कोहळ्याचे चौकोनी तुकडे दोन कप
अर्धा कप ओले खोबरे
४-५ हिरव्या मिरच्या
१ चमचा च डाळ, १ चमचा तीळ, १/२ चमचा जिरे
.अर्धी वाटी घट्ट दही - जरासे आंबट असावे.
फोडणी साठी मोहरी, हिंग , सुक्या मिरच्या कढीपत्ता
कोहळ्याचे तुकडे, हळद मीठ घालून थोड्या पाण्यात शिजत लावावेत.
चमचाभर खोबरेल तेलात मिर्च्यांचे तुकडे परतून घ्यावेत. मिर्च्या बाजूला काढून च डाळ, तीळ व जिरे परतून घ्यावे.
मिरच्या व खोबरे बारीक वाटावे. शेवटी च डाळ, जिरे व तीळ घालून ३० सेकंद वाटावे.
कोहळा शिजला की वाटण व दही घालावे. लागेल तसे मीठ घालावे. एखादी उकळी येऊ द्यावी, दही घातल्यावर फार उकळू नये.
आवडत असल्यास खोबरेल, नाहीतर साध्या तेलावर मोहरी , हिंग हळद , सुक्या मिरच्या, कढीपत्ता यांची फोडणी करून भाजीत ओतावी.
कोहळा, तवशे, मोठी काकडी इत्यादी ( कोकणीत उदुकुळी - पाणीदार ) भाज्यांचा हा टिपिकल प्रकार. दुधी, झुकिनी, स्क्वाश वगैरे घालून पण करता येईल.
मज्जिगे म्हणजे ताक, पण या भाजीत दहीच घालतात, तरी मज्जिगे हुळी का म्हणतात कोण जाणे !
मेधा, छान वाटते आहे कृती.
मेधा, छान वाटते आहे कृती. थोडा अवियल सारखाप्रकार आहे ना? इथे कोहळा मिळाला नाही तर अजून काय (काकडी सोडून) वापरता येईल? आणि पाककृती सार्वजनिक करशील का?
छान रेसीपी. कोहळ्याची भाजी,
छान रेसीपी. कोहळ्याची भाजी, कोहळे घलून कढी पण अशीच करते आई. तवश्याची पण करायला सांगते आता.
मी खाल्लाय हा प्रकार. खोबरेल
मी खाल्लाय हा प्रकार. खोबरेल तेलाने छान चव येते.
वा वा, बंगलोरात खायचे मी
वा वा, बंगलोरात खायचे मी बर्याचदा हा प्रकार.... मला नाव वाचून आधी मठ्ठ्याचा अजून एखादा प्रकार असावा असे वाटले होते.
मेधा, कोहळ्या ऐवजी झुकिनि
मेधा, कोहळ्या ऐवजी झुकिनि वगैरे चालेल का?
तवशे- म्हणजे काय? धन्यवाद
तवशे- म्हणजे काय?
धन्यवाद मेधा.
वेगळाच प्रकार आहे. कधी
वेगळाच प्रकार आहे. कधी ऐकला/खाल्ला नाही.
अरे वा! मला ताक/दह्यातले
अरे वा! मला ताक/दह्यातले प्रकार भारी आवडतात, तेव्हा नक्की करून बघणार.
>> पाणीदार भाज्यांचा हा टिपिकल प्रकार.
अंजली, म्हणजे दुधी भोपळा, यल्लो स्क्वाश, दोसाकाई (हे इन्ग्रोत मिळतं), कलिंगडातला पांढरा गर वगैरेंची करता येईल बहुतेक.
हे कानडी नाव आहे ना? मला पण
हे कानडी नाव आहे ना? मला पण मज्जगी ताकाला म्हणतात माहित आहे. हुळी म्हणजे काय?
मेधा, छान आहे हा प्रकार.
मेधा, छान आहे हा प्रकार. फार्मर्स मार्केटमधे कोहळा मिळतो आणुन करावे लागेल.
तवशे म्हणजे सांबार काकडी ना? त्याचे सांबार नेहेमीच्या सांबारपेक्षा वेगळे असते असे कळले. मी नेहेमीच्या सांबारातच ती काकडी घालते कधीकधी. तुला ते सांबार ठावूक असेल तर रेसिपी देशील का?
तवसं असे असते http://en.wikipedia.org/wiki/File:GNTdosakai.jpg
अंजली_१२, हुळी म्हणजे आंबट!!
हुळी म्हणजे आंबट!!>>> हुळी
हुळी म्हणजे आंबट!!>>> हुळी म्हणजे आमटी/सांबार हो !
हुळी हा शब्द आंबट अशा अर्थाने
हुळी हा शब्द आंबट अशा अर्थाने पण वापरतात बहुतेक बिसीबेळे हुळी अन्ना ( ज्याला शुद्ध मराठीत भिशीब्याळी अण्णा म्हणतात ) त्याचा अर्थ गरम ( बिसी ) डाळ ( बेळे ) हुळी ( आंबट ) भात ( अन्ना) असा होतो. कैर्या , चिंचा हुळी आहेत का नाहीत वगैरे अर्थाने वापरला जातो.
ए, फोटो टाक गं! पहिल्यांदाच
ए, फोटो टाक गं! पहिल्यांदाच ऐकला हा पदार्थ! पहायची खुप इच्छा आहे....
हुळी म्हणजे आंबट!!>>> हुळी
हुळी म्हणजे आंबट!!>>> हुळी म्हणजे आमटी/सांबार हो ! स्मित >> नक्कीच नाही. हुळी म्हणजे आंबटच! कानडी शब्द आहे.
फोटो टाकल्यास अजून कल्पना
फोटो टाकल्यास अजून कल्पना येइल.. बहुतेक काकडी वापरलेला असलाच पदार्थ मी खाल्लाय.
घरी विचारल्यावर कळलंय की हुळी
घरी विचारल्यावर कळलंय की हुळी हा शब्द आंबट म्हणुन पण वापरतात अन पातळसर आमटी सारख्या पदार्थांना पण वापरतात. भेंडी, फरसबी, कच्ची केळी, वगैरे घालून पण हुळी करतात. सर्वसाधारणपणे यात डाळ नसते.
मस्त आहे कृती.
मस्त आहे कृती.
छान लागतो हा प्रकार. इथे ९९
छान लागतो हा प्रकार. इथे ९९ रँच मार्केटमध्ये कोहळा मिळतो.
आज केला हा प्रकार, भात आणि
आज केला हा प्रकार, भात आणि पापडासोबत छान लागला पण पाणी थोडं जास्त झालं होतं बहुतेक.
मस्त कृती. नेहमीपेक्षा वेगळी
मस्त कृती. नेहमीपेक्षा वेगळी म्हणून करून बघेन नक्की!