सात घडीची पोळी

Submitted by दिनेश. on 27 February, 2011 - 14:17
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

क्ष

क्रमवार पाककृती: 

क्ष

वाढणी/प्रमाण: 
३ रोट्या होतील
अधिक टिपा: 

क्ष

माहितीचा स्रोत: 
वर लिहिलेय ते स्वाती हॉटेल.
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पण ह्याच्यात घड्या कुठे आहेत ???? हे तर थर आहेत...
घरी ज्या घडीच्या पोळ्या म्हणून करतात.. त्यात प्रॉपर घड्या घालतात की... आधी अर्धी मग अजून अर्धी आणि मग लाटतात.. ज्यामुळे पोळीला ३ पापुद्रे सुटतात..

पग्याला अनुमोदन. दोन, तीन आणि चार घडीच्या पोळ्या माहिती आहेत. शिर्षकावरुन वाटलं की तशाच सात 'घडी'च्या पोळ्या आहेत की काय.

हे बघा ! एवढी चांगली पाकृ दिलीय ते बघायच राहिलच बाजुला .
ह्यालाच म्हणतात नाचता येईना अंगण वाकडं.

<<< एकंदर सुगरणपणा ज्यादिवशी दाखवायचा असेल, त्यादिवशी या रोट्या करायच्या !! >>> दिनेशदा प्रचंड अनुमोदन.

Hmm..मलाही पग्या आणि सिंडी सारख घड्या घालून पोळी असेल असं वाटलं..

बाजिंदा,
नाचता येइना अंगण वाकडं काय त्यात, रेसिपीचं नाव पाहून जे वाटलं ते पोचवलं दिनेशदां पर्यंत !

दिनेशदा, रेसिपी आवडली....

रेसिपीला "सात पदरी पोळी" म्हणा.. हाकानाका... आपल्याला खाण्याशी मतलब Happy

३ लेयर्स ची आधी करेन म्हणत्येय Happy मग जरा कॉन्फीडन्स आला की ५ आणि ७ लेयर्स Happy

लाजोला अनुमोदन.

मस्त प्रकारे हा. मी करणार. आतून यालाही पापुद्रे सुटतीलच ना. फारतर प्रत्येक लेयरवर तेलाचा एक हात फिरवा म्हणेज पापुद्रे व्यवस्थित सुटतील आणि पोळी खुसखुशीत लागेल.

कृती छानच. कधीतरी जरा वेगळा प्रकार म्हणून करून बघायला हरकत नाही.

पण शिर्षकावरून मात्र पग्या, सिंडीशी अगदी सहमत.

पराग. सिंसरेला हे नाव त्या स्वाती हॉटेलचं आहे.
बाय द वे पराग दोन घड्या घातल्या कि माझ्या चपातीला ४ (३ नाही) सूटतात. सिंडरेला ने सांगितलेल्या ४ घडीच्या पोळ्या (म्हणजे ८ पदर असलेल्या ना ? कि १६ ?) कशा करायच्या ? ७ पदर सूटण्यासाठी साडेतीन घड्या घालाव्या लागतील, का आणखी किती ? त्या कशा घालायच्या ? आणि सिंडरेला, पेन्सिल भाजीत, पेन्सिली कुठे होत्या ?

हो मामी, हलक्या हाताने लाटली तर याला सात पापुद्रे व्यवस्थित सूटतात.

मस्तच एकदम....

माझे पोळीप्रकारातील कौशल्य लक्षात घेता दोन कणकेच्या लाट्या आणि मध्ये एक बेसनची लाटी एकावर एक एवढेही भारी पडेल Happy तेवढेच करुन पाहिन आधी.

दिनेशदा,
फार छान रेसिपि आहे. प्रवासासाठी उत्तम पर्याय वाटतो आहे. ह्याच्या मधे आपण सुचवल्याप्रमाणे थोड्या भाज्या किंवा पालेभाज्या घातल्या तर फारच छान. २ दिवस तरी उत्तम टिकतील. हिंग जिरे आहेच पण डाळीचे पिठ असल्यामुळे थोडा ओवा घातला तर पचनासाठि आणिक उत्तम. दह्याबरोबर पण मस्त लागेल.

पेन्सिल भाजीत, पेन्सिली कुठे होत्या ? >> हा हा तीर बसला हां बरोबर दिनेश. Wink

दिनेश तुम्ही 'थराच्या पोळ्या' नाव द्या हो. नाहितर काही लोकं नावावरूनच अनेक थराच्या पोष्टी पाडतील. Happy

आणि काय आहे ना, आम्ही आमच्या रेसीपीला पाहिजे ते नाव देवू, पण तुमच्या रेसीपीला नावं ठेवायला येवू. Wink

ध्वनी तै लई भारी..
अवो दिपांजली तुम्ही मेंदीला मेहंदी म्हणता तरी पण आम्ही तुमच्या कलेचं कौतुक करायलाच येतो, टोमणे मारायला नाही.

अरेच्या,
' मेंदीला मेहेंदी का म्हणता ' हा प्रश्न विचारला असता तर नॉर्मल च उत्तर दिलं असतं, साधा प्रश्नं आहे ...टोमणा काय त्यात ?
तसाच शीर्षकावरून वेगळी पध्द्त वाटली लिहिण्यात कसला टोमणा ? Uhoh

>>रेसिपीला कोणी नावं ठेवलीयेत ?<<
मी कुठे म्हटले कोणी नावं ठेवलीत? मी दिनेश ह्यांना सुचवले असे 'नावं ठेवा' रेसीपीचे म्हणजे लोकांचा गोंधळ नको. म्हणून म्हटले तुमच्या रेसीपीला नावं ठेवायचे/द्यायचे काम करतो.
दिपांजलीताई, तुम्ही कशाला वाईट अर्थ काढताय 'नावं ठेवणे' वरून. नावं ठेवणे म्हणजे काय वाईटच असते का? Happy

मस्त आहे. लहान मुलांनसाठि छान आहे. ह्या वेगवेगळ्या रंगाच्यापण करता येतील. एक थर बीटाचा, एक पालेभाजीचा वैगरे...मस्त. करुन बघणार नक्की.

>>बाय द वे पराग दोन घड्या घातल्या कि माझ्या चपातीला ४ (३ नाही) सूटतात. सिंडरेला ने सांगितलेल्या ४ घडीच्या पोळ्या (म्हणजे ८ पदर असलेल्या ना ?) कशा करायच्या ? ७ पदर सूटण्यासाठी साडेतीन घड्या घालाव्या लागतील. त्या कशा घालायच्या ? आणि सिंडरेला, पेन्सिल भाजीत, पेन्सिली कुठे होत्या ?>>ह्या साठी well said.... Happy

देवरुखातल्या मातृमंदिराच्या हळबे मावशींची 'सात घडीच्या पोळ्या' ही खासियत होती. काही कामानिमित्त कोकणात आलेल्या दुर्गाबाई भागवत खास ह्या पोळ्या शिकण्यासाठी हळबे मावशींकडे देवरुखात आल्या होत्या.

या पाककृतीचं शीर्षक वाचून मलाही त्याच 'सात घडीच्या पोळ्यां'ची पाककृती लिहिली आहे की काय असंच वाटलं. असो.
घडीच्या पोळ्या करायला वेळ लागतो म्हणून मी फुलके करते, मग ह्या सात थराच्या पोळ्या करायच्या तर मग माझ्यासाठी प्रोजेक्टच Happy

मंजूडी, मला वाटते दूर्गाबाईंनी याच प्रकाराबद्दल लिहिले होते. म्हणजे एकावर एक पेढे ठेवून. आणखी काही वेगळा प्रकार आहे का या घड्यांचा ?

आपण त्रिकोणी पराठ्याला ज्या दोन घड्या घालतो त्याने चार पदर सुटतात, त्याला आणखी एक घडी घातली, तर आठ पदर होतील. सातचा हिशेब काही लागत नाही.

मालवणला सातकापे घावण म्हणून एक प्रकार करतात, पण तो वेगळा असतो.

देवरुखातल्या मातृमंदिराच्या हळबे मावशींची 'सात घडीच्या पोळ्या' ही खासियत होती. काही कामानिमित्त कोकणात आलेल्या दुर्गाबाई भागवत खास ह्या पोळ्या शिकण्यासाठी हळबे मावशींकडे देवरुखात आल्या होत्या. .
>> हो.. हेच लिहायला आलेले की दुर्गाबाईंच्या पुस्तकात मी पहिल्यांदा आठघडीच्या पोळ्यांची कृती वाचलेली..

दिनेश दा.. मस्त पाककृती आहे ही.. उद्याच ट्राय करणार नक्की..
मी असे साधे लच्छा पराठा करतांना प्रत्येक थरावर तेलाचा हलका हात आणी कोरडी पिठी भुरभुरते( आमच्या मुस्लिम कुक्ची ही ट्रिक) ..त्यामुळेही पापुद्रे सुटतात.. आता तुमची रेसिपी पण फॉलो कर्णार्..आणी सुगरणपणाचा नमुना आधी फक्त माझ्यासमोरच सादर करणार,,, Proud

मालवणला सातकापे घावण म्हणून एक प्रकार करतात, पण तो वेगळा असतो.

मस्त असतो हा प्रकार...

आधी घावणाच्या बीडावर पुर्णचंद्रासारखे घावन घालायचे, मग घावण बीडावर असतानाच त्याच्या अर्ध्या भागावर खोबरे+गुळ्+वेलचीचे मिश्रण पसरायचे, उरलेला अर्धा घावण त्या मिश्रणावर कलथ्याने आच्छादायचा. मग बीडावर रिकाम्या झालेल्या अर्ध्या भागात घावणाचे मिश्रण ओतुन तिथे घावण तयार करायचा. शिजला की त्या भागावर परत खोबरे+गुळ्+वेलचीचे मिश्रण घालायचे. पहिला अर्धा भाग (खोबरे+गुळ्+वेलचीच्या मिश्रणासकटचा) ह्या नविन भागावर पलटवायचा. मग रिकाम्या जागी परत घावण घालायचे.... आपल्याला जेवढे उलटवायला जमते तेवढे उलटवत घावण घालायचे. . हा प्रकार अफलातुन लागतो. खुप गोड होत असल्याने मी हल्ली करत नाही. पण its yummy.... आम्ही त्याला सातपाटीचे घावण म्हणतो. यथाशक्ती तिनपाटीचे, पाचपाटीचे असेही करता येतात.

आठघडी पोळी म्हणजे आपली साधी ४ घडी पोळी लाटायची. त्या पोळीला पुन्हा घड्या घालून परत पोळी लाटायचे. हे दुर्गाबाईंनी लिहिलेले वर्णन आहे.

माझ्या वडीलांच्या एक मावशी अशा पोळ्या कधी मधी करत असत. ह्या पोळ्या खुपच हलक्या हाताने लाटाव्या लागतात. तेल-पीठ लावून घड्या केल्याने वेगवेगळे पदर नीट वेगवेगळे रहातात असे त्या सांगत असत. नेहेमी पोळ्या करताना येवढे खेळत बसायला वेळ नसल्याने बर्‍याच वर्षात केल्या नाहीत. करून पाहेन असे तोंडदेखले म्हणावेसे वाटत नाही Happy

Pages