लेकानं केलेली कविता

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

'मराठी भाषा दिवस'निमित्ये लेकानं कविता केली होती. 'मायबोली'च्या उपक्रमाअंतर्गत ही कविता 'बालकवी'मध्ये द्यायची असेही ठरले होते. पण ऐनवेळी बरेच घात झाले आणि ही कविता त्या उपक्रमास वेळेत देता आली नाही. म्हणून ही आता इथे देत आहे.

कवितेतल्या सर्व कल्पना लेकाच्या आहेत. मी काही ठिकाणी यमकं जुळवायला मदत केली आहे. त्याचे मराठी शुद्धलेखन म्हणजे शुद्ध भाषेत सांगायचं तर बोंब आहे! Proud पण मी मुद्दामच त्यात बदल/ सुधारणा नाही केले. काही अवघड शब्द जसे की एल्ड्रॅगो, सॅजिटेरिओ वगैरे (ही विविध बेब्लेड्जची नावं आहेत) मी पाटीवर लिहीले आणि त्याने ते बघून उतरवलेत. त्यातही परत काही चुका आहेतच! Uhoh

कविता आवडली तर जरूर लिहा. त्याला प्रतिसाद पाहून हुरूप येईल. धन्यवाद Happy

kavita.JPG

प्रकार: 
शब्दखुणा: 

समग्र नीक, कार्टून नेटवर्क Proud

मस्त आहे नचिकेत तुझी कविता, मला आवडली. मी एन्जॉय केलीच पण माझ्यापेक्षा जास्त एन्जॉय सानिका करेल जेव्हा मी तिला वाचून दाखवेन Happy

@पूनम, "आई जोरात मारते हाका" मधला "हाका" शब्द तू सुचवलास ना? त्याला मारते हाच शेवट करायची इच्छा असणार बहुतेक Wink Proud

जरा स्वच्छ शब्दात, तीच कविता Happy

माझे आवडते कार्टून

मला पहायला आवडतात कार्टून
पाहताना मी जातो रंगून

टॉम अ‍ॅन्ड जेरी हसवतात
आई-बाबांनाही आवडतात
जेरी काढतो टॉमच्या खोड्या
टोम शोधतो फसवायची idea
जेरी नेहमी सटकतो
टॉमच त्यात अडकतो
दोघेही सतत भांडतात
कधी कधी मित्रही बनतात

भीम आहे ताकदवान
राजूची तलवार फार बलवान
जग्गू मारतो कोलांट्या उड्या
चुटकीच्या काढतो खोड्या
भीम ढोलकपूरला वाचवतो
राजा त्याला शाबासकी देतो
(छोटा भीम म्हणून एक कार्टून आहे. महाभारतातल्या भीमाशी ह्याचा संबंध नाही Happy भीम अडचणीत सापडलेल्या राजाला साहसाने नेहेमी वाचवतो असं टिपिकल कार्टून आहे)

बेब्लेड बेब्लेड हो जाय शुरू
एक दोन तीन म्हणत गंमत शुरू
जिंगा, क्योयो, बेन्टो, केन्टा
बेब्लेड सोडतात सटासटा
पेगसिस, लिऑन, एल्ड्रॅगो, सॅजिटेरियो
स्टेडियममें आजाओ
जिंगा नेहेमी जिंकतो
कॅन्टा नेहेमी हरतो
पण ऐका!
बेब्लेड जास्त खेळू नका
आई जोरात मारते हाका.

छान लिहिलीय गं कविता. नचिकेत, तुला एक मोठ्ठे कॅडबरी सिल्क या कवितेसाठी.

या कवितेतले कार्टुन नेटवर्क पाहायला पाहिजे एकदा... Happy एवढी जम्माडी गंमत असते त्यात माहित नव्हते.

आँ. एवढे सगळे असते कार्टुनात ते तुझ्यामुळे कळले रे नचिकेत.
शाब्बास. मस्त कविता करतोस रे तू.
नेहमी करत जा आणि आईला इथे टाकायला सांग. Happy

कविता! Proud सानूला आवडली का ते कळव Happy (आवडेलच ;))

बाप्रे! बेब्लेड प्रकार झिणझिण्या आणणारा आहे (आपल्याला)! ती नावंसुद्धा किती अवघड आहेत (लिहायला!) मुलं तल्लीन होऊन खेळत असतात. सर्व मुलग्यांकडे बेब्लेड आहेच. मी एकदा वैतागून त्याला विचारले, की कोणाकडे बेब्लेड नाहीये तुझ्या माहितीत, सांग बरं, तर खूप विचार करून म्हणाला, 'गर्ल्सकडे' Happy कमाल म्हणजे ह्याच खेळाची फॅशन माझा भाचा लहान असताना, म्हणजे साधारण ८-९ वर्षांपूर्वीही आली होती आणि तेव्हाही अशीच क्रेझ होती! Uhoh

सगळ्यांचे आभार. संध्याकाळी नक्की वाचून दाखवेन सर्व प्रतिसाद Happy

शाब्बास नचि!! झक्कास कविता. मला खूपच आवडली.

पूनम, त्याचं मराठी आणि इंग्रजी अक्षर खूप छान आहे. आणि इतक्या लवकर त्याने सराईतपणे मराठी लिहावं अशी अपेक्षाही नाही. कवितेतून त्याचा निरागसपण पुरेपूर उतरलाय. एक छोट्टासा मुलगा अगदी गोड चेहर्‍याने आपल्याला आवडणार्‍या कार्टूनांविषयी बोलतोय हे माझ्या डोळ्यांसमोर आलं. Happy

बेब्लेड काय असतं? Uhoh

शाब्बास नचिकेत. छान लिहिलियेस कविता.:)

मला यातलं एक टॉम अँड जेरी सोडलं तर दुसरं कोणतंच कार्टून माहित नाहीये. एखादा दिवस कार्टून नेटवर्क लावून बसावं लागणार बहूतेक.

छान Happy

शाब्बास नचिकेत, मस्त लिहिलीयेस कविता.
अगदी ग पूनम, बेब्लेडची पुन्हा खूप साथ आहे सध्या Wink सगळे मुलगे 'हो जाये शुरु' करत असतात आणि मुलींना त्यात अज्जिबात इंटरेस्ट नसतो.

शाब्बास नचिकेत! माझ्या भाच्यांना आवडणारी कविता.... कार्टून नेटवर्क म्हणजे जीव की प्राण आहे नुसता.... त्यांना देखील तुझी कविता वाचायला देईन हां!

रच्याकने : सध्या बालसमुदायात सोनी वरची सी आय डी सीरियल अतिशय लोकप्रिय आहे. माझी भाचे मंडळी ती सीरियल, तिचे री-रन्स तासंतास बघू शकतात, त्यावर गप्पा मारू शकतात, आणि आता तर ते सी आय डी - सी आय डी खेळत असतात. एक जण दया होतो, एक अभिजीत इ. इ. आणि जिकडे तिकडे पुरावे शोधत हिंडत असतात!!! Uhoh

छान कविता नचिकेत.
अक्षराचं वळण पण छान आहे.
शुद्धलेखन पूनम घेईलच करून योग्य वेळी.. Happy
वेळेत का नाही गं टाकलीस. खट्टू झाला असेल ना त्यामुळे नचि?

नचीकेत ...भारी आहे... Happy टॉम आणी जेरी लहान मुलांबरोबर मोठ्ठ्यानाही आवडत हे आणी वेब्लेड बाबतच निरीक्षण मस्तच रे...

२४/७ तुम्ही फक्त निक पाहता का? नचिकेतची कविता १दम मस्त जमलीये Happy
पण पौर्णिमा, तुझे डोके कसे काय गरगरत नाही ग?
ह्याच खेळाची फॅशन माझा भाचा लहान असताना, म्हणजे साधारण ८-९ वर्षांपूर्वीही आली होती आणि तेव्हाही अशीच क्रेझ होती!>>> अगदी मला ८वते आहे. आपला भोवरा यांना नाही जमत पण ते बेब्लेड मात्र आवडते.

आता तर ते सी आय डी - सी आय डी खेळत असतात. एक जण दया होतो, एक अभिजीत इ. इ. आणि जिकडे तिकडे पुरावे शोधत हिंडत असतात>>> हा १ भयानक प्रकार. दया, अभिजीत ठीके, पण किलर कोणाला करतात? Happy

मी लेकानं म्हटल्यावर गोंधळलो
त्या एवजी माझा लेक त्याची कविता अस छान वाटलं असत

कविता छान आहे

Pages