लेकानं केलेली कविता

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

'मराठी भाषा दिवस'निमित्ये लेकानं कविता केली होती. 'मायबोली'च्या उपक्रमाअंतर्गत ही कविता 'बालकवी'मध्ये द्यायची असेही ठरले होते. पण ऐनवेळी बरेच घात झाले आणि ही कविता त्या उपक्रमास वेळेत देता आली नाही. म्हणून ही आता इथे देत आहे.

कवितेतल्या सर्व कल्पना लेकाच्या आहेत. मी काही ठिकाणी यमकं जुळवायला मदत केली आहे. त्याचे मराठी शुद्धलेखन म्हणजे शुद्ध भाषेत सांगायचं तर बोंब आहे! Proud पण मी मुद्दामच त्यात बदल/ सुधारणा नाही केले. काही अवघड शब्द जसे की एल्ड्रॅगो, सॅजिटेरिओ वगैरे (ही विविध बेब्लेड्जची नावं आहेत) मी पाटीवर लिहीले आणि त्याने ते बघून उतरवलेत. त्यातही परत काही चुका आहेतच! Uhoh

कविता आवडली तर जरूर लिहा. त्याला प्रतिसाद पाहून हुरूप येईल. धन्यवाद Happy

kavita.JPG

प्रकार: 
शब्दखुणा: 

फारच छान!! खोड्या आणि idea असे दोन वेगवेगळ्या भाषेतले शब्द वापरून यमक जुळवायचे म्हणजे ग्रेटच!!

Lol भारी कविता आहे. खोड्या-आयड्या यमक फार्फार आवडले.

बेब्लेड प्रकार झिणझिण्या आणणारा आहे >>> हे मात्र खरं आहे. आमचे चिरंजीव आता त्यातून बाहेर पडलेले आहेत पण ४-५ वर्षांपूर्वी वीट आला होता त्या 'थ्री-टू-वन, हो जा शुरू'चा. केसांची शिप्तरं कपाळावर वागवणारी त्या कार्टूनमधली मुलं पाहून त्यांना २०-२० रुपये देऊन आधी न्हाव्याकडे घेऊन जायला हवं असं वाटायचं मला !! :बेब्लेडच्या नुसत्या आठवणीने कपाळावर आठ्या पडलेली आईरूपी बाहुली: Proud

पण का ?? का ???? त्याला असं काही करायला लावतेस इतक्या लहानपणी ? >>> पराग, Rofl हे बाकी खरं...

नचिकेत तुझ नेटवर्क लय भारीयं... आवडल आपल्याला... आमच्या वेळी आस काय नव्हत बुवा

आपला भोवरा यांना नाही जमत पण ते बेब्लेड मात्र आवडते.> भोवरा फिरवायला लय स्कील लागतं... सहजा सहजी जमत नाही... रच्याकने ज्यांना बेब्लेड परवडत नाही ते सर्रास भोवरा खेळताना दिसतात.. आणि आपल्या भोवर्‍यानी दुसर्‍याचा चालू असलेला भोवरा फोडायचा.. बाबांच्या ऑफिसच्या इथे फारच जोरात चालतो हा प्रकार..

नचिकेत, एकदम मस्त मोठ्ठी कविता केली आहेस.खूप खूप आवडली.भरपूर कविता कर.
पूनम,किती वर्षांचा आहे नचिकेत? फारच सुंदर कविता करतो आहे.तुझे सुद्धा अभिनंदन.Keep it up.

क्या बात है नचिकेत Happy मस्त झालीये तुझी कविता.
अक्षर पण एकदम बढिया !!
अशा छान छान कविता करत रहा Happy

मनापासून धन्यवाद मंडळी! Happy काल रात्री त्याने बरेचसे प्रतिसाद वाचले. बर्‍याच लोकांना तो प्रत्यक्षही ओळखतो, त्यामुळे त्यांनी प्रतिक्रिया दिली हे पाहून जास्तच खुश झाला Happy प्रोत्साहनासाठी खूप खूप आभार!

अप्रतिम यार............................जबरदस्त आहे रे..................
चल गुरु.......................हो जा शुरु...........

कविता एकदम भारी आहे Happy
कार्टुन नेटवर्क पहात नाही त्यामुळे बरेच शब्द आणि कॅरेक्टर्स झेपले नाहीत.
पन नचिचे अभिनंदन! Happy

ऑ, हे कसं काय निसटलं इतके दिवस? Uhoh
भारी रे नचिकेत! मस्त मस्त. पूनम, मुलांच्या प्रचंड जिव्हाळ्याच्या विषयावर मुलानेच केलेली कविता ही कल्पनाच फार आवडली.
आणि आमच्याकडे गर्ल्स असूनही बेब्लेड आहेत रे..! Happy

मस्त....शाब्बास नचिकेत ! छान कविता केली आहेस. Happy
टॉम अ‍ॅण्ड जेरी आमच्याइथे जीव की प्राण आहेत.
छोटा भीमसुद्धा खूप लाडका आहे. वेब्लेड अजून नाहीत....हुश्श Proud

Pages