना.
उष्ण वारे वाहती नासिकात, गुलाबाना सुकविती काश्मिरात
नंदनातील हलविती वल्लरीला, कोण माझ्या बोलले छबेलीला
विभा, विमला, आपटे, प्रधानांच्या, अन्य कन्या श्रीमान कुलिनांच्या
गौर चैत्रीची तशा सजुन येती, रेशमाची पोलकी चीटे नेती
(अगदी लहान असल्यापासून आई आम्हाला झोपवताना हे गाणे म्हणायची.)
गंमत म्हणजे या कविता आठवताना,
गंमत म्हणजे या कविता आठवताना, त्या शिकवलेल्या बाईंच्या पण आठवणी येताहेत. खुपच छान वाटतं.
काही आणखी. पूर्ण आठवत नाहीयेत. कोणाकडे असतील तर टाका.
१. आता उजाडेल
खिन्न आंधळा अंधार आता ओसरेल पार
लहरीत किरणांच्या कलाबतु मोहरेल
२. कारभारणी आण, माझं न्ह्यारीचं पान
भाकरीला पटणी, मजेदार चटणी, संग हिरवा कांदा अन मिरचीचा चेंदा
उष्ण वारे वाहती नासिकात,
उष्ण वारे वाहती नासिकात, गुलाबाना सुकविती काश्मिरात
नंदनातील हलविती वल्लरीला, कोण माझ्या बोलले छबेलीला
विभा, विमला, आपटे, प्रधानांच्या, अन्य कन्या श्रीमान कुलिनांच्या
गौर चैत्रीची तशा सजुन येती, रेशमाची पोलकी चीटे नेती
अरेच्या,ही दोन कडवी राहिलीच.
तुम्ही लिहिलेल्या कविता असाव्यात बहुधा.
>>> गौर चैत्रीची तशा सजुन
>>> गौर चैत्रीची तशा सजुन येती, रेशमाची पोलकी चीटे नेती <<<
मामी आणि डॉ. गायकवाडसर
> वरील ओळ "गौर चैत्रीची तशा सजुन येती, रेशमाची पोलकी छिटे लेती" अशी आहे.
विभा विमला या ललना किंवा मुलींनी घातलेली रेशमी पोलकी चमचमत होती. "छिट = चमकणे" या अर्थाने.
पहिलिची एक फुलपाखरु छान किति
पहिलिची एक
फुलपाखरु छान किति दिसते !
फुलपाखरु छान किति दिसते !
या वेलीन्वर, फुलान्बरोबर
गोड किती हसते
फुलपाखरु छान किति दिसते !
डोळे बारीक , करीती लुकलुक
गोल मणी जणु ते
फुलपाखरु छान किति दिसते !
पन्ख चिमुकले, निळे जाम्भळे
<<<<<<<<<<<<<<
फुलपाखरु छान किति दिसते !
मी धरु जाता, येइ ना हाता
दुरच ते पळते
फुलपाखरु छान किति दिसते !
मध्लि एक ओळ आठ्वत नहि
देवा तुझे किती |सुंदर
देवा तुझे किती |सुंदर आकाश|
सुंदर प्रकाश |सूर्य देतो||
.....................
......................
तशी आम्ही सुंदर |मुले तुझी||
Pages